सध्या जिकडे तिकडे एकच नाव
चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक
आणि ओर्कुटवर कुठेही जा...एकाच गोष्टीची चर्चा...अण्णा हजारेंचे आंदोलन. एका
रात्रीत अण्णांना देवत्व बहाल करण्यात आले. आण्णा म्हणजे या देशातील सर्व सामन्यांचे
मसीहा, तारणहार अशा प्रकारची मांडणी केली गेली. काही उत्साही अण्णाप्रेमी तर
घोषणाच देत होते, ‘अण्णा हजारे आंधी है, देश कें दुसरे गांधी है’. गांधींना पण बरे
वाटले असेल...चला एकदाचा दुसरा गांधी तयार झाला (कि केला) तर...समाजात अण्णा हजारे
म्हणजे दुसरे गांधी आहेत असे मानून त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची भरपूर चर्चा
केली गेली.



प्रकाश पोळ
Posted in: