शनिवार, एप्रिल १६, २०११

अण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न

सध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटवर कुठेही जा...एकाच गोष्टीची चर्चा...अण्णा हजारेंचे आंदोलन. एका रात्रीत अण्णांना देवत्व बहाल करण्यात आले. आण्णा म्हणजे या देशातील सर्व सामन्यांचे मसीहा, तारणहार अशा प्रकारची मांडणी केली गेली. काही उत्साही अण्णाप्रेमी तर घोषणाच देत होते, ‘अण्णा हजारे आंधी है, देश कें दुसरे गांधी है’. गांधींना पण बरे वाटले असेल...चला एकदाचा दुसरा गांधी तयार झाला (कि केला) तर...समाजात अण्णा हजारे म्हणजे दुसरे गांधी आहेत असे मानून त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची भरपूर चर्चा केली गेली.

अण्णांनी नुकतेच लोकपाल विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आंदोलन केले. या लोकपाल विधेयकाचा मसुदा कायदेतज्ञ शांतीभूषण, किरण बेदी, निवृत्त न्या. संतोष हेगडे, प्रशांत भूषण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांनी तयार केला आहे. हे लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी १९६९ पासून प्रयत्न चालू आहेत. ६९ मध्ये हे विधेयक पहिल्यांदा मंजुरीसाठी सभागृहासमोर मांडले गेले. त्यांनतर ९ वेळा म्हणजे १९७१, ७७, ८५, ८९, ९६, ९८, २००१, ०५, ०८ मध्ये हे विधेयक पुन्हा पुन्हा मांडले. तरीही त्याला मंजुरी मिळू शकली नाही.

अण्णा हजारे यांनी जे उपोषण केले ते तत्कालीन मसुद्यात थोडे बदल करून मंजूर करण्यासाठी. त्यासाठी विश्वचषक स्पर्धा आणि आय.पी.एल. यामधील आठ दिवसांचा कालावधी वापरण्यात आला. कारण क्रिकेटचे सामने सुरु असताना जर अण्णांनी उपोषण केले असते तर भ्रष्टाचाराची चीड (?) असणारी जनता क्रिकेट सोडून आण्णांच्या पाठीमागे उभी राहिली नसती. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आण्णांनी उपोषणाचे रणशिंग फुंकले. अण्णाच्या समर्थनासाठी देशभरातून किती पाठींबा मिळाला हे नक्की सांगता यायचे नाही. कारण १०० लोक समोर असताना दहा हजार लोक होते असे सांगून एखाद्या गोष्टीला मोठे समर्थन मिळवून देण्यात (किंवा तसे चित्र निर्माण करण्यात) मनुवादी प्रसारमाध्यमे वाकबगार आहेत. इलेक्ट्रोनिक मिडीयाने तर आण्णांना एकदम National Hero बनवून टाकले. संपूर्ण देश आण्णांच्या पाठीशी उभा असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. त्यासाठी प्रिंट मेडीयापासून इंटरनेटपर्यंत सर्व प्रचारयंत्रणा पद्धतशीरपणे राबवली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘जेव्हा ही मनुवादी प्रसारमाध्यमे माझी स्तुती करतात तेव्हा मी कुठेतरी चुकतोय असे मला वाटते. परंतु जेव्हा ते माझ्यावर टीका करतात तेव्हा मी बरोबर आहे याची मला खात्री पटते.’ याचा अर्थ असा कि ब्राम्हणी व्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीला सकारात्मक प्रसिद्धी ही मनुवादी माध्यमे देत नाहीत. त्यामुळे ज्याअर्थी ते आण्णांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठींबा देत आहेत त्याअर्थी नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. आपला समाज अतिशय भोळसट आहे. पेपर मध्ये छापलेले किंवा टीवीवर दाखवलेले सर्व खरे आहे असे समजण्याची घोडचूक ते नेहमी करतात. त्यामुळे मेडीयाने आण्णांना हिरो बनवताच सामान्य लोकांना अण्णा म्हणजे देवमाणूस वाटू लागतात. अण्णांच्या आंदोलनाची चिकित्सा न करता समाज त्यात भरकटत जातो. इतका भरकटत जातो कि अण्णांच्या आंदोलाची चिकित्सा करणे म्हणजे देशद्रोह मानला जातो.

आजवर अण्णांनी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी (?) अनेक आंदोलने केली. पण आत्तापर्यंत त्यांनी ठराविक नेत्यांना टार्गेट केले आहे. इतर नेत्यांकडे अण्णांनी दुर्लक्ष केले. अण्णांनी कधीतरी बाळ ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, अडवाणी, मोदी यांच्याविरुद्ध बोलावे. का ही सर्व मंडळी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहेत का ? आण्णा त्यांना तसे सर्टिफिकेट देणार का ? नाहीतर शरद पवारांवर तोंडसुख घ्यायचे आणि मोदींची स्तुती करायची यामागचे राजकारण न कळण्याइतपत आम्ही दुधखुळे नाही. भ्रष्टाचार हा काही व्यक्ती किंवा काही क्षेत्रांपुरता मर्यादित नाही. समाजातील सर्व स्तरात, सर्व क्षेत्रात भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मोहरे या भ्रष्टाचाराच्या गंगेत आकंठ बुडालेले आहेत.

कालचीच बातमी....साई मंदिरात तीन दिवसात तीन कोटी रुपये जमा झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पैशाचा विनियोग कसा केला जातो ? भारतातील अनेक मंदिरे गर्भश्रीमंत आहेत. या मंदिरात देणगीच्या रुपाने अब्जावधी रुपये आणि सोने-चांदी जमा होते. गोरगरीब भाविकांचा पैसा हा निर्जीव दगडासमोर जमा होतो. हा सर्व पैसा कसा, कुठे आणि कुणासाठी वापरला जातो हे मंदिराच्या विश्वास्तांनाच माहित. मंदिरात चालणाऱ्या या भ्रष्टाचाराची बरोबरी कोणत्याही क्षेत्रातील भ्रष्टाचाराशी होणार नाही. त्यामुळे अण्णांनी एकदा आपला मोर्चा भारतातील मंदिराकडे वळवावा अशी अण्णांना विनंती आहे. त्याची सुरुवात शिर्डीच्या साई मंदिरापासून केली तरी चालेल.

अण्णांनी कधीतरी धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातील भ्रष्ट लोकांविरुद्ध बोलावे. अनेक बुवा-बाबा-मातांची कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या आश्रमांतून अनेक काळे धंदे चालतात. त्यांच्या ट्रस्टच्या नावे हजारो एकर जमिनी आहेत. त्याकडेही अण्णांनी लक्ष द्यावे. यातील बरेच जण जंतर-मंतरला आण्णांच्या मांडीला-मांडी लावून बसले होते. भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांना समर्थन देत होते. याचे गौडबंगालही आम्हाला समजून घ्यावे लागेल. 

भ्रष्टाचार कोणत्याही क्षेत्रातील असुदे, कोणीही करूदे, त्याचे समर्थन होणार नाही. संपूर्ण भारताला भ्रष्टाचाराने पोखरून काढले आहे. आपल्याकडे भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे नाहीत असे नाही. परंतु जे कायदे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होते का हा संशोधनाचा विषय आहे. नुसते कायदे करून कोणताही गैरव्यवहार थांबलेला नाही. कायदे करणाऱ्यांना त्यातून पळवाटा कशा काढायच्या हे चांगलेच ठावूक असते. हे गैरव्यवहार रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टींची सांगड घातली पाहिजे.

23 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

Kharokhr atishya parakhadpane ha lekh lihila ahe. Anna Hazare he fakta Sharad Pawaranach target karatat, parantu etaranvar kahihi bolat nahit. Mage mi ase ekale ki tyanchi brahstrachar nirmulan samiti hi khandani gola karate. ---Aniket Sonawane.

DipesH- म्हणाले...

Tumhi Bhrashtachara viruddha kontya upay yojana suchval..............
anna hajare sarkhi mansa aaj jar rastyavar utarli nahit tar bhrashtachar ajun wadhnar aahe. Mahiti Adhikara mule aaj moth mothi prkarna ughad zali aahet, ani pudhe hi tyacha khup fayda aahe. padadya magchi rajkaran kahihi aso tyat aapla hit kevdha aahe te mahtwacha aahe. Aani tyani kona viruddha aawaz uthvava ha tyancha prashna aahe. tumhala jar koni bhrashta watat asel tar tya viruddh tumhi aawaz uthava. shevati nyay milavane kiti kathin zala aahe he tumhala annanchya ani prkalpa sathi hot asalelya bhumi putranchya aandolana varun disun yeil. Evdhya lokancha pathimba asun dekhil aaj sarkar vidheyak pass karat nahi he bhartiya lokshahisathi kiti ghatak aahe. Yasathi aapan kai upay suchavnar ki je aahe te baghat basnar............. aaj desh swatantra houn 60 varshe zali asun suddha mulbhut suvidhancha abhav aahe te keval bhrashtachara mule. mag ha bhrashtachar aapn sampvayla nako ka?...........

Unknown म्हणाले...

राजकीय भूमिका हि त्या राजकीय पक्षा पुरती मर्यादित राहते.
माणसे बदलली कि पुनः पहिले पाढे पंचावन्न सुरु होईल.
कायदा हा अनेक वर्ष टिकेल आणि माणसांवर अवलंबून नसेल.
याचा फायदा सर्वसामान्य माणूस घेवू शकेल.

आपल्या सर्वाना जाहीर आवाहन....
आपले सर्व वैचारिक मतभेद बाजूला ठेवून, व्यक्तिगत विचार आणि प्रतिष्टा बाजूला ठेवून ८ दिवस एका मनाने अण्णांना पाठींबा द्या.....
काही तरी चांगले निष्पन्न होईल.

Unknown म्हणाले...

सचिन तेंडूलकर चांगला क्रिकेट खेळतो म्हणून त्याला फुटबॉल च्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा उतरवण्या सारखे तुमचे विचार आहेत....

व्यक्तिगत राग आणि द्वेष जास्त दिसून येत आहे.
चुकत असेल तर माफ करा......

अनामित म्हणाले...

@kunal
maf kela tumala...tumi chuktay he manya ahe tumala

Ajinkya म्हणाले...

@dipesh this 'Jan Aandolan' wont destroy corruption from india.... it will happen only when people try to change their mentality.... and each one should start from himself.....

अनामित म्हणाले...

thodkyat tumala yevadhe mahit aahe tar aataparyant tumi ka guppa baslat ekhade dhadasvan paul uchalayala pahije hote ji gosht tondane bolta yete ti pratyakshat karne khoop avaghad asate yachi prachiti tumala nakkich yenar

अनामित म्हणाले...

first of all,is annas team really having support of whole india? if they believe they do then they should democratically(if they believe in democracy) contest elections and get the bill passed by their representatives,secondly cant the lokpall be corrupt?thirdly also among annas supporters,arent their haters of costitution and demoracy and manuwadis? what if they take over from anna or after him?corruption definitely should be uprooted,but is this the proper way? raj khatal

VIkas Godage म्हणाले...

Good luck Prakash.

अनामित म्हणाले...

भ्रष्टाचार कोणत्याही क्षेत्रातील असुदे, कोणीही करूदे, त्याचे समर्थन होणार नाही. संपूर्ण भारताला भ्रष्टाचाराने पोखरून काढले आहे. आपल्याकडे भ्रष्टाचाराविरुद्ध कायदे नाहीत असे नाही. परंतु जे कायदे आहेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होते का हा संशोधनाचा विषय आहे. नुसते कायदे करून कोणताही गैरव्यवहार थांबलेला नाही. कायदे करणाऱ्यांना त्यातून पळवाटा कशा काढायच्या हे चांगलेच ठावूक असते. हे गैरव्यवहार रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी व कडक अंमलबजावणी आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टींची सांगड घातली पाहिजे.

अनामित म्हणाले...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘जेव्हा ही मनुवादी प्रसारमाध्यमे माझी स्तुती करतात तेव्हा मी कुठेतरी चुकतोय असे मला वाटते. परंतु जेव्हा ते माझ्यावर टीका करतात तेव्हा मी बरोबर आहे याची मला खात्री पटते.’ याचा अर्थ असा कि ब्राम्हणी व्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीला सकारात्मक प्रसिद्धी ही मनुवादी माध्यमे देत नाहीत. त्यामुळे ज्याअर्थी ते आण्णांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठींबा देत आहेत त्याअर्थी नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. आपला समाज अतिशय भोळसट आहे. पेपर मध्ये छापलेले किंवा टीवीवर दाखवलेले सर्व खरे आहे असे समजण्याची घोडचूक ते नेहमी करतात. त्यामुळे मेडीयाने आण्णांना हिरो बनवताच सामान्य लोकांना अण्णा म्हणजे देवमाणूस वाटू लागतात. अण्णांच्या आंदोलनाची चिकित्सा न करता समाज त्यात भरकटत जातो. इतका भरकटत जातो कि अण्णांच्या आंदोलाची चिकित्सा करणे म्हणजे देशद्रोह मानला जातो.

अनामित म्हणाले...

kharay yaar tuza Hi sagali ya RSS valyanchi mothi kheli ahe ani anna la pudha karun hi mandali magun ban marat ahet...
Tyamule nalayak BJP(Brahmin janata party) la fukat cha fayda hotoy...
ya lokani lokana fasvayla ani bahujan netyana badnam karnya sathi sarv marg vaparlet eg. Facebook,Newspaper, Media. he bahujan lokancha man kalushit karat ahet khote sangun....Next election aplya bahujan votes bjp,Shivsena sarkhya brahmin pakshana milu nayet...yasathi aplyala janjagruti karaychi garaj ahe ti apan karuyat.

ram म्हणाले...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, ‘जेव्हा ही मनुवादी प्रसारमाध्यमे माझी स्तुती करतात तेव्हा मी कुठेतरी चुकतोय असे मला वाटते. परंतु जेव्हा ते माझ्यावर टीका करतात तेव्हा मी बरोबर आहे याची मला खात्री पटते.’ याचा अर्थ असा कि ब्राम्हणी व्यवस्थेला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीला सकारात्मक प्रसिद्धी ही मनुवादी माध्यमे देत नाहीत. त्यामुळे ज्याअर्थी ते आण्णांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठींबा देत आहेत त्याअर्थी नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. आपला समाज अतिशय भोळसट आहे. पेपर मध्ये छापलेले किंवा टीवीवर दाखवलेले सर्व खरे आहे असे समजण्याची घोडचूक ते नेहमी करतात. त्यामुळे मेडीयाने आण्णांना हिरो बनवताच सामान्य लोकांना अण्णा म्हणजे देवमाणूस वाटू लागतात. अण्णांच्या आंदोलनाची चिकित्सा न करता समाज त्यात भरकटत जातो. इतका भरकटत जातो कि अण्णांच्या आंदोलाची चिकित्सा करणे म्हणजे देशद्रोह मानला जातो

अनामित म्हणाले...

आपला समाज अतिशय भोळसट आहे. पेपर मध्ये छापलेले किंवा टीवीवर दाखवलेले सर्व खरे आहे असे समजण्याची घोडचूक ते नेहमी करतात. त्यामुळे मेडीयाने आण्णांना हिरो बनवताच सामान्य लोकांना अण्णा म्हणजे देवमाणूस वाटू लागतात. अण्णांच्या आंदोलनाची चिकित्सा न करता समाज त्यात भरकटत जातो. इतका भरकटत जातो कि अण्णांच्या आंदोलाची चिकित्सा करणे म्हणजे देशद्रोह मानला जातो

ramesh म्हणाले...

Ya deshat jo koni bhrashatachara virudhha awaz uthwito tyachach gala dabla jato.
Ethe bhrashtachar karnarya nete mandalinchi chikitsa karnyache sodun annasarkhya niswarthi mansala aropichya pinjaryat ubhe kele jatey

प्रकाश पोळ म्हणाले...

@DipesH-
मी आंधळेपणाने अण्णा हजारेंचा विरोध करत नाही. भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा हीच माझीही भावना आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र, सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार चालू आहे. तो काय एका कायद्याने थांबणार नाही. अर्थात कायद्याची आवश्यकता नाही असे नाही. कायदा जरुरी आहेच, पण त्याच बरोबर आवश्यक आहे ते प्रबोधन. अण्णा हजारे यांचे आंदोलन अण्णांच्या हातात न राहता उच्चभ्रू एनजीओ ने संचालित केले. पडद्यामागील राजकारण काहीही असो असे आपण कसे काय म्हणू शकतो ? त्या राजकारणाची पण चिकित्सा व्हायला हवी. त्यात कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्याचीही शहानिशा व्हायला हवी.

प्रकाश पोळ म्हणाले...

@ramesh-
भ्रष्टाचारी नेते मंडळीना आपणच निवडून देतो न ? मग त्यांच्या नावाने ओरड करण्याचा अधिकार तरी आपणाला आहे काय ? निवडून आल्यावर पाच वर्षे भ्रष्टाचार करायला नेते मंडळीना लायसन्स आपणच देतो. प्रत्येक भारतीय व्यक्तीला भारतीय संविधानाने आपले लोक प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्याचा वापर करून भ्रष्ट व्यक्तींना सत्तेपासून दूर ठेवले जावू शकते. तेवढे कर्तव्य आपण चोख बजावले तरी भरपूर आहे.

Kalandar म्हणाले...

अण्णा, बघाच एकदा या मंदिरांकडे तसेही सरकारचाच कारभार चालतो. त्यामुळे सरकारसोबत तुमची पण दृष्टी असूद्यात देवळाकडे.

Abhijeet Tupdale म्हणाले...

kitihi zal tari bhrashtachar vadhat ahe he visrata kama naye. annachya agodar nete kay zopa kadat hote ke? Asha netyana apan jab ka nahi vicharta? anna brashtacharavar bollyawar aplyala barach tatwdnyan athwat ahe... ajchi paristithichi janiv sarvana ahe.. tumhi sucha ya matashi sahamat asal.... ya deshache bhale karayache sarvachya manat ahe tar lokpal yayala yeodhe varsh ka lagle sir? nusat likhan karun chalat nahi tyasathi rastyavar utrao lagat. apan vicharane mothe asal pan parishthiti pasun dur jatay. ajchi parishthiti badlali nahi tar nakkich maran amchi ahe netyachi nahi. dushkal bhagat, shetkari te aple aple bhogtahet.. tumach maz kahich jat nahi. Jiv tyancha jato ho ki nahi. yanchyahi apal kay ghen den. ho ki nahi..
Kuthetari chigari udali nahi tar ag lagnar nahi ag lagal nahi tar bhrashtachar jalun khak honar nahi... nahitar he nete tyana vatel tase aplyavar rajya karatahetch na. Aplya sarvana vegveglya karanavarun vibhagayala te taryar ahet apan vegal vhayala pan tayar ahot... bagha vichar kara... bhrashtachar kami kara anna apoapach nahishe hotil. kunach mashiha ka hotil? tumhi karat nahi mhanun tyana te karav lagtay yevdhach.

Abhijeet Tupdale म्हणाले...

andolan kunachya hatat ahe tyachi shaha nisha n karata jase nete annana mhantahet himmat asel tar election madhe utara tase tumi pudhe vhya ani hatat andolan gheun baga kiti kal tumi tiku shakta te tumhala kalel. bolane sope ahe karane atyant kathin ahe....

अनामित म्हणाले...

पटते बुवा .....................

Unknown म्हणाले...

ha khare hay tay

The Bat म्हणाले...

Power tends to be corrupt and absolute power corrupts absolutely.
Lokpal will give absolute power into the hands of few.
P Sainath on Lokpal has said:-
There is nothing wrong in having advisory groups. But there is a problem when groups not constituted legally cross the line of demands, advice and rights-based, democratic agitation.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes