 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
|
भारतीय
राज्यघटनेच्या माध्यमातून बहुजन स्वातंत्र्याला कायद्याचे अधिष्ठान मिळवून
देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल हा जन्मदिवस.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त बहुजन समाजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी
आपल्या विचार आणि आचारातून भक्कम वैचारिक बळ दिले. बाबासाहेबांच्या
विचारांना स्मरून बहुजन समाजाने शैक्षणिक, सामाजिक आणि ...आर्थिकदृष्ट्या
सक्षम बनाने गरजेचे आहे. जातीपातीच्या राक्षसाला गाडून टाकून सर्व भारतात
बुद्धविचाराचा प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. बाबासाहेबांना
अपेक्षित प्रबुद्ध भारत घडवणे हे आपले लक्ष्य आहे.
बाबासाहेबांनी सर्व
जाती-धर्माच्या उपेक्षित लोकांसाठी संघर्ष केला. स्त्रियांसाठी हिंदू कोड
बिल मांडले. परंतु संकुचित विचारांच्या मनुवादी लोकांनी हिंदू कोड बिलाला
विरोध केला. आज अनेक उपेक्षित घटक बाबासाहेबांच्या संघर्षामुळे सन्मानाचे
जीवन जगात आहेत. स्त्रियांसाठी समान हक्क आहे. समस्त स्त्री वर्ग
बाबासाहेबांचा ऋणी असला पाहिजे. परंतु जातीव्यवस्थेची बंधने आणि
बाबासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल मुद्दाम निर्माण केलेले गैरसमज अशा वावटळीत
बहुतांशी लोक बाबासाहेबांचा तिरस्कार करतात. बाबासाहेबांची ही उपेक्षा
अतिशय अन्यायकारक आहे.
स्वताच्या डोक्याने विचार करा. बाबासाहेब समजून
घ्या. कोणताही अभ्यास न करता बाबासाहेबांच्या कार्याबद्दल टिपण्णी करू नका.
त्यांचे चरित्र वाचा. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला एकसंध समाज निर्माण
करुया. ते आपले नैतिक कर्तव्य आहे.
बाबासाहेब,
तुमच्या विचारांची ज्योत अशीच तेवत राहु दे,
परिवर्तनवादी विचारांचा प्रकाश मला दाखवत राहुदे,
तुमच्या संघर्षमय जीवनाची गाथा,
मला ठरते नवी प्रेरणा,
त्यातूनच मला मिळतो एक वसा,
मानवतावादी समाज घडवण्याचा,
विषमतावादी परिस्थितीशी लढण्याचे,
तुम्हीच दिले बळ आम्हाला,
एक जगावेगळी क्रांती करून,
तुम्ही सर्व समाजासमोर ठेवला आदर्श,
“शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा”
हा मूलमंत्र,
ठरला संघर्षाच्या पर्वातील एक महामंत्र,
तुमचे प्रखर विचार,
करतात मानुवाद्यांवर प्रहार,
म्हणूनच बाबासाहेब तुम्ही ठरलात महामानव.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गौरवशाली कार्य आणि विचारांना विनम्र अभिवादन.........
2 टिप्पणी(ण्या):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित - पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव!
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ