गुरुवार, डिसेंबर २७, २०१२

75 years of ‘Annihilation of Caste- प्रा. हरी नरके यांचे भाषण

सौजन्य: अलोक जत्राटकर,सहा.कुलसचिव,शिवाजी विद्यापिठ,कोल्हापुर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे नाताळच्या दिवशी एका महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. ’75 years of ‘Annihilation of Caste’- Tracing the Journey of Caste System in India ’ असा या दोन दिवसीय चर्चासत्राचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक १९३६ साली प्रकाशित झालं. भारतीय जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी कालातीत रसद पुरवणाऱ्या या पुस्तकाची पंचाहत्तरी आणि आजच्या काळातील त्याचं महत्त्व,...

बुधवार, डिसेंबर २६, २०१२

स्त्रियांवरील वाढते अत्याचार : सामाजिक अवनतीचे लक्षण

- प्रकाश पोळ. दिल्ली येथे एका अभागी भगिनीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराने सारा देश खडबडून जागा झाला आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दिल्लीतील त्या मुलीवर जो प्रसंग ओढवला तो माणुसकीला काळिमा फासणारा आहे. माणसाची नैतिकता किती खालावलेली आहे हेच या घटनेवरून दिसून येते. ती मुलगी रात्री १० च्या सुमारास आपल्या मित्राबरोबर एका खाजगी बसमधून प्रवास करत असताना तिच्यावर पाच जणांच्या टोळक्याने सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड शारीरिक यातना देवून तिच्या मित्रासह बसमधून फेकून दिले. ती तरुणी आजही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. मिडीयाने या घटनेला...

गुरुवार, ऑक्टोबर २५, २०१२

अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या "बळीवंश" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते  याचे काही पुरावे .  गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर...

शनिवार, ऑगस्ट ०४, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग ३

तुकोजीरावांचा आंतरधर्मीय विवाह तुकोजीराव होळकर (III) बावला खून खटल्यानंतर  १९२६ मध्ये तुकोजीराव यांनी गादी सोडली आणि युरोप-अमेरिकेकडे रवाना झाले. तिथेच त्यांची ओळख मिस मिलर यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि तुकोजीरावानी मिलर यांच्याशी लग्न करायचे ठरविले. १९२८ मध्ये तुकोजीराव मिलर यांना घेवून भारतात आहे. त्यांनी तिच्याशी रीतसर लग्न केले. मिलर यांनी हिंदू धर्म स्वीकारला. लग्नानंतर त्यांचे नाव शर्मिष्ठादेवी असे झाले. तुकोजीराव आणि शर्मिष्ठादेवी आयुष्यभर एकत्र राहिले. परंतु त्यांच्या लग्नाबद्दलही जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम चालू आहे. इंटरनेट वर अनेक ब्लॉगधारकांनी बावला खून...

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग २

                                 बावला खून खटला महाराजा तुकोजीराव होळकर (III)    बावला खून खटला हे तुकोजीरावाच्या आयुष्यातील अतिशय दुर्दैवी प्रकरण होय. या प्रकरणात त्यांची खूप बदनामी झाली, त्यांना विनाकारण मनस्ताप सोसावा लागला. शेवटपर्यंत या खून खटल्यात तुकोजीरावांचा सहभाग असल्याचा एकही पुरावा सापडला नाही, तरी कपाळकरंट्या लोकांनी तुकोजीरावच मुख्य आरोपी आहेत असे मानून या प्रकरणाची मांडणी केली . बावला खून खटल्याची थोडक्यात कहाणी अशी की, ...

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग १

तुकोजीराव होळकर (III) आपल्या समाजात अनेक महामानवांनी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामध्ये विचारवंत, लेखक ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सत्ता हातात असणारे राजे, महाराजे, संस्थानिक सुद्धा आहेत. यामध्येच इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. परंतु तुकोजीरावांचे सामाजिक काम समाजासमोर फारसे मांडले गेले नाही. आणि जर कुणी तुकोजीरावांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतलाच तर समाजात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण होवू नये म्हणून प्रस्थापित लेखणीबहाद्दार आणि सनातनी लोकांनी तुकोजीरावांची एवढी बदनामी केली की त्यापुढे त्यांचे सामाजिक कार्य झाकोळून जाईल. त्यामुळे तुकोजीरावांचे सामाजिक कार्य समाजासमोर मांडण्याचा आणि त्यांच्यावरील आरोपांचे खरे स्वरूप दाखवण्याचा हा लेखनप्रपंच....

संभाजी ब्रिगेडने विचार करावा

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक या लेखाचा उद्देश संभाजी ब्रिगेडची बदनामी करणे नाही हे लेख संपूर्ण वाचल्यानंतर लक्षात येईल. मी स्वतः संभाजी ब्रिगेडबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती मला माहित आहे. त्यांच्या कार्याने विचाराने प्रभावित होवून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. प्रश्न केवळ ब्रिगेडचा नाही. कोणतीही बहुजनवादी, पुरोगामी संघटना या माझ्यासाठी आदरणीय आहेत. वेळोवेळी अशा सर्व संघटनांमध्ये मी काम करीत आलो आहे. परंतु ब्रिगेड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे त...

गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१२

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक

अखेर रायगडवरील बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. गेले अनेक दिवस वाघ्या कुत्र्याच्या प्रश्नावरून उलट-सुलट चर्चा चालू होती. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी जोरदार आंदोलन उभे केले होते. वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या एका महाराणीच्या समाधीवर ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक उभा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या महाराणी यांची बदनामी करणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा रायगडवरून काढून टाकावा अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. (संभाजी ब्रिगेडच्या सविस्तर भूमिकेसाठीक्लिक करा.) परंतु रायगडवरील शिवस्मारकाला इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांनी आर्थिक मदत केली असल्याने धनगर समाजाचा वाघ्याचा पुतळा काढण्याला...

शुक्रवार, जुलै २७, २०१२

खरे आयडॉल- प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद्‌ पाटील

लेखक-  किशोर मांदळे सर्वच चळवळींना अरिष्टात सापडण्याचा भोग अटळ असतो. चळवळीचे अरिष्ट नेमके कोणते ते आकलल्याशिवाय त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडू शकत नाही. चळवळींना अरिष्टातून बाहेर काढण्याचे दिव्य विद्यापीठांच्या "आयव्हरी टॉवर'मधील विचारवंतांच्या आवाक्यातले कधीच नसते. त्यासाठी चळवळीच्या रणमैदानातूनच "द्रष्टा पुढे यावा लागतो. या द्रष्ट्याचीही वाटचाल सोपी नसते. कारण, तत्वज्ञानाने कर्मठ बनलेल्या श्रद्धा त्याला मोडीत काढाव्या लागतात. मार्क्सवादाच्या "सार्वभौम श्रद्धेला' आव्हान देऊन त्याचे दार्शनिक अरिष्ट जगासमोर मांडणे म्हणजे तर केवढे पाखंड! हे पाखंड कॉ. शरद्‌ पाटील यांनी तीन दशकांच्या मागेच केले.आत्मरत डाव्या प्रस्थापितांनी कॉ. शरद्‌ पाटलांची कोंडी...

रविवार, जून २४, २०१२

राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा

  (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-3804376078699870", enable_page_level_ads: true }); "सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे...

''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 4

1990 ला RSS-BJP ने पुन्हा अशाच षडयंत्राची रचना केली. परंतू ब्राम्हणी व अब्राम्हणी या दोन्ही शत्रूंनी एकमेकांचा मागचा अनुभव पाहता, RSS-BJP चे नेते जसे हुशार झाले होते तसे ओबीसी नेतेही सतर्क व सावध झाले होते. 1989चा जनता दल व 1977 चा जनता पक्ष यांच्यात बराच मुलभूत फरक होता. परिस्थितीही आमूलाग्र बदललेली होती. यावेळी RSS-BJP ने संभाव्य मंडलविरोधी लढ्याची तयारी खूप आधीपासूनच सुरु केलेली होती. त्यांनी आपल्या पक्षात ओबीसी जातीतून भरपूर ...

शनिवार, जून १६, २०१२

''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 3

आतापर्यंत आपण प्रस्थापित कॉंग्रेसधर्मी पक्षांमधील ओबीसी नेत्यांबाबत चर्चा करीत होतो. आता आपण मूळ ओबीसी चळवळीतून निर्माण झालेल्या ओबीसी नेत्यांबाबत विचार करु या! तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या जातीअंतक सत्यशोधक चळवळ ब्राम्हण-मराठा युतीने दडपून टाकताच तीने एकीकडे तामीळनाडूत तर दुसरीकडे बिहारात मूळ धरले. तामीळनाडूत पेरियार ई. व्ही. रामास्वामी...

गुरुवार, जून १४, २०१२

''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 2

                जर जातीव्यवस्था वर्गव्यवस्थेप्रमाणे खूली राहीली असती तर आज ओबीसी नेतेपदी मुंडे-भूजबळांच्याऐवजी जोशी-कुलकर्णी दिसले असते. बाबरी मशिद पाडण्यासाठी जुंपलेल्या या हिंदू नेत्यांवर ओबीसी नेतृत्वाची झूल का टाकण्यात आली? ते  पुढीलप्रमाने समजून घेता येईल ---- व्हि. पी. सींग सरकार व बाबरी मशिद पाडतांना मंडल आयोगाचा क्रांतीकारक सामाजिक व राजकीय गाभा बर्‍याच प्रमाणात गाडला गेल्यानंतर ओबीसी जातीतील या हिंदू नेत्यांचे एक काम संपलेले होते. आर्थिक व राजकीय उठाव कायमचे उखडून टाकता येतात, सामाजिक असंतोष मात्र...

मंगळवार, जून १२, २०१२

''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 1

  लेखक- प्रा. श्रावण देवरे                   प्रा. श्रावण  देवरे ''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''  हे पुस्तक 6 महिन्यापुर्वीच लिहुन तयार आहे. आर्थिक स्थिती बरी असलेल्या ओबीसी नेत्यांना व कार्यकर्त्यांना पुस्तक छपाईसाठी आर्थिक मदतीची विनंती केली. परंतू फारसा चांगला अनुभव नाही. ईलेक्शनची हौस भागविन्यासाठी आमचे  ओबीसी  3/4 लाख रुपये सहज उडवुन टाकतात. परंतू चळवळीला मार्गदर्शक ठरणारे पुस्तक छपाईसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. या पुस्तकातील एक लेख आपल्या सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी----------...

शुक्रवार, एप्रिल ०६, २०१२

पल्लवी रेणके : चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक

पल्लवी रेणके फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाशी आणि ध्येयवादाशी पक्की नाळ जुळलेली पल्लवी गेलं दशकभर भटक्याविमुक्तांच्या चळवळीसाठी पूर्णवेळ आणि विना मानधन झटत आहे. तिच्या डोळ्यापुढे व्यवस्था परिवर्तनाचं आणि जात, वर्ग, लिंगभेद निर्मुलनाचं स्वच्छ संकल्पचित्र आहे... सामाजिक कार्यकर्ती असलेल्या पल्लवी रेणकेबद्दल सांगत आहेत तिचे वडील, भटक्या-विमुक्तांचे नेते बाळकृष्ण रेणके. ...

रविवार, एप्रिल ०१, २०१२

विचारवंत कलावंत : निळूभाऊ फुले

महाराष्ट्रात अनेक मोठे कलावंत होऊन गेले, पण दुर्गमातल्या दुर्गम खेडय़ापर्यंत आणि तिथल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली जी काही मोजकी नावे असतील, त्यात निळू फुले यांचे नाव अग्रक्रमाने येते. चित्रपटसृष्टीपुरती तुलना करायची तर फक्त दादा कोंडके आणि अशोक सराफ यांची लोकप्रियता निळूभाऊंच्या जवळपास पोहोचते. त्यातही पुन्हा हे दोघे फक्त लोकप्रियतेच्या बाबतीत निळूभाऊंच्या जवळपास जातात....

रविवार, मार्च १८, २०१२

शनिवार, मार्च १७, २०१२

'आंबेडकर' समजून घ्या!

डॉ. भालचंद्र मुणगेकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे. अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;...

बुधवार, मार्च ०७, २०१२

जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक

पुरोगामी महाराष्ट्रात प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारा सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यातील औंध या गावी माणुसकीला काळीमा फासणारी ‘ऑनर किलिंग’ ची घटना घडली. या गावातील आशा शिंदे ही उच्चशिक्षित तरुणी. साताऱ्याच्या सोशल सायन्स कॉलेजमधून तिने एम. एस. डब्ल्यू. केले होते. पुण्यातील एका नामांकित कंपनीत ती कार्यरत होती. विचाराने आधुनिक. जात-पात या गोष्टी गौण आहेत असे तीचे मत. ती एका परजातीतील मुलाच्या प्रेमात पडली. ...

रविवार, मार्च ०४, २०१२

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर !

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना....

शनिवार, फेब्रुवारी २५, २०१२

बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?

हा लेख बहुजनांच्या विरोधात किंवा ब्राम्हणांच्या बाजूने नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे या एकाच हेतूने तो लिहिला आहे. - महावीर सांगलीकर.स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही...

बुधवार, फेब्रुवारी २२, २०१२

स्वतंत्र पुरोगामी भूमिका घेणे म्हणजे ब्राह्मणद्वेष का ?

सह्याद्री बाणावर लिखाण करताना एक आरोप नेहमीच होत आला आहे तो म्हणजे ब्राह्मणद्वेष. तुम्ही ब्राम्हणांचा द्वेष करता असे मला अनेक ब्राम्हण  म्हणतात. पण मी कसा ब्राह्मणद्वेष करतो ते मात्र सांगत नाही. मला आश्चर्य वाटते की मी इतकी संयमी मांडणी करूनही हे लोक नेहमी तेच-तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर ब्राम्हणद्वेषाचा आरोप करणाऱ्या लोकांना मी एका प्रतिक्रीयेद्वारे उत्तर दिले आहे. ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे- ...

शनिवार, फेब्रुवारी ११, २०१२

बुद्ध धम्म , वादविवाद: काल आज आणि उद्या

प्राचीन काळी बौद्ध भिक्खुंमध्ये धम्मा विषयी वादविवाद निर्माण होत असत , काही तत्व, आचार विचार विषयी मतभिन्नता निर्माण होत असे तेव्हा ते वाद मिटविण्यासाठी धम्म संगीतीचे आयोजन करण्यात येत असे. या संगीति अनेक महिने, वर्ष चालत असत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर चार महिन्या नंतर प्रथम धम्म संगीतीचे आयोजन शिशुनाग वंशातील राजा 'अजातशत्रू' यांनी राजगृह येथे केले होते. स्थविर उपाली आणि बुद्धांचा आवडता शिष्य आनंद यांची या संगीतीसाठी प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. ही संगीति सात महिने चालली. मानवाच्या कल्याणासाठी भदंत आनंद यांच्या मार्गदर्शना खाली बुद्ध तत्व प्रणाली तयार करण्यात आली....

शनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२

'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल

गुलामगिरी, अज्ञान, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर २०१०) सह्याद्री बाणा हा ब्लॉग तयार केला. आजपर्यंत ज्या-ज्या महामानवांनी प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला त्या शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून सह्याद्री बाणा ने एक वर्ष वाटचाल केली. बहुतांश बहुजन समाज हा अशिक्षित आणि...

वैदिक लढाया आणि सुसंस्कृतपणा (?)

निरपराध शम्बुकाला रामाने ठार मारले. शंबूक हा तथाकथित शूद्र वर्णातील असून त्याने विद्या ग्रहण केली, हा त्याचा अपराध होता काय? यात रामाचे समर्थन कसे होईल. हे सुसंस्कृत युद्धाचे उदाहरण आहे का ? वामनाने तीन पावलाची जमीन मागून कपटाने निष्कपट बळीराजाला ठार केले हा सुसंस्कृतपणा आहे का ? परशुरामाने अत्यंत क्रौर्याने आपल्या आई आणि भावाना ठार मारले हा सुसंस्कृतपणा आहे का ? सुग्रीव आणि वाली यांच्या संघर्षात निरपराध वालीला रामाने क्षात्रधर्म बाजूला सारून मारले हे रामाचा सुसंस्कृतपणा दर्शवते की कपट ? वालीचा कोणता अपराध होता ? अशी शेकडो उदाहरणे देता येतील. इंद्राने ऋषीच्या बायकोला फसवून तिच्यावर केलेला अत्याचार काय दर्शवतो....

गुरुवार, जानेवारी १९, २०१२

महान क्रांतिकारक: संगोळी रायन्ना

(सदर लेख लिहिताना  विश्वाचा यशवंत नायक या मासिकातील एस. एल. अक्कीसागर यांच्या लेखाचा खूप उपयोग झाला.) संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही....

सोमवार, जानेवारी १६, २०१२

पानिपत आणि मल्हारराव होळकर: पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ

संजय सोनवणी १४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्ष होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबदल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील. १४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्षे होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबद्दल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील. विजयाचे श्रेय घ्यायला सारेच येतात, पण पराजय हा नेहमीच पित्रुत्वहीन असतो असे म्हणतात ते खरेच आहे. उलट एकमेकांवर दोषारोप करण्याची अहमहमिका लागते. त्यातून सत्य हाती लागतेच, असे नाही. कोणाचा तरी बळी चढवून सारे खापर त्याच्या माथी मारून मोकळे होणे ही सामान्यांची रीत झाली, पण इतिहास संशोधनात...

बुधवार, जानेवारी ११, २०१२

परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर- श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस)

श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) हे सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत. तश्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. तुम्हाला ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल. परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर (शब्दांकन: श्री. मनोहर भोळे) दहावीत केवळ ५३ टक्के, बारवीत ७० टक्के, बी. कॉम. मध्ये ६६ टक्के, तर एमबीएमध्ये ६६ टक्के गुण. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील ही सर्वसाधारण प्रगती. बारावीपर्यंतचे शिक्षणही ग्रामीण भागात झाले. पहिली ते चौथी फलटणच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये. पाचवी ते दहावी येथील मुधोजी हायस्कूलमध्ये. या व्यक्तिमत्त्वाचा राजकुमार व्हटकर हा एक सामान्य विद्यार्थी ते भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी हा प्रवास तसा रोमांचक आहे...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes