रविवार, जुलै ३१, २०११

“आरक्षण” प्रश्नी उच्चवर्णीय मानसिकता ?

प्रकाश झा यांचा “आरक्षण” हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोषित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेने जे आरक्षण दिले आहे त्याच विषयावर हा चित्रपट असल्याने त्याबद्दल वाद निर्माण होणे साहजिक आहे. उलट निर्माण झालेला वाद हा प्रकाश झा यांच्याच पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण कोणतीही चर्चा झाली नसती तर कदाचित हा चित्रपट खूप लोकांनी पहिलाच असता असे नाही. परंतु एका ज्वलंत विषयावर निर्माण केलेल्या चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाल्यानंतर तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे आता या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. परंतु चर्चा झालीच नाही तर कदाचित एकांगी आणि द्वेषमुलक बाजू मांडली जावू शकते त्यामुळे या विषयी सखोल चर्चा आवश्यक आहे.

मुळात राखीव जागांची कल्पना मांडली महात्मा फुल्यांनी. मागास बहुजन समाजाला काही प्रमाणात राखीव जागा असाव्यात अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतर १९०२ साली राजर्षी शाहूंनी आपल्या संस्थानात अब्राम्हणांना ५० % जागा राखीव ठेवल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  डॉ. बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नामुळे घटनेच्या माध्यमातून मागास समाजाला राखीव जागा दिल्या गेल्या. १९९० नंतर मंडल आयोगाने ओबीसी ना राखीव जागा द्याव्या अशी शिफारस केली. जेव्हा-जेव्हा बहुजन समाजाच्या आरक्षणाचा विषय समोर आला तेव्हा-तेव्हा उच्चवर्णीय समाजाने त्याला कडकडून विरोध केला. राखीव जागांना विरोध करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. परंतु जेव्हा-जेव्हा राखीव जागांच्या विरोधात आंदोलने उभी राहिली तेव्हा राखीव जागांच्या विरोधाबरोबरच मागास समाजाचा द्वेष करण्याची प्रवृत्तीही दिसून आली. एम्स च्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन असो वा दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी. सर्व ठिकाणी मागास समाजाबद्दल एक द्वेषमुलक भावना दिसून येत होती. राखीव जागांच्या माध्यमातून प्रवेश घेणे म्हणजे गुणवत्ता नाकारणे अशा प्रकारचे समज पसरवले गेले. तथाकथित गुणवत्तेचे ढोल पिटले गेले. प्रसारमाध्यमे उच्चवर्णीय समाजाच्या ताब्यात असल्याने सर्वानी जातीनिष्ठ भूमिका घेवून राखीव जागांच्या विरोधात वातावरण तापवले. चित्रपट, नाटके, वृत्तपत्रे, इलेक्ट्रोनिक मेडिया इ. सर्वांवर उच्चवर्णीय ब्राम्हणांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या सर्व माध्यमातून वेळोवेळी राखीव जागांना विरोध करण्यात आला. मागास समाजाची बाजू कुणीही मांडली नाही. सामान्य माणूस टीव्ही आणि पुस्तकातून त्याच्यापर्यंत जे पोहचत असते त्यावर विश्वास ठेवतो. वरील सर्व माध्यमे ‘समाजमत’ आणि ‘समाजमन’ घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशा माध्यमातून जर वेळोवेळी एकांगी, पुर्वग्रहदुषित माहिती समोर येत असेल तर ते बहुजन समाजाच्या दृष्टीने धोकादायक आहे. किंबहुना बहुजन समाजाच्या विरोधात ते ठरवून राबवलेले षडयंत्र आहे.

प्रकाश झा एक उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आहेत. त्यांचे चित्रपट अतिशय लोकप्रिय असतात. त्यामुळे अशा एखाद्या चित्रपटातून जर राखीव जागांबद्दल चुकीचे समाज प्रसारित केले गेले तर त्याचा विपरीत परिणाम होवू शकतो. प्रकाश झा हे बिहार मधील एका उच्चवर्णीय ब्राम्हण कुटुंबात जन्माला आले आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांचा राखीव जागांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे ते चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येईल. परंतु बहुजन समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन मात्र सकारात्मक नाही हे त्यांच्या आधीच्या काही चित्रपटांमधून दिसून येईल. त्यांच्या “गंगाजल” या चित्रपटात ‘यादव’ (बिहार मधील पशुपालक अहिर समाज) हे खलनायक आहेत. “अपहरण” चित्रपटातील नायक ‘अजय शास्त्री’ उच्चवर्णीय आहे. म्हणजे खलनायक दाखवायचा असेल तर बहुजन समाजातील व्यक्तींची नवे वापरायची आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, प्रामाणिक न्यायाधीश, अन्यायाविरुद्ध लढणारा नायक अशा पात्रांना उछावार्नियांचे नवे द्यायची असे प्रकार चित्रपटातून नेहमीच होत असतात. जुन्या मराठी चित्रपटात ‘पाटील’ हा हमखास खलनायक असायचा. जुन्या हिंदी चित्रपटातील खलनायक ‘ठाकूर’ वगैरे असायचे. ‘पाटील’ काय किंवा ‘ठाकूर’ काय, दोघेही बहुजन समाजातील. या ‘पाटील’ किंवा ‘ठाकूर’ यांनी समाजावर अन्याय केला नाही अशातला भाग नाही. परंतु ब्राम्हणांनी काय कमी अन्याय-अत्याचार केलेत का ? त्यांना नाही कधी खलनायक म्हणून प्रोजेक्ट केले. थोडक्यात सांगायचा भाग असा कि चित्रपट, नाटके, कथा, कादंबऱ्या अशा सर्व माध्यमातून बहुजन समाज आणि त्यांच्या हिताच्या गोष्टींविरुद्ध उच्चवर्णीय लोक वातावरण तयार करतात. त्यामुळे प्रकाश झा यांनी “आरक्षण” चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर बहुजनांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणे स्वाभाविक आहे. 

अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांनी आरक्षण चित्रपट आधी आयोगाला दाखवण्यात यावा अशी भूमिका घेतली आहे. प्रकाश झा यांनी नकार दिल्यानंतर आयोगाने रीतसर नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्रातील मंत्री ना. छगन भुजबळ, आर. पी. आय. चे अध्यक्ष रामदास आठवले, गोपीनाथ मुंडे, जितेंद्र आव्हाड अशा लोकांनी आरक्षण चित्रपटात काही बहुजन विरोधी भाग असेल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. भारतात जे राखीव जागांचे समर्थक नेते आहेत त्यात मायावती, लालूप्रसाद यादव, शरद यादव, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान, करुणानिधी, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, महादेव जानकर, जितेंद्र आव्हाड इ. लोकांनी हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी पाहिला पाहिजे. बहुजन समाजातील एखाद्या घटकाबाबत काही द्वेषमुलक भाग असेल तर तो तात्काळ काढून टाकण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

31 टिप्पणी(ण्या):

Prof. Hari Narke प्रा. हरी नरके म्हणाले...

अभिनंदन प्रकाश.खुपच समतोल आणि समर्पक भुमिका आहे तुमची.तुमचे मत सुद्न्य वाचकांना पटेल.मी याबाबत लिहिलेले माझ्या ब्लोगवर आहे.आजच्या प्रहारमध्ये कोलाज पुरवणीत पान २ वर याविरुद्धचा श्री.मुकेश माचकर यांचा लेख आहे.तो पहावा.लगे रहो.....

प्रकाश पोळ म्हणाले...

आपल्या बहुमोल प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे सर्.

अनामित म्हणाले...

अलीकडे बॉलीवूडमधील मंडळीना गुणवत्तेची फार काळजी आहे असे दिसत आहे. ह्या मंडळीना आरक्षनामुळे गुणवत्ता असणऱ्या व्यक्तींना प्राधान्य मिळत नाही असे चित्र निर्माण करायचे आहे चित्रपटाच्या माध्यमातून. मी आतापर्यंत बॉलीवूडमधील जितके चित्रपट पहिले त्यातील जवळपास ७५% चित्रपटातील कथा, संगीत, वेशभूषा इतकेच नव्हे तर हे केशरचना सुधा हॉलीवूडमधून चोरल्या आहेत. ह्या चोरनाऱ्या मंडळीना गुणवत्तेची काळजी पडली आहे हे पाहून मला हसू येत आहे. आणि आणखी एक गोष्ट “बॉलीवूड” हे हॉलीवूड ह्या नावापासून प्रेरित ( कि चोरलेले) आहे.

प्रकाश पोळ म्हणाले...

अगदी खरे आहे सचिन जी. यांच्या गुवात्तेची परीक्षा पर्याची झाली तर यांची फार पंचाईत होईल. एकतर हॉलीवूड च्या कथा चोरायच्या किंवा साउथ च्या. यांना रिमेक करण्याशिवाय खास काही येत नाही, आणि वरून बहुजनांच्या आरक्षणामुळे गुणवत्ता धोक्यात येत असल्याचे गैरसमज पसरवतात. जे अमिताभ बच्चन, प्रकाश झा, सैफ आली खान आरक्षण विरोधी आहेत तेच या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. यावरून चित्रपटात काय संदेश असेल याची कल्पना येते.
बच्चन णे तर आपल्या ब्लॉग वर लिहिलेच आहे कि आरक्षणामुळे समाजात भेदभाव वाढतो. बच्चन पुढे म्हणतो जातीव्यवस्थेचे मला इतके ज्ञान नाही. तरीही तो त्यावर टिपण्णी करतो कि या प्रथा समाजात हजारो वर्षे चालत आल्या आहेत. या आपण नाकारता काम नयेत. या प्रथा सहजासहजी नष्ट होणार नाहीत. याला एक वास्तव म्हणून स्वीकारले पाहिजे. आता असल्या व्यक्तींकडून काय अपेक्षा करणार ?

प्रकाश पोळ म्हणाले...

अत्यंत समर्पक लेख आहे. मुळात आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या जो-तो आपापल्या सोयीनुसार करत असतो. त्यामुळे फार मोठे घोटाळे होतात. उच्चवर्णीयांनी काही करायचे म्हंटले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ढोल बडवले जातात आणि बहुजन समाजाच्या हिताच्या काही गोष्टी बहुजनांनी मांडल्या तर मात्र जातीयवादाला खतपाणी घालत असल्याचे आरोप होतात.
प्रकाश झा यांच्या आरक्षण या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचा हेतू प्रामाणिक असेल असे वाटत नाही. त्याला कारण आहे त्यांचे मागील काही चित्रपट. उदा. गंगाजल, अपहरण. या चित्रपटात बिहार मधील सामाजिक, राजकीय परिस्तिथी अतिरंजित आणि भडक स्वरुपात दाखवली आहे. या चित्रपटांचे नायक हे उच्चवर्णीय आणि खलनायक मात्र बहुजन समाजातील आहेत. गंगाजल मधील खलनायक साधू यादव (यादव हे बिहार मधील पशुपालक अहिर आहेत.) दाखवले आहेत. देशाच्या उत्तर भागात ब्राम्हणी वर्चस्व अधिक आहे. त्यामुळे तुलनेने उत्तरेत ब्राम्हणी अत्याचार अधिक झाले. असे असताना अत्याचार करणारे यादव वगैरे बहुजन दाखवायचे ही सनातनी मानसीकता आहे. त्यामुळे आरक्षण या चित्रपटात काही वावगे आणि घटनाविरोधी भाग असेल तर त्याला विरोध आवश्यक आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पोकळ ढोल बडवले बंद केले पाहिजे.

Bahujan All India फेसबुकवर लिहितात म्हणाले...

आरक्षण या सिनेमा बद्दल बरीच हवा झालेली असली तरी ज्या तरुण वर्गा साठी म्हणजे विद्यार्थ्यान साठी हा सिनेमा बनविण्यात आलेला आहे , त्या वर या सिनेमाचा काही फरक पडलेला नाही तो तरुण वर्ग या सिनेमा बद्दल उदासीन आहे कारण आजचा उच्चवर्णीय तरुण आरक्षण...ा बदल त्रासलेला असला तरी त्याला आरक्षण हे मागासवर्गीयांना का दिले जाते या बद्दल हि ग्यान बाळगून आहे , त्यानाही सत्य परिस्थिती माहित आहे , त्यामुळे त्यांचा हि या आरक्षणा बद्दल काही ओरडा नाही , या आरक्षणा बद्दल ओरडा फक्त राजकारण्यांचा आहे बाकी तरुण वर्ग या गोष्टीन कडे ढुंकूनही बघत नाही हे निदर्शनात आले आहे , झेंडा या सिनेमा मध्ये नारायण राणेचे नाव आहे का म्हणून अगोदर सिनेमा पाहणारे महाभाग आणी त्याला परवानगी देणारे महाभाग आणी आरक्षण हा सिनेमा अगोदर पाहण्यास नकार देणारे महाभाग हे देशासाठी कलंक आहेत हि सिस्टम तोडावयास हवी .

नि ना दि फेसबुक वर लिहितात म्हणाले...

खरे तर आरक्षणाबाबतीतील कितीतरी गैरसमज हळुहळु दुर होऊ लागले आहेत. आरक्षणाचा विरोध करणारर्‍यांची संख़्याही कमी होऊ लागल्याने जातीव्यवस्था माननार्‍या मुठभर लोकांच्या मनात आता हा विरोध संपेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे असे चित्रपट... काढुन हा विषय पुन्हा जनतेसमोर मांडत आहे. पण महाराष्ट्रात याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही. कारण मराठा समाज ही आता आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आरक्षणाचे महत्व आता हळुहळु सार्‍यांना पटत चालले आहे.

Sameer Devekar म्हणाले...

good this is better in the sence of business point of view and for societial benifit........but we indian better in debate and planning not in the initiative and execution which is the way of inclusive growth and development of our country...

Kalpesh Dongre म्हणाले...

amitabh bachchan mhanto mi jat pat wagere manat nahi mhane tyach aayi punjabi aahe ,wahini sindhi,patni bengali .arey pun tuza ghari koni SC/ST aahe ka?

Akhilesh Chandra Gautam म्हणाले...

AARAKSHAN Film ka virodh road par hoga. Film nahi chalne di jayegi. JAI BHEEM

सौ गीतांजली शेलार म्हणाले...

नमस्ते प्रकाश,मी प्रथमच तुमचा ब्लोग वाचत आहे.मी मराठा आहे. मला बारावीनंतर वैद्यकीय शाखेला प्रवेश घ्यायचा होता. त्या वेळी पीसीबी ग्रुप पाहून यादी लावली जायची. ८३% ला ओपण मेरीट बंद झाल. मला ८२.७०% मार्क होते( आयुर्वेदिक साठी) प्रवेश मिळाला नाही.माझ्या बरोबर ७०% मार्क असलेल्या माझ्या वर्गमित्राला प्रवेश मिळाला. त्याचा अभ्यासक्रम संपवायला त्याला जवळजवळ ८ वर्ष लागली तरीही तो प्रक्टिस मध्ये तो अजूनही स्थिरावला नाही. त्याच वेळी मी एका शेतकऱ्याची मुलगी शिकण्याची जबर इछ्या ग्रामीण भागात कसली सुविधा नसताना ७ किमी अंतर जावून येवून.अगदी शक्य तो वेळ अभ्यासात घालवून मार्क मिळवले. पण प्रवेश नाही मिळाला पैसे भरणे वडिलांना शक्य नव्हते. मला माझ्या मित्राला प्रवेश मिळाला म्हणून दु:ख नाही त्याला त्या संधीच सोन नाही करता आल. या माझ्या अनुभवातून मला एवढंच सांगायच आहे आजच्या समाजात जाती भेदावरील आरक्शानापेक्ष्या गरज आहे ती गरीब मागासवर्गीय आरक्षनाची. कारण आज ब्राह्मण मराठा आणि इतर जे आरक्षणात मोडत नाहीत पण हुशार आणि गरीब आहेत त्यांनाहि शिक्षणाची गरज आहेच कि!

अनामित म्हणाले...

प्रकाश झा की आने वाली फिल्म आरक्षण में एक प्रधानाचार्य की भूमिका निभा रहे अमिताभ बच्चन आरक्षण को जाति आधारित समाज के कुछ वर्गों के खिलाफ भेदभाव मानते हैं।
अमिताभ आरक्षण फिल्म में एक निजी कॉलेज के प्रधानाचार्य डॉ. प्रभाकर आनंद की भूमिका निभा रहे हैं जो शिक्षा से वंचित हर वर्ग के लिए समान अवसरों का पक्षधर है। बॉलीवुड के महानायक ने अपने ब्लॉग पर लिखा है-इन दिनों मीडिया में आरक्षण फिल्म पर चल रही हर बहस में यह जानने का प्रयास किया जाता है कि जाति आधारित आरक्षण की नीति पर हमारे व्यक्तिगत विचार क्या हैं। पर क्या मैं पूछ सकता हूं कि देश में कौन ऐसा है जिसके इस विषय पर न्यायसंगत विचार हों। उन्होंने जाति व्यवस्था को ऐसी सामाजिकपरंपरा बताया है जो पीढि़यों से समाज में चली आ रही है और उसे अचानक नहीं हटाया जा सकता। बकौल अमिताभ आरक्षण अब एकसंवैधानिक सत्य है। इसे हटाने का अर्थ होगा लोकतंत्र के मूल आधार और हमारे संविधान में सुधार करना। मुझे आशा है कि हम ऐसा कर पाएंगे, लेकिन वर्तमान में यह एक वास्तविकता है और हमें इसके साथ रहना होगा।
अमिताभ ने अपने व्यक्तिगत विचार रखते हुए कहा मेरे लिए व्यक्तिगत तौर पर, इसका मतलब जाति और पंथ के आधार पर बंटे समाज के कुछ वर्गों के खिलाफ भेदभाव है। मैंने कभी जाति प्रथा का पक्ष नहीं लिया और न ही मुझे इसकी पर्याप्त जानकारी है, लेकिन मैं इतना जानता हूं कि जाति हमेशा किसी व्यक्ति के उपनाम के आधार पर निर्धारित की जाती है।

प्रकाश पोळ म्हणाले...

नमस्ते गीतांजली ताई.
आपण ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आभार. आपणाला मेहनत करूनही वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला नाही, ही आपली खंत मी समजू शकतो. आपण बारावीला ८२.७० % मार्क्स मिळवूनही आपणाला प्रवेश मिळाला नाही मात्र आपल्या वर्गमित्राला ७० % ला प्रवेश मिळाला. त्याला संधीचं सोनं करता आलं नाही ही अपवादात्मक गोष्ट आहे. कारण आरक्षणाच्या माध्यमातून प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी याच पद्धतीने शिक्षण पूर्ण करतात असे नाही. खुल्या वर्गातील मुलांनाही बऱ्याच वेळा संधीचं सोनं करता येत नाही. पण या अपवादात्मक केसेस असतात.
आरक्षणाबद्दल बोलायचे झाले तर आर्थिक निकष हा खुद्द न्यायालयाने रद्दबादल ठरवला आहे. आर्थिक निकष हा वेळोवेळी बदलणारा असून तो घटनाबाह्य आहे. कुणीही सहजरीत्या उत्पन्नाचा खोटा दाखला काढू शकतो. त्यामुळे खऱ्या गरजूना त्याचा लाभ मिळेल ही शक्यता तर अगदी दुरापास्त. भारतात आजवर जात याच माध्यमातून समाजावर अन्याय झाले आहेत. जातीच्या आधारेच समाजाची उतरंड ठरवण्यात आली आहे. जातीच्या आधारे शिक्षण, संपत्तीचा हक्क नाकारण्यात आला होता. त्यामुळे आरक्षणाचा आधारही जात हाच हवा आहे.
आपण मराठा समाजाच्या आहात. तर आपण अनुभवाने सांगा ‘मराठा’ म्हणून आपणाला समाजात एक मानसन्मान प्रतिष्ठा आहे ती मागास समाजातील लोकांना आहे का ? मागास समाजाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन निर्मळ असतो का ? ज्या देशात आणि समाजात माणसाची प्रतिष्ठा तो कोणत्या जातीत जन्माला आला त्यावरून ठरते त्या देशात जन्माला येवून आपण चूक केली अशी मागास लोकांची भावना होत नसेल काय ? त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, समाजाच्या प्रत्येक स्तरात आपल्या जातीची जाणीव व्हावी अशी वागणूक दिली जाते. विशेषतः शाळा, कॉलेज मध्ये आरक्षण, प्रवेश यावर चर्चा चालू असताना मागास समाजाबद्दल लोकांची काय मते असतात ते मी स्वतः अनुभवले आहे. मागास समाजाला जनावरांपेक्षाही हीन समजले जाते. त्यांच्याबद्दल घाणेरडी टिकाटिपण्णी केली जाते.
आज समाजात अनेक अन्याय-अत्याचार होत आहेत त्याला जातींचाच आधार आहे. खैरलांजी प्रकरण देश अजून विसरला नाही. परवाच बोरगाव दंगलीचा निकाल लागला. एक उच्चवर्णीय मुलगी दलित युवकाबरोबर पळून गेली म्हणून गावातील सवर्णांनी दलितांची अख्खी वस्ती जाळून टाकली. अनेकांची कत्तल केली. हे कशाचे द्योत्यक आहे. त्या बिचाऱ्या लोकांची चूक ती काय, कि त्यांचा जन्म एका विशिष्ठ जातीत झाला ? (एवढे होवूनही जवळजवळ ८० लोकांची निर्दोष सुटका झाली.) आजही समाजात आंतरजातीय विवाह पचवण्याची मानसिकता किती जणांमध्ये आहे. त्यात जर मुलगा किंवा मुलगी दलित समाजातील असेल तर विचारायची सोय नाही.
आजही फासेपारधी, कातकरी वगैरे आदिवासी जमाती आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती यांना गुम्हेगर म्हणून ओळखले जाते. २१ व्या शतकात वाटचाल करत आहोत आपण, तरीही या भटक्या लोकांना राहायला हक्काची जागा मिळू नये. एका गावातून हाकलले कि दुसऱ्या गावात. तिथून हाकलले कि तिसऱ्या गावात. तिथून आणखी कुठे. त्यांना घटनेने आरक्षण जरून दिले आहे. पण जे शाळेचे तोंड पाहू शकत नाही. समाज ज्यांना माणूस म्हणून वागणूक देत नाही त्यांनी कुठे आरक्षणाचा लाभ घ्यायचा ?
ताई, आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. मागास जातीचे बहुसंख्य लोक आर्थिकदृष्ट्या मागास आहेतच. त्यांना जोपर्यंत समाज माणूस म्हणून मान्यता देत नाही, त्यांचा जगण्याचा हक्क मान्य करत नाही तोपर्यंत आरक्षण रहावे, असे मला वाटते.
आपण मराठा समाजाच्या असल्याने मागास जातींची भयप्रद स्थिती आपणास कितपत माहित आहे ते मला माहित नाही. मात्र आपण ज्या समाजातून आणि वातावरणातून पुढे आला आहात तिथे सामाजिक मान्यता, प्रतिष्ठा होती. आरक्षणाबद्दल विचार करताना आपण मागास लोकांच्या दृष्टीने विचार केलात तर आपणाला माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल.
आपल्या प्रतिक्रियेत द्वेष न दिसता तळमळ दिसली म्हणून ही विस्तृत प्रतिक्रिया दिली. कृपया समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. यापुढे निखळ चर्चा होत राहील.
धन्यवाद.

अनामित म्हणाले...

tendulkar, dravid haramkhor ahet

अनामित म्हणाले...

sayaji shinde zindabad, raja gosavi murdabad, raja paranjape murdabad, pandharinath kamble zindabad, wasim akram aage badho, chhagan bhujbal hum tumhare saath hai

सौ गीतांजली शेलार म्हणाले...

धन्यवाद प्रकाश,तुम्ही मला एक नवीन दृष्टीकोन दिल्याबद्दल! खरोखर माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मला चार भिंतीची एक सुरक्षित चौकट लाभली. माध्यमांनी दाखवलेल्या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवला जातो हे कदाचित तुम्हीहि उमजून असालच. म्हणून कदाचित एका कुपमंडूकाची माझी स्थिती होती. माणसाने धनिक म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगणे जास्त गरजेचे आहे..आणि याच कारणासाठी ज्या महामानवाने हा मार्ग सांगितला आहे त्यांना प्रणाम!

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद गीतांजली ताई.
आपल्यासारख्या सुजान आणि समजदार व्यक्ती समाजात आहेत हे सर्वांचे सद्भाग्य आहे. आपण हा विषय ज्या तळमळीने समजून घेतलात ते पाहता आपले कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. साधारणपणे अशा विषयांवर चर्चा होत असताना आक्रस्ताळेपणे आणि द्वेषाने विषयाची मांडणी केली जाते. परंतु आपल्या चर्चेमध्ये असे काही झाले नाही. याचे श्रेय आपणाला आहे.
माझी नेहमी हीच भूमिका असते कि एखाद्या विषयवार मतभेद झाले तर चर्चेने प्रश्न सोडवावा. पण नेहमी वेगळाच अनुभव येतो.
असो. आपण नैतिक मार्गाने चर्चा केलीत हीच माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे.

आशिष परांजपे म्हणाले...

या देशाच्या साधन संपत्तीत सर्व घटकांना न्याय्य वाटा मिळाला पाहिजे हे बरोबर आहे. सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण कोणत्याही एका विशिष्ट जाती-वर्गाकडे होऊ नये. पण शिक्षणावर कोणाचा जन्मसिद्ध अधिकार असू नये. हजारो वर्षे दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवले गेले. पण आम्हाला ज्ञानापासून पारखे ठेवले गेले हि ओरड तेव्हढी बरोबर नाही. कारण त्यावेळी जे ज्ञान म्हणवले जात होते त्या ज्ञानाला आता काही किंमत उरलेली नाही.आताच्या काळात प्रगती करून घेण्यासाठी लागणारे आधुनिक ज्ञान आणि सवर्णांनी मागास वर्गीयांपासून हजारो वर्षे लपवून ठेवलेले ज्ञान याचा काहीही संबंध नाही. हे आधुनिक ज्ञान दलितांसाठी जेवढे नवे आहे तेवढेच ते उच्च वर्णीयांसाठीही नवे आहे. "उच्च वर्णीयांच्या घरात ज्ञानाची परंपरा कित्येक वर्षे चालत आली आहे म्हणून त्यांना आजच्या जगात काहीही संघर्ष करावा लागत नाही आणि आमच्या जातीत ज्ञानाची परंपराच नाही म्हणून आम्हालाच सगळा संघर्ष करावा लागतो", ही भूमिका राजकीय दृष्ट्या सोयीची असली तरी वास्तवाशी जुळणारी नाही.
मागास वर्गीयांमधील अनेक जाती आजही आपसात आंतरजातीय विवाह करत नाहीत. त्यांची एकमेकांविषयीची मते फार वाखाणण्याजोगी नाहीत. अशा परिस्थितीत केवळ सवर्ण समाजाकडे बोट दाखवणे कितपत योग्य आहे? 'आम्ही ' आणि 'ते' असे सरळ गट पाडून फारतर ह्या समस्येचे राजकीय सुलभीकरण करता येईल, पण मूळ समस्या मात्र तशीच राहील नव्हे अजून जटील होत जाईल. खरा प्रश्न आरक्षणाचा फायदा कोणाला मिळतो आहे हा आहे. आरक्षण हे शोषित वर्गासाठी असेल तर गेल्या साठ वर्षांत शोषितांची संख्या कमी होणे अपेक्षित होते. पण खरे चित्र वेगळेच आहे. मुळात आरक्षण असावे याबद्दल कोणाचेच दुमत असण्याची शक्यता नाही. पण ते किती असावे आणि त्याचे निकष काय असावेत हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. अर्थात हे निर्णय सखोल चर्चा करून सर्व सहमतीनेच घेतले गेले पाहिजेत. आरक्षणाच्या विरोधात असो की बाजूने, झुंडशाही हा चर्चेचा पर्याय कधीही होऊ शकत नाही. दोन्ही बाजूनी स्वत:च्या भावनांना आणि विचारांना चर्चेच्या माध्यमातूनच वाट करून दिली पाहिजे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो बंद पाडण्याच्या घोषणा करणे किंवा तसे वातावरण तयार करणे ह्या बाबी चर्चेला पोषक नाहीत.
मुळात चित्रपटांचा परिणाम एका मर्यादेपलीकडे होत नसतो. गंभीर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कोणी चित्रपटांचा आधार घेत नाही. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' यासारख्या भडक जातीयवादी नाटकाला जर मागास वर्गीयांचा विरोध नसेल तर या तद्दन गल्लाभरू दिग्दर्शकाच्या व्यावसायिक चित्रपटाला विरोध कशासाठी?
'मी नथुराम...' ला उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती म्हणून ते नाटक चालू राहिले. उद्या जर ह्या चित्रपटाचे निर्माते न्यायालयात गेले आणि त्यांनी तशीच परवानगी मिळवली तर मग चित्रपटाचे विरोधक काय करणार आहेत? स्वत:ला मागास वर्गीयांचे नेते म्हणवणारे प्रदर्शनापूर्वी चित्रपट न दाखवल्यास तो बंद पाडण्याच्या वल्गना करतात हे बाबासाहेबांच्या संविधानात कुठे बसते? आणि ही झुंडशाही जर मागास वर्गीयांना चालणार असेल तर बाबासाहेबांच्या विचारांपासून ते लांब जात आहेत असेच म्हणावे लागेल.

प्रकाश पोळ म्हणाले...

आपण लिहिलेल्या लेखात अत्यंत चुकीची विधाने केली आहेत. आरक्षणाला विरोध आहे म्हणून त्या चित्रपटाचे प्रक्षेपण थांबवावे अशी मागणी कोणीही केलेली नाही. छगन भुजबळ, आठवले, जितेंद्र आव्हाड, हरी नरके यांनी जी मागणी केली आहे ती वेगळीच आहे. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट काढताना त्यात घटनाविरोधी, मागास समाजावर टिपण्णी करणारा काही भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण प्रकाश झा यांच्या आधीच्या चित्रपटातून खलनायक बहुजन आणि मुस्लीम समाजातील दाखवले आहेत तर नायक हे उच्चवर्णीय आहेत. स्वतः प्रकाश झा हे ब्राम्हण आहेत. त्यामुळे ते मागास समाजाकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात असे वाटत नाही. त्यामुळे साहजिकच त्यांचा आरक्षण हा चित्रपट आधी राखीव जागांच्या समर्थकांना दाखवावा अशी मागणी केली तर त्यात गैर काय ? त्यात जर काही घटनाविरोधी नसेल तर प्रश्नच नाही. मग असे असताना प्रकाश झा किंवा स्वयंघोषित बुद्धिवादी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चाहत्यांनी चुकीचा प्रचार करण्याची गरज काय ?

Dilip Mandal म्हणाले...

प्रकाश झा की फिल्में देखने के बाद और सवर्ण आयोग वाले नीतीश के साथ उनके "जमीनी" और "मॉली" रिश्तों की बात खुलने के बाद भी, अगर यह जानने के लिए कि प्रकाश झा का आरक्षण पर क्या नजरिया होगा, फिल्म देखनी पड़े, तो फिर मुश्किल है। मैं अंदाजा लगाता हूं- प्रकाश झा आर्थिक आधार पर आरक्षण की वकालत करेंगे। ब्राह्मणवादी यूथ फॉर इक्वैलिटी के अंदाज में, ताकि सामाजिक गैरबराबरी की बात पृष्ठभूमि में चली जाए। एक ब्लैक कॉफी की शर्त लगा सकता हूं।

अनामित म्हणाले...

Sundar vivechan. Sundar vivechan.

प्रकाश पोळ म्हणाले...

प्रकाश झा यांची उच्चवर्णीय ब्राम्हणी मानसिकता.

प्रकाश झा यांच्या आरक्षण चित्रपटावरून वादळ उठले आहे. जे प्रकाश झा दलित, आदिवासी समाजाबाबत कुचेष्टेने ट्विटर वर टिपण्णी करतात त्यांनी आरक्षण चित्रपट असा प्रकार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच आरक्षण चित्रपट आधी राखीव जागांच्या समर्थक नेत्यांना दाखवावा अशी मागणी केली होती. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका येणारे विचारवंत आता प्रकाश झा च्या या ट्विट बद्दल काय म्हणतील? प्रक्ष झा यांची ब्राम्हणी मानसिकताच यातून दिसत नाही का ?

खालील लिंक पहा.
http://a7.sphotos.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc6/223069_261035753923444_100000510651040_1106711_46907_n.jpg

प्रकाश पोळ म्हणाले...

प्रा. दिलीप मंडल आणि फेसबुक वरील जागृत बहुजन कार्यकर्ते ज्यांनी प्रकाश झा ची लबाडी, दुटप्पी भूमिका आणि सनातनी ब्राम्हणी मानसिकता उघड केली त्यांचे आभार.

आशिष परांजपे म्हणाले...

माझ्या ज्या विधानांना आपण अत्यंत चुकीचे ठरवले होते तीच विधाने आज "काही" लोकांनी अक्षरश: खरी करून दाखवली आहेत. कृपया ही लिंक ओपन करा.
http://indiatoday.intoday.in/site/video/prakash-jha-office-attacked-aarakshan/1/147297.html
बाबासाहेबांच्या संविधानाला स्मरून आपण या कृतींचे समर्थन करणार नाही अशी भाबडी आशा आहे.

अनामित म्हणाले...

आशिष परांजपे tumhi amhla baba sahebancha vichar sanganyachi garaj nahi.

अनामित म्हणाले...

दिनांक ८ ऑगस्ट २०११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्टार न्यूज या वाहिनीवर आरक्षण या चित्रपटाच्या निमित्ताने 'नोकरीमध्ये आरक्षण असावे का ?' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रकाश झा, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण सहभागी झाले होते.
he kay vicharvant ahet kay?

Saish Dipankar म्हणाले...

१) भारतातील सर्व मंदिरांमध्ये फक्त एकाच जातीला (ब्राम्हणांना ) १००% आरक्षण का आहे ? २) शंकराचार्य हे पद फक्त ब्राम्हनान्साठीच १००% आरक्षित का आहे ? ३) आरक्षण ही सामाजिक कीड आहे असे म्हणणाऱ्या लोकांना भारतातील ६००० जातींची सामाजिक विषमता दिसत नाही का ? ४) या सामाजिक विषमतेने शिवाजी महाराजांना सुद्धा कमी लेखले. ब्राम्हणांनी शिवाजी महाराजांना शुद्र ठरवून त्याना राज्याभिषेक नाकारला. काशीहून आणलेल्या बामणांनी शिवाजी महाराजांचा मोफत राज्याभिषेक का केला नाही ? ५) जेम्स लेन प्रकरणामध्ये जिजामातेचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न करणारे हेच हरामखोर जातीयवादी ब्राम्हण. ६) शाहू महाराजांना वेदोत्त प्रकरणामध्ये शुद्र ठरविले. ७) महात्मा फुलेंना, सावित्रीमाई फुलेंना अतोनात त्रास दिला. ८) महाज्ञानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना अतोनात त्रास दिला. ९) सर्व बहुजन संतांना अतोनात त्रास देवून त्यांचे खून केले, इ. १०) २५०० वर्षे बहुजन समाजाला वंचित ठेवून त्यांचे अतोनात शोषण केले. ११) आत्ताकुठे बहुजन समाज स्वताच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय तोवर या जातीय वाद्यांच्या पोटामध्ये दुखू लागले आहे. ................. तेव्हा जातीयवाद्य्यानो थोडे आत्मपरीक्षण करा नाहीतर परत एकदा क्रांतीची ठिणगी पडून संपून जाल.

Sanjay Samant म्हणाले...

जातीवरून नको, गरीबांना 'आरक्षण' द्या : राज ठाकरे

एकीकडे जातपात पाळू नका असे सांगितले जाते, तर दुसरीकडे त्याचेच राजकारण केले जाते. म्हणूनच जातीच्या आधारावर नको, तर कोणत्याही जातीतील गरीबांना आरक्षण मिळायला हवे, असे मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडले. ' आरक्षण ' सिनेमानिमित्त तापलेल्या वातावरणावर ते बोलत होते. असो.

राज साहेब.. आपण एक करिश्मा असलेले नेते आहोत याचे पद्धतशीर चित्र निर्माण केले आहे. याला महाराष्ट्र नव निर्माण मधील पाहिले निर्माण म्हनू हवे तर.. तुमच्या नीटपणे म्यानेज केलेल्या जाहीर सभा असोत दौरे असोत भन्नाट असतात..तुम्ही तुमची शिवसेनेत असलेली ताकत दाखवून विधानसभेत ९ शिलेदार पण पाठवलेत इथपर्यंत ठीक आहे.. पण आरक्षण बद्दल आपले मत महारास्ष्ट्र टाईम्स मधे वाचले आणि आपण काय आहात याचे खरे दर्शन घडले..

तुमच्या म्हनन्यानुसार २५०० वर्षाचा जातीचा इतिहास ६० वर्षात बदलला आहे..आता "जातीवर" आरक्षण देने बंद करून "आर्थिक" निकषावर आरक्षण द्यावे..पण तुम्हाला माहित असेल पण कदाचित माहित नसल्याचा आपण बहाणा करत नहीं असे गृहीत धरून आपणास सांगावेसे वाटते की आरक्षण हां गरीबी निर्मुलानाचा कार्यक्रम नाही.. त्यासाठी केंद्र सरकारचे "रोजगार हमी योजना " "गरीबी हटाव योजना" यासारख्या अनेक योजना आहेत.. त्यासाठी केन्द्रीय नियोजन आयोगाची लिंक पहा

http://planningcommission.nic.in/plans/planrel/fiveyr/10th/volume2/v2_ch3_2.pdf

आणि याव्यतिरिक्त विविध राज्य सरकारे पण गरीबी निर्मुलानाच्या योजना ६० वर्षापासून राबवित आहेत..आरक्षण हे घटनेतील कलम ३४०, ३४१, ३४२ नुसार ओ . बी. सी. , एस. सी. आणि एस. टी. यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात "प्रतिनिधित्व" दिलेले आहे..आणि या तीनही कलामाना कोणतीही कालमर्यादा नाही हे इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते..आणि विशेष म्हणजे आपण ज्या गरीबांची कालजी करत आहात ते बहुतांश गरीब ओ बी सी या सदरात येतात.. आणि त्यांची सोय बाबासाहेबानी कलम ३४० मधे म्हणजे एस सी (341) आणि एस टी (342)यांचे अगोदर केलि आहे..

पण गुनावात्तेवर चालणार्या आतापर्यंतच्या एकाही सरकारी अधिकर्याने ३४० वर कामच केले नाही...आणि एकाही "पन्त" प्रधानाने त्याची दखल घेतली नाही..जरी घेतली तरी वेलकाढूपनाने घेतली.. वी पी सिंग यानी मात्र हे सारे खोदून मंडल आयोगाची अम्मलबजावानी करून ओ . बी. सी न म्हणजे तुमच्या भाषेत गरीबाना आरक्षण देण्याची व्यवस्था पण सोपी करून दिली..पण त्यासाठी जातीय जनगणना करून त्यांचे प्रमाण आणि आर्थिक, सामजिक शैक्षणिक स्थिती याची गणना होने जरुरीची आहे पण त्याला पण तुमच्यासारख्या गरीबांच्या कैवारी नेत्यांचा विरोध आहे..आता तुमच्या वाक्याकडे वलू ."आता खालच्या जातीतील श्रीमंत माणसांनाही आरक्षण द्यायचे का ? " याचे स्वच्छ उत्तर आहे -हो.. कारण खालच्या जातीतील मानुस श्रीमंत झाल्यावर त्याच्याशी जातीय भेदभाव होत नाही असे नाही..

उदाहरणे कित्येक आहेत..पण आशय केसेस अगदी अपवादाने आढ़लतात. आणि अपवादाला नियम बनवू नये असा संकेत आहे.. असो तुमच्या निमित्ताने माझ्या बहुजन बंधवाना आराक्षनाची घटनेतील तर्तुदीची माहिती होइल ..कारण तुमचे कार्यकर्ते म्हणजे दुसरे तीसरे कोणी नसून बहुजना मधील अशी पीढी आहे त्याना ना त्यांचे हक्क आणि अधिकार माहिती नाहीत ना त्यांचे महापुरुष.. ते आपले दिसला थोडा पैसा आणि झेंडा की लगेच चिकटवातात दांडा.. या निमित्ताने त्याना पण आराक्षनाबद्दल माहिती होईल..खरे तर आरक्षण विरोधकापेक्षा आरक्षण समर्थाकनाच माहित नाही ते आराक्षान का घेतात ते..

म्हणून प्रयत्न..

सौजन्य संजय सामंत सर

prashant` म्हणाले...

VERY GOOD WORK.....................

steffi म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
steffi म्हणाले...

प्रकाश पोळ आपण खूप व्यवस्थित विषयाची मांडणी केली आहे .मी एका autonomous engineering college मध्ये शिकले .तिथे sc ,st ,obc विध्यार्थ्याचे देखील मेरीट खूप high होते .त्यांनी open मधून admission घेतले .तरी open वाल्यांनी बोंब ठोकली तुम्हाला आरक्षण असताना open च्या जागा कशाला खाता .म्हणजे आमचे मेरीट वाढले तरी शिव्या ?.दुसरी परिस्थिती अशी कि याच college मध्ये दरवर्षी ओपेन चे विध्यार्थी ज्यांना cet मध्ये १०० पेक्षा कमी गुण आहेत ते शिकतात त्यांचे मेरीट आरक्षण category पेक्षा कमी आहे लाखो रुपये फी भरून शिकतात .तेव्हा मला आरक्षणाचे खरे महत्व पटले .manje arkshan nasate tar merit he paisya varun tar tharalech asate tar caste varun suddha merit tharale asate.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes