मंगळवार, जानेवारी ०५, २०१६

सह्याद्री बाणा ब्लॉगला पाच वर्षे पूर्ण

नमस्कार वाचक मित्रहो,
आज तुमच्याशी संवाद साधताना खूप आनंददायी भावना मनात आहे. २०१५ वर्ष संपता संपता सह्याद्री बाणा या ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण झाली. २९ नोव्हेंबर २०१० रोजी सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालू केला. बहुजन हितासाठी चालू केलेल्या या ब्लॉगला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या २९ नोव्हेंबर ला ब्लॉगला पाच वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून ब्लॉगच्या पाच वर्षाच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घ्यावा असा विचार आहे.

ब्लॉगची सुरुवात-
प्रकाश पोळ
वर सांगितल्याप्रमाणे सह्याद्री बाणा या ब्लॉगची निर्मिती २९ नोव्हेंबर २०१० रोजी केली. त्याआधीदोन-अडीच वर्ष मी "विद्रोही विचार मंच" नावाचा ब्लॉग चालवत होतो. मुळात ब्लॉग तयार करण्याची गरज का पडली हेही समजून घेणे योग्य ठरेल. पुरोगामी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ हवे होते. वैचारिक वाचन चालूच होते. त्यामुळे अनेक विचार सुचत, अनेक विचारांवर प्रतिक्रिया द्यावीशी वाटे. समाजात आपल्या आजूबाजूला घडणार्या अनेक गोष्टींवर मतप्रदर्शन करावे वाटे. त्यामुळे लोकमत, पुढारी अशा वर्तमानपत्रातून 'वाचकांचा पत्रव्यवहार' या सदरातून लिहिता झालो. लोकमत आणि पुढारीतून जवळजवळ शंभरभर पत्रे प्रसिद्ध झाली. यातील काही पत्रे विद्रोही विचार मंच या ब्लॉगवर टाकली आहेत. वाचकांचा पत्रव्यवहार मधून लिहिता लिहिता कराड, सातारा येथील स्थानिक वर्तमानपत्रातून लेख लिहू लागलो. स्थानिक वृत्तपत्रे लेख प्रसिद्ध करायचे,
परंतु त्यांची वाचक संख्या खूपच मर्यादित असल्याने ते विचार फार लोकांपर्यंत पोहचत नव्हते. तरीही प्रीतीसंगम, ग्रामोद्धार अशा वृत्तपत्रांनी माझे अनेक लेख प्रसिद्ध केले. प्रस्थापित वृत्तपत्रे मात्र अनेक कारणांनी लेख प्रसिद्ध करायचे नाहीत. त्यामुळे त्या वृत्तपत्रातून लिहायचे असेल तर वाचकांचा पत्रव्यवहार हे सदर मदतीला होतेच. परंतु त्यालाही मर्यादा होत्या. एकतर वाचकांच्या पत्रांसाठी जागा खूपच कमी असे. त्यामुळे फारफार तर १००-१५० शब्द किंवा कधी कधी ५०-६० शब्दांचे पत्र छापून येत असे. त्यामुळे आपणाला जो विचार मांडायचा आहे तो पूर्णपणे मांडता येत नसे. दुसरे असे कि या मजकुराला संपादकीय  संस्काराला सामोरे जावे लागे. कधी महत्वाचा मजकूर गाळला जाई तर कधी जहाल लिहिल्यामुळे पत्र प्रसिद्ध केले जात नसे. यामुळेच वृत्तपत्रातील लिखाणाला मर्यादा पडत होत्या. म्हणूनच आपले विचार मांडण्यासाठी एका अशा व्यासपिठाची गरज होती कि जे आपले लिखाण जसेच्या तसे प्रसिद्ध करेल. त्याचप्रमाणे जे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून आपले प्रचार-प्रसाराचे उद्दिष्ठ पूर्ण करेल.

अशा व्यासपिठाच्या शोधात असतानाच माझी ओळख ब्लॉग या प्रकाराशी झाली. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजकालची पिढी जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन असते. तेव्हा ब्लॉगच्या माध्यमातून आपण आपले विचार मांडू शकतो. याला जागेचीही मर्यादा नाही. तसेच कराडमधून पोस्ट केलेला लेख एखादा माणूस अमेरिका, रशियातही बसून वाचू शकतो. त्यामुळे ब्लॉग हे माध्यम हाताशी आल्याने मी खूपच खुश झालो. त्यानंतर विद्रोही विचार मंच या ब्लॉगची निर्मिती केली. या ब्लॉगवर माझी लोकमत, पुढारीत प्रसिद्ध झालेली पत्रे, महत्वाच्या बातम्या, लेख प्रसिद्ध केले आहेत. या ब्लॉगलाही वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला. दरम्यानच्या काळात मी काही पुरोगामी, विद्रोही संघटनांच्या संपर्कात आलो. या संघटनांच्या कट्टर ब्राह्मण विरोधी विचारांचा प्रभाव माझ्यावर काही काळ पडला. पण थोडाच काळ. परंतु तरीही वि. वि. मंच वरून प्रसिद्ध झालेला मजकूर तुलनेने जहाल होता.  त्याबाबत मीही समाधानी नव्हतो. तसेच हा ब्लॉग अपडेट करायलाही फार वेळ मिळत नसे. त्यामुळेच असा विचार केला कि एक नवीन ब्लॉग तयार करावा आणि तोच कायमस्वरूपी अपडेट ठेवावा. शेवटी खूप विचार करून २९ नोव्हेंबर २०१० रोजी सह्याद्री बाणा या ब्लॉगची निर्मिती केली. 

अल्पावधीतच ब्लॉगला भरपूर प्रसिद्धी मिळाली. ब्लॉग तयार करणे, डिजाईन करणे याचे तांत्रिक ज्ञान नव्हतेच. परंतु गुगल मदतीला असताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. गुगलच्या मदतीने ब्लॉग तयार करून चांगल्या प्रकारे डिजाईन केला. काहीतरी हटके नाव द्यायचं म्हणून महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या सह्याद्रीचे नाव ब्लॉगला दिले. ब्लॉगवरून पुरोगामी विचारांच्या प्रसारासाठी खूप लेख लिहिले. क्वचित प्रसंगी मला भावलेले इतर अभ्यासकांचे लेखही सह्याद्री बाणाच्या वाचकांना उपलब्ध करून दिले. दरवर्षी ब्लॉगला प्रतिसाद वाढतच गेला. दररोज शेकडो विजिट मिळत गेल्या. जगभरातील अनेक देशांमध्ये ब्लॉगने आपले नियमित वाचक तयार केले. ब्लॉगवर जगभरातून आलेल्या प्रतिक्रिया पाहता ब्लॉगला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद दिसून येतो. पाच वर्षात ब्लॉगला जे यश मिळाले त्याबाबत मी समाधानी आहे. हा ब्लॉग म्हणजे माझे सर्वस्व आहे. ब्लॉगने मला सामाजिक जीवनात ओळख मिळवून दिली. महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक पुरोगामी विचारवंत, कार्यकर्ते संपर्कात आले. त्यांचा पाठिंबा, प्रोत्साहन तसेच त्यांनी केलेल्या सूचना यांची माझ्या वाटचालीत खूपच मदत झाली. 

पुरोगामी चळवळीत काम करत असताना विविध अनुभव आले. सह्याद्री बाणावर लिहिलेल्या लेखावर परस्पर विरोधी प्रतिक्रियाही आल्या. काहींनी कौतुकाची थाप टाकली तर काहींनी कौतुक करत असतानाच मोलाच्या सूचनाही केल्या. काहींनी मतभेद व्यक्त करून वैचारिक वादविवाद केले. तर काहींनी फक्त घाणेरड्या शिव्या दिल्या. अर्थात सर्वच प्रतिक्रियांचे मी मनापासून स्वागत केले. कारण ब्लॉग तयार करतानाच काही गोष्टी मनाशी ठरवल्या होत्या. उदा. ब्लॉगवर लिहित असताना सभ्यता आणि नैतिकता कधीही सोडायची नाही. कुणी शिव्या दिल्या तरी आपण त्यांच्या मार्गाने व्यक्त व्हायचे नाही. दुसरे असे कि ब्राह्मण जातींवर वैयक्तिक टीका करायची नाही. टीका करायची ती ब्राह्मण्यावर. चिकित्सा करायची ती ब्राह्मण्याची. कारण हे ब्राह्मण्य सर्व जातींमध्ये कमी जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे जिथे असे ब्राह्मण्य किंवा विषमतावादी प्रवृत्ती आढळून येईल त्याचा समाचार ब्लॉगवर घ्यायचा. परंतु वैयक्तिक टीका टिपण्णी करायची नाही. अशा काही गोष्टी ठरवून ब्लॉग लिहायला सुरुवात केली. 

पुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंत, अभ्यासक, कार्यकर्ते यांनी ब्लोगचे कौतुक केले आहे. सर्वांचा नामोल्लेख करणे शक्य नसले तरी काही लोकांचा उल्लेख करावा लागेल. डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. हरी नरके, आ. महादेव जानकर, संजय सोनवणी, प्रा. श्रावण देवरे, प्रा. होमेश भुजाडे, प्रा. श्रीमंत कोकाटे, विनीत वानखेडे, सचिन शेंडगे, वैभव छाया, मधुकर रामटेके, संजय सामंत, नवनाथ चौगुले, संजय क्षीरसागर, रोहित घनवट अशी अनेक माणसं भेटली. ज्यांनी मला ब्लॉग लिहिण्यास खूपच प्रेरणा दिली. त्यांचा पाठींबा आणि वाचकांचे भरभरून मिळणारे प्रेम या जोरावर सह्याद्री बाणाची आज पर्यंतची वाटचाल यशस्वी होवू शकली. याव्यतिरिक्त अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी या वाटचालीत खूपच मोलाची साथ दिली. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईक यापैकी अनेकांनी आस्थेने चौकशी करून प्रोत्साहन दिले. 

यात सर्वात महत्वाचा उल्लेख करावा लागेल तो माझ्या वडिलांचा, दिवंगत लालासाहेब पोळ यांचा. त्यांनीच
लालासाहेब पोळ
मला घडवलं. माझ्यावर पुरोगामी संस्कार केले. मला वाचनाची गोडी लावली. माझ्यासाठी खूप पुस्तकं आणली. मला वाचण्यास आणि लिहिण्यास नेहमी प्रेरणा दिली. ते माझे पहिले गुरु होते. माझ्या प्रत्येक विचार आणि कृतीच्या पाठीशी ते ठाम उभे राहिले. भरपूर वेळा आमच्यामध्ये तासनतास वादविवाद झडायचे. त्यांच्या माझ्यासोबत वैचारिक वाद करण्यामुळे माझे विचार बर्यापैकी संतुलित राहण्यास मदत झाली. सह्याद्री बाणावर प्रसिद्ध होणार्या लेखांचे पुस्तक तयार करावे असे त्यांच्या मनात होते. ते माझ्या या वाटचालीत सावलीसारखे माझ्या पाठीशी राहिले. परंतु दुर्दैवाने ५ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. माझ्यासाठी सर्वकाही असणारे माझे वडील गेले हा धक्का खरेतर पचवणे माझ्यासाठी खूपच अवघड होते. परंतु 'रडायचं नाही, लढायचं' ही त्यांचीच शिकवण कामी आली. ते आज शरीराने माझ्याजवळ नसले तरी मनाने, विचाराने नेहमीच माझ्या मनात, हृदयात राहतील. हा ब्लॉग म्हणजे एक प्रकारे त्यांच्या प्रयत्नाचे फलित आहे. त्यांनीच मला घडवले. मला माणूस म्हणून समाजात उभे केले. आज मी जो काही आहे तो त्यांच्याच मुळे. ते माझे वडील, मित्र, मार्गदर्शक, गुरु होते. म्हणूनच हा ब्लॉग मी त्यांनाच अर्पण केलाय. त्यांनी पुरोगामी विचारांचा मला दिलेला वसा मी सह्याद्री बाणाच्या माध्यमातून पुढे नेतोय हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


पाच वर्षात ब्लॉगला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आजवर अडीचशे लेख या ब्लॉगवर प्रसिद्ध केले.  हा लेख लिहीपर्यंत ४,९३,२४३  (जवळजवळ पाच लाख) वाचकांनी सह्याद्री बाणाला भेट दिली आहे. जगभरातून जवळजवळ ८४ देशांतून या ब्लॉगला वाचक नियमित भेट देत असतात. ब्लॉगला ३६० फॉलोवर आहेत. तसेच फेसबुकवर सह्याद्री बाणा हे पेज १७०० हून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ब्लॉगवर आजपर्यंत १५०० प्रतिक्रिया आल्या आहेत. 

आजपर्यंतचे सर्वात लोकप्रिय लेख 

18789








15468








14367








12587








12269








9191








8893








4244








1673








16 Feb 2011, 26 comments

या देशांतून ब्लॉग सर्वात जास्त वाचला जातो-

India
369238
United States
52512
Israel
7959
Ukraine
5218
China
4688
Germany
2321
Russia
2056
Spain
1898
Canada
1220
United Kingdom
 
 1136
 

9 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

blog is really good; Thank you very much for providing us such useful and important information. Best Wishes !!!

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद ताई....असाच स्नेह राहू दे....

श्री.अभिजीत पाटील म्हणाले...

आपला ब्लॉग खुपच छान आहे सगळे लेख चांगले आहेत.आपल्या ब्लॉगमध्ये बर्याच विषयांना स्पर्ष केला आहे आपण.हे स्तुत्य कार्य आपणाकडून उत्तरोत्तर होवो हीच इच्छा.आपण आपल्या महत्कार्यात यशस्वी व्हावे आणी अशाच प्रकारे लेखण निर्माण करावे.बहुजनांच्या साठी लिहिणारे फ़ारच कमी आहेत.तुम्ही त्यातीलच एक आहात समाजाला तुमची गरज आहे.सत्य लिहिणे आपल्या स्वभावात आहे त्यामुळे परिवर्तनामध्ये आपला मोलाचा वाटा ठरु शकतो.आजवर ज्याच्या हाती लेखणी तोच इतिहासाचा धनी अशाच प्रकारे इतिहास लिहिला गेला.त्यामुळे खरी लेखणी उचलल्याशिवाय गौरवशाली इतिहास समोर येणार नाही.शेवटी मी एवढंच म्हणेन की प्रत्येकाने या ब्लॉगवरील लेख मनात कोणतही पुर्वग्रह दुषित भावना न ठेवता स्वच्छ मनाने वाचावा.असेच कार्य चालू ठेवा आपल्या भावी वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा.
जय जिजाऊ जय शिवराय

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद अभिजित

राकेश म्हणाले...

खुप छान प्रकाश.... तुझा ब्लोग वाचायला खुप मजा येते. keep it up....

avi@kolhaput म्हणाले...

Mast blog ahe ha...mi nehmi vachto

Unknown म्हणाले...

Prathmta thank u sir. Aapn suru kelelya blogmule mipn vichar mandu shakto. Lihu shakto hi bhavna jahrut Zuli. Tumhi ani tumche vichar khup khup great aahet sir. Thanks ones more. Aapli lihnyachi Hatoti aani vicharshakti Ashish baharat javo. Hyach shubhhechya.

Unknown म्हणाले...

Prathmta thank u sir. Aapn suru kelelya blogmule mipn vichar mandu shakto. Lihu shakto hi bhavna jahrut Zuli. Tumhi ani tumche vichar khup khup great aahet sir. Thanks ones more. Aapli lihnyachi Hatoti aani vicharshakti Ashish baharat javo. Hyach shubhhechya.

Balasaheb Dhumal म्हणाले...

प्रकाश पौळजी आपण खुपच प्रखर समर्पक व वास्तव लिहीता. विशेष म्हणजे दुर्लक्षीत विषय व व्यक्तीरेखा समोर आणता. आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे. सह्याद्रीबाणा वाचायला मिळतो हे मी माझे भाग्य समजतो.धन्यवाद व शुभेच्छा...

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes