शनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२

'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल

गुलामगिरी, अज्ञान, दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर २०१०) सह्याद्री बाणा हा ब्लॉग तयार केला. आजपर्यंत ज्या-ज्या महामानवांनी प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला त्या शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या कार्यापासून प्रेरणा घेवून सह्याद्री बाणा ने एक वर्ष वाटचाल केली. बहुतांश बहुजन समाज हा अशिक्षित आणि
अज्ञानी आहे. बहुजन समाजाजवळ प्रचार-प्रसाराची साधने फार कमी आहेत. आणि जी आहेत टी अपुरी आहेत. त्यामुळे बहुजन विचाराच्या प्रचार प्रसारासाठी बुद्धीजीवी वर्गाने प्रसारमाध्यमे निर्माण केली पाहिजेत ही निकड नेहमीच जाणवत होती. बहुजन समाजाचा खोटा, बदनामीकारक इतिहास लिहून बहुजनांच्या माथी मारला जातो. असे नतदृष्ट इतिहासकार आणि अभ्यासक (?) नेहमीच प्रस्थापित व्यवस्था टिकवण्यासाठी धडपडत असतात. त्यांच्या हाती हजारो वर्षांपासून शिक्षणाच्या चाव्या असल्याने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आघाड्यांवर त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. प्रचार-प्रसाराची बहुतांश माध्यमे त्यांच्याच हाती असल्याने बहुजनांचा आवाज दाबला जायचा. आपल्या हातातील माध्यमांचा गैरवापर करून बहुजनावरील गुलामी अधिक बळकट कशी होईल यासाठीच ही माध्यमे झटत आहेत. स्वतःची बाजू जशीच्या तशी मांडणे हे प्रस्थापित माध्यमांच्या मदतीने कधीच शक्य होत नव्हते. त्यामुळे बौजानांचा आवाज सर्व समाजासमोर मांडण्यासाठी सह्याद्री बाणा हा ब्लॉग चालू केला.
सध्या इंटरनेट विश्वात कमालीची क्रांती झाली आहे. समाजातील सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर करू लागला आहे. विशेषतः तरुण वर्गाचा इंटरनेट वरील वाढता वावर पाहता एखाद्या ब्लॉग/वेबसाईट ची निर्मिती करण्याची कल्पना मनात आली. सह्याद्री बाणा वर आजपर्यंत जे-जे लिखाण केले त्याला बहुजन वाचकांचा खूप प्रतिसाद मिळाला. त्यानंतर विविध प्रश्नांवर एक वर्ष लेखन केले. काही वेळा इतर ब्लॉगवरील/वर्तमानपत्रातील लेखही सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिले. अल्पावधीतच सह्याद्री बाणा हा ब्लॉग बहुजन समाजात लोकप्रिय झाला.
सह्याद्री बाणाचे वैशिष्ठ्य म्हणजे कुणालाही शिव्या न देता सभ्य भाषेत केलेली मांडणी. आपल्या वैचारिक शत्रूविरुद्ध लिहितानाही लेखणीचा तोल ढळू दिला नाही. मी शिव्या द्याव्या म्हणून अनेकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मला घाणेरड्या शिव्या दिल्या. त्यानेही मी बिथरलो नाही म्हटल्यावर त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांना शिव्या घातल्या. परंतु मी बहुजन महा मानवांची बदनामी हे लोक का करतात ते सुसंस्कृत शब्दात मांडले.
आजपर्यंत अनेक विचारवंत, लेखक, पत्रकार, संपादक आणि चळवळीतील नेत्यांनी सह्याद्री बाणाची दाखल घेतली. यामध्ये डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. हरी नरके, महादेव जानकर, संजय सोनवणी, एस. एल. अक्कीसागर, डॉ. नीरज साळुंखे, प्रा. श्रावण देवरे, प्रा. शोभाताई देवरे, डॉ. श्रीमंत कोकाटे, प्रा. महावीर सांगलीकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सह्याद्री बाणाच्या वाटचालीत अनेक मित्रांनीही खूप मदत केली. निखिल देशमुख याने sahyadribana.com हे डोमेन विकत घेवून दिले. त्याचा सुरुवातीचा खर्चही त्यानेच केला. अनेक मित्रांनी सह्याद्री बाणासाठी शक्य ते सर्व सहकार्य केले. त्यांचा नामोल्लेख करायचा तर जागा अपुरी पडेल.

एका वर्षात सह्याद्री बाणा ची वाचकसंख्या- १,६०,०००
Countries- 53, Follower- 183, Google Page Rank- 2.
 Top 5 articles-
गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज    1369

12 टिप्पणी(ण्या):

Sanket Patil म्हणाले...

sahyadribana.com is great. congrats Mr. Prakash for your valuable work for bahujan samaj. we appreciate your work.

अरुण साठे म्हणाले...

सह्याद्री बाणा हा ब्लॉग म्हणजे बहुजन मुलनिवासी समाजच मिडिया आहे. प्रकाश धन्यवाद या ब्लॉग बद्दल. सनातनी वर्चस्ववादी प्रवृत्ती विरुद्ध तू जो संघर्ष करत आहेस त्यात आम्हीही सामील आहोत. तुझ्या ब्लॉगवरील लिखाणाशी मी सहमत आहे. अशीच प्रगती करत राहा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
आपला स्नेहांकित,
अरुण साठे.

अनामित म्हणाले...

तुला काय काळात का. इतिहास मणजे काय माहिती आहे का? बाबासाहेब पुरंदरे, मेहेंदळे, बलकवडे हे इतिहासकार आहेत. तुम्ही श्रीमंत कोकातेना विचारा त्यांना मोदी येते का? संस्कृत येते का? निघालेत इतिहास लिहायला. अरे जरा शिका, अभ्यास करा, आधी घरात खायला काय आहे का ते बघा अन मग इतिहास लिहा.

प्रकाश पोळ म्हणाले...

@संकेत आणि अरुण साठे-
मित्रानो धन्यवाद. आपण ब्लॉग वाचून प्रतिक्रिया दिलीत आणि माझे मनोबल वाढवले. सह्याद्री बाणा ला यापुढेही असेच प्रेम मिळेल ही अपेक्षा.

Unknown म्हणाले...

Very good blog prakash !

प्रकाश पोळ म्हणाले...

Thanks sameer.

अहिल्यादेवी युवा मंच यमगरवाडी म्हणाले...

जय मल्हार... जय अहिल्या ....!!
आजच्या विसाव्या शतकात आपणास एव्हढा त्रास झाला तर २००० वर्षा पासून बहुजन समाजाने किती त्रास सहन केला असेल हे कल्पनेच्या पलीकडील आहे. कांही दिवसापूर्वी मला मुलाने डिस्कव्हरी चैनेल पाहत असताना प्रश्न विचारला होता... जसे पाश्चिमात्य देशात नवीन नवीन शोध लागले वैज्ञानिक क्रांती झाली तशी भारतात का झाली नाही?? आपली संस्कृती तर जगात सर्वात प्राचीन आहे. आणि कोणताही नवीन शोध लागला तर, हे लोक हे तर आमच्या पुराणात आहे ; म्हणत मोठेपणा करतात . जर पुराणात असेल तर त्याचे प्रत्यक्ष पुरावे लिखाण माहिती का मिळत नाही? खरेच या वर्गाने ज्ञानाला बंदिस्त करून ठेवले होते. सर्व गुरुनी त्यांच्या ठराविक जातीतील शिष्यानच हे ज्ञान दिले. बहुजन समाजास जाणीवपूर्वक नाकारले. आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वार्थ साधण्या साठी केला. बहुजन समाजास कर्मकांडात गुंतवून ठेवले. याचा परिणाम देश गुलामगिरीत गेला. या परकीय सत्तेचे भाट हाच उच्च वर्ग होता. यांनी खोटा इतिहास लिहिला . बहुजन समाजाच्या नेत्यांना बदनाम केले. आणि सत्य उजेडात येताच चोराच्या उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली. ... पण आता ज्ञानाचा सूर्य उगवल्या मुळे यांना हात चोळत बसावे लागत आहे.... .........!! जय मल्हार... जय अहिल्या ! जय शिव फुले शाहू आंबेडकर .....!!!!

श्री.अभिजीत पाटील म्हणाले...

नमस्कार प्रकाश
मी आपला ब्लॉग नेहमी वाचत आलोय कारण मला कविता , चारोळ्या वाचण्यापेक्षा सामाजिक लेख वाचायला आवडते.
तुमचा ब्लॉग खूप छान आहे आणि मराठी मध्ये आहे हि चांगली गोष्ट आहे.
मी आपले अनुकरण करील एक ब्लॉग लिहिला आहे.
जरूर पहा
http://marathikattaa.blogspot.in/

प्रकाश पोळ म्हणाले...

धन्यवाद मराठी कट्टा,
मला आपली मदत हवी आहे. कृपया ९६६५३३१९१० या नंबर वर संपर्क करा. किंवा आपला नंबर द्या.

श्री.अभिजीत पाटील म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
कट्ट्यावरचा लेखक म्हणाले...

मराठी कट्टा

Parat akada म्हणाले...

सर्वप्रथम खुप खुप धन्यवाद प्रकाश बहुजन समाजाला त्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल.आणि इंटरनेटचा आपण हि प्रभावी वापर करु शकतो हे दाखवून दिल्याबद्दल. ब्लाँग खुप खुप प्रभावी आहे मी गेले पंधरा दिवस वाचत आहे धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes