उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते.
‘आद्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘पहिला’. ‘आद्य क्रांतिकारक’ म्हणजे ‘पहिला क्रांतिकारक’. प्रथम ज्याने सशस्त्र क्रांती सुरु केली असा क्रांतिकारक ‘आद्य क्रांतिकारक’ ठरू शकतो. ‘आद्य क्रांतिकारक’ एकच असू शकतो. दोन-दोन आद्य क्रांतिकारक असणे शक्य नाही. परंतु आपल्या इतिहासात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र क्रांती करणारे दोन-दोन आद्य क्रांतिकारक आहेत. एक आहेत उमाजी नाईक आणि दुसरे म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आता या दोघांनी सशस्त्र क्रांतीला एकत्रित सुरुवात केली असती तर या दोघानाही एकत्रितरीत्या आद्य क्रांतिकारक म्हणणे योग्य ठरले असते. परंतु या दोघांचाही कार्यकाल भिन्न आहे. तरीही या दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून कशी काय होवू शकेल ? यात मला कुणाचाही अवमान करायचा नाही. परंतु हे वास्तव आहे कि दोघांचीही मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून होवू शकत नाही.
त्यासाठी आपण जरा दोघांच्याही जीवनपट आणि कार्यकालावरून नजर टाकू.
![]() |
उमाजी नाईक |
उमाजी नाईक –
उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ साली पुणे भिवडी येथे झाला. उमाजी नाईक हे शिवरायांचे निस्सीम भक्त होते . शिवरायांनी ज्यापद्धतीने जुलमी, परकीय शक्तीविरोधात लढा उभारून स्वराज्य निर्माण केले तसेच स्वप्न उमाजी नाईक ही पाहत होते. इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्याबरोबर इंग्रजी सत्तेच्या विरोधात रणशिंग फुंकले. याकामी त्यांना विठूजी नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळकर आणि इतर सहकाऱ्यांनी बहुमोल मदत केली. इंग्रजांच्या खजिन्यावर धाडी टाकणे, तो गरिबांना वाटणे, इंग्रज सैन्याला सळो कि पळो करून सोडणे, प्रसंगी जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांना ठार कारणे अशा मार्गाने उमाजी नाईक यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. डिसेंबर १८३० ला त्यांनी इंग्रज सत्तेच्याविरोधात जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. इंग्रजांनी उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड धास्ती खाल्ली होती. परंतु काही फितूर लोकामुळे १५ डिसेंबर १८३१ रोजी अवघ्या ४१ व्या वर्षी उमाजी नाईक देशासाठी फासावर चढले.
वासुदेव बळवंत फडके -
![]() |
वासुदेव बळवंत फडके |
वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर १३ वर्षांनी म्हणजे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्य लेखा सेवेत नोकरीस होते. एकदा त्यांची आई आजारी असताना त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी रजा नाकारली. त्यामुळे ते आजारी आईला भेटायला जावू शकले नाहीत. जेव्हा ते आईला भेटायला गेले तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले होते. या प्रकाराने संतापून फडके यांनी इंग्रजी नोकरीचा राजीनामा दिला आणि इंग्रजाविरुद्ध संघर्ष चालू केला.
दोघांचाही कार्यकाल अभ्यासाला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात यायला हवी कि उमाजी नाईक यांच्या मृत्युनंतर तब्बल १३ वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. मग फडके यांच्या कितीतरी अगोदर उमाजी नाईक यांनी सशस्त्र क्रांती सुरु केली होती. मग आद्य क्रांतिकारक हा बहुमान उमाजी नाईक यांना मिळायला हवा. मात्र त्यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांची मांडणी आद्य क्रांतिकारक म्हणून केली जाते. त्यामुळे होते काय कि ज्या अर्थी वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत त्या अर्थी त्यांनी पाहिली सशस्त्र क्रांती सुरु केली. अर्थात त्यांच्या आधी कुणीही सशस्त्र क्रांती सुरु केली नाही. मग वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटल्याने उमाजी नाईकांचे कार्य-कर्तुत्व डावलले जात नाही का ? कि मुद्दाम त्यांना उपेक्षित ठेवण्यासाठीच असे प्रकार होतात ? अशाने खरा इतिहास समाजासमोर कसा येणार ?
या दोघांची तुलना केलेली अनेकांना आवडणार नाही. परंतु जर आपण उमाजी नाईक यांना डावलून वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणणार असू तर या दोघांचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. कारण ज्यांच्या हातात प्रचार-प्रसाराची माध्यमे आहेत ते जातीनिष्ठ इतिहास समाजाच्या माथी मारण्याचे प्रयत्न नेहमी करतात. आपला माणूस, आपल्या जातीचा माणूस सर्वश्रेष्ठ स्थानी पाहिजे ही वर्णवर्चस्वाची गुर्मी त्यांना असे करायला भाग पाडते. आपल्या समाजाबद्दल, आपल्या माणसांबद्दल सर्वाना आदर आणि अभिमान असणार आणि तो असायलाच हवा. परंतु त्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही दुसऱ्या जातीत जन्माला आलेल्या महामानवांची उपेक्षा करायची. महापुरुषांच्या नावाला आणि कर्तुत्वाला जातीचे परिमाण लावणे हे जितके चुकीचे तितकेच त्यांना जातीत बंदिस्त करून त्यांचा इतिहास लिहिणेही चुकीचे. मात्र इतिहास लिहितानाच अशा लबाड्या केल्या गेल्या असतील तर त्या दाखवून देताना जातींचे संदर्भ आले म्हणूण महापुरुषांच्या कर्तुत्वाला धक्का पोहचला असे कुणी मानू नये.
8 टिप्पणी(ण्या):
Jay Umaji Naik, umaji naik hech aadya krantikarak ahet. Bramhanani ugich tyache shrey vasudev balawant fadake yana denyacha prayatn kela ahe. Pan tumhi karat aslelya jagrutimule samajala saty samjat ahe. Umaji naik yanchya mrutyu nantar 13 varshani fadakecha janm zala asatana fadake aadya krantikarak kasa ? LOTS OF THANKS FOR SUCH EFFORTS.
EK UMAJI BHAKT...
kranti mhanaje sadya rajavati virudha kelela uthav. umaji naik chya kaalat marathi satta shillak hoti, ti kranti kashi tharu shakate? ki tyane marathi satte virudha kranti keli? ugach dishabhool kashala?
Jativadacha chashma kadhun ya donhi mahapurushanchya karyakade pahilyas koni lahan koni motha disnar nahi. Doghanni deshasathi kelelya balidanatun bodh gheun sadhyachya julmi Cobgress rajvativirudhh ladnyasathi sidhh vha !
@एक जाग्रुत हिंदू.....
तुम्ही मला जे सांगताय ते मान्य आहे. परंतू आधी उमाजीला उपेक्षित कुणी ठेवले, वासुदेव बळवंत फडकेंची आद्यक्रांतीकारक म्हणून मांडणी करताना उमाजीला का दुर्लक्षिले ते सांगा. तुम्ही उघड उघड जातीयवाद करायचा आणि आम्ही उमाजीसारख्या उपेक्षित लोकांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला कि आम्हालाच दोषी ठरवायचे हे योग्य नाही.
jar ramoshi samjacha real itihas baher kadhala tr sampurn deshacha itihas badlava lagel ......
Umaji Naik was a great and looking at time he started ,he is the first, we need to study his struggle and take inspiration.
this in no way means Phadke was any less patriot or revolutionary.
इतिहास हा आपण कोण होतो याचे उत्तर देतो
पण आपण कोण बनत चाललो आहोत हो
तू कोण मी कोण
हा त्या जातीचा तो त्या जातीचा
नका हो वाटू ह्या महामानवांना आपल्यात
त्यांनी जे केले त्याचे 1% पण आपण करत नाय
अहो अन्यायाला वाचा फोडण्याचे डेअरिंग त्यांना त्यावेळी होते
खरे हिरो होते ते आपले
Barach khara itihas ha anek itihaskarani khota lihila ani tymadhe aplysoinisar vattel te badal pan kele pan ata garaj ahe ti khara itihas samanyna samjnychi uprokt bab hi nishitach khari ahe .I agree this massage
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ