प्रा. हरी नरके |
गेल्या काही दिवसात बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा. हरी नरके आणि बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांच्यातील वादामुळे बहुजन कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. या वादात बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची बाजू ‘मुलनिवासी नायक’ मधून नेहमी मांडली जाते. परंतु हरी नरकेंची बाजू पाहण्यात आली नव्हती. एखाद्या वादग्रस्त गोष्टीवर लिहीत, बोलत असताना दोन्ही बाजू ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. एकच बाजू आपण सातत्याने मांडायची आणि दुसऱ्याची बाजू ऐकूनच घ्यायची नाही किंवा दुसऱ्याला त्याची बाजू मांडायची संधीही द्यायची नाही हा शुद्ध पक्षपातीपणा आहे. तो पक्षपातीपणा मी तरी करणार नाही. याआधी चारच दिवसापूर्वी मी या ब्लॉगवर ‘हरी नरकेंची विसंगत भूमिका’ हा लेख लिहिला होता. तो लेख लिहिण्यामागे प्रामाणिक भावना होती. हरी नरके यांच्यावर टीका करणे हा त्या लेखाचा उद्देश नव्हता. (हरी नरके यांच्यावर टीका करावी एवढी माझी वैचारिक उंची नाही. माझ्या वयापेक्षा जास्त वर्षे नरके सरांनी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसाठी खर्च केली आहेत.) परंतु लेख लिहिण्यापूर्वी मी एकदा नरके सरांशी बोलायला हवं होतं. म्हणजे त्यांनी माझ्या प्रश्नांचा खुलासा केला असता. परंतु गेले काही दिवस नरके सरांना अनेक अनाहूत कॉल्स येत असल्याने ते माझा कॉल रिसिव्ह करतील का ही शंका होतीच. नरके सरांना कॉल करून अनेक जण धमक्या देत आहेत, त्यामुळे ते त्रस्त होते. मग आपल्याच एखाद्या सहकाऱ्याला धमक्या देण्याइतपत आपली नैतिक पातळी खालावली आहे का ? याचा विचारसुद्धा चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.
२४ ऑक्टोबर २०१० च्या ‘दादोजी कोंडदेव हटाव संघर्ष मेळाव्या’त प्रा. हरी नरके आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विषयीचा तो ठराव पाहूनच मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु त्यानंतर वाद अशाप्रकारे वाढत जाईल असे वाटले नव्हते. त्यानंतर दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवण्यात आला आणि तो ठराव सर्वजण विसरूनही गेले. त्यांनतर प्रा. हरी नरके यांचा ‘लोकप्रभा’ मध्ये लेख वाचला आणि मनात अनेक प्रश्नांचे काहूर उठले. त्याच प्रमाणे ‘मुलनिवासी नायक’मधून गेल्या सहा महिन्यांपासून हरी नरके यांना ज्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले ते पाहून मन व्यथित झाले. प्रा. हरी नरके, मेश्राम साहेब, खेडेकर साहेब ही सारी मोठी, अभ्यासू आणि विचारी माणसं आहेत. त्यांच्या मानानं आम्ही चळवळीत काम करणारी तरुण मुलं फारच लहान आहोत. आपल्या घरातील मोठ्या माणसांची भांडणं चालू झाली तर लहान मुलं ज्याप्रमाणे कावरी-बावरी होतात, तशी आमची गत झाली आहे. नक्की वाद का चालू आहे, कशासाठी चालू आहे या गोष्टीचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. ‘मुलनिवासी नायक’मधून तर हरी नरके गद्दार, हरी नरके ब्राम्हणांना फितूर अशी मांडणी होतच होती. पण त्याहीपुढे जावून हरी नरकेंच्या पितृत्वाविषयी टीकाटिपण्णी केली गेली, (संदर्भ- मुलनिवासी नायक, ३ फेब्रुवारी २०११) हा हरी नरकेंच्या आईचा अपमान/बदनामी नाही का ? ज्या माउलीने कि जी उस तोडणी कामगार होती, आपल्या मुलाला प्रतिकूल परिस्थितीत लहानाचा मोठा केला, त्याला शिकवले. त्यानंतर हरी नरके गेल्या २५-३० वर्षे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. ज्यांनी २५ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. ६००० भाषणे केली. हजारो लेख लिहिले त्या हरी नरके यांच्याबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल इतकी विकृत मांडणी.....गेल्या काही वर्षात जिजाऊंच्या बदनामीच्या निषेधार्त आपण अनेक आंदोलने केली. ब्राम्हणांच्या वर्चस्ववादी आणि विकृत भूमिकेविरुद्ध संघर्ष केला. त्याच संघर्षाचे एक शिलेदार असणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या आईचा कोणता मान-सन्मान आपण ठेवला ? हरी नरकेंच्या भूमिकेबाबत मतभेद असतील तर जरूर मांडावेत, पण मांडण्याची पद्धत कोणती असावी याचा जरातरी विचार आम्ही करणार आहोत कि नाही ?
‘मुलनिवासी नायक’मधून हरी नरके यांच्याविषयी अनेक लेख, बातम्या छापून आल्या. परंतु नरकेंचा एका ओळीचाही खुलासा का छापला नाही ? चळवळीत काम करताना सर्वांचे प्रत्येक मुद्द्यावर एकमत झालेच पाहिजे असा नियम नाही. किंवा आपण जी भूमिका घेतली आहे, तीच चळवळीतील प्रत्येकाने घेतली पाहिजे असा अट्टाहासही असता कामा नये. मग काही गोष्टीत मतभेद झाले म्हणून एखाद्याला फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतून बहिष्कृत करणार का ? ज्या माणसाने आपलं आजपर्यंतचं सारं आयुष्य केवळ चळवळीसाठी खर्च केलं आहे. ज्यांनी अभ्यास, संशोधन करून अनेक नव्या गोष्टी समोर आणल्या त्यांना आपण इतक्या सहजपणे कसे काय गद्दार ठरवू शकतो ? विशेषतः चळवळीत काम करणाऱ्या तरुण मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण कुणाबद्दल बोलतो, काय बोलतो याचं तारतम्य आणि भान आपल्याला असायला हवं. हरी नरकेच नव्हे तर चळवळीतील इतर कोणतीही व्यक्ती एखाद्या भूमिकेमुळे चुकीची आहे, असे वाटत असेल तर त्याबद्दल जरूर लिहा, बोला. तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु तसे करताना समोरच्या व्यक्तीचे वय, पद, प्रतिष्ठा आणि त्याचे चळवळीतील योगदान याचा जर आपण विचार करणार नसू तर आपण कृतघ्न आहोत असे मला वाटते.
‘मुलनिवासी नायक’ला टीका करण्याचा अधिकार आहे. नरके सरांची एखादी भूमिका पटली नाही तर त्याविरुद्ध अग्रलेख लिहा, बातम्या छापा. परंतु ज्या गोष्टीला काहीही अर्थ नाही अशा बातम्या आणि लेख छापण्यात काय अर्थ आहे ? कुणीतरी नरकेंना फोन करायचा, अद्वातद्वा बोलायचे, नरकेंचे सामाजिक चळवळीतील योगदान विसरून जाब विचारल्याच्या अविर्भावात प्रश्न करायचे आणि तेच स्टिंग ऑपरेशनचा आव आणून ‘मुलनिवासी नायक’ मध्ये छापायचं यात कोणती नैतिकता आहे. चळवळीतील आपल्या सहकाऱ्याविरुद्ध इतकी टोकाची भावना.....यामुळे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ पुढे जाईल कि मागे ? याचा विचार आपण करणार आहोत कि नाही ?
‘मुलनिवासी नायक’मधून हरी नरके यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याला उत्तर देण्याची नरके सरांची तयारी आहे. त्यांनी जो खुलासा मुलनिवासी नायककडे पाठवला तो छापला गेला नाही. मग आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी नरके सरांनी इतर माध्यमे (मग ती ब्राम्हणांची असली तरी) वापरली तर त्यांना दोष देण्याचा अधिकार आपणाला आहे काय ? प्रा. हरी नरके यांनी आजपर्यंत मुलनिवासी नायकमधील आरोपांबाबत लिहिलेले नाही (अपवाद-लोकप्रभा). जर त्यानीही इतर माध्यमामधून लिहायला चालू केले तर वाद अधिकच वाढत जाणार. परिणामी चळवळीचेच नुकसान होण्याची शक्यता आहे.
अजून वेळ गेलेली नाही. हरी नरके चर्चेला तयार आहेत. काही बाबींवर मतभेद आहेत, ते चर्चेने दूर केले पाहिजेत. कारण चर्चेने बरेच प्रश्न सुटू शकतात. नरके सरांचा चर्चेवर विश्वास आहे. तो आपणही ठेवायला हरकत नाही.
16 टिप्पणी(ण्या):
Prakash, thanks a lot for ur article.mi maza khulasa man. vaman meshram,man. pravin gaikwad ni sampadak, mulnivasinayak yanna pathavlela ahe. to tyanna milalela ahe.yapurvihi khulase pathavale hote.te mazi baju chhapat nahit. tyanchyavar kes karanyashivay mala paryay nahi.aurangabadchi mulnivasitil mazyabaddalchi batami 100 takke khoti asalyache man. vaman meshram yanna sayojak prof. neeraj salunkhe yanni sangunahi te khulasa chapat nahit.chalvalipexa konihi motha nasato ha niyam fakt hari narkela lagu ahe. to chalvalila apali khajgi property samajnarya mulnivasinayakla lagu naselch.chalvalipexa kunihi mothe asat nahi mag tya vyakti asot ki sanghatana,ki vartamanpatre he yanna kon sangnar?
हरी नरके सर,प्रकाश सर, एकलव्य साहेब, सोनवणी जी....आपण सर्वांना विनंती आहे कि....ज्या प्रमाणे प्रकाश यांनी प्रसिद्ध केले आहे कि नरके हे चर्चे ला तयार आहेत...त्याच प्रमाणे आपण असेही जाहीर करावे कि हि चर्चा आपण इथेच face book वर करणार आहात कि त्याकरिता कोणते विशिष्ठ व्यासपीठ आयोजित करणार आहात....याची माहिती आम्हांस कळवावी जेणेकरून चळवळीचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी व ती याहून अधिक बळकट करण्यासाठी या चर्चेचा फायदा अनेकांना घेता येईल...
हरी नरके विषवी वैयक्तिक आदर आहे
कारण सर प्रामाणिक आहेत
जेव्हा सर सत्यशोधकी चळवळी सोबत होते तेव्हा ते या चळवळी सोबत प्रामाणिक राहिले आणि आता ते भांडारकर सोबत आहेत तेव्हा ते तिथे पण प्रामाणिक आहेत
सर प्रामाणिकच आहेत अन सध्या ते आपल्या सोबत नाहीत कारण त्यांचे भाषणे मी स्वत ऐकली आता ते ब्राम्हणी चळवळी शी प्रामाणिक आहेत.
त्यानी स्वता विचार करावा आज ते फुले पेक्षा टिळकाला महत्व देत आहेत
ज्या भांडारकर ने शिवाजी महाराज यांची बदनामी केली त्या ठिकाणी नरके जातातच कसे
शासना ला ते सांगू शकत नाहीत का ? शिवरायाची बदनामी करणाऱ्या संस्थे मध्ये आम्ही जाणार नाही म्हणून
आज नरके सर भांडारकर चे वकील झालेत
त्याना चळवळ माफ नाही करणार
माझी विनंती आहे ,पुरुषोत्तम खेडेकरसाहेब, वामन मेश्रामसाहेब, प्रवीणदादा गायकवाड श्रीमंत कोकाटेसर, विलास खरात सर, भैयासाहेब पाटील या सर्वाना की जो पर्यंत प्रा.हरी नरके सर भांडारकर संस्थे च्या सदस्यत्वा चा राजीनामा देणार नाहेत तो पर्यंत त्यांच्या शी चर्चा करू नका.
शिवराय आणि जिजाऊ यांची बदनामी करणाऱ्या संस्थे वर जाणारे माणसे आपली नाहीत त्या घाणेरड्या ठिकाणी जाऊन या लोकांनी सामाजिक आत्महत्या केली आहे त्याना आपल्या चळवळी मध्ये येऊन तिची वाट लावायची आहे कारण आता हरी नरके सर ब्राम्हणी गुलाम आहेत
आपला
गणेश बारहाते
कार्यकर्ता जय मल्हार ग्रुप आणि भारत मुक्ती मोर्चा
मु.पो..हटा ता.वसमत जिल्हा.हिंगोली
नरके सरांचा विजय असो.
अभिनंदन प्रकाशजी, तुम्ही जे " प्रा.हरीनारके " यांच्या संदर्भातील वादाविषयी लिहिलात.ते कदाचित तुमच्या जवळ असणाऱ्या " मोठ्याना " दुखावणार सुद्धा असेल.पण आधुनिक पिढीतील तरुणाची मत होती,आहेत.तुम्हाला माझ्यासारख्या बर्याच तरुणाचा पाठींबा आहे ..संपूर्ण update बद्दल आभार ..आणि तुमच्या बुद्धिवादी कार्यास सुभेच्छा
Tumache "Hari Narake" vadachi dusari baju baddalche sahyadri banavarache sarv lekh vachale. Khup vicharpurvak tumhi likhan karata tyabaddal tumache Abhinandan va abhar sudha. Mi "Dainik "Mulnivasi Nayak nehami vachato. Narake siranbaddal barachse vachale ani aaj tumache lekh vachale. I m confuse. Please describe Mr narake sir's side on your blog so that we all should come out from this dilemma. Also please give in details @ Mr narake sirs contribution for our society upcoming / development.
पोळजी, मी तुमच्या या विवेचनाने भारवून गेलो आहे. अजूनही तुमच्यासारखे तटस्थ विचार करू शकणारे युवक आहेत..यात सारे काही आले. धन्यवाद. नरके साहेबांना आपण समजावुन घ्यायचे कि कोणी..याचे चपखल उत्तर आपण दिले आहे. मझा विश्वास आहे कि आहे हे मळभ दूर होईल...नक्किच...
really nice article tuzya lekhamule satya kalnyyas madat hote jai jijau
भांडारकर संस्थेतून हरी नरके यांनी राजीनामा दिलं नाही ही चूक झाली असे गृहीत धरू. मुळात त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही आहे काय याचं विचार व्हावा. कारण नरके आणि आ. ह. साळुंखे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. तरीही त्यांना राजीनामा मागितला. मग गेली अनेक वर्षे रेखाताई खेडेकर भाजप च्या आमदार आहेत ते कसे काय चालते ? त्यांना कधी राजीनामा मागितला काय ?
पुरुषोत्तम खेडेकर यांनी "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" ही पुस्तिका ज्या पाच-सहा लोकांना अर्पण केली आहे, त्या लोकांना त्यांनी सच्चे शिवभक्त संबोधले आहे, त्यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नाव कसे काय ? नरके यांनी ज्या ब्राम्हणांची स्तुती केली आहे, त्यांची स्तुती पूर्वी महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी केली आहे. पण मनोहर जोशी यांच्यासारख्या संघनिष्ठ माणसाला खेडेकर आपली पुस्तिका अर्पण करतात आणि इतर वेळी मात्र ब्राम्हणांना झोडपा म्हणतात हे कसे काय बुवा....
त्याचप्रमाणे 'आपली मानसं अशी का वागतात ?' या पुस्तिकेत खेडेकर यांनी जे मुखपृष्ठ तयार केले आहे, त्यात आपल्या मानल्या गेलेल्या माणसांचे चेहरे आहेत, या बहुजन चेहऱ्यात खेडेकरांनी काही इतर चेहरे घुसवले आहेत, त्यात बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, लालकृष्ण अडवाणी यांचे चेहरे आहेत. आता मला प्रश्न पडतो, ठाकरे आणि अडवाणी आपली मानसं आहेत काय ? जर खेडेकरांना तसे वाटत असेल तर त्याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.
नरके सरांना त्यांचे मत मांडण्याची संधी द्यायलाच हवी. आणि पातळी सोडून कोणावरही टीका करता कामा नये, अगदी आपल्या शत्रूवरसुद्धा. असे असताना आंबेडकरी चळवळीचे शिलेदार असणा-या नरकेसरांवर टीका करणा-यांपासून समस्त आंबेडकरी जनता दूर जाईल. भले त्या त्या संघटनेचे काम कितीही चांगले असो.
भांडारकर संस्थेतून हरी नरके यांनी राजीनामा दिलं नाही ही चूक झाली असे गृहीत धरू. मुळात त्यांना राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही आहे काय याचं विचार व्हावा. कारण नरके आणि आ. ह. साळुंखे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. तरीही त्यांना राजीनामा मागितला. मग गेली अनेक वर्षे रेखाताई खेडेकर भाजप च्या आमदार आहेत ते कसे काय चालते ? त्यांना कधी राजीनामा मागितला काय ?
पुरुषोत्तम खेडेकर यांनी "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" ही पुस्तिका ज्या पाच-सहा लोकांना अर्पण केली आहे, त्या लोकांना त्यांनी सच्चे शिवभक्त संबोधले आहे, त्यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे नाव कसे काय ? नरके यांनी ज्या ब्राम्हणांची स्तुती केली आहे, त्यांची स्तुती पूर्वी महात्मा फुले आणि बाबासाहेबांनी केली आहे. पण मनोहर जोशी यांच्यासारख्या संघनिष्ठ माणसाला खेडेकर आपली पुस्तिका अर्पण करतात आणि इतर वेळी मात्र ब्राम्हणांना झोडपा म्हणतात हे कसे काय बुवा....
पोळजी, मी तुमच्या या विवेचनाने भारवून गेलो आहे. अजूनही तुमच्यासारखे तटस्थ विचार करू शकणारे युवक आहेत..यात सारे काही आले. धन्यवाद. नरके साहेबांना आपण समजावुन घ्यायचे कि कोणी..याचे चपखल उत्तर आपण दिले आहे. मझा विश्वास आहे कि आहे हे मळभ दूर होईल...नक्किच... anand d.chandanshive
सह्याद्री बाणा हा एक ब्राम्हणद्वेष्टा ब्लॉग आहे. आज ब्रम्हणांकडे सत्ता, धन, संख्या या पैकी काहीही नाही. काल्पनिक शत्रूपेक्षा खरा शत्रू ओळखा. Identify Clear and Present Danger (Islam and Christianity). उशिर व्हायच्या आधी.
Do you think brahmins have been playing
patriot Games all these years?
Brahmins and Brahmin thoughts are thousands/lacs times dangerous than Islam and Christians, understand.
अरे बाप रे पोळ साहेब
अहो समोरच्या मानसाच् वय
त्याच काम
पाहुन आदरान बोलण
हे आपल्याला चळवळी मधल्या लोकांना जमत का..???
आपल्या विरोधकाना फोन करुण शिव्या देन
धमक्या देन
एकरी मधे उल्लेख करण(बाब्या, भटुकडे,)
कोणत्याही पातळी वर जाऊन टिका करण
विरोधकांचा बाप काढन
किंवा त्यांच्या बापा बद्दल शंका घेन
विरोधकांच्या आई आणि बायको बद्दल काही पण बोलन
हे तर अगदी नित्याचा कार्यक्रम झाला आहे आपल्या लोकांचा
आता हे सगळे भोग नरके सरांच्या वाट्याला आले आहेत त्याला कोण काय करणार..???
अहो तरुण मुलाना चांगल शिकवा तर हे असे प्रकार होणार नाहीत
जे आपण लोकांनी पेरल आहे तेच उगवत आहे
जे शिक्षण तरुणांना दिल त्याच प्रकाराच् वर्तन चालु आहे
नरके सर
जो अनुभव गेली कित्येक वर्ष आपले विरोधक घेतायत तोच अनुभव आज आपल्याला येतो आहे
आता आपण ठराव की हे बरोबर आहे का चुकीच् ते
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ