१. अन्य भाषांसाठी अकादमी - महाराष्ट्र शासनाने हिंदी, गुजराती, सिंधी
आणि उर्दू भाषांतील साहित्यासाठी चार स्वतंत्र अकादमी स्थापन केल्या आहेत.
यांपैकी प्रत्येक अकादमीला दरवर्षी आवश्यकतेनुसार पुरेशी आर्थिक तरतूद
उपलब्ध करून देण्यात येईल. या अकादमींची माहिती गुजरात शासनाला कळविण्यात
येईल. गुजरात राज्याची मातृभाषा असलेल्या गुजराती भाषेची अकादमी
महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली आहे, त्याच धर्तीवर गुजरात राज्याने
मराठी अकादमीची स्थापना करावी, अशी विनंती गुजरात शासनाला करण्यात येईल.
याच पद्धतीने हिंदी मातृभाषा असलेल्या राज्य शासनांना या अकादमींची माहिती
कळवून त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मराठी अकादमीची स्थापना
करण्याची विनंती करण्यात येईल.
२. अमराठी भाषकांसाठी प्रकाशने - मराठी भाषेखेरीज एखादी अन्य
भारतीय/विदेशी भाषा ही ज्यांची मातृभाषा असेल, त्यांना मराठी भाषा
शिकण्यासाठी आवश्यक अशा पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार्या
व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल. तसेच, त्या भाषांतील
शब्दांचे मराठी अर्थ देणार्या आणि मराठी भाषेतील शब्दांचे त्या भाषांतील
अर्थ देणार्या शब्दकोशांची निर्मिती करणार्या व्यक्तींना/संस्थांना
अर्थसाहाय्य देण्यात येईल. या प्रकल्पासाठी आवश्यकता असल्यास परदेशस्थ
महाराष्ट्रीय व्यक्तींचा/संस्थांचा आर्थिक व अन्य प्रकारचा सहभाग
मिळविण्यात येईल. यासाठी आवश्यक ती योजना ‘राज्य मराठी विकास संस्था’ किंवा
‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ तयार करील.
३. अमराठी भाषकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी – अमराठी भाषकांसाठी
व्यवहारोपयोगी मराठी शिकविण्याची सोय उपलब्ध करून देणार्या
व्यक्तींना/संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ