१. बृहन्महाराष्ट्र परिचय पुस्तिका - बृहन्महाराष्ट्रातील तसेच विदेशांतील मराठी भाषकांच्या संस्थांचे स्वरूप, उद्दिष्टे, कार्य इत्यादींचा परिचय करून देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. ‘राज्य मराठी विकास संस्था’ यासाठी योजना तयार करील व राबवील.
२. बृहन्महाराष्ट्र मंडळे साहाय्य - महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणार्या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच
महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणार्या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल.
३. संस्कृती परिचय अभ्यासक्रम - अलिकडच्या काळात महाराष्ट्रीय व्यक्ती शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वास्तव्य, पर्यटन इ. उद्देशांनी परप्रांतांत वा परदेशांत मोठया संख्येने जाऊ लागल्या आहेत. अशा उद्देशांनी प्रवास करणार्या व्यक्तींना त्या त्या ठिकाणची सांस्कृतिक मूल्ये, शिष्टाचार, कायदेकानून, वेशभूषा, संभाषणशैली, आहार, हवामान इत्यादींची योग्य ती माहिती असणे आवश्यक असते. तसेच, महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीविषयीही मूलभूत आणि वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक असते. सांस्कृतिक देवाण-घेवाण विधायक रीतीने होण्यासाठी आणि तिथल्या वास्तव्यात समायोजन होण्यासाठी अशी दोन्ही प्रकारची माहिती उपकारक ठरते. अशा प्रकारे अन्यत्र जाऊ इच्छिणा-या महाराष्ट्रीय/मराठी व्यक्तींना या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ पातळीवर लघुमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ