भुतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहीती म्हणजे इतिहास होय, अशी इतिहासाची व्याख्या केली जाते. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते निपक्षपातीपणे सांगणे हा इतिहासाचा हेतू होय. परंतू आजपर्यंत बहुजनाना इतिहासाच्या नावाखाली त्यांच्याच पराभवाच्या, बदनामीच्या गोष्टी तिखट-मिठ लावून सांगीतल्या गेल्या. स्वाताच्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी बहुजन समाज ब्राम्हनावर अवलंबुन राहीला हे बहुजन समाजाचे दुर्दैव होय.
समाजातील उच्च स्थानी असलेला ब्राम्हण वर्ग आजपर्यंत इतिहासाची मांडणी करत आला आहे. परिणामी ती मांडणी करताना त्यानी स्वताला पोषक अशीच केली आहे. बहुजनांच्या महापुरुषाना खलनायक ठरवून त्यांच्याच वंशजांच्या मनात या महापुरुषाविषयी किल्मिष निर्माण करण्याचे महापातक ब्राम्हणी इतिहासाने केले. त्याचप्रमाणे ज्या महापुरुषांचे बहुजन समाजात अत्यंत आदराचे स्थान आहे आणि कुठल्याही परिस्थितीत बहुजन समाज ते स्थान नाकारायला तयार नाही, असे दिसताच ब्राम्हनानी आपले डावपेच बदलले. या महापुरुषांचे ब्राम्हनीकरण करून त्यांचे विचार व कार्य ब्राम्ह्णी संस्कृतीला पोषक होते आणि ते ब्राम्हणी धर्माचे समर्थक, रक्षक होते अशी मान्डणी आज वर केली गेली. हजारो वर्षापासून बहुजन समाजातील अनेकानी विरोध केला. ब्राम्ह्णी संस्कृतीविरूद्ध क्रांती केली. परंतु इतिहासाची प्रभावी अशी पुनर्मांडणी करण्यात बहुजन समाज कमी पडला, अयशस्वी ठरला. त्यामुळे प्रत्येक वेळी ब्राम्ह्णी संस्कृतीने बहुजनाच्या क्रांतीविरूद्ध प्रतिक्रांती केली. खोट्या इतिहासाला निष्प्रभ करण्यासाठी त्याला विरोध करणे हा एक मार्ग मानला तरी तो पुरेसा नाही. भावी पिढ्याना ब्राम्हणी इतिहासाचा हा खोटेपणा कळण्यासाठी ‘प्रतिइतिहास ’ निर्माण करण्याची गरज आहे. दुर्दैवाने या आधीच्या काळात असे प्रयत्न अपवादानेच झाले असे म्हणावे लागेल. त्यामुळे त्या काळापुरती बहुजनाची सरशी झाली व ब्राम्ह्णी इतिहास खोटा पडला तरी पुढील काळात तोच खरा इतिहास म्हणून बहुजन समाजाच्या माथी मारला जातो.
धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यानी त्यांच्या बळीवंश या ग्रंथात पान न. 227 वर भारताचार्यांच्या नाट्यशास्त्रात आलेल्या नाट्यवेदाच्या निर्मितीचा वृत्तांत दिला आहे. “एकदा इंद्र वगैरे देवानी ब्रम्हदेवाकडे मनोरंजनाचे साधन मागितले. त्यावेळी इंद्र ब्रम्हदेवाला म्हणाला ‘हा वेद व्यवहार शूद्र जातीमधे संभवत नाही. म्हणून सर्व वर्णासाठी वेगळा असा पाचवा वेद निर्माण कर. त्याप्रमाणे ब्रम्हदेवाने नाट्य नावाचा पाचवा वेद निर्माण केला. आणि भारत मूनिना इन्द्राच्या ‘ध्वजमह ’ नावाच्या उत्सवामधे त्याचा प्रयोग करणास सांगितले. हा ध्वजमह म्हणजे असुर व दानव यांचा पाडाव केल्याबद्दल साजरा केला जाणाराइंद्राचा विजयोत्सव होता. त्या नाट्यामधे दैत्याना उद्देशून क्रोधपूर्ण वचने होती. तेथे जमलेले दैत्य तो प्रयोग पाहून क्शुब्ध झाले. त्यानी तो प्रयोग बंद पाडला. त्यानंतर झालेल्या देव आणि दानव यांच्या संघर्षात देवानी दानवांचा नाश करून टाकला.वरील प्रसंगाचे डॉ. आ. ह. साळुंखेनी केलेले विश्लेषण पुढील प्रमाणे-
समाजाच्या विविध क्षेत्रात घडणार्या विविध घटनाची नोंद करताना अत्यंत एकतर्फी, एकांगी व पक्षपाती पद्धत अवलंबणे, हे वैदिक संस्कृतीचे एक ठळक लक्षण होय.
प्रेक्षकामधे समाजाच्या विविध गटातील लोक उपस्थित असतील, तर नाट्यप्रयोग सर्वाना सुखावणारा हवा होता. एका गटाचा अभिमान फुलवणारा आणि दुसर्या गटाला हिणवुन अपमाणित करणारा नको होता. प्रत्यक्षात जे घडले ते याच्या विपरीत होते.
नाट्यप्रयोगासाठी निवडलेला हा प्रसंग एकात्म समाजनिर्मितिच्या मार्गातील अडथळा ठरणार असल्यामुळे अनुचित होता, असेच म्हटले पाहिजे.
असुरानी नाटकाचा प्रयोग बंद पडला हे एक प्रकारे योग्यच होते, असे डॉ. आ. ह. साळुंखे म्हणतात. कारण समाजातील एका घटकाची प्रतिमा उजळून टाकायची आणि दुसऱ्या घटकाच्या प्रतिमेला छिन्न-विछिन करून टाकायचे असे कपट मनात बाळगुन रचलेल्या निंद्य प्रयोगाचा त्या दुसऱ्या घटकाने निषेध करणे, हे स्वाभाविकच होय.
इतिहासाच्या पुनर्मांडनीविषयी आ. ह. पुढे लिहितात, ‘असुरानी अपमान कारक प्रयोगाला विरोध केला, यातून त्यांचा स्वाभिमान प्रकट होत असला, तरी एका दोषाबद्दल त्याना धारेवर धरले पाहिजे. देवांच्या बाजूने झालेला नाट्यप्रयोग निष्प्रभ करण्यासाठी तो उधळून लावणे, हा एकाच मार्ग नव्हता आणि तो मार्गही तसे करण्यासाठी पुरेसा नव्हता. खरे म्हणजे त्याला निष्प्रभ करण्यासाठी निपक्षपाती इतिहास नोंदवणारे प्रतिनाट्य असुरानी निर्माण करायला हवे होते….धसमुसळेपणा करून नटकाचा एक प्रयोग बंद पाडला, म्हणून विरोधकांची सगळी अपप्रचार यंत्रणा उखडली गेली असे होत नाही…..आपले महापुरुष भलेही हरले असतील, म्हणून ते आपल्या दृष्ठीने खलनायक ठरत नाहीत. ते आपले महानायकच आहेत, अशा स्वरुपातील त्यांची खरीखुरी प्रतिमा निर्माण करणारी नाटके, खन्डकाव्ये, महाकाव्ये निर्माण करून ती लोकांच्या हृदयाला भिडवण्याच्या बाबतीत असुरानी हलगर्जीपणा केला…..आणि आजतागायत बहुजन समाजाने असुरांच्या या द्षावर फार मोठी मात केलेली नाही.’
डॉ. आ. ह. साळुंखे यांचे वरील विश्लेषण हे आजच्या बहुजनासाठी अत्यंत बोधप्रद आहे. स्वाताचा इतिहास जाणुन घेण्यासाठी आपल्याच शत्रूवर अवलंबून राहणे ही आपली फार मोठी चूक झाली. बहुजन समाज इतिहासाच्या साधनाबद्दल , इतिहास लेखनाबद्दल अनभिज्ञ राहीला, त्यामूळे आपल्या सांस्कृतिक शत्रूनी सांगितलेला, लिहिलेला एकांगी, पूर्वग्रहदुषित इतिहास आपण स्वीकारला. त्यामुळे बहुजनांच्या शेकडो पिढ्यांचे वैचारीक, सामाजिक नुकसान झाले.
इथून पुढील काळात आपल्या पूर्वजांची ही चूक आपण सुधारण्याची गरज आहे. त्याची सुरूवात तर झाली आहे. नुसत्या सुरुवातीने ब्राम्हणी संस्कृतीचे बुरूज ढासळतील की काय अशी शंका यायला लागली आहे. इतिहासाच्या पुनर्मांडणीचे हे कार्य बहुजन समाजातील सुशिक्षीत, सुजाण लोकानी पुढे चालू ठेवले पाहिजे. वाचकांच्या पत्रव्यवहारपासून संपादकीयापर्यंत आणि पुस्तके, कथा, कादंबर्या, चित्रपट, नाटके, मालिका, इंटरनेट या माध्यमाद्वारे बहुजन समाजाचा प्रगल्भ आणि प्रभावी इतिहास आपण मांडला पाहिजे. आपल्या भावी पिढ्याना आपला आणि आपल्या पूर्वजांचा महान इतिहास समजण्यासाठी आपल्या सांस्कृतिक शत्रूवर अवलंबून राहायला लागू नये, याची जबाबदारी आपल्यावर आहे. तेव्हा उचला लेखणी आणि सनातनी संस्कृतीला खिंडार पाडण्यासाठी सज्ज व्हा. बहुजन समाजातील शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी यानी जागृत राहून या सामाजिक कार्यात योगदान द्यावे.
सुजाण वाचकाकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. आपल्या चांगल्या वाईट प्रतिक्रियाचे स्वागतच राहील.
3 टिप्पणी(ण्या):
Really Nice
If we have a inspirable history, it's a responsibility of our litreaturers, authors, historians and most important 'politicions' to rewrite the history. Because if we doesn't get political support, we can't take any action on current history.Also, it's important to take away our books and other knowledge resourses to countryside or village area in whole maharashtra.In villages, brains of bahujana are still in hands of brahmins. It's my request, please make our books available in almost every 'taluka'. Don't limit books upto sindkhedraja and pune for selling. Otherwise our mission will take a time of about 50 years to reach a comman bahujan man. JAY MAHARASHTRA! JAI JIJAU!
इतिहास लिहिताना ब्राह्मणांसह कुणालाही दुखविण्याचा लेखकांचा उद्देश नसतो. त्यांना बहुजन समाजातला मनुवाद्यांच्या आगीतून बाहेर काढावयाचे आहे . अंधश्रद्धा, अज्ञान, कर्मकांड, दैववाद, देवभोळेपणा, विषमता वगैरे प्रकारचे मनुवादी चटके बसून बहुजन समाज्याच्या हालअपेष्ठा वाढलेल्या आहेत. म्हणून ते बोलत आहेत, लिहित आहेत. त्यांचे कर्तव्य ते करीत आहेत. पण हा मनुवादी वर्ग (वर्ण श्रेष्ठत्वाचा, दैववादाचा आणि ज्ञानाचा फाजील अहंकार असणारे) त्यांना अडथळा करीत आहेत. प्राचीन काळापासून हे असेच चालू आहे. या देशात सुज्ञ आणि बुद्धिवादी ब्राह्मण असतील तर (?) त्यांनी याकडे लक्ष्य देण्याची कृपा करावी. पण त्यांनी मनुवाद्यांच्या रक्षणासाठी परिवर्तनवादी बनून बहुजनांची दिशाभूल करू नये हि नम्र विनंती.
-प्रा. राहुल कापसे
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ