डॉ. आ. ह. साळुंखे
यांनी त्यांच्या "बळीवंश" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे
दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते याचे काही
पुरावे .
गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज
अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख
गणपती
हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे
भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे
प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या
दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने
त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर
आणि पार्वती यांचा
पुत्र असलेला गणपती मुळचा अनार्य संस्कृतीमधील आहे हे उघडच आहे.
चित्रावशास्त्रींनी गणपती आणि निकुंभ एकच असल्याची माहिती वायुपुराणांच्या
आधारे दिली आहे. निकुंभ हा एक दैत्य होता, हे प्रसिद्धच आहे. प्रल्हादाच्या
एका पुत्राचे नावही निकुंभच होते. महाभारताने म्हटले आहे, “हे भारतवंशजा, प्रल्हादाचे तीन पुत्र
सर्वत्र प्रसिद्ध होते. विरोचन, कुंभ आणि निकुंभ, अशी त्यांची नवे होती.” शिव आणि पार्वती यांनी बाणासुराला आपला
पुत्र मानले होते आणि शिवाने त्याला गणपती होण्याचा वर दिला होता. याचा अर्थ असुरांमधील
अत्यंत पराक्रमी आणि गणांचे प्रमुख असलेल्या व्यक्तींना गणपती म्हटले जात असे.
बाणासुराप्रमाणेच त्याच्या आधीच्या पिढ्यांमधील अनेकांना ही पदवी देण्यात आली
असेल, यात शंका नाही. स्वाभाविकच, प्रल्हादाचा पुत्र निकुंभ याला गणपती म्हणणे, हा
त्याच्या पदाला व पराक्रमाला अन्वर्थक संज्ञा देण्याचा प्रकार म्हटला पाहिजे.
काळाच्या ओघात शंकराचेच वैदिकीकरण झाल्यामुळे गणपतीचे वादिकीकरण होणे
अपरिहार्य होते. त्यामुळे वैदिकांनी ब्रह्मणस्पतीला गणपती मानले. स्वाभाविकच,
वैदिकीकरण झालेल्या गणपतीचे स्वरूप मूळच्या गणपतीपेक्षा खुपच वेगळे झाले. गणपतीची
ही वेगवेगळी अशी दोन रूपे ध्यानात घेवूनच गणपतीच्या व्यक्तिमत्वाचे आकलन करणे
आवश्यक आहे. वैदिकीकरणाची पुटे दूर करूनच गणपतीचे अनार्य संस्कृतीमधील मूळ
स्वरूप समजून घेणे महत्वाचे आहे. (संदर्भ- बळीवंश- डॉ. आ. ह. साळुंखे, पान
नं. ७९)
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी त्यांच्या “बळीवंश” या ग्रंथात पान नं. २७२/७३ वर
हरीवंशामध्ये आलेली बलीपुत्र बाणाची कथा दिली आहे. ही कथा हरीवंशाच्या ‘विष्णूपर्व’ या भागात आली
आहे. वैशंपायनाने जनमेजयाला सांगितलेली ही कथा संवादरुपात आहे. या कथेतील महत्वाचा
भाग असा, “युद्धाची प्रशंसा करणाऱ्या बलीपुत्राला
रुद्र आणि स्कंद यांचे सहाय्य होते.......महात्मा शंकराने त्याला वर दिला,
त्यानुसार त्याला सदैव स्वतःचे (शंकराचे) सानिध्य लाभेल आणि अक्षय्य गाणपत्य
(गणपती हे पद) लाभेल असे त्याने सांगितले.” याच अर्थाचा सदर श्लोक डॉ. साळुंखे यांनी
पान नं. ४२८ वर दिला आहे. तो असा,
“वासुदेवेन यत्र असौ रुद्र-स्कन्द-सहायवान |
बलीपुत्रः रणश्लाघी जित्वा जीवन विसर्जितः ||
यथा च अस्य वर दत्तः शंकरेण महात्मना |
नित्यं सानिध्यता च एव गणपत्यं तथा अक्षयम्” ||
(हरिवंश १०६.५-६)
शंकराने बाणाला जे विविध वर दिले, त्यापैकी एक वर फार फार महत्वाचा
आहे. बहुजनांना आपला वारसा समजून घेण्याच्या दृष्टीने तो फार उपयुक्त ठरणारा आहे. बाणाने प्रमाथगणवंशामध्ये आपले स्थान प्रथम
असावे आणि महाकाल म्हणून आपली ख्याती व्हावी, असे वरदान मागितले आहे.
प्रमाथगण याचा अर्थ शत्रुना घुसळून काढणारा, विलक्षण पराक्रमी गण होय. बाण
गणवंशामध्ये प्रथम होऊ इच्छितो, याचा अर्थ तो एका दृष्टीने गणपती होऊ इच्छितो.
पुढच्या काळात गणपतीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलून त्याला ब्राम्हनानुकुल
बनविण्यात आले असले, तरी गणपती हा मुळचा बहुजनांचा एक अत्यंत पराक्रमी असा पूर्वज
होता आणि असे जे अनेक गणपती होऊन गेले असतील, त्यापैकी बाण हा एक अत्यंत महान
गणपती होता, हे यावरून स्पष्ट होते. (संदर्भ : बळीवंश, पान नं. २८४)
6 टिप्पणी(ण्या):
रोजच्या जगण्यातील ठेचांनी घायाळ होऊन अगतिक झालेल्या समाजाला बुद्धिवादाची नव्हे तर आश्वासनांची गरज असते. अशी आश्वासने ज्या माध्यमातून मिळतात तिथे इच्छुकांची गर्दी जमल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ज्यांचे आयुष्यच जगण्याच्या धडपडीत संपते त्यांना गणपती आर्य-अनार्य असल्याने फरक पडत नाही. नवसाला पावला म्हणजे झाले.
गणपती हा आर्य आहे की अनार्य हा मूळ प्रश्न नसून त्याच्याकडे कोणत्या तत्वांचे प्रतीक म्हणून पाहिले जाते हा खरा प्रश्न आहे. काही ठराविक तथागत किंवा महात्मे तत्वांसाठी त्याग करायला तयार झाले म्हणून संपूर्ण समाज त्यांचे अनुकरण करत नसतो. तत्त्वं कितीही महान असली तरी स्वत:ला सोयीस्कर असतील तेव्हाच समाजाकडून त्यांचे पालन केले जाते. म्हणूनच ऐतिहासिक सत्याच्या मांडणीला तत्वांचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. तत्वांशी फारकत घेतलेल्या इतिहासातून निव्वळ वांशिक दुरभिमान वाढण्याशिवाय इतर काही घडण्याची शक्यता नसते. नाझी विचारधारा हे याचे अजूनही जिवंत असलेले उदाहरण आहे.
अनार्य हे महान आणि आर्य सगळे आक्रमक अशा स्वरूपाचा संदेश कोणासाठीच हितावह नाही. तुमच्यावर आरोप करण्याचा हेतू नाही पण अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून हे लिहिणे भाग पडले.
तसेही वेदोक्ताचा अधिकार ब्राह्मणांनी स्वत:कडे ठेवून इतरांना मूर्तीपुजेतच अडकवून ठेवले आहे. त्यामुळे गणपती सध्याच्या स्वरूपातही अवैदिकच आहे. कारण मुळात वेदांमध्ये मूर्तीपूजेला स्थानच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे धर्म हे सत्ताधारी वर्गाने समाजाला वैचारिक दास्यात ठेवण्यासाठी वापरलेले अस्त्र आहे ही जाणीव समाजात निर्माण होणे गरजेचे आहे. ती जाणीव जर नसेल तर गणपती अनार्य म्हणून स्वीकारला तरी वैचारिक दास्य तसेच राहील. तेव्हा वैचारिक दास्यत्व हे वैदिक असले किंवा अवैदिक असले तरी दास्यत्व्च आहे. केवळ वैदिकांचा विरोध करून ही गुलामी संपण्याची शक्यता नगण्य आहे.
@ Ganesh- ha lekh maza nahi. Ganpati utsav ani bahujan samaj ya mazya lekhat mi ganpati he asurapaiki asat ase lihile hote. Tyala purava mhanun salunkhe saranchya pustakatil utare jasechya tase dile ahet. Te salunkhe saranche sanshodhan ahe.
@ Jidnyasu- rojachya jaganyache kitihi prashn samor asale tari itihasakade purn durlax karave ase mala vatat nahi.
Sarv arya vaait ani sarv asur changle ashi tokachi bhumika mazi nahi. Ulat aaj paryant arya mhanje changle ani anarya mhanje atishay vaait, krur lok ashi annyaykarak ani ektarfi mandani zali ahe. Je anarya sadguni, shur hote tyancha sanman zala pahije, ase mala vatate.
प्रकाशभौ जरा सहकारी साखर कारखाने आणि सहकारी बँका ह्यांच्यामुळे किती लोकांचे किती नुकसान झाले आहे ते सुद्धा लिहीत चला की! तुमचे ते साळुंखे तर याविषयी लिहिणारच नाहीत. त्यांना आणि त्यांच्या मालकांना सामान्य लोकांची पडलेली नाही. दोन वेळची भाकरी हाच भुकेल्यांचा धर्म असतो. ती सनातन्यांनी दिली काय आणि पुरोगाम्यांनी दिली काय त्यांना भाकरी मिळाल्याशी कारण. तुम्ही ज्यांच्या विरोधात लिहिण्याचे टाळून ज्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करत आहात त्यांना तुमचीही पर्वा नाही. उद्या तुम्ही भुकेने तडफडत राहिलात तरी ते तुमच्याकडे बघणार नाहीत.
सनातनी ब्राह्मणांच्या विरोधात लिहू नका असे तुम्हाला कोणी सांगत नाही. पण आज सत्तेचा माज ज्यांच्या डोक्यात भिनला आहे आणि त्या जोरावर जे 'दादागिरी' करत आहेत त्यांच्या बद्दल तुम्ही कधी लिहिणार? आजच्या जगात अन्याय करणारे फक्त ब्राह्मणच आहेत का? इतर 'पावर' फुल लोक ब्राह्मण नाहीत म्हणून त्यांच्या अन्यायाविषयी तुम्ही काहीच लिहिणार नाही का? ह्यामुळे तुमच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उमटेल एवढे लक्षात असू द्या.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ