फेरआढावा
- समाज जीवन प्रवाही असते. त्यामुळे सांस्कृतिक बाबींचे स्वरुप काळाच्या ओघात बदलत असते. समाजाच्या आकांक्षा आणि गरजा यातही बदल होत असतो. पुढच्या काळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आणि सर्वसामान्य नागरिकांकडून या धोरणाच्या संदर्भात ज्या सूचना प्राप्त होतील, त्यांमधून समाजाच्या या आकांक्षा आणि गरजा व्यक्त होतील. स्वाभाविकच, या धोरणात समाविष्ट करण्यात आलेल्या विविध बाबींवर वेळोवेळी नव्याने विचारमंथन करावे लागेल. तसेच, बदलत्या परिस्थितीनुसार त्यांत योग्य ते फेरफार करावे लागतील वा त्यांमध्ये भर घालावी लागेल.
उपरोक्त सर्व बाबी ध्यानात घेऊन या धोरणाचा दर पाच वर्षांनी फेरआढावा
घेण्यात येईल आणि त्यात आवश्यकतेनुसार फेरबदल करण्यात येतील.
परिशिष्टे
खालील परिशिष्टे मसुद्यात आहेत पण अंतीम संमत धोरणात त्या बद्दल वेगळी निती नमुद केली आहे.
- परिशिष्ट क्र. 1
लेखनपद्धती/वाक्प्रयोग-पुनर्विचार समितीपुढे ठेवण्यात यावयाची उदाहरणे )
खालील चुकीच्या परंतु रूढ झालेल्या शब्दांना वैकल्पिक तद्भव रूप म्हणून
मानावे काय? मूळ शब्द रूढ झालेले शब्द
तज्ज्ञ तज्ञ
अट्टहास अट्टाहास
उपाहारगृह उपहारगृह
साहाय्य सहाय्य
उपर्युक्त उपरोक्त
सर्जन सृजन
सामग्री सामुग्री
देदीप्यमान दैदीप्यमान
कोट्यवधी कोटयावधी
ब्रह्मदेव, ब्राह्मण ब्रम्ह’,‘ब्रम्हदेव’, ‘ब्राम्हण’
व्यक्तिमत्त्व, महत्त्व, तत्त्व इत्यादी व्यक्तिमत्व, महत्व, तत्व इत्यादी
म्लेच्छ म्लेंच्छ
मथितार्थ मतितार्थ
- संस्कृतमध्ये असलेल्या अर्थापेक्षा मराठीत विरूद्ध/वेगळ्या अर्थाने रूढ झालेल्या ‘अपरोक्ष’ इत्यादी शब्दांना प्रमाण शब्द म्हणून मान्यता द्यावी काय?
- चुकीच्या पद्धतीने रूढ झालेल्या पुढील शब्दांसारख्या शब्दांना प्रमाण मानू नये काय?-
प्रमाण शब्द रूढ झालेले चुकीचे शब्द
सयुक्तिक संयुक्तिक
व्यंग्यचित्र व्यंगचित्र
विरोध विरोधाभास
दुरवस्था दुरावस्था
पृष्ठ (‘पृष्ठ’ या अर्थाने वापरला जाणारा) ‘पान’
मग्न, कार्यमग्न (‘मग्न’ या अर्थाने वापरला जाणारा) ‘व्यस्त’
प्रेक्षक ‘प्रेक्षक’ या अर्थाने वापरला जाणारा ‘दर्शक’
- मोडी लिपीमध्ये एकच वेलांटी व एकच उकार असतो. मराठीमध्ये देवनागरीसाठी हीच लेखनपद्धती स्वीकारता येईल काय?
- विरामचिन्हे वापरण्यासंदर्भात निश्चित धोरण नव्याने तयार करणे आवश्यक आहे काय ?
- या समितीने मराठीमधील शब्दांच्या समासांविषयी नव्याने विचार करावा. उदा. ‘क्रीडानैपुण्यविकास’ असा समास करण्याऐवजी ‘क्रीडा नैपुण्य विकास’ असे लिहिणे विकल्पाने प्रमाण मानावे काय?
- ‘मोहिमेंतर्गत’, ‘शाळेंतर्गत’, योजनेंतर्गत’ असे पूर्वरुप संधी मान्य करावेत काय ?
- शब्दांना शब्दयोगी अव्यये जोडण्याच्या बाबतीत निश्चित नियम करण्याची गरज आहे काय ?
- परिशिष्ट क्र. 2
अप्रयोगार्ह शब्दसूची तयार करणा-या समितीपुढे विचारार्थ ठेवावयाची उदाहरणे
अप्रयोगार्ह शब्द - प्रयोगार्ह शब्द धेडगुजरी - संमिश्र, संकरित
चांभारचौकशा - नसत्या चौकशा चांभार - चर्मकार मांग - मातंग भंगी - सफाई
कामगार न्हावी - नाभिक वेश्या - देहविक्रय करणारी व्यक्ती बुद्दू
(बुद्धू) - मूर्ख गांवढळ, खेडवळ, ग्राम्य - ग्रामीण, खेडूत च्यायला, आयला
- अरेच्च्या बाटगा - धर्मांतरित खेळखंडोबा - विचका मलपृष्ठ - (मूलपृष्ठ
किंवा, नवीन शब्द तयार करणे)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ