चळवळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
चळवळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शनिवार, फेब्रुवारी ११, २०१२
गुरुवार, ऑक्टोबर २७, २०११
समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजा
आज बलिप्रतिपदा ! शेतकरी, कष्टकऱ्यांचा राजा बळीराजा ! त्याच्या
पुनरागमनाचा हा दिवस ! या दिवशी बहुजन स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, “इडा
पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” आजचा दिवस बळीराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला
तर जातीयवादी इडा-पीडा घालवण्यासाठी बहुजनांना लढण्याची प्रेरणा मिळेल. या
निमित्ताने बळीराजाचे महत्व प्रतिपादन करणारा प्रा. श्रावण देवरे यांचा लेख “सह्याद्रीबाणा”च्या वाचकांसाठी देत आहोत.
-
प्रकाश पोळ.
![]() |
| बळीराजा |
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे
म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो
आणि बळीचे राज्य येवो !” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार
वर्षापूर्वी बळीराजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या
आर्य वामन याने बळीराजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे
झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद
महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा
भालदेव बसवतात. १५ दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात.
भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या
मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.
शुक्रवार, ऑगस्ट १२, २०११
मेरीटच्या गप्पा कुणाला सांगता ?
आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे.
रविवार, जुलै ३१, २०११
“आरक्षण” प्रश्नी उच्चवर्णीय मानसिकता ?
प्रकाश झा यांचा “आरक्षण” हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोषित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेने जे आरक्षण दिले आहे त्याच विषयावर हा चित्रपट असल्याने त्याबद्दल वाद निर्माण होणे साहजिक आहे. उलट निर्माण झालेला वाद हा प्रकाश झा यांच्याच पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण कोणतीही चर्चा झाली नसती तर कदाचित हा चित्रपट खूप लोकांनी पहिलाच असता असे नाही. परंतु एका ज्वलंत विषयावर निर्माण केलेल्या चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाल्यानंतर तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे आता या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. परंतु चर्चा झालीच नाही तर कदाचित एकांगी आणि द्वेषमुलक बाजू मांडली जावू शकते त्यामुळे या विषयी सखोल चर्चा आवश्यक आहे
शुक्रवार, जुलै ०८, २०११
Satyashodhak Examination
Dear friends
Satyashodhak Chhatrapati Dnyanpith has organized two examinations on the syllabus books of Fule Shahu Ambedkar thought. Both exams will be conducted all over Maharashtra at 300 exam centers on 28 August 2011. Detail information can be available at ---
Satyashodhak Chhatrapati Dnyanpith has organized two examinations on the syllabus books of Fule Shahu Ambedkar thought. Both exams will be conducted all over Maharashtra at 300 exam centers on 28 August 2011. Detail information can be available at ---
------ Sau. Shobhatai Shrawan Deore
Convenor, Satyashodhak Chhatrapati Dnyanpith,
201, Sparsh Heights, Dream city Road
Opp. Fame Cinema, Pune Road, NASHIK - 422011
Mobile - 9422788546.
Email- satyashodhak.university@gmail.com
गुरुवार, जून २३, २०११
शिवशक्ती-भीमशक्ती भाग ३- कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे बेगडी दलीतप्रेम
आठवले सेनेसोबत जाणार हे स्पष्ट होताच
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपले डावपेच खेळण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीने सामाजिक
हक्क परिषद भरवून आम्हीच दलित मागास जनतेचे कैवारी आहोत असा डांगोरा
सोमवार, जून २०, २०११
शिवशक्ती-भीमशक्ती भाग २- शिवसेना आंबेडकरी विचार पचवू शकेल ?
रामदास आठवलेंनी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेवून सर्वच
परिवर्तनवादी घटकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याला शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास
कारणीभूत ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागास समाजाच्या उन्नतीसाठी
चळवळ उभी केली. देशाच्या सामाजिक पटलावर आपले क्रांतिकारी विचार मांडले.
प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्याना नेहमीच सामाजिक टीकेचे लक्ष बनावे लागले आहे.
अन्यायकारक व्यवस्था उलथवून टाकून समतावादी समज निर्माण करण्यासाठी जे-जे महापुरुष
धडपडले त्यांची प्रथमदर्शनी समाजाने उपेक्षाच केली. परंतु जेव्हा त्या
महापुरुषांच्या कार्याचे खरे मोल समाजाने जाणले तेव्हा मात्र त्या महापुरुषांचा
गौरव व्हायला सुरुवात झाली. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर या सर्वाना
याच चक्रातून जावे लागले. डॉ.
रविवार, जून १९, २०११
शिवशक्ती-भीमशक्ती - भाग १ : केवळ आठवले गट म्हणजे संपूर्ण भीमशक्ती ?
सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, ते
शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीच्या चर्चेमुळे. रामदास आठवले यांनी शिवसेनेबरोबर
जाण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली.
आजपर्यंत दलितांचे तारणहार म्हणवून घेत हे पक्ष महाराष्ट्रातील बहुतांश दलित मतदार
स्वतःकडे वळवून घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु रामदास आठवलेंच्या शिवसेनेशी युती
करण्यामुळे आपला पारंपारिक आणि हक्काचा मतदार असलेला दलित वर्ग आपल्यापासून दूर
जाईल या भीतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सैरभैर झाले आहेत. प्रसारमाध्यमातून या
युतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु हि चर्चा करत असताना काही महत्वाच्या
मुद्द्यांना जाणीवपूर्वक बगल दिली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही मुद्द्यांची
चर्चा करुया.
भाग १ : केवळ आठवले गट म्हणजे संपूर्ण भीमशक्ती ?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना-भाजप युतीला रामदास आठवले
यांनी साथ दिली आहे. शिवसेनेचे धनुष्य आपल्या खांद्यावर घेवून आठवले
कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान करीत आहेत.
बुधवार, मे ०४, २०११
डॉ. आ. ह. साळुंखे
स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बदलत्या
सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या, हाताच्या बोटांवर
मोजता येणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावेच
लागते. महाराष्ट्राच्या भविष्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने
तयार केलेले सांस्कृतिक धोरण थोरामोठय़ांकडून वाखाणले गेले. सांगली जिल्हय़ात
खाडेवाडीसारख्या छोटय़ा गावात १९४३ मध्ये शेतकरी कुटुंबात साळुंखे जन्माले.
आयुष्यभर नांगर ओढत, पाण्याच्या पखाली वाहण्याचेच काम करावे लागता कामा
नये याची पक्की जाणीव आ. ह. साळुंखे यांना असली पाहिजे; डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची केवळ दैवते नव्हती,
रविवार, एप्रिल २४, २०११
बहुजनांनो आत्मपरीक्षण करा
विषमतावादी ब्राम्हणी
व्यवस्थेच्या दलदलीत रुतून बसल्यामुळे बहुजन समाजाची म्हणावी तशी प्रगती झाली
नाही. हजारो वर्षे बहुजन समाजावर इथल्या व्यवस्थेने अन्यायच केलेला आहे.
बहुजनांच्या या परिस्थितीला अन्याय करणारी सनातनी भिक्षुकशाही जेवढी जबाबदार आहेत
तेवढेच अन्याय सहन करणारेही बहुजनही जबाबदार आहेत. बहुजन समाजाला ब्राम्हणी
गुलामीतून बाहेर काढण्यासाठी बुद्ध-महावीरांपासून फुले-शाहू-आंबेडकर आणि बळीराजा,
सम्राट अशोकापासून शिवरायांपर्यंत अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले.
काहींनी सामाजिक चळवळी उभारून तर काहींनी राजकीय चळवळीच्या माध्यमातून बहुजन
समाजाच्या प्रगतीला, विकासाला चालना दिली. तरी अजूनही हा समाज या गुलामीतून पुरता
बाहेर पडलेला नाही. कोणत्याही समाजाला स्वतःवरील अन्यायाची जाणीव झाल्याशिवाय तो
अन्यायाविरुद्ध पेटून उठत नाही. बहुजन समाजाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची
पूर्णपणे जाणीव नाही. स्वतःचे खरे मित्र कोण, शत्रू कोण याचे भान नाही. अन्यायी
व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करताना जर लक्षच निश्चित नसेल तर चळवळ दिशाहीन होते.
शत्रूला मित्र समजून जर त्याच्याबरोबर मैत्री केली तर तो धोका देणार नाही याची
खात्री कोण देवू शकेल ?
बुधवार, एप्रिल २०, २०११
ही बहुजनांची संस्कृती नाही
गेले काही दिवस बहुजन
चळवळीतील कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खरा
इतिहास मांडणे आणि खोटया व विकृत इतिहासाला विरोध करणे यात बहुजन तरुणांनी आघाडी
घेतली आहे. जिथे क्रिया आहे तिथे ओघानेच प्रतिक्रिया येणारच. बहुजनांचा इतिहास विकृत
करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला विरोध होणारच. दीडशे वर्षापूर्वी महात्मा
फुले व सावित्रीमाई या दाम्पत्याने बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला.
त्याअगोदर अपवादानेच बहुजन समाजातील लोक शिक्षण घेत होते. सामान्य बहुजन समाजाला
तर शिक्षणाची दारे पूर्णपणे
मंगळवार, मार्च २२, २०११
‘हरी नरके’ वादाची दुसरी बाजू
| प्रा. हरी नरके |
गेल्या काही दिवसात बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा. हरी नरके आणि बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांच्यातील वादामुळे बहुजन कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. या वादात बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची बाजू ‘मुलनिवासी नायक’ मधून नेहमी मांडली जाते. परंतु हरी नरकेंची बाजू पाहण्यात आली नव्हती. एखाद्या वादग्रस्त गोष्टीवर लिहीत, बोलत असताना दोन्ही बाजू ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. एकच बाजू आपण सातत्याने मांडायची आणि दुसऱ्याची बाजू ऐकूनच घ्यायची नाही किंवा दुसऱ्याला त्याची बाजू मांडायची संधीही द्यायची नाही हा शुद्ध पक्षपातीपणा आहे. तो पक्षपातीपणा मी तरी करणार नाही. याआधी चारच दिवसापूर्वी मी या ब्लॉगवर
गुरुवार, जानेवारी २७, २०११
शिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा ?
![]() |
| रामदास आठवले |
महाराष्ट्रातील दलित चळवळीतील एक महत्वाचे नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतीच सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या एकीकरणाचा नारा दिला. या भेटीत अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी या भेटीमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
.
.



प्रकाश पोळ
Posted in: 
