हा परशुराम होता तरी कोण ? हा यशवंत रायकर
यांचा दि. १४ ऑक्टोबरच्या अंकातील लेख आणि त्यावरील दि. २५ नोव्हेंबरच्या अंकातीलश्यामसुंदर गंधे यांची प्रतिक्रिया वाचली. धार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या
कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे. परशुराम हा
विष्णूच्या अवतारांपैकी एक. हा एकमेव विष्णूअवतार चिरंजीव मानण्यात आलेला आहे.
मुळात परशुरामाचा संबंध अनेक पिढ्यातील लोकांबरोबर आल्याचे दाखवले आहे. पुराणात
वर्णन केल्याप्रमाणे जर परशुरामाचे वय काढायचे म्हटले तर ते हजारो वर्षे होईल. आणि
हजारो वर्षे कोणतीही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
परशुरामाभोवती काल्पनिक आणि चमत्कारी घटनांची इतकी गुंफण करून ठेवली आहे कि
त्यामुळे परशुरामाचे खरे चरित्र समजणे फार अवघड आहे. त्यात रायकर यांनी लिहिल्याप्रमाणे
नरसंहाराचा...