हा लेख बहुजनांच्या विरोधात किंवा ब्राम्हणांच्या बाजूने नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे या एकाच हेतूने तो लिहिला आहे. - महावीर सांगलीकर.
स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही

भारतातील सगळेच समाज, मग ते धार्मिक समूह असोत की जातीय,
अल्पजन आहेत. सगळे अल्पजन एकत्र आले म्हणून कांही त्यांना बहुजन म्हणता
येणार नाही. तरीही विषयाच्या सोयीसाठी मी या लेखात त्यांना बहुजन असे
संबोधत आहे.
या तथाकथित बहुजनांनी ब्राम्हण समाजाच्या विरोधात लढा पुकारला आहे. ब्राम्हण हे कितीही आपमतलबी, अहंकारी आणि स्वत:ला श्रेष्ठ समजणारे असले, त्यांनी धर्म आणि इतिहास या क्षेत्रात कितीही लांड्या-लबाड्या केल्या असल्या तरी ते कातडी बचाऊ आणि घाबरट आहेत. त्यामुळे त्यांना टार्गेट करणे सोपे, सोयीचे आणि सुरक्षित आहे. केवळ त्यामुळेच ब्राम्हणांना फासिस्ट पद्दतीने टार्गेट करण्यात येत आहे.
ब्राम्हणांनी जर बहुजनांना गेली पाच हजार वर्षे गुलामीत ठेवले असेल, तर यात दोष ब्राम्हणांचा की या बहुजनांचा? ब्राम्हणांनी आपला स्वार्थ पाहिला यात विषेश ते काय, पण जर बहुजन अल्प अशा ब्राम्हण समाजाचा चक्क पाच हजार वर्षे गुलाम रहात असेल तर ही गोष्ट या तथाकथित बहुजनांची योग्यता काय आहे हेच दाखवून देते. बहुजनवाद्यांच्या मते बहुजनांच्या अवनतीला ब्राम्हण हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. आपण हे खरे आहे असे मानले तर आपणाला हेही मानावे लागेल की ब्राम्हण हे श्रेष्ठ आहेत, कारण ’साडे तीन टक्के’ असणारा ब्राम्हण समाज एवढ्या मोठ्या बहुजन समाजाला वाकवू शकतो तेही हजारो वर्षे!
बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?
आता प्रश्न हा आहे की बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का? ज्यांना खरेच आत्मपरीक्षण करावे असे वाटते त्यांनी खालील गोष्टींवर जरूर विचार करावा:
१. भारतभर गावोगावी दलितांवर राजरोस जे अत्याचार होत असतात, ते करणारे लोक नेमके कोण असतात? या अत्याचारांमध्ये ब्राम्हणांचा सहभाग किती असतो? ’यात बहुजनांचा दोष नसून ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या सिस्टीमचा दोष आहे’ असे ज्यांना वाटते ते ही सिस्टीम मोडण्यासाठी काय करत आहेत? की ही सिस्टीम चालूच रहावी असेच त्यांना वाटते?
२. ब्राम्हण विरोधी पुस्तके लिहिणा-या बहुजन लेखकांची संख्या भरमसाठपणे वाढत आहे. पण बहुजन समाजात इतर महत्वाच्या विषयांवर लिहिणा-यांचे प्रमाण काय आहे? कला, साहित्य, माहिती, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, मनोरंजन, अर्थकारण, धर्म, तत्वज्ञान, समीक्षा असे हजारो विषय लिहिण्यासाठी आहे. बहुजन समाजात अशा विषयांवर लिहिणा-यांची वानवा आहे. असे का? या विषयांवर लिहिण्यासाठी अभ्य़ास आणि संशोधन करायला लागते, खूप मेहनत घ्यावी लागते, भरपूर वेळ खर्च करावा लागतो म्हणून? त्यापेक्षा ब्राम्हणविरोधी लिहायला फारसी मेहनत करणे गरजेचे नसते, केवळ शिव्या घातल्या तरी भागते.
बहुजन लेखकांची झेप फारतर ’पानीपत’पर्यंतच असते! पानीपत पलिकडे जायला ते तयारच नाहीत.
जी गोष्ट बहुजन लेखकांची, तीच गोष्ट बहुजन वाचकांची. त्यांचीही झेप तेवढीच. आणि बहुसंख्य बहुजन तर वाचतच नाहीत. चळवळीच्या बाहेरचे बहुजन राजकरण आणि क्रिकेट या दोनच विषयांवर वाचताना आणि बोलताना दिसतात.
३.बहुजनवादी लेखक आणि नेते ब्राम्हणी मेडियाला नेहमी दोष देत असतात. मेडीयामधले ब्राम्हण हे त्यांचे मोठे टार्गेट असते. मेडीयाचे मालक हे ब्राम्हणेतरच असतात, त्यातील कित्येक तर बहुजनच असतात. पण संपादकीय विभागातील महत्वांच्या पदावर ब्राम्हण असतात. यात दोष त्या ब्राम्हणांचा, त्यांना तेथे ठेवणा-या बहुजन मालकांचा की बहुजनांचा? बहुजन लोक सामान्य रिपोर्टर होवू शकतात, पण संपादक होण्याची योग्यता अजून त्यांच्यात आली नाही हे खरे नाही का? (कांही अपवाद असू शकतात, पण ते अपवादच आहेत). बहुजनातून कोणी माधव गडकरी, कुमार केतकर, निखिल वागळे का तयार होवू शकत नाहीत?
४. आंतर्जातीय लग्न केले म्हणून त्या मुलाला व मुलीला ठार मारणारे बहुजनच असतात. असा प्रकार कधी ब्राम्हणांनी केला आहे का? ब्राम्हण मुली दलितांशीही लग्ने करताना दिसतात, पण समान सामजिक दर्जा असणा-या दोन बहुजन जातीत देखील लग्न होणे म्हणजे आकाश कोसळणे होय. जातीव्यवस्था बळकट करण्यात बहुजन समाजच आघाडीवर आहे, हे खरे नाही का?
५. बहुजनांपैकी अनेक समूहांकडे प्रचंड सत्ता, संपत्ती आणि साधन सामग्री आहे. पण त्यांच्यापैकी कोणीही तळागाळातील लोकंसाठी शाळा, हॉस्पिटल्स, अनाथालये, समाजोपयोगी संस्था काढल्या नाहीत. हे काम भारतातील पारशी, ज्यू , ख्रिस्ती, जैन व कांही प्रमाणात ब्राम्हण समाजाने केले. बहुजन समाजाने अलिकडच्या काळात कॉलेजेस, सहकारी संस्था, हॉस्पिटल्स काढले, पण त्यामागे अर्थकारण व राजकारण हेच मुख्य उद्देश होते, समाजसेवा नव्हे.
ब्राम्हण समाजाने भारतात अनेक इतिहास संशोधन संस्था काढल्या, अनेक प्रकाशन संस्था काढल्या, बहुजनांना ते अजूनही जमत नाही. ब्राम्हणांनी चुकीचा व एकांगी इतिहास लिहिला हे खरे आहे, पण त्यांनी संशोधन संस्था काढल्या, बहुजनांनी काय केले? आज कांही बहुजन लोक आपल्या ’जातीय’ इतिहास संशोधन संस्था काढत आहेत, आणि ब्राम्हणांनी खोटा इतिहास लिहिला म्हणून हेही खोटा इतिहास लिहित आहेत. बरे, ब्राम्हणांनी जे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केले, ते हे बहुजन आता करत आहेत, म्हणजे बहुजन हे लेट-लतीफ आहेत हे कबूल करावे लागेल.
६. ब्राम्हणांनी शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात बंदिस्त करून टाकले, बहुजनांनी तर वेगळे काय केले? शिवाजी महाराजांचा उपयोग राजकारणासाठी करण्यात बहुजन कुठे मागे आहेत? शिवाजी महाराजांचे राज्य कोकणापासून तमिळनाडूपर्यंत होते पण आजही बहुसंख्य बहुजन शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राची इस्टेट समजतात. महाराजांना छोटे करण्यात ब्राम्हणांइतकेच, किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त बहुजन दोषी आहेत.
७. अलिकडे बहुजनांतील अनेक जाती स्वत:ला अभिमानाने शूद्र म्हणवून घेऊ लागल्या आहेत. जर स्वत:ला ब्राम्हण अथवा क्षत्रिय म्हणवून घेणे म्हणजे वर्ण व्यवस्थेचे समर्थन करणे असे हे 'पुरोगामी शूद्र’ मानतात, तर मग स्वत:ला शूद्र म्हणवून घेणे हेही वर्णव्यवस्थेचे समर्थन नाही काय? तसेच ज्याप्रमाणे हिंदू ही अरबी-फारसी लोकांनी दिलेली शिवी आहे, त्या प्रमाणेच शूद्र ही तथाकथित उच्च वर्णियांनी दिलेली शिवी आहे. त्या शिवीचा अभिमान धरणे योग्य आहे का?
८. बहुजन समाजात व्यक्तिपूजा हा प्रकार अगदी किळस यावी इतका बोकळला आहे. प्रत्येक जातीचे बहुजन आपापल्या जातीतला एखादा महापुरुष शोधून त्याचा उदोउदो करण्यात धन्यता मानत आहे. त्या-त्या महापुरुषाचे विचार, कार्य यापेक्षा तो आमच्या जातीचा आहे यालाच महत्व आले आहे. या महापुरुषांच्या नावांचा दुरुपयोग आणखी किती काळ तुम्ही करणार आहात?
९ . तुमची संख्या किती आहे त्याला महत्व नाही तर तुमच्यात किती शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, संपादक, सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी, सेनाधिकारी, कलाकार, संशोधक, विचारवंत वगैरे आहेत हे महत्वाचे आहे. केवळ यावरूनच एखाद्या समाजाची योग्यता ठरत असते. या आघाडीवर पाहिले तर बहुजन समाज मागासलेलाच आहे. हे मागासलेपण कोणाला शिव्या देवून दूर होणार नाही.
बहुजन चळवळीच्या आघाडीवर मला जे दिसले ते मी येथे लिहिले आहे.
हेही वाचा:

68 टिप्पणी(ण्या):
खरंय तुमचं, बहुजनांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे.
असाच १ लेख "ब्राम्हणांनी आत्म्परिक्षन करावे ? असा आपण लिहाल का ?
रामटेके,महावीर सांगलीकर आणि संजय सोनवणी यांना RSS कडून अश्या प्रकारचे लिखाण करण्यासाठी भरपूर पैसा मिळतो....प्रकाशभाऊ आपण आपल्या ब्लॉगवर अश्या लेखांना प्रसिद्धी देऊन बहुजन चळवळीच्या विरोधकांना साथ तर देत नाही ना !!
कृपया गैरसमज नको परंतु विचार करा..
---आपल्या ब्लॉग चा एक नियमित वाचक ..!!
@Anonymous-
रामटेके,महावीर सांगलीकर आणि संजय सोनवणी यांना RSS कडून अश्या प्रकारचे लिखाण करण्यासाठी भरपूर पैसा मिळतो....प्रकाशभाऊ आपण आपल्या ब्लॉगवर अश्या लेखांना प्रसिद्धी देऊन बहुजन चळवळीच्या विरोधकांना साथ तर देत नाही ना !!
कृपया गैरसमज नको परंतु विचार करा..
---आपल्या ब्लॉग चा एक नियमित वाचक >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
बहुजन समाज हा हजारो वर्षाच्या गुलामीत राहिला याला बहुजन समाजही जबाबदार आहे. ब्राम्हणांनी आपल्यावर अन्याय केला याची मांडणी आपण करत असतोच. पण त्याचबरोबर बहुजन समाज आपल्या कोणत्या चुकांमुळे या गुलामीत अडकून पडला हे जर सांगितले नाही तर भावी काळात गुलामीतून बाहेर पडणे आपणाला अशक्य होवून बसेल. तसेच नवीन गुलामीत आपण अडकून पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण जुन्या चुका माहित असतील तर त्यात सुधारणा करून त्या टाळता येतील. पण त्या चूकच जर समजून घेतल्या नाहीत तर मात्र नव्याने आपण त्याच चुका करू. बहुजन समाजाने स्वत:च्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत. हा बहुजन समाजाचा अपमान, कमीपणा नाही. उलट भविष्यकाळ उज्वल करायचं असेल तर अधिकाधिक सुधारणा करायला पाहिजे.
रामटेके,महावीर सांगलीकर आणि संजय सोनवणी यांच्याशी तात्विक पातळीवर मतभेद असणे मी समजू शकतो. पण त्यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात अर्थ नाही. एखाद्या व्यक्तीचे काही विचार पटले नाही तर त्याला विरोध करण्याचे किंवा त्याच्या चुका दाखवून देण्याचे स्वातंत्र्य आपणाला आहे. ते आपण निश्चित करू शकतो.
Anonymous-
असाच १ लेख "ब्राम्हणांनी आत्म्परिक्षन करावे ? असा आपण लिहाल का ?
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ब्राम्हणांनी आत्मपरीक्षण करावे असे मी अनेकदा लिहिले आहे. बहुजन समाजाने आत्मपरीक्षण करावे असे लिहिले म्हणजे ब्राम्हणांनी आत्मपरीक्षण करू नये असे होत नाही. आत्मपरीक्षण तर सर्वानीच केले पाहिजे. कारण सर्वजण थोडयाफार प्रमाणात चुकत असतात. फरक एवढंच असतो की काही जण मुद्दाम चुका करतात, काहीजण अज्ञानातून चुका करतात. पण शेवटी चुका त्या चुकाच. त्याचे परिणाम मात्र सर्वांनाच भोगावे लागणार.
samata prastapit karaychi asel tar sarvani atmaparikshan kele pahije.
अशा प्रकारच्या आत्म्त्परिक्षणाची सुरुवात तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी केली. सांगलीकरांनी उपस्थित केलेले बरेचसे मुद्दे तात्यासाहेबांच्या समग्र वाङमय मध्ये आहेतच.असे आत्मपरिक्षण वारंवार झाले पाहिजे. हे आत्म्परिक्षण आपल्याच महापुरुषांच्या चिकीत्सेपर्यंत पोहोचले पाहीजे उदाहरणार्थ---
1) तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी निर्मिक पुरुषीच का मान्ला? स्त्री स्वरुपात का नाही?
2) शिवरायांना 8 बायका होत्या, त्या संदर्भात त्यांना पुरोगामी मानता येइल काय?
3) भगवान बुद्धांनी संसार अर्धवट सोडणे योग्य होते काय?
अशा अनेक मुद्यांवर आपण बहुजन उगाच एक्साइट होतो. आपले महापुरुष हे आधी सर्वसामान्य माणसंच होती, जनतेनेच त्यांना चळवळीतून मोठे केले अशी वास्तववादी भुमिका आपण घेतो का? ज्या दिवशी घेउ त्या बरेच काही साध्य होइल.
सांग्लीकरांना व प्रकाशजींना धन्यवाद!
ज्या महापुरुषांना पृथ्वी गोल आहे की सपाट हे सुद्धा माहित नव्हते त्यांना सर्वज्ञानी मानून त्यांच्या नावाने वितंडवाद घालणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. महापुरुष ही देखील माणसेच असतात आणि इतर लोकांप्रमाणे ते देखील चुका करू शकतात हे जेव्हा सर्वांना मान्य होईल तेव्हा खरे आत्मपरीक्षण सुरु होईल. जातींच्या चष्म्यातून इतिहासाकडे बघणाऱ्या लोकांसाठी आईनस्टाइनचे एक चपखल वाक्य आहे,"Everything should be made as simple as possible, not simpler."
१. भारतभर गावोगावी दलितांवर राजरोस जे अत्याचार होत असतात, ते करणारे लोक नेमके कोण असतात? या अत्याचारांमध्ये ब्राम्हणांचा सहभाग किती असतो? ’यात बहुजनांचा दोष नसून ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या सिस्टीमचा दोष आहे’ असे ज्यांना वाटते ते ही सिस्टीम मोडण्यासाठी काय करत आहेत? की ही सिस्टीम चालूच रहावी असेच त्यांना वाटते?
----------------------------------------------------
ही सिस्टीम मोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपण सर्वांनीच पुढे यायला हवे...बामन आणि बहुजन सर्वांनी एकत्र आले पाहिजे त्यासाठी बमानांनी पहिल्यांदा घोषित करावे की
१.या देशातील कोणताही हिंदू पुजारी म्हणून काम करू शकतो ,हे होईल का?
२.मंदिरांचे कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न शासनाच्या तिजोरीत जमा करून ...त्यातून जनहिताच्या योजना राबवाव्यात....किती बामन तयार होतील ? ही मागणी बामनांनी पुढे करावी ! बहुजनांचा त्यांच्यावरील रोष कमी होईल.
३.बामनांनी घोषित करावे की हिंदू धर्मातील बामन ही जात नष्ट झालेली आहे...बाकीच्या जातीही अनुकरण करतील.
४.बहुजनांनी लग्नात कोणत्याही समाजाच्या माणसाला बोलवून लग्न लावावे.
५.महात्मा फुले या देशातील शिक्षणाचे जनक आहेत..म्हणून त्यांचा स्मृतीदिन हाच खरा "शिक्षक दिन" आहे,,
असे घोषित करण्यासाठी किती बामन पुढे येतील ??????

---------
ase brhmananchya nawane kiti diwas khade phodat rahnar....
mangtatli takad aani dokytla mendu waprun pragti kadhi sadhnar...
niwwal brhmnanan shivya ghalun pragti sadhta yete ka yachahi vichar karyla hawa....

सूर्य चक्क पश्चिमेला उगवला? Something is Wrong. VERY WRONG!! पुढच्या लेखाचे शीर्षक 'हिंदी, हिंदू, हिंदुस्थान' असे नसावे अशी अपेक्षा आहे.
या लेखाचा उद्देश बहुजन समाजाला स्वतःच्या चुका दाखवून देणे हा आहे. कारण स्वतःच्या चुका, दोष जाणून घेवून ते टाळण्यासाठी बहुजन समाजाने प्रयत्न केले तर बहुजनांचा अपेक्षित विकास होऊ शकेल. काही बहुजनांना या लेखाचा राग आला आहे. परंतु विचार करा की जर आपण आत्मपरीक्षण करणार नसू तर आपले भवितव्य काय असेल ? कारण आत्मपरीक्षण करणाऱ्या व्यक्तीच आयुष्यात योग्य मार्गाने जात असतात. आपण आत्मपरीक्षण न करता त्याच त्याच चुका परत परत करत असू तर बहुजन चळवळ यशस्वी होणार नाही हे लक्षात घ्या. मनुवादी, ब्राम्हणी व्यवस्थेने बहुजनांना गुलामीत ठेवले हे खरे आहे. परंतु हीच गुलामी शिरसावंद्य मानून आपली वाटचाल चालू आहे हे नाकारता येईल काय ? ब्राम्हणी व्यवस्थेने निर्माण केलेले नियम, कायदेकानून, अनिष्ठ परंपरा आपणच जपणार असू तर व्यवस्थेला दोष देवून आपण गुलामीतून बाहेर पडणार नाही.
मला वाटते बहुजनांनी भावनिक न होता सारासार विवेक जागृत ठेवून विचार करावा. अंतिम सत्य हे स्वतःच्या बुद्धीला पटेल तेच मानावे. तरच चळवळ खऱ्या अर्थाने यशस्वी होईल.
१. दलितांवरील अत्याचारांमध्ये बहुतांशी बहुजन समाज गुंतलेला असतो हे सत्य आहे. पण ब्राह्मण समाजातून याचा किती प्रमाणात विरोध होतो? ब्राह्मण समाज आज प्रत्यक्ष अत्याचार करत नसला तरी त्यांचे या प्रकारांना मूक समर्थन असते. त्यामुळे त्यांना निर्दोष ठरवणे व्यर्थ आहे.
२. बहुजन समाजात मुळात वाचन करणाऱ्यांची संख्या किती प्रमाणात आहे? त्याच प्रमाणात लेखकांची संख्या असणार हे उघड आहे. वाचन संस्कृती ही अचानक येत नाही. ती पिढ्यानपिढ्याच्या संस्कारातून रुजावी लागते. त्यासाठी त्या समाजात साक्षरतेचे प्रमाण उच्च असावे लागते. हे सर्व ब्राह्मण समाजाला शेकडो वर्षे धर्माच्या माध्यमातून उपलब्ध होते. पण बहुजन समाजाला प्रामुख्याने स्वातंत्र्यानंतरच हे सर्व उपलब्ध झाले आहे. या देशात केवळ इतिहासच नव्हे तर सर्वच क्षेत्रांमध्ये प्रथम पाऊल टाकणारे ब्राह्मणच होते हा निव्वळ योगायोग नव्हे. या देशात येणाऱ्या प्रत्येक परकीय राज्यकर्त्यांना ब्राह्मण समाजाशी जुळवून घ्यावे लागले हा देखील योगायोग नव्हे. बहुजन लेखकांनी पानिपत पलीकडे जावे म्हणजे नेमके कुठे जावे अशी अपेक्षा आहे? अनेक बहुजन लेखकांनी उत्तम लेखन केले आहे. त्यांची दखल घेतली जात नाही.
३. मुळात सामाजिक आणि सांस्कृतिक वर्चस्व म्हणजे काय याची जाणीवच बहुजन समाजात नाही. त्यामुळे ते वर्चस्व मिळवणे आणि टिकवणे यासाठी जे पद्धतशीर आणि संघटित प्रयत्न करावे लागतात त्यांची बहुजनांमध्ये वानवा आहे.
४. ऑनर किलिंगचे प्रकार ब्राह्मण समाजात देखील घडतात. उत्तरेकडच्या राज्यांमध्ये जास्त घडतात.
५. जे खोटा इतिहास लिहितात ते कोणत्याही जातीतले असले तरी बहुजनांचे शत्रू आहेत. खोटा इतिहास लिहिण्यामागे जातीय वर्चस्ववाद हेच कारण असते.
६. राजकारणासाठी फक्त शिवाजी महाराजांचाच नाही तर फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांचाच उपयोग होतो. जातीय व्यवस्थेतून येणारी असुरक्षितता हे जातीय आधारावर निवडणुका लढवल्या जाण्याचे कारण आहे.
७. स्वत:ला शूद्र म्हणवून घेणे हा राजकारणाचा भाग आहे. अन्यथा कोणीही शूद्र म्हणून मिरवणार नाही.
८. व्यक्तिपूजा ही ब्राह्मण समाजात देखील आहे. किंबहुना भारतीय समाजाच्या हाडात रुजलेली आहे. ज्यांनी कोणत्याही जाती-धर्माची बाजू घेतली नाही अशांची देखील यातून सुटका नाही. उदा. सुभाषचंद्र बोस, गांधीजी वगैरे.
९. शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, कलाकार, संशोधक, विचारवंत ह्यांची संख्या बहुजनांमध्ये जास्त असलीच पाहिजे. पण तेवढेच पुरेसे नाही. समाजाला दिशा देण्याची ताकद असणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय नेतृत्वाची फळी बहुजन समाजातून निर्माण होणे आवश्यक आहे. पण त्यासाठी बहुजन समाजाच्या जाणीवा जागृत होणे गरजेचे आहे. ज्यांच्या जाणीवा मेलेल्या असतात ते जिवंतपणीच मृत झालेले असतात.
Na ghar ka ........
Na ghat Ka!!!!!!!!!!
Khup changla ahe lekh.lihit raha. RSS shi sabandh jodale ki zale amche ghode ganget nhale.
@Anonymous-
१.या देशातील कोणताही हिंदू पुजारी म्हणून काम करू शकतो ,हे होईल का?
२.मंदिरांचे कोट्यावधी रुपयाचे उत्पन्न शासनाच्या तिजोरीत जमा करून ...त्यातून जनहिताच्या योजना राबवाव्यात....किती बामन तयार होतील ? ही मागणी बामनांनी पुढे करावी ! बहुजनांचा त्यांच्यावरील रोष कमी होईल.
३.बामनांनी घोषित करावे की हिंदू धर्मातील बामन ही जात नष्ट झालेली आहे...बाकीच्या जातीही अनुकरण करतील.
४.बहुजनांनी लग्नात कोणत्याही समाजाच्या माणसाला बोलवून लग्न लावावे.
५.महात्मा फुले या देशातील शिक्षणाचे जनक आहेत..म्हणून त्यांचा स्मृतीदिन हाच खरा "शिक्षक दिन" आहे,,
असे घोषित करण्यासाठी किती बामन पुढे येतील ??????
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
१. या देशातील कोणताही माणूस कोणताही व्यवसाय त्याच्या इच्छेप्रमाणे निवडू शकतो. मंदिराचा पुजारी होण्याचा अधिकार या देशातील सर्वाना आहे. परंतु मंदिरे ही अशी व्यवस्था आहे की ज्यामुळे बहुजन समाज गुलामीत पुरता अडकून पडला आहे. त्यामुळे बहुजनांनी मंदिराचा पुजारी होण्यापेक्षा ही मंदिरांची व्यवस्थाच नष्ट केली पाहिजे.
२. भारतातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण करून तो पैसा सर्वांच्या कल्याणाकरता वापरला तरी खूप काही साध्य होईल. परंतु मंदिरात जमा होणारा करोडो रुपयांचा पैसा हा बहुजनांच्या कष्टातून आणि घामातून तयार झाला आहे. त्यामुळे बहुजनांनी असा पैसा मंदिरे आणि देव यावर खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर खर्च करावा.
३. बहुजनांनी ब्राम्हणांचे अनुकरण का म्हणून करायचे ? बहुजन अशा नैतिक गोष्टींसाठी पुढाकार घेऊ शकत नाहीत का ? अर्थात पुरोगामी बहुजन काही प्रमाणात अशी भूमिका घेत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. कोणतीही समाजसुधारणा करण्यासाठी बहुजनांनी इतरांची वाट पाहू नये. अन्य्याय गोष्टी संपवण्यात बहुजानांचेच हत आहे. त्यामुळे त्यानीच पुढाकार घ्यावा. कारण व्यवस्थेचे समर्थक ती व्यवस्था संपवण्यासाठी पुढे येतील अशी आशा करणे भाबडेपणाचे ठरेल.
४. लग्नात ब्राम्हनच कशासाठी बोलावला पाहिजे? कोणत्याही समाजातील माणसाकडून लग्न कावून घेतले तर ब्राम्हणांची मक्तेदारी मोडीत निघेल. हे करायलाच हवे.
५. महात्मा फुले आणि सावित्रीमाई हे दाम्पत्य या देशातील शिक्षणाचे आद्य जनक आहे याबद्दल कुणाच्या मनात शंका नसावी. शिक्षकदिन हा महात्मा फुल्यांचा स्मृतीदिन असावा ही अपेक्षा योग्य आहे. त्यामुळे त्यांचा उचित गौरव होईल यात शंका नाही.
@श्रावण देवरे सर -
आपली भूमिका अगदी योग्य आहे सर. महापुरुष आपल्या दृष्टीने कितीही महान असले तरी तीही शेवटी माणसेच आहेत. त्यांचे निष्पक्ष मूल्यमापन करणे हे आपले कर्तव्यच आहे. भले त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील, किंवा त्यांचे काही विचार विसंगत किंवा आजच्या काळानुसार चुकीचे असतील तर त्यांचीही चिकित्सा झाली पाहिजे. यासाठी भावनिक न होता विचार केला पाहिजे. कारण आपल्या महामानवांची तीच इच्छा होती की अनुयायांनी आंधळेपणाने काहीही न स्वीकारता चिकित्सा करावी. अशी चिकित्सा म्हणजे त्या महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा योग्य आदर आहे.
जोपर्यंत प्रत्येक जातीमध्ये इतर जातींविषयी अविश्वास आणि घृणा आहे तोपर्यंत कसलीही मुलभूत सुधारणा होणार नाही आणि समाज म्हणून आपण पुढे जाण्याऐवजी मागेच जात राहू हे वास्तव आता स्वीकारले पाहिजे. ही सकाळमधील बातमी वाचा आणि विचार करा.
"अभ्यासू असल्याने विद्यार्थ्याचा वर्गमित्रांकडून खून" -
"गरीब कुटुंबातून असूनही प्रदीप कायम वर्गात अव्वल राहायचा. याचा या दोन वर्गमित्रांना प्रचंड राग येत होता. ते नेहमीच त्याला चिडवत असत. तो मागासवर्गीय असल्याने ते त्याची कायम छेड काढीत. त्याचे वडील सुतारकाम करतात. तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता.''
पूर्ण बातमी :- http://www.esakal.com/esakal/20120228/5057452516208081541.htm
Ha! Ha! Ha!
This is 180 degree turn. praksh pol might have received notice from kapil sibbal. you can ask help from ncp.
Now 'pol' is trying to walk on the both sides of the fence.
there could not be a better joke than this article on this very blog!
ना तू जमीं के लिये है ना आसमान के लिये
तेरा वजूद है अब सिर्फ दास्तान के लिये
Bahujan Aani Brahman Dharm (Hindu):
"Gulam Banawanaryancha aani Gulamacha Dharm Ek Kasa Asu Shakto"?- Dr. A.H. Salunkhe
'Etarey brahmanani' yawar vichar karava.
Prakash पोल . अगदी मुद्द्याचे बोललात .विद्रोहाचा पहिला टप्पा हा नकाराचा असतो .असे करताना नकारा नंतरच्या विकल्पाची मांडणी झालेली नसते .पण नकारा नंतरच्या विकल्पाला संकल्पाची जोड देऊन विकास साधण्यात खरे हशील . दुर्दैवाने बऱ्याच चळवळी ह्या माझ्यावर अन्याय्य झाला आणि तो तुझ्या मुले झाला हि बोंब ठोकण्याच्या समोर जाऊ शकल्या नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास शिवधर्माचे देता येईल .वैदिक गुलामगिरीला नकार म्हणून फक्त ब्राम्हनाना शिव्या देण्या पेक्षा नवीन धर्माची चौकट किती व्यापक होईल ह्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे AAHE .
yas im agree wit u - (by Dilip C Mandal-चलते भी चलो-पढ़ते भी चलो)
Sahityik,vicharwant bahujan samajatun mothya pramanat var yayla havet..
पोल . अगदी मुद्द्याचे बोललात .विद्रोहाचा पहिला टप्पा हा नकाराचा असतो .असे करताना नकारा नंतरच्या विकल्पाची मांडणी झालेली नसते .पण नकारा नंतरच्या विकल्पाला संकल्पाची जोड देऊन विकास साधण्यात खरे हशील . दुर्दैवाने बऱ्याच चळवळी ह्या माझ्यावर अन्याय्य झाला आणि तो तुझ्या मुले झाला हि बोंब ठोकण्याच्या समोर जाऊ शकल्या नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास शिवधर्माचे देता येईल .वैदिक गुलामगिरीला नकार म्हणून फक्त ब्राम्हनाना शिव्या देण्या पेक्षा नवीन धर्माची चौकट किती व्यापक होईल ह्याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे AAHE
पानिपत च्या पुढे म्हणजे कुठे ?
पानिपत च्या पुढे 'छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या ' हा विषय आहे.
प्रो . मा . म . देशमुख यांनी यावर अचूक संशोधन आणि लेखन केले आहे. ब्राम्हणांनी त्यांच्या पुस्तकावर हाय कोर्टात केस केली होती. त्यावेळी देशमुख यांचे वकील न्यायमूर्ती पी . बी. सावंत हे होते. देशमुख केस जिंकले. ब्र्म्हनानी अजून हा इतिहास मान्य केलेला नाही.
तुम्ही निदान पानिपत च्या आलीकडे 'भीमा- कोरेगाव ची लढाई ' या विषयावर तरी लिहा .
दुसर्यांना काय सांगता ?
yes. pol should write on 'The Great Battle of Bhima- Koregoan' 01 January 1818.
बरोबर आहे. शिक्षण नाही आणि माहितीपण नाही म्हणून बहुजन समाज गुलाम आहे.
माहिती द्या , संभ्रम नको !
संभ्रम द्यायला सांगलीकर , सोनवणी आहेतच कि. त्यांना करू द्या कि वाकिली ब्राम्हणाची.
इतिहास लेखनात देखील जातीयवाद आहे. एखाद्या बहुजन लेखकाला बाळाजी चिटणीस यांचे शिवाजी महाराजांच्या आयुष्यात काय स्थान होते यावर लिहावेसे वाटत नाही? कवी कलश यांनी संभाजी महाराजांवर जी निष्ठा दाखवली त्याबद्दल लिहावेसे वाटत नाही? ब्राह्मण लेखकांना संभाजी महाराजांचा अंगरक्षक साडेतीनशे वर्षांपूर्वी रायाप्पा महार होता या गोष्टीला महत्व द्यावेसे वाटत नाही? की ब्राह्मणांनी ब्राह्मणांचा इतिहास लिहायचा, मराठ्यांनी मराठ्यांचा, माळ्यांनी माळ्यांचा, महारांनी महारांचा, कायस्थांनी कायस्थांचा?
हेच जर आपण इतिहासापासून शिकणार असू तर सर्व जातींचे ब्रेनवॉशिंग करून सर्वांना इतिहास विसरायला लावा. जिथे सर्वांनी मिळून मिसळून राहायचे तिथे उगाच इतिहासातले वाद उकरून काढून लोकांची डोकी भडकवणे आणि स्वत:च्या राजकीय पोळ्या भाजून घेणे हे काम आज काही लोक करत आहेत आणि मूर्ख समाज त्याला बळी पडत आहे. शिव्या मुस्लिमांना दिल्या काय किंवा ब्राह्मणांना काय त्यात कोणाचे भले आहे? ज्यांना स्वत:चे हित कशात आहे हे कळण्याची सुद्धा अक्कल नाही त्यांचा नेहमीच वापर होत राहणार.
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! आगोदर खोटा इतिहास लिहायचा आणि शाळेत बहुजन विद्याथी च्या डोक्यावर मारायचा आणि अंगावर आले कि शहजोक पाना करायचा . हेच ब्राम्हणांना इतके वर्ष का सामाजले नाही? आता आम्हाला सांगायची वेळ आली.
अफझल खानाचा इतिहास शिकवायचा पण कृष्णा कुलकर्णी नाही. इतके वर्ष ब्राम्हणाचे एकले म्हणून बहुजन सामाजाचा सत्यानाश झाला.
एकदम बरोबर!
" आता आमच्या धडावार , आमचेच डोके !" - आ . ह . साळुंखे
इतिहास केवळ अफझलखान किंवा कृष्णाजी कुलकर्णी यांचाच न शिकवता मुधोळचे बाजी घोरपडे, जावळीचे चंद्रराव मोरे, शृंगारपुरचे सुर्वे, गणोजी शिर्के, हरजीराजे महाडिक यांचा देखील शिकवावा. तसेच अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, राहुजी सोमनाथ यांचाही शिकवावा. म्हणजे गद्दारांना जात नसते हे फार लहान वयात मुलांना कळेल आणि मोठे होऊन स्वत:च्या निष्क्रीयतेचे खापर इतर जातींवर फोडण्याची सवय त्यांना लागणार नाही. त्याऐवजी स्वत:मध्ये सुधारणा घडवून वैयक्तिक आणि समाजाचा विकास साधण्यात ते वेळ खर्च करू शकतील.
शिवाय ग्राम पंचायत, जिल्हा परिषद इथपासून ते मंत्रिपदापर्यंत कोणाची डोकी भरली आहेत आणि कोणाची धडे वापरली जात आहेत ते सध्याच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झालेले आहे. त्या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष व्हावे म्हणूनच ही इतिहासाची कागदी घोडी नाचवली जात आहेत.
१००% सहमत !
तुम्ही सांगता तो इतिहास शाळेत शिकवला पाहिजे. पण अभ्यासक्रम मंडळ ब्राम्हणांचे .
ते कसा काय हा इतिहास शिकवणार? बहुजनांच्या शाळा आणि शिक्षण संस्था असून काही उपयोग नाही . ते गुलामच आहेत.
ब्राम्हनानाचे शेकडो पेपर आणि tv channel आहेत. निदान त्यांनी तरी सांगावा हा इतिहास. पण तसे होणार नाही . नाही तर हा Blog आणि वाद - संवाद करायची काही गरजच नाही.
आ. ह. साळुंखे यांना 'विद्रोही तुकाराम ', 'तुळशीचे लग्न' , मनुस्मृती च्या समर्थकांची संस्कृती' हि पुस्तके लिहायची गरजच पडली नसती !
Apratim lekh!!!!!!!!!!!!!
Shivya-shap det basu naka. Vacha, vichar kara, vichar karavayas pravrutta kara ani vichar karavayas prossahan dya, tasech apapalya sarvach kshetratil uchcha pade swatahachya himtiwar padakrant kara ase sarvana kalkaliche avahan!.
Ek Hitchintak.
बहुजन समाज हा हजारो वर्षाच्या गुलामीत राहिला याला बहुजन समाजही जबाबदार आहे. ब्राम्हणांनी आपल्यावर अन्याय केला याची मांडणी आपण करत असतोच. पण त्याचबरोबर बहुजन समाज आपल्या कोणत्या चुकांमुळे या गुलामीत अडकून पडला हे जर सांगितले नाही तर भावी काळात गुलामीतून बाहेर पडणे आपणाला अशक्य होवून बसेल. तसेच नवीन गुलामीत आपण अडकून पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण जुन्या चुका माहित असतील तर त्यात सुधारणा करून त्या टाळता येतील. पण त्या चूकच जर समजून घेतल्या नाहीत तर मात्र नव्याने आपण त्याच चुका करू. बहुजन समाजाने स्वत:च्या चुका लक्षात घेतल्या पाहिजेत. हा बहुजन समाजाचा अपमान, कमीपणा नाही. उलट भविष्यकाळ उज्वल करायचं असेल तर अधिकाधिक सुधारणा करायला पाहिजे.
रामटेके,महावीर सांगलीकर आणि संजय सोनवणी यांच्याशी तात्विक पातळीवर मतभेद असणे मी समजू शकतो. पण त्यांच्यावर चुकीचे आरोप करण्यात अर्थ नाही. एखाद्या व्यक्तीचे काही विचार पटले नाही तर त्याला विरोध करण्याचे किंवा त्याच्या चुका दाखवून देण्याचे स्वातंत्र्य आपणाला आहे. ते आपण निश्चित करू शकतो.
ब्राम्हनानाचे शेकडो पेपर आणि tv channel आहेत. निदान त्यांनी तरी सांगावा हा इतिहास. पण तसे होणार नाही . नाही तर हा Blog आणि वाद - संवाद करायची काही गरजच नाही.
आ. ह. साळुंखे यांना 'विद्रोही तुकाराम ', 'तुळशीचे लग्न' , मनुस्मृती च्या समर्थकांची संस्कृती' हि पुस्तके लिहायची गरजच पडली नसती !
तुमची संख्या किती आहे त्याला महत्व नाही तर तुमच्यात किती शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, संपादक, सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी, सेनाधिकारी, कलाकार, संशोधक, विचारवंत वगैरे आहेत हे महत्वाचे आहे. केवळ यावरूनच एखाद्या समाजाची योग्यता ठरत असते. या आघाडीवर पाहिले तर बहुजन समाज मागासलेलाच आहे. हे मागासलेपण कोणाला शिव्या देवून दूर होणार नाही.
" आता आमच्या धडावार , आमचेच डोके !" - आ . ह . साळुंखे
आंतर्जातीय लग्न केले म्हणून त्या मुलाला व मुलीला ठार मारणारे बहुजनच असतात. असा प्रकार कधी ब्राम्हणांनी केला आहे का? ब्राम्हण मुली दलितांशीही लग्ने करताना दिसतात, पण समान सामजिक दर्जा असणा-या दोन बहुजन जातीत देखील लग्न होणे म्हणजे आकाश कोसळणे होय. जातीव्यवस्था बळकट करण्यात बहुजन समाजच आघाडीवर आहे, हे खरे नाही का?
Comments denaryanno:
Arvachchya bhasha, shivya, urmatpana nako tasech mahiti purn puravyanishi dya mhanaje prashna samanjasyapane mitvita yetil. Swatahala sudhara, samajala sudharava ani manav jatiche kalyan kara. Kitihi rag ala tari lihitana thode tartammya balaga ani satya kitihi kathor asale tari pachwayala shikuya.
बहुजन समाजाने आत्मापरीक्षण खरोखरच करायला पाहिजे . कारण बहुजन समाज हजारो वर्षांपासून गुलाम आहे .
याचे कारण रामटेके , सागलीकर , सोनवणी यांच्या सारखे लोक पूर्वी पण जिवंत होते. हे लोक आपल्या बुद्धीचा वापर समाजाला योग्य आणि positive दिशा देण्यासाठी करत नाहीत . तर गोंधळ निर्माण करतात.
पण बहुजन समाज आता जागा झाला आहे . आणि त्याला 'शत्रू ' आणि 'मित्राची ' ओळख झाली आहे.
बहुजन समाजाने आता असल्या बुद्धिभेद करणाऱ्या लेखनाला थारा देऊ नये. तसेच बळी-वामन असल्या फालतू काल्पनिक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नये. जर ब्राह्मणी साहित्यातील लबाड्या समजून घ्यायच्या असतील तर राजकीय स्वार्थासाठी ब्राह्मणद्वेष पसरवणाऱ्या लोकांची पुस्तके वाचण्यापेक्षा आंबेडकरांचे समग्र साहित्य वाचून काढा. इतिहास महत्वाचा आहेच. पण आपले वर्तमान काय आहे? आपले भविष्य काय आहे? भविष्यात वाटेत येणाऱ्या खाचखळग्यांची जाणीव आपल्याला आहे का? नसेल तर ती जाणीव विकसित करण्यासाठी काय करायला हवे? या सर्व प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांचे साहित्य वाचूनच मिळतील. जातीय विकृतीने भरलेली पुस्तके वाचून मिळणार नाहीत. एक मार्ग ज्ञानाचा, प्रगतीचा आहे. दुसरा मार्ग आत्मघाताचा आहे. बहुजनांनी योग्य तो निर्णय घ्यावा.
वा वा ..... येथे कांही बालबुद्धिच्या लोकांनी मला आर.एस.एस. वाला म्हंटले आहे. ज्यांना BLACK and WHITE हे दोनच रंग कळतात, त्यांच्याकडून दुसरी कसली प्रतिक्रिया येणार? पण मला हे कळत नाही की ते आर.एस.एस. वाले माझ्यावर ख्रिस्ती-मुसलमान-पाकिस्तान-आय.एस.आय. यांचा हस्तक असल्याचा आरोप करतात. एकूण काय, ज्यांची स्वतंत्र विचार करण्याची योग्यता नसते, असे ते झापडबंद लोक स्वतंत्र विचार करणा-यांना आपल्याप्रमाणे कुणाचा तरी गुलाम समजतात. समजोत बापडे, मला त्याने कांही फरक पडत नाही.
बिन बुडाची घागर!
बुद्धीजीवी माणूस आपल्या बुद्धीशी प्रामाणिक असतो. आशा माणसाच्या 'कथनी' आणि 'कारणी' हि एकाच असते. जो आपल्या बुद्धीशी प्रामाणिक नसतो असे लोक 'Intellectual Dishonest' असतात. अशा लोकांचे लेख 'ना बूड ना शेंडा.
बुद्धीजीवी माणूस निश्चित भूमिका घेऊन आयुष्यात चालत असतो. कुंपणावर बसून बाता मारणारे बुद्धीजीवी नसतात . एक तर 'बघे' नाहीतर बदमाश आसतात!
Intellectual Prostitution हे वर्णन जास्त बरोबर वाटते.
देव म्हणाला प्रकाश होऊ दे... आणि प्रकाश झाला...
निनावी कॉमेंट्स देणे किती सोपे असते! पण निनावी कॉमेंट्स देणे हा डरपोकपणाच नव्हे काय? आपले मत आपल्या नावानिशी मांडायला भीती कशाची?
सगळे निनावी लोक Anonymous या एकच नावाने येत असल्याने वाचकांचा गोंधळ होतो, त्यामुळे या लोकांनी निदान टोपण नावाने तरी लिहावे.
वाचकांचा गोंधळ निनावी प्रतिक्रियांमुळे होत नाही तर परस्परविरोधी विचार मांडणाऱ्या लेखनामुळे होतो. जर मांडलेले विचार स्पष्ट आणि सुसंगत असतील तर नाव नसल्याने काहीही फरक पडत नाही. सोशल इन्जिनिअरिन्गच्या नावाखाली लोकांचा बुद्धिभेद करण्यापेक्षा निनावी प्रतिक्रिया देणे तुलनेने निरुपद्रवी आहे.
थोडक्यात काय तुम्हाला जे आवडेल तेच आम्ही लिहायला पाहिजे असे तुमचे म्हणणे दिसते. पण मला तरी ते शक्य नाही, कारण मी वाचकांना आवडेल ते लिहिणारा लेखक नाही किंवा एखाद्या ’इझम’ला बळी पडून कांहीही लिहिणारा लेखक नाही. तुमचे चालु द्या आपले. मी माझे काम माझ्या मनाप्रमाणे करत रहाणार. माझे लेख वाचायलाच पाहिजेत अशी कोणावर सक्ती नाही.
Sanglikar Saheb, Kashala yaa bahujansaathee lihoon aapalaa vel vayaa ghalavat aahat?
ज्यांना खरोखरच सुधारणा करायची असते ते बहुजन आणि ब्राह्मण असा भेद करत नाहीत. उणीवा सर्व जातींमध्ये आहेत. आज समाज ज्या अवस्थेत आहे त्यासाठी सर्वच जण कमी अधिक प्रमाणात जबाबदार आहेत. त्यामुळे केवळ बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे असे म्हणणे बरोबर नाही. हे म्हणजे गाडीच्या मागच्या चाकांना ती मागची चाके आहेत म्हणून दोष देण्यासारखे आहे. गाडीच्या पुढे असावे की मागे हा निर्णय त्या चाकांच्या हातात नव्हता. पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये समन्वय असेल तरच गाडी व्यवस्थित चालेल. गाडी नीट चालायची असेल तर सर्वच चाकांचे परीक्षण करणे आवश्यक असते. तसेच सर्व चाके एकाच दिशेने फिरणे हे सुद्धा तितकेच आवश्यक असते.
सांगलीकर, बर झालं एकदाच तुम्ही मान्य केले कि तुम्ही काय लिहित आहात. "बहुजन समाजाला चांगले वाटावे म्हणून तुम्ही लिहित नाही, (पण हे अर्धे वाक्य आहे.) पूर्ण वाक्य - ब्राम्हणांना चांगले वाटावे म्हणून तुम्ही लिहित आहात"!
खर तर तुमची काहीच चूक नाही. पोल यांनी असल्या 'भाडोत्री लेखकांना ' वापरू नये. अगदीच प्रकाश पडायला काही नसेल तर आ. ह. साळुंखे यांच्या पुस्तकातील काही भाग इथे द्यावा.
maharashtratil tarun aj 60 varsha congres madhil maratha pudhryancya bhrashtacharala va labadila kantalun virodhi pashankade jat ahet.tyamule rashtrawadi cong.ne maratha lobby nahishi howu naye yakarata sambhaji brigade he karstan ruchale ahe.
ganoji shirke va surya pisal he marathach hote.
marathyani atyachar kele ki manuwadyanchya dabawane kele.pun chukun kahi changale kele kimarathani kele ha dutappipana ahe.OBC/DALIT TARUNANI LABADILA FASU NAYE.
PRATYEK JATIT KAHI CHANGLI W KAHI WAIT MANSE ASTAT.PATIL BOWANI PRACHANDA ATTYACHAR KELELE AHET PUN MHANUN SURVA MARATHE WAIT ASE AMHI MHANNAR NAHI.(EK OBC TARUN)
March 21, 2012
बहुजन समाज निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.
हे बघ मित्र हा काय खूप मोठा नवीन शोध नाही कि बहुजन अशी काही संकल्पना नाही. परंतु जे ब्राह्मण नाही ते बहुजन अशी समजण्याची रूढ होती आणि अजून आहे पण सध्या काही पत्रकार मंडळी स्वयंभू लेखक मराठ्यांना बहुजन समाजामधून बाहेर काढून काढण्याचे प्रयत्न करत आहेत. असो. that is different thing...
जर बहुजन तथाकथित असतील तर ब्राह्मेनेतर हा शब्द कसा वाटतो? ब्राह्मांवर कसा अन्याय होत आहे ह्या तुला झालेल्या ह्या साकाश्य्ताकारा बद्दल तुझे अभिनंदन. आता तू काहीतरी नवनिर्मिती करू शकशील अशी अपेक्श्या आहे.
ब्राह्मणांनी गुलामीत ठेवले हा ब्राह्मणाचा दोष नाही न बहुजनाचा, हा दोष असतो तो धर्माचा ज्यःच्या तुम्ही गुलामीत असता, आणि एकदा गुलामाची सवय लागली कि ती गुलामीच आपल्याला आवडू लागते , मग आपल्या माल्काविषयी कुणी वाईट बोललेले पण आपल्याला आवडत नाही, त्या गुलामीतून अजून आपण सगळे १००% बाहेर आलेलो नाहीत, आंबेडकरांनी प्रयत्न केला त्यांना थोडे यश आले. आणि आता मराठा सेवा सघ तो प्रयत्न करत आहे त्याच्या बद्दल त्यांचे आभार. फुले शाहू आंबेडकर होवून पण तुम्ही आम्ही अजून सत्यनारायण करतो हे गुलामिचेच प्रतिक आहे. पोल तू करत नसशील पण तुझ्या आई वडील, किवा नातेवाईक करत नाहीत हे तू छातीठोक पाने सांगू शकतो का?
"साडेतीन टक्के असणारा बामन अक्ख्या बहुजन समाज्याला वाकवू शकतो कारण त्यांच्या हातात धर्माचे सगळ्यात मोठे हत्यार आहे. अहो ह्याच अधर्मामुळे पोपने सुद्धा १५०० वर्ष पश्यामात्या जगावर राज्य केले आपल्यावर बमानाने केले कारण आपल्याला शिक्षणापासून धर्माच्या नावाने बहिष्कृत केले होते. त्यामुळे आपण गुलाम आहेत ते कळायला उशीर लागला"
१. भारतभर गावोगावी दलितांवर राजरोस जे अत्याचार होत असतात, ते करणारे लोक नेमके कोण असतात? या अत्याचारांमध्ये ब्राम्हणांचा सहभाग किती असतो? ’यात बहुजनांचा दोष नसून ब्राम्हणांनी निर्माण केलेल्या सिस्टीमचा दोष आहे’ असे ज्यांना वाटते ते ही सिस्टीम मोडण्यासाठी काय करत आहेत? की ही सिस्टीम चालूच रहावी असेच त्यांना वाटते?
उत्तर - तुला तर माहित आहेच कि आपला (म्हणजे आता तुझा) हिंदू धर्म हा शिडी सारखा आहे गावोगाव दालीतावर अत्याचार करणारा वर्ग वेगळा आहे कारण बामन गावातच नाही, ब्राह्मण , मराठ्यांना शुद्र समजतात, मराठे इतर मागास्वर्गीयाना शुद्र समजतात, ते दलितांना दलित पारधी कोलात्याना नवे ठेवतात, बर्याच ठिकाणी इतर मागास्वर्गीयानी दालीतावर अनन्य केले आहे आणि हे नाहीसे करण्यासाठीच आम्ही हिंदू धर्म सोडत आहोत, प्रयत्न करत आहोत तुम्च्य्सारख्या उंटावरून शेळ्या राखत नाही.
साहित्य, माहिती, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, मनोरंजन, अर्थकारण, धर्म, तत्वज्ञान, समीक्षा असे हजारो विषय लिहिण्यासाठी आहे. बहुजन समाजात अशा विषयांवर लिहिणा-यांची वानवा आहे. असे का? या विषयांवर लिहिण्यासाठी अभ्य़ास आणि संशोधन करायला लागते, खूप मेहनत घ्यावी लागते, भरपूर वेळ खर्च करावा लागतो म्हणून? त्यापेक्षा ब्राम्हणविरोधी लिहायला फारसी मेहनत करणे गरजेचे नसते, केवळ शिव्या घातल्या तरी भागते.
उत्तर - मित्र आता कुठे लिहायला चालू केले आहे गेल्या १०० वर्ष्यात, आम्हाला कुठे वाचायला मिळाले साहित्य काय असते ते तरी. तरी सुद्धा फडके - खांडेकरांच्या टुकार कादंबर्या , व. पु. काळे सुहास शिरवळकर फिल्मी कादंबर्याला तुम्ही अभिजात साहित्य म्हणू असाल आणि, आमच्या भालचंद्र नेमाडे, नम्देओ ढासळ, आनंद यादव, ग्रेस, भाऊ पाध्ये, नारायण सुर्वे , शिवाजी सावंत, राजन गावास, अश्या आणि अनेक लेखकांची नोंद पण घेणार नसाल अत्र तुम्हाल ते दिसणार नाहीत, कारण माणसाला जे पाहायचे असते तेच दिसते. कोणता ब्राह्मणाने नवनिर्मिती केली? बहुतेकांनी पश्य्त्यांचे अनुकरण केले , भाषांतरी पुस्तके लिहिली, आणि म्हणे नवनिर्मिती केले......ययाती घेवून डोक्यावर नाचतात , अहो कोसला म्हणजे नवनिर्मिती......ययाती म्हणजे तोच इतिःस तीच भंकस पुन्हा पुन्हा सामोईर मांडणे.........
आन कसली होई नवनिर्मिती? इथे पोट भरण्यातच जिंदगी बरबाद होत होती - तिथे कसली आलीय झ्याटाची नवनिर्मिती. बमानाने कधी पावसाची वाट बघितालेलेई पहिली आहे का तुम्ही?
३. बहुजनांपैकी अनेक समूहांकडे प्रचंड सत्ता, संपत्ती आणि साधन सामग्री आहे. पण त्यांच्यापैकी कोणीही तळागाळातील लोकंसाठी शाळा, हॉस्पिटल्स, अनाथालये, समाजोपयोगी संस्था काढल्या नाहीत. हे काम भारतातील पारशी, ज्यू , ख्रिस्ती, जैन व कांही प्रमाणात ब्राम्हण समाजाने केले. बहुजन समाजाने अलिकडच्या काळात कॉलेजेस, सहकारी संस्था, हॉस्पिटल्स काढले, पण त्यामागे अर्थकारण व राजकारण हेच मुख्य उद्देश होते, समाजसेवा नव्हे.
आरे आता तुला काय म्हणावे हेच समाजात नाही.....कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, जगदाळे मामा, सलुके, हे काय बामन होते कारे? आज ग्रामीण भागात जी शैक्षणिक क्रांती झाली आहे ती या लोकामुलेच आणि मी पण आज त्यांच्यामुळेच तुला उत्तर देवू शकत आहे. कॉलेजेस, दवाखाने, काढले आणि अर्थकारण केले तर बिघडले कुठे...आपल्या पोरांना शिक्ष्यान तर मिळत आहे न,,,,,आपण नाही केले तर गुजर मारवाडी, आणि ब्राह्मण करतील......म्हणजे अर्ह्कारानापासून बहुजन समाजाने लांबच राहावे का? १९६० -७० -८० च्या पूर्वी पुणे आणि मुंबई शिवाय शिक्ष्यान होते का? आता मी माच्या बार्शीत राहून डॉक्टर होवू शकतो....
tujha vaicharik gondhal jhala aahe........
कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी जळगावमध्ये मुलीची हत्या
पाथरी येथील मनिषा धनगर या मुलीचे गावातीलच दुसऱ्या समाजातील मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेम प्रकरणाची कुणकुण मनिषाच्या घरात लागल्यावर पिता युवराज धनगर यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ती ऐकत नसल्याचे पाहून प्रसंगी तिला मारझोडही केली. परंतु तरीही मनिषा त्या मुलाला भेटतच राहिली. मनिषाच्या कृत्यामुळे समाजात कुटुंबाची बदनामी होत आहे, असा ग्रह करून घेत प्रतिष्ठा जपण्यासाठी युवराज धनगर यांनी स्वत:च्या मुलीलाच संपविण्याचा निर्णय घेतला. १२ मार्च रोजी युवराज यांसह मनिषाचे काका शरद धनगर आणि आजी सानीबाई या त्रिकुटाने मनिषा झोपलेली असताना तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर रेल्वेरूळावर तिचा मृतदेह ठेवून दिला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=220356:2012-04-08-19-23-41&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
I realised later that this is wriiten by sanglikar..sorry for that.....but agree that you dont have answer to my questions..............then dont put such nossense articles on your blog else answre in your so called intellectual language....i see future you are going in same way like........bhatalele..........................
karan thode liahaya;a shakel ki tumhala bamnakadun certificate lagate ki tumhi ata lekhak jhala aahat
आता या ब्लॉगचे नाव बदलून "भटाळलेला सह्याद्री बाणा" असे ठेवण्यास प्रत्यवाय नसावा.
"आंतर्जातीय लग्न केले म्हणून त्या मुलाला व मुलीला ठार मारणारे बहुजनच असतात. असा प्रकार कधी ब्राम्हणांनी केला आहे का?" - महावीर सांगलीकर
कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी मुलीचा खून
- वृत्तसंस्था
Monday, April 30, 2012 AT 02:30 AM (IST)
इंदूर - दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याबद्दल परदेशिपुरा भागातील शिवनारायण वर्मा (वय 45) याने आपली 19 वर्षे वयाची मुलगी ज्योती हिचा शनिवारी रात्री खून केला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. खून केल्यानंतर शिवनारायणने स्वतःच पोलिसांकडे जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
http://online2.esakal.com/esakal/20120430/4890896832110299846.htm
सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा महाराष्ट्रद्रोह
महाराष्ट्रात काही शेफारलेली बाळे आणि बाळ्या आहेत. सचिन तेंडुलकर, माधुरी दिक्षित, आणि मंगेशकर कुटुंबातील स्त्री-पुरुष यांचा त्यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल. यांना शेफारून ठेवण्याचे पाप महाराष्ट्रातील प्रसार माध्यमांनी केले आहे. हे लोक महाराष्ट्राची शान आहेत, असा प्रचार माध्यमे गेली अनेक दशके करीत आहेत. एखाद्या खोट्या गोष्टीचा प्रसार सतत करीत राहिले की, ती शेवटी लोकांना खरी वाटू लागते, असे हिटलरचा माहिती आणि प्रसारणमंत्री डॉ. पॉल जोसेफ गोबेल्स म्हणत असे. ही बाळे आणि बाळ्यांच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. अत्यंत स्वार्थी आणि आपल्याच कोशात जगणाèया या बाळे-बाळ्यांवर मीडियातून सातत्याने हितसंबंधी प्रशंसेचा वर्षाव होत राहिला. त्यामुळे या बाळे-बाळ्यांना असे वाटायला लागले की आपल्यामुळेच महाराष्ट्राला किम्मत आहे. अतएव आपण सर्व कायदे आणि नियमांच्या वर आहोत. नियम हे सर्वसामान्यांसाठी आहेत. आपल्यासाठी नाहीतच. ही बाळे आणि बाळ्या आता सरकारलाही जुमानीशी झाली आहेत.
या सर्वांत एक समान दुवा आहे. तो म्हणजे हे लोक पैशांच्या बाबतीत अत्यंत हावरट आहेत.
१.
मंगेशकरं हे महाराष्ट्रातील सर्वाधिक शेफारलेले लोक आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची इतर भावंड मुंबईतील पेडर रोडवर राहतात. कृष्णकुंज असे त्यांच्या घराचे नाव. मंगेशकर राहत असल्यामुळे कृष्णकुंजला सर्व नियमांतून बाजूला काढण्यात यावे, असे त्यांना वाटते. पेडर रोड हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. या रोडवर वाहतुकीची सातत्याने कोंडी होते. सर्वसामान्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारने येथे उड्डाण पूल बांधण्याचे ठरवले. कृष्णकुंज समोर उड्डाण पूल? किती घोर पाप? स्वत: लताबाई आणि मंत्रालयात गेल्या. संपूर्ण दशकभर त्यांनी हा पूल रोखून धरला. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लताबाई कधी अशा बाहेर पडल्या नाहीत. उड्डाण पूल झाला तर आम्ही दुबईला जाऊन राहू, अशी धमकी खुद्द लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी दिली होती. याचाच अर्थ असा की, यांना देशाबद्दल अजिबात प्रेम नाही. मला तर वाटते, हे दुबईला कधी जातात याची वाट सरकारने पाहूच नये. एका बोटीत बसवून त्यांना दुबईच्या दिशेने तोंड करून अरबी समुद्रात सोडून द्यायला हवे. दुबईत जाऊन नवे प्रभूकुंज बांधा म्हणा. हा उड्डाण पूल करायचाच असा निर्णय आता सरकारने घेतला आहे. ही चांगली गोष्ट झाली.
सर्व मंगेशकरांनी मिळून महाकपटी विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला' वगैरे रडगाणी गायिली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी असे एखादे गाणे मंगेशकरांनी गायलेय का? किन्वा छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यासाठी एखादे गाणे गायलेय का? येथे प्रश्न असा पडतो की, मंगेशकरांनी सावरकरांसाठीच का बरे एकत्र येऊ गळे काढले? हृदयनाथ मंगेशकरांनी तर अलिडके अत्यंत जात्यंध उपक्रम हाती घेतला आहे. वारकरी संतांमधून ज्ञानेश्वरांना वेगळे काढून केवळ त्यांचेच अभंग मंगेशकर गात फिरत फिरत आहे. इतक्या जात्यंध लोकांना मीडिया कित्येक दशके महाराष्ट्राची शान म्हणत आहे. Contd..........................
२.
सचिन रमेश तेंडुलकर
क्रिकेटचा देव वगैरे अत्यंत फालतू विशेषणांनी मराठी मीडियाने सचिनला शेफारून ठेवले आहे. याला भारतरत्न द्या, अशी मागणी करण्यात राजकीय पक्षांत मध्यंतरी शर्यतच लागली होती. मुळात प्रश्न असा आहे की, खेळाच्या क्षेत्रात शिखरावर असलेला हा एकच माणूस भारतात आहे का? महाराष्ट्रातून क्रीडा क्षेत्रातून भारतरत्न द्यायचे झाले, तर सर्वांत प्रथम महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना द्यावे लागेल. कुठल्याही सरकारी सुविधा न घेता, केवळ स्वत:च्या सामथ्र्यावर त्यांनी भारताला ऑलिम्पिक मधले पहिले पदक मिळवून दिले आहे. पण मीडिया खाशाबांचे नाव घेत नाही. मंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील पेरीक्रॉस रोडवर सचिनने आलिशान चार मजली बंगला बांधला आहे. त्याची किंमत शंभर कोटी आहे की, दोनशे कोटी यात आपल्याला जाण्याचे कारण नाही. तो त्याचा खाजगी प्रश्न आहे. परंतु या घरात प्रवेश करण्याआधी ऑक्युपेशन सर्टिफिकेट (भोगवटा प्रमाणपत्र) घेणे कायद्यानुसार आवश्यक होते. ते न घेताच सचिन नव्या घरात गेला. मीडियातून ओरड झाल्यानंतर मुंबई महापालिकेने त्याला ४ लाख ३५ हजारांचा दंड ठोठावला. हा दंड माफ करण्यात यावा यासाठी राजकारण्यांनी महापालिकेकडे नुसता तगादा लावला होता. वर्षाला अडीचशे तीनशे कोटी रुपये कमावणाèया सचिनला ४.३५ लाखांचा दंड का माफ केला जावा? माफ करायचा असेल, तर सर्वांनाच माफ करून टाका. सचिनने हा दंड भरला की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंबंधीची माहिती मिळावी यासाठी महापालिकेत अर्ज केला होता. ही माहिती देऊ नये, असा पवित्रा सचिनने घेतला. त्यामुळे आता पालिकेने ही माहिती देण्यास नकार दिला आहे. कर नाही त्याला डर कशाला? यात नक्कीच काही तरी काळे बेरे असणार म्हणून तर सचिनने ही माहिती रोखली आहे. फावड्याने पैसे ओढणारा सचिनला चार-सव्वाचार लाखांच्या सरकारी कराची नादारी हवी आहे. यातून त्याची कंजुषी तर समोर येतेच, पण त्याचा स्वार्थही दिसून येतो. Contd..........................
३.
माधुरीला +धक धक गर्ल+ हा मानाचा किताब दिला गेला आहे. तीसुद्धा हा किताब मिरवत असते. अनिल कपूरसोबतच्या चित्रपटात तिने आपली वक्षस्थळे आणि पाश्र्वभाग (पाश्र्वभाग हा संस्कृत शब्द आहे. मराठीत त्याला qटगर असे म्हणतात.) गाण्याच्या तालावर हलविली म्हणून तिला हा किताब मिळाला आहे. तिच्या गाण्याला qकवा गाण्यातील शारिरिक हालचालींना आमचा अजिबात विरोध नाही. तिला पैसे कमावण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे. पण पैसे कमावण्याच्या उद्योगाला कोणी महाराष्ट्राची शान म्हणू नये. घोळ नेमका इथेच आहे. पैशांसाठी काहीही हलवायला तयार असलेल्या दीक्षितांच्या या माधुरी मीडियाने महाराष्ट्राची शान असा किताब स्वत:च्या अखत्यारित देऊन टाकलेला आहे. माधुरीने श्रीराम नेणे नावाच्या एका अनिवासी भारतीय डॉक्टरशी विवाह केला, तेव्हा मीडियाचा उर भरून आला होता. स्वत:चीच मुलगी अमेरिकेत चालली असा आनंद मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांना झाला होता. हिला वृत्तपत्रांनी इतके डोक्यावर बसवून घेतले की, ही बया आता महाराष्ट्राचाच अपमान करीत आहे. महाराष्ट्र सरकारने तिला नुकताच एक पुरस्कार देऊ केला होता. तो घ्यायला ती फिरकलीही नाही. महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाची ब्रँड अॅम्बॅसिडर हो, अशी गळ राज्य सरकारने तिला घातली. तेव्हा तिने इतके पैसे मागितले की, सरकारचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. माधुरीच्या ठुमक्यांचे आंबट शौकिन असलेले लोक आता असे म्हणू लागले आहे की, मेहनतीने पैसे कमावणाèया माधुरीने सरकारसाठी फुकट काम का करावे? हा कृतघ्नपणा आहे. महाराष्ट्र सरकारकडून फुकट सवलती उकळताना लाज वाटली नाही. महाराष्ट्राच्या ११ कोटी लोकांनी प्रेम दिले म्हणून तुम्ही सुपर स्टार झालात. पैसे कमावले. लोकांनी पैसे मोजून तुमचे चित्रपट पाहिले. या ॠणातून थोडेसे उतराई होण्याची वेळ आली, तर तुम्हाला पैसे हवे आहेत. आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठविणारी अवलादच असे बोलू शकते. केंद्र सरकारची अतुल्य भारत ही जाहिरात मालिका आमिर खानने एक पैसाही न घेता केली. अमिताभ बच्चन यांनी एक पैसा न घेता उत्तर प्रेदशचे ब्रँड अंबॅसिडर म्हणून काम केले. हे खरे महान कलाकार आहेत. End.
brhamhanachya mate shudracha janm payatun zala jeva te mhantat tya arthi te niwal chestes patra thartat yamadhe vaidnyanik drushtikon adhlat nahi kinwa, ase kadhich shakya nahi
मराठा जाती मध्ये असलेले पुढारी सुध्दा मनुवादी विचारधाराचे आहेत. त्यांना वाटते...समाजाने आयुष्यभर आपल्या पायथ्याशी रहावे.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ