सह्याद्री बाणावर लिखाण करताना एक आरोप नेहमीच होत आला आहे तो म्हणजे ब्राह्मणद्वेष. तुम्ही ब्राम्हणांचा द्वेष करता असे मला अनेक ब्राम्हण म्हणतात. पण मी कसा ब्राह्मणद्वेष करतो ते मात्र सांगत नाही. मला आश्चर्य वाटते की मी इतकी संयमी मांडणी करूनही हे लोक नेहमी तेच-तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर ब्राम्हणद्वेषाचा आरोप करणाऱ्या लोकांना मी एका प्रतिक्रीयेद्वारे उत्तर दिले आहे. ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
आपल्या म्हणण्यानुसार मी ब्राह्मणद्वेष करतो. मोघम आरोप करण्यापेक्षा मी
कधी ब्राम्हणांचा द्वेष केला ते सांगितले असते तर बरे झाले असते. तुम्हा
लोकांचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही चिकित्सेला ब्राह्मणद्वेष समजता. सगळे
ब्राम्हण वाईट असतात अशी भूमिका मी कधीही घेतलेली नाही. किंवा ब्राम्हण आहे
म्हणून एखाद्याला झोडपायचे असेही मी करत नाही. एखाद्या गोष्टीबद्दल
लिहिताना पारंपारिक, ऐकीव, खोट्या, मतलबी बाजूला न भुलता नवीन पुरोगामी
भूमिका घेणे मला योग्य वाटते. त्यात एखाद्याचे हितसंबंध गुंतलेले असले तर
अशा व्यक्तींना ही स्वतंत्र आणि पुरोगामी भूमिका पटत नाही. मग ते लगेच बोंब
ठोकतात. जातीवाद आणि ब्राम्हणद्वेषाचा आरोप करतात.
शिवरायांच्या इतिहासाबद्दल लिहिताना शिवराय हे गोरगरीब प्रजेचे रक्षण करते होते असे सांगितले तर तुम्हाला तो ब्राह्मणद्वेष वाटतो. कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे शिवराय हे गो-ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजे आम्ही संपूर्ण समाजाचे शिवराय मांडतो तर तुम्ही राजांना एका जातीचे रक्षणकर्ते म्हणून मांडता, यात किती फरक आहे. राजे सरावंचे होते. सर्व प्रजा त्यांना समान होती. ते सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होते. असे असताना तुम्ही मात्र त्यांना ब्राम्हणांचे पालनकर्ते म्हणून सांगता तेव्हाच तुमच्या मनातील गुप्त हेतू स्पष्ट होतात. काहीही करून कर्तुत्ववान व्यक्तीला ब्राम्हणी व्यवस्थेपुढे बांधून टाकायचे हे आपले धोरण असते. त्यातून जर अशा व्यक्तींना मुक्त करून त्यांचे खरे चरित्र समाजासमोर मांडायचे म्हटले की आपली कोल्हेकुई सुरु होते.
शिवराय आणि एकूणच सर्व महापुरुषांचा इतिहास बऱ्याच प्रमाणात खोटा लिहिला गेला. याला बहुतांशी ब्राम्हण लेखक जबाबदार आहेत, कारण लेखणी त्यांच्याच हातात होती. आता नव्याने इतिहासाची पुनर्मांडणी करायची असेल तर पूर्वीच्या लेखकांनी काय चुका केल्या ते दाखवणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे खरा इतिहास मांडणेही आवश्यक आहे. त्यामुळेच रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु म्हणून आजपर्यंत शिकवले जात असताना नवीन संशोधनानुसार या दोघांचाही शिवाजी राजांशी गुरु-शिष्याचा संबंध नाही हे उघड झाले आहे. मग या दोघांना राजांच्या गुरुपदी बसविण्याचा खटाटोप इतिहासकारांनी का केला याचाही शोध घेणे क्रमप्राप्त आहे. बहुजन समाजात कर्तुत्ववान माणूस जन्मू शकत नाही, आणि जर असा माणूस जन्माला आलाच आणि कर्तुत्ववान झालाच तर त्याचा गुरु/पिता ब्राम्हण असला पाहिजे. कारण ब्राम्हण मार्गदर्शक असल्याशिवाय बहुजन समाजातील व्यक्ती कर्तुत्व गाजवू शकत नाही हा ब्राम्हणी अहंकार/मानसिकता धोकादायक आहे. आमचा विरोध या मानसिकतेला आहे. चुका करणारे बहुतांशी ब्राम्हण होते त्यामुळे त्यांना दोष देणे म्हणजे ब्राह्मणद्वेष करणे नव्हे हे समजून घ्या. प्रामाणिक ब्राम्हण लोकांना आमचा विरोध नाही. उलट त्यांच्या नैतिक कार्यात आम्ही त्यांना सहकार्याच करू. मात्र निष्कारण खोटा इतिहास लिहिणारे, बहुजन समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा यात गुरफटून ठेवणारे जे लोक असतील त्यांना आम्ही नेहमीच विरोध करू, मग त्याची जात/धर्म कोणताही असो. तुमच्या दुर्दैवाने अशा लोकांपैकी बहुतेक लोक ब्राम्हण असल्याने आम्ही नेहमीच ब्राम्हणांचा द्वेष करतो असे आपणाला वाटते पण ते खरे नाही.
मला वाटते आपण स्वतः आत्मपरीक्षण करावे. प्राचीन काळी ब्राम्हणांनी केलेल्या चुकांचे खापर आम्ही आताच्या ब्राम्हणांवर फोडणार नाही कारण पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आताच्या ब्राम्हणांना देणे अनैतिक आहे. परंतु आताच्या ब्राम्हणांनी स्वतः आत्मपरीक्षण करून आपण किती प्रामाणिक आहोत ते पहावे. बहुजन समाज, स्त्रिया यांच्याबद्दल आपली काय मते आहेत ती माणुसकीच्या पातळीवर उतरणारी आहेत काय हेही तपासावे. आणि स्वताच्या दोषावर पांघरून घालण्यापेक्षा तो दोष नाहीसा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
(सदर प्रतिक्रिया शिवरायांचा आठवावा विचार... या लेखावर दिली होती.)
शिवरायांच्या इतिहासाबद्दल लिहिताना शिवराय हे गोरगरीब प्रजेचे रक्षण करते होते असे सांगितले तर तुम्हाला तो ब्राह्मणद्वेष वाटतो. कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे शिवराय हे गो-ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजे आम्ही संपूर्ण समाजाचे शिवराय मांडतो तर तुम्ही राजांना एका जातीचे रक्षणकर्ते म्हणून मांडता, यात किती फरक आहे. राजे सरावंचे होते. सर्व प्रजा त्यांना समान होती. ते सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होते. असे असताना तुम्ही मात्र त्यांना ब्राम्हणांचे पालनकर्ते म्हणून सांगता तेव्हाच तुमच्या मनातील गुप्त हेतू स्पष्ट होतात. काहीही करून कर्तुत्ववान व्यक्तीला ब्राम्हणी व्यवस्थेपुढे बांधून टाकायचे हे आपले धोरण असते. त्यातून जर अशा व्यक्तींना मुक्त करून त्यांचे खरे चरित्र समाजासमोर मांडायचे म्हटले की आपली कोल्हेकुई सुरु होते.
शिवराय आणि एकूणच सर्व महापुरुषांचा इतिहास बऱ्याच प्रमाणात खोटा लिहिला गेला. याला बहुतांशी ब्राम्हण लेखक जबाबदार आहेत, कारण लेखणी त्यांच्याच हातात होती. आता नव्याने इतिहासाची पुनर्मांडणी करायची असेल तर पूर्वीच्या लेखकांनी काय चुका केल्या ते दाखवणे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे खरा इतिहास मांडणेही आवश्यक आहे. त्यामुळेच रामदास आणि दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु म्हणून आजपर्यंत शिकवले जात असताना नवीन संशोधनानुसार या दोघांचाही शिवाजी राजांशी गुरु-शिष्याचा संबंध नाही हे उघड झाले आहे. मग या दोघांना राजांच्या गुरुपदी बसविण्याचा खटाटोप इतिहासकारांनी का केला याचाही शोध घेणे क्रमप्राप्त आहे. बहुजन समाजात कर्तुत्ववान माणूस जन्मू शकत नाही, आणि जर असा माणूस जन्माला आलाच आणि कर्तुत्ववान झालाच तर त्याचा गुरु/पिता ब्राम्हण असला पाहिजे. कारण ब्राम्हण मार्गदर्शक असल्याशिवाय बहुजन समाजातील व्यक्ती कर्तुत्व गाजवू शकत नाही हा ब्राम्हणी अहंकार/मानसिकता धोकादायक आहे. आमचा विरोध या मानसिकतेला आहे. चुका करणारे बहुतांशी ब्राम्हण होते त्यामुळे त्यांना दोष देणे म्हणजे ब्राह्मणद्वेष करणे नव्हे हे समजून घ्या. प्रामाणिक ब्राम्हण लोकांना आमचा विरोध नाही. उलट त्यांच्या नैतिक कार्यात आम्ही त्यांना सहकार्याच करू. मात्र निष्कारण खोटा इतिहास लिहिणारे, बहुजन समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा यात गुरफटून ठेवणारे जे लोक असतील त्यांना आम्ही नेहमीच विरोध करू, मग त्याची जात/धर्म कोणताही असो. तुमच्या दुर्दैवाने अशा लोकांपैकी बहुतेक लोक ब्राम्हण असल्याने आम्ही नेहमीच ब्राम्हणांचा द्वेष करतो असे आपणाला वाटते पण ते खरे नाही.
मला वाटते आपण स्वतः आत्मपरीक्षण करावे. प्राचीन काळी ब्राम्हणांनी केलेल्या चुकांचे खापर आम्ही आताच्या ब्राम्हणांवर फोडणार नाही कारण पूर्वजांनी केलेल्या चुकांची शिक्षा आताच्या ब्राम्हणांना देणे अनैतिक आहे. परंतु आताच्या ब्राम्हणांनी स्वतः आत्मपरीक्षण करून आपण किती प्रामाणिक आहोत ते पहावे. बहुजन समाज, स्त्रिया यांच्याबद्दल आपली काय मते आहेत ती माणुसकीच्या पातळीवर उतरणारी आहेत काय हेही तपासावे. आणि स्वताच्या दोषावर पांघरून घालण्यापेक्षा तो दोष नाहीसा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
(सदर प्रतिक्रिया शिवरायांचा आठवावा विचार... या लेखावर दिली होती.)
55 टिप्पणी(ण्या):
प्रति, प्रकाश पोळ .
आपली भूमिका अगदी योग्य आहे. ब्राम्हण असो वा आणखी कुणी. द्वेष न करता चिकित्सा झाली पाहिजे. आणखी एक परखड प्रतिक्रिया. छान वाटले. लिहीत राहा आमच्या शुभेच्छा.
आपला,
आनंद मासाळ.
प्रकाश राजे, आपण ब्राम्हणांना आत्मपरीक्षण करायला सांगता मात्र स्वतः आत्मपरीक्षण करत नाही ? आपण आपल्या बहुजन समाजाला जरा आरशात आपला चेहरा पाहायला सांगा. जे ब्राम्हणांना लागू होते ते बहुजनांना लागू होते. रामदास स्वामी आणि दादाजी कोंडदेव हे शिवारायंचे गुरु नसतीलही (माझा इतिहास कच्चा आहे), पण म्हणून स्वराज्याच्या कार्यात त्यांचे योगदान कमी होत नाही. त्यांचे कार्य गौण ठरत नाही. महाराष्ट्र धर्माची पताका शिवरायांनी फडकवत ठेवली त्याचे प्रेरणास्थान रामदास नाहीत काय? मग त्याचे कार्य नाकारण्यात काय हशील ? हा जातीवाद (ब्राम्हणदवेश)नाही का ?
सहमत आहे.
prakash pol tumhi bramhandvesh karta. kitihi samartahn kele tari saty kay ahe te tumhala pan mahit ahe. ugich takala javun bhande lapavnyat kay arth ahe. saral kabul kara na. tumha b-gready lokana savayach ahe. tumhala bramhanna shivya ghatalyashivay jevan jat nasel. kasht karayche sodun shivya dya. purvihi tech kele ani atahi tech. kay farak? aso pragati kara, pudhe ja.
I am agree with you prakash...we should know the politics behind the Brahminism. One should analyze the history which was witnessed by our ancestors. They were discriminated by the Brahmins and mainstream society. So, while thinking about the development of our community one should know real reasons and problems rooted in history...
सह्याद्री बाणा च दुसरा अर्थच जातीयवाद आहे. हा ब्लॉग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्राम्हणांना शिव्या देण्याचा धंदा आहे.
अतिशय सुंदर ब्लॉग. सुंदर विश्लेषण.
पोळ ने घातला घोळ. तुला समर्थ रामदास आणि दादोजी यांच्याबद्दल माहित आहे का ? पांडुरंग बलकवडे, शिवशाहीर बाबासाहेब यांना विचार आणि मग बोल. त्या अफजल खान ची कबर सतरा जिल्ह्यातच आहे न. तिथे दाखव तुझी मर्दुमकी.
totally wrong. u r dam full bastard.
i am fully agree with u. whatever u wrote is fact. we want true history, not false history by bramhanins. so lage raho...keep it up brother.
शिवरायांच्या इतिहासाबद्दल लिहिताना शिवराय हे गोरगरीब प्रजेचे रक्षण करते होते असे सांगितले तर तुम्हाला तो ब्राह्मणद्वेष वाटतो. कारण तुमच्या सांगण्याप्रमाणे शिवराय हे गो-ब्राम्हण प्रतिपालक होते. म्हणजे आम्ही संपूर्ण समाजाचे शिवराय मांडतो तर तुम्ही राजांना एका जातीचे रक्षणकर्ते म्हणून मांडता, यात किती फरक आहे. राजे सरावंचे होते. सर्व प्रजा त्यांना समान होती. ते सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील होते. असे असताना तुम्ही मात्र त्यांना ब्राम्हणांचे पालनकर्ते म्हणून सांगता तेव्हाच तुमच्या मनातील गुप्त हेतू स्पष्ट होतात.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
पूर्वीच्या काळी ब्राम्हण हे पूजनीय असल्याने सर्व समाजाला त्यान्ह्च्याबद्दल आदर होता. त्या आदरापोटी शिवरायचं नव्हे तर सर्वच राजे ब्राम्हणांचे रक्षण करत असता. ब्रम्हहत्या पाप मानले जाई. तसेच गाय ही समस्त हिंदूंची माता असल्याकारणाने शिवराय तिचेही रक्षणकर्ते होते. यात कुठे आहे ब्राम्हणी अहंकार ?
BAMANANA KAHI KAM NASTE MHANUN TE ASHA KADYA KARAT ASTAT. TE DUSARYANCHA ITIHAS BATAVATAT KARAN TE SVATA ITIHAS NIRMAN KARU SHAKAT NAHIT. TYA NAIRASHYATUN TE DUSARYNCHA KHOTA ITIHAS LIHITAT TYACHE SHREY SVATALA GHETAT ANI APLE MANSIK SAMADHAN KARUN GHETAT. YA MULAVAR GHAV GHALAYLA HAVA.
स्वताच्या दोषावर पांघरून घालण्यापेक्षा तो दोष नाहीसा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.
nice article.
मला ब्राम्हणांची गम्मत वाटते. एवढे कांही झाले तरी अजून आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत. मग त्यांच्यावरील टीका वाढतच जाणार. त्याला ते द्वेष समजत असतील तर समजू देत, त्याची काळजी आपण का करावी? मला वाटते की ब्राम्हणांना आपल्या चुका कळायला अजून बरीच वर्षे लागणार आहेत, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
-महावीर सांगलीकर
pol tula dhande nahit ka, uth suth bramhanana shivya ghaltos. tya mohansing rajpal chi kay avastha zali mahit ahe na.
We proud of sahyadribana.com apli bhumika purogami ahe, tyala kon bramhandvesh mhnt asel tar dont worry. tyana bolu det. apan aple kam karit raha.
मला वाटते की ब्राम्हणांना आपल्या चुका कळायला अजून बरीच वर्षे लागणार आहेत, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
Good article
अलिखित सत्य व खरा इतिहास निरपक्ष पणे मांडणे हा जातीय वाद कसा बरे होईल , जरा **वाद बाजूला सारून विचार करून बघा कुठे दिसतोय तुम्हाला या ब्लॉग वर जातीयवाद. अरे जिभेला हाड नसते म्हणून सोयीस्कर पणे लोक खोटं बोलून जातात पण एकदा लिहिलेले कि ते पुसायचे काम इथे होत नाही.एक काळ होता जेव्हा लोक ***सांगणार तीच पूर्व दिशा मानायचे आता काळ बदलला आहे . खातीर जमा केल्या शिवाय आता कोणीही असेच फुकटचे काही बोलत नाही .तुम्ही लोक उगाचच कुठलं तरी वाचायचं आणी एकदा येऊन लिहायचं असले धंदे बंद करा ..अरे लेख काय आहे आपण बोलतो काय आहे एवढ साध कसकाय काळात नाही तुम्हा धुर्तांना ....उगाचच आमची डोकी फिरवायची काम करूनका एकदा जरा खरी नवे व फोन नं देऊन बोला मग सांगतो तुम्हाला जातीय वाद काय असतो ते ....@ प्रकाश आपली भूमिका प्रत्तेक वेळी योग्य आहे मी आपल्याशी सहमत आहे ..
सर्व वस्तुस्थिती आहे.. आपण नित्य लेखन करावे..
शेवटचा पराग्राफ उत्कृष आहे आणि त्यात तर्क सुसंगत ब्राम्हणाला राग येण्या सारखे काहीही नाही!
good article brother. well said.
farach chhan lekh ahe. bram,han samajane ata atmachintan karayla pahije nahitar samajat tedh nirman hoil. bahujan samaj ani bramhan samaj ha vad kunasathich faydyacha nahi. tevha sarvani vichar karava.
you are rigठht prakash sir...........i agree with you.
पुरोगामी ब्रामन आणि सनातनी ब्रामन एकाच शरीराच्या दोन भुजा असतात ......त्याप्रमाणे प्रकाश सर् ब्राम्हणांनी कितीही टीका केली तरी आपण आपले कार्य जोमात सुरु ठेवा हीच आमची विनंती .
आरे इतिहास हा आमचा आरसा आहे आणि तो आम्ही पुसायचा प्रयत्न केला तर आम्हीच तालिबानी आम्हीच भांडणे लावतो म्हणता ...मात्र ज्यांनी इतिहासामध्ये हरामखोरी करून ठेवली त्याचे काय ???????????????????
ब्राह्मणांना एक जात-वंश म्हणून स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे. ते देखील समाजाच्या अग्रभागी राहून. त्यामुळे इतिहासात होऊन गेलेल्या प्रत्येक ब्राह्मण व्यक्तिरेखेचे उदात्तीकरण करणे त्यांना भागच आहे. लक्षात घ्या की लोकशाही म्हणजे सर्व प्रकारच्या समाजांनी समान पातळीवर येऊन जगणे. हे जर खरोखरच शक्य झाले तर ब्राह्मणांचे ब्राह्मण म्हणून अस्तित्वच उरणार नाही. लोकशाहीमध्ये नेहमीच बहुसंख्याकांची सत्ता असते. प्रश्न हा आहे की बहुसंख्य आणि अल्पसंख्य हे कोणत्या आधारावर ठरवले जाणार? ब्राह्मण हिंदू या नावाखाली बहुसंख्य असल्याचे भासवतात. पण प्रत्यक्षात ते ब्राह्मण म्हणून अल्पसंख्यच आहेत. जर त्यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर ते एक जात-वंश म्हणून काळाच्या ओघात नामशेष होऊन जातील. थोडक्यात म्हणजे आज मुस्लिम समाजाची ज्याप्रमाणे महत्वाच्या क्षेत्रांत पीछेहाट होत आहे तीच अवस्था ब्राह्मणांची व्हायला फार वेळ लागणार नाही. म्हणूनच त्यांना काहीही करून ब्राह्मणांचे महत्व समाजमनावर ठसवत राहण्याची गरज आहे. हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही कितीही शुद्ध मनाने ब्राह्मणद्वेष करत नाही असे सांगितले तरी ते तुमच्यावर तोच आरोप करत राहणार. कारण त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नाही.
इतर समाज आपल्यापेक्षा वरचढ ठरेल ही त्यांची भीती नसून ते आपल्या बरोबरीला येतील ही त्यांची भीती आहे. आणि हे टाळण्यासाठी ते खोटा इतिहास लिहिण्यापासून पुरोगामी विचारवंतांचे आवाज दाबणे, त्यांना नाउमेद करणे इथपर्यंत काहीही करू शकतात. पण आपण आपले कार्य चालूच ठेवावे. इतकी वर्षे बहुजन समाजाला प्रश्न विचारणे आणि नकार देणे ह्या दोन्ही गोष्टींचा अधिकार नव्हता. आज हे दोन्ही अधिकार बहुजन समाजाला मिळाले आहेत. त्यांचा पुरेपूर वापर करून स्वत:चा विकास करून घेणे आणि स्वाभिमानाने जगणे हा बहुजन समाजाचा हक्क आहे.
hup chhan blog aahe ...mala tar yat kahi jatiwad ani brahman dwesh disala nahi....
darudyala sagale jagach darude disate tyala aata kon kay karnar....
Prakash khup chhan lihit ahat ...age badho ham tumhare sath hai.....
afzal khanacha vakil krushnaji kulkarni hota jyane shivaji maharajan vaer var kela hota.....sanket joshi la tyabaddala bol mhanave....mandire padatana ramdas swami kuthe lapun basala hota.....
Sachin.....
Bamanani kitihi kolhekui karu dya, tumi aple kam kara. We are with u.
जय मल्हार... जय अहिल्या ....!!
आजच्या विसाव्या शतकात आपणास एव्हढा त्रास झाला तर २००० वर्षा पासून बहुजन समाजाने किती त्रास सहन केला असेल हे कल्पनेच्या पलीकडील आहे. कांही दिवसापूर्वी मला मुलाने डिस्कव्हरी चैनेल पाहत असताना प्रश्न विचारला होता... जसे पाश्चिमात्य देशात नवीन नवीन शोध लागले वैज्ञानिक क्रांती झाली तशी भारतात का झाली नाही?? आपली संस्कृती तर जगात सर्वात प्राचीन आहे. आणि कोणताही नवीन शोध लागला तर, हे लोक हे तर आमच्या पुराणात आहे ; म्हणत मोठेपणा करतात . जर पुराणात असेल तर त्याचे प्रत्यक्ष पुरावे लिखाण माहिती का मिळत नाही? खरेच या वर्गाने ज्ञानाला बंदिस्त करून ठेवले होते. सर्व गुरुनी त्यांच्या ठराविक जातीतील शिष्यानच हे ज्ञान दिले. बहुजन समाजास जाणीवपूर्वक नाकारले. आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वार्थ साधण्या साठी केला. बहुजन समाजास कर्मकांडात गुंतवून ठेवले. याचा परिणाम देश गुलामगिरीत गेला. या परकीय सत्तेचे भाट हाच उच्च वर्ग होता. यांनी खोटा इतिहास लिहिला . बहुजन समाजाच्या नेत्यांना बदनाम केले. आणि सत्य उजेडात येताच चोराच्या उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली. ... पण आता ज्ञानाचा सूर्य उगवल्या मुळे यांना हात चोळत बसावे लागत आहे.... .........!! जय मल्हार... जय अहिल्या ! जय शिव फुले शाहू आंबेडकर .....!!!!
@chinmay ghokhale-
मी ब्राम्हणांना कधीही शिव्या घातल्या नाहीत, घालणारही नाही. माझे अनेक मित्र ब्राम्हण आहेत. ब्राम्हण म्हणून मी व्यक्तीद्वेष करत नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे असे लिहून मी सह्याद्री बाणावर बहुजनांच्या चुकाही दाखवल्या आहे. उगीच तेच तेच आरोप करू नयेत.
@Mahesh Joshi -
पूर्वीच्या काळी ब्राम्हण हे पूजनीय असल्याने सर्व समाजाला त्यान्ह्च्याबद्दल आदर होता. त्या आदरापोटी शिवरायचं नव्हे तर सर्वच राजे ब्राम्हणांचे रक्षण करत असता. ब्रम्हहत्या पाप मानले जाई.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कर्तुत्ववान ब्राम्हण, ज्याने सर्व समाजासाठी काहीतरी चांगले काम केले आहे तो जरूर आदरणीय, पूजनीय असावा. ब्राम्हणाच काय कोणताही माणूस जो सर्व समाजासाठी खस्ता खातो, सुधारणा करतो तो पूजनीय असावा. पण ब्राम्हण पूजनीय होते ते कशाच्या आधारावर. जन्माने ब्राम्हण आहे म्हणून तो पूजनीय, अशी भूमिका आपण घेणार असला तर मला ते मान्य नाही. सर्व समाजाला ब्राम्हनाबद्दल आदर होता याला काय पुरावा आहे. ब्राम्हणाची एक दहशत होती. धर्माचा, देवाचा गैरवापर करून ब्राम्हणांनी भोळ्या-भाबड्या समाजाला आपल्या कह्यात ठेवले होते. लोक ब्राम्हणाच्या वाटेला जात नसत याचे कारण त्यांना ब्राम्हनाबद्दल आदर होता हे नाही तर ते ब्राम्हणी देव, धर्म्ला भीत होते. दुसरे असे की ब्राम्हण जरी अल्पसंख्य असले तरी राजसत्ता त्यांच्या इशाऱ्यावर चालत होती. त्यामुळे साहजिकच ब्राम्हणाच्या प्रत्येक धोरणाला जणू राजमान्यताच मिळायची. (याला अपवाद आहेत.)राजे लोकसुद्धा ब्राम्हणी धर्म, देव यांना टरकून असत. कारण एकूणच सर्व समाजावर ब्राम्हणी अंमल होता. त्यामुळे राजा होण्यासाठी ब्राम्हणाच्या हातून राज्याभिषेक केल्याशिवाय समाजमान्यता मिळाली असे गृहीत धरले जात नसे. त्यामुळे बहुतांशी राजे ब्राम्हणाच्या अधीन असायचे. परंतु शिवरायांचा इतिहास अभ्यासल्यावर आपणाला दिसते की त्यांनी कृष्णा भास्कर कुलकर्णी याला ठार केले होते. त्यांनी ब्रम्हहत्येचा विचार केला नाही.
Afzal Khanacha valil Krishnaji Bhaskar Kulkarni yache maharajani tukde-tukde kele ani yach veli Manusmrutitil Bramhan hatya (Bramhahatya) maha pap ya kalamache suddha tukde-tukde zale paryayane, vishamatavadi Manusmrutichehi tukde tukde zale ani hit Manusmruti nantar Babasahebanni jalali, hich manusmruti 1950 maddhe rajyaghatanene bad tharavali. Ajahi kahi dharma martand Manusmrutiche gungan gatana distat tyanchi kiv karavishi vatate. Manusmruti punha lagu karnyasathi tyanche kevilvane prayatna chalale ahet te velich hanun padale pahijet.
खर आहे आपले...........पन काही ब्राम्हणांच्या चुकाना आज ही आपण उगाळत बसणार आहोत काय ? मग मराठा म्हणून आपण एकत्र कधी येणार ? एक लक्ष्यात असुद्या शिवरायानी आठरा पगड जातीच्या ,बारा बलुतेदारांच्या लोकाना बरोबर घेउन हिन्दवी स्वराज्या चा हा प्रचंड डोलारा उभा केला, तो फक्त मराठयांसाठी नाही,त्यात सर्वच जमातितिल लोकानां आसरा होता.मग जे छत्रपति नि केले नाही ते तुम्हाला आम्हाला करण्याचा मुळीच अधिकार नाही. कृपा करुण थांबवा हा ब्रामन समाजा विरूद्द चा आकस आणि मराठी म्हणून आपण सर्वानी ऐकत्र येउया.कारण मराठी च नाही तर समस्त हिंदू समाजाचे अनेक शत्रु आज डोके वर काढू लागले आहेत,ज्यात सर्वात मोठा धोका आहे तो...............
१) ईस्लामी अतिरेक्यांचा जो सर्वाना परिचित आहे.
२)सबंध देश्यातिल ८० % शिक्षण संस्था आपल्या हातात घेउन आपल्या कोवळया बालकांचा ब्रेंनवोश करुन धर्मान्तरन करणार्या ईसाईं मिशनरीचा.
३)आणि या दोन्ही चे गुण एकत्र असणारी बहुसंख्य हिंदू असून ही फक्त बाई रोमन कँथोलिक आहे म्हणून लाचार असलेली कांग्रेस आणि राष्ट्रवादी संघटना??????????
बघा विचार करा ???????????
हिंदू म्हणजे काय असते रे भाऊ? हिंदू नेमके कोणाला म्हणायचे रे भाऊ?
सचिन तेंडुलकर हा ब्राह्मण नसता तर आजच्या त्याच्या महाशतकाच्या विश्वविक्रमाबद्दल तुम्ही लेख लिहून त्याचे अभिनंदन केले असते. किमान त्याला शुभेच्छा तरी दिल्या असत्या. बहुजनांमधील काही लोकांनी चांगली कामगिरी केली म्हणून त्यांचे जाहीर कौतुक करण्यासाठी तुम्हाला वेळ आहे आणि त्यांचे कौतुक होणे गरजेचे आहे. पण आज सचिनने न भूतो न भविष्यती असा विक्रम करून दाखवला आहे. त्याबद्दल मोठमोठ्या महान खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले आहे. पण तुमच्या ब्लॉगवर मात्र त्याच्याबद्दल एकही ओळ लिहिली जाणार नाही याची खात्री आहे. जर ब्राह्मणांचे दोष दाखवण्याबरोबरच त्यांचे गुण देखील तुम्ही वेळोवेळी दाखवले असते तर तुम्हाला हा लेखच मुळात लिहावा लागला नसता.Remember, Actions speak louder than words!
@Vinayak Deshpande-
सचिन तेंडूलकर ने शतक केले त्याचा आनंद तुम्हाला आहे, तो जरूर असावा. पण तो सामना भारताने गमावला याचे मात्र तुम्हाला दुखः होणार नाही. क्रिकेटच्या सामन्यात एक व्यक्ती महत्वाची नसते तर अख्खा संघ महत्वाचा असतो, समान पातळीवर असतो. भारत आणि बांगलादेश या सामन्यात महत्वाचे काय होते. भारताने सामना जिंकणे महत्वाचे होते की सचिनचे शतक होणे महत्वाचे होते. ज्या व्यक्तींना भारतीय संघाच्या पराजयाचे काहीही दुखः झालेले नाही त्यांनी आपल्या निष्ठा तपासाव्यात. सचिन चांगला क्रिकेट खेळाडू आहे याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही लोक इंग्रजांना शिव्या घालता आणि त्यांनी आणलेल्या व लोकप्रिय केलेल्या खेळाला मात्र इतर सर्व गोष्टींपेक्षा खूप जादा महत्व देता हे मलातरी बरोबर वाटत नाही. एक खेळ म्हणून क्रिकेट ठीक आहे, पण त्याचा खूप अतिरेक झाला आहे. पैशांचा बाजार चालू असतो क्रिकेटच्या नावावर. इतर खेळांना (जसे की कबड्डी, खो-खो, हॉकी) यांना काहीही महत्व दिले जात नाही. हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ नावापुरता आहे. जगातील किती प्रगत देश क्रिकेट खेळतात. चीन, जपान, अमेरिका, फ्रान्स हे देश क्रिकेट खेळत नाहीत. भारतीय उपखंडातील देशच क्रिकेटला अति महत्व देतात. त्यामुळे क्रिकेट या खेळाची या ब्लॉगवर फारशी दाखल घेण्याचे कारण नाही.
राहिला प्रश्न सचिन तेंडूलकर चा गौरव करण्याचा. तर क्रिकेटच्या अतिरेकालाच माझा विरोध असल्याने सचिनचाही गौरव या ब्लोगवर होऊ शकत नाही. मग तो ब्राम्हण असू दे नाहीतर आणखी कुणी. तुम्हाला पाहिजे तर हवा तेवढा गौरव करा. तो ब्राम्हण आहे म्हणून त्याचा गौरव करू नका असे आम्ही म्हणणार नाही. पण सचिन चा गौरव करण्यासाठी सह्याद्री बाणाची निर्मिती झालेली नाही. माझा बहुजन समाज अजून अशिक्षित आहे, अज्ञानी आहे. त्याला जागृत करणे हा सह्याद्री बाणाचा उद्देश आहे आणि शेवटपर्यंत राहील.
भारताने सामना गमावल्याचे दु:ख मला झालेले नाही हा निष्कर्ष तुम्ही कोणत्या आधारावर काढला? एकीकडे तुम्हीच सांगता की क्रिकेट या खेळात तुम्हाला फारसा रस नाही तसेच तुमच्या ब्लॉगवर या खेळाला जागा नाही. मग सामना गमावल्याचा मुद्दा उपस्थित करण्याचे कारणच काय?
तुमच्या माहितीसाठी सांगतो की सट्टेबाजांना खेळ कोणता आहे याने काहीही फरक पडत नाही. उद्या दुसरा कोणताही खेळ लोकप्रिय झाला तरी त्यावरही ते सट्टेबाजी करणारच. अनेक देशांमध्ये इतर खेळांमध्ये सट्टेबाजी चालते. तो दोष क्रिकेटचा नाही. तसेच ज्यांना आपली उत्पादने भारतात खपवायची आहेत त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही त्याने काही फरक पडत नाही. इतर देशांमध्ये त्या कंपन्या अशाच प्रकारे खेळाडूंचा वापर करतात.
'आम्ही लोक इंग्रजांना शिव्या घालतो' म्हणजे नेमके काय करतो? आणि तुम्ही चीन, फ्रान्स ही उदाहरणे दिली आहेत म्हणून सांगतो. इंग्रजांनी १९४७ मध्ये सत्ता सोडली पण फ्रान्सने १९६२ पर्यंत पोन्डिचेरी स्वत:कडेच ठेवले होते. चीनने वारंवार अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून जाणीवपूर्वक भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेने कायमच पाकिस्तानला मदत केली आहे. अशा देशांची उदाहरणे देणाऱ्या लोकांनी आधी स्वत:च्या निष्ठा तपासून घ्याव्यात. ते क्रिकेटला महत्व देत नाहीत म्हणून आम्हीही देऊ नये हा कुठला न्याय? आज आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले जाणारे बहुतेक खेळ हे पाश्चिमात्य देशांतुनच आले आहेत; ऑलिम्पिक सुद्धा. मग तर हे सारेच खेळ टाकून दिले पाहिजेत. शिवाय इंग्रजी भाषा देखील त्यागली पाहिजे. आपण प्राकृत भाषेचे पुनरुज्जीवन का करत नाही? शिवाय तुम्हाला हॉकी विषयी इतकेच प्रेम असेल तर आतापर्यंत किती वेळा त्याबद्दल लिहिले आहे? थोड्याच दिवसांपूर्वी भारतीय महिला कबड्डी संघ विश्वचषक जिंकून आला त्यांचे तरी तुम्ही अभिनंदन केले का? नसेल तर उगाच उदाहरणे कशाला देता?
क्रिकेटचा अतिरेक आणि सचिनचे कर्तृत्व यांचा काय संबंध आहे? यासाठी आपण सचिनला जबाबदार धरत असाल तर बोलणेच खुंटले. सचिन हे फक्त एक उदाहरण मी दिले होते. सचिनचाच गौरव केला पाहिजे असा माझाही आग्रह नाही. पण ब्राह्मणांचे फक्त दोषच दाखवायचे आणि ब्राह्मण समाजात जे कर्तबगार लोक झाले आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हाच जर तुमचा अजेंडा असेल तर काय बोलणार? बहुजनांमध्ये अनेक महान लोक आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की बहुजनांनी केवळ बहुजन महापुरुषांचा आदर्श ठेवावा आणि ब्राह्मणांनी ब्राह्मण महापुरुषांचा. बहुजनांनी आणि ब्राह्मणांनी देखील आदर्श ठेवतांना जातीच्या पलीकडे जाऊन विचार केला तरच समाज एकत्र येऊ शकेल.
क्रिकेट हा खेळ इंग्रजांचा आहे म्हणून तो नाकारावा असे मी म्हणत नाही. क्रिकेटलाही इतर खेळाप्रमाणे महत्व द्यावे पण त्याचा अतिरेक योग्य नाही, इतकेच मला म्हणायचे आहे. तसेच इतर देशांची उदाहरणे दिली ती त्यांच्या सर्व गोष्टी मला मान्य आहेत म्हणून नव्हे. ते प्रगत देश असून क्रिकेट ला फार महत्व देत नाहीत हे मला सांगायचे होते. ते कोणत्या गोष्टीला महत्व देतात/देत नाहीत यावर इतरांनी आपली मते ठरवावी असेही मी म्हणत नाही. परंतु प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यावे हे ज्याचे-त्याला कळले पाहिजे.
मी फक्त ब्राम्हनांचेच दोष दाखवतो हा आपला गैरसमज आहे. ब्लॉग पूर्ण वाचला असता तर आपला गैरसमज दूर झाला असता. परंतु ब्लॉग न वाचता आपण एकांगी आरोप करणे योग्य नाही. या आधीच मी प्रा.महावीर सांगलीकर यांचा बहुजनांच्या चुका दाखवणारा लेख सह्याद्री बाणावर प्रसिद्ध केला आहे. मागे मीही बहुजन समाजाच्या काय चुका होत आहेत ते दाखवून देणारे लेख लिहिले आहे. ते आपणाला सह्याद्री बाणावर वाचायला मिळतीलच.
आपण ब्राम्हण समाजातील गुणवंत व्यक्तींचा गौरव करायला मला सांगत आहात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ब्राम्हण समाजातील व्यक्ती एखाद्या बहुजन समाजातील व्यक्तीपेक्षा कमी लायक असेल तरीही त्या ब्राम्हण व्यक्तीचाच जास्त उदो-उदो केला जातो. ब्राम्हण साहित्यिक, लेखक, विचारवंत, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांनाच जास्त महत्व दिले जाते. हे वास्तव आहे आणि ते तुम्हीही अमान्य करू शकत नाही. बहुजन समाजात कितीतरी गुणवंत लोक आहेत ज्यांचा कधीही गौरव केला जात नाही किंवा प्रसिद्धी माध्यमे, उच्चभ्रू समाज त्यांना मान्यता देत नाही. म्हणून आम्हाला बहुजनांचा गौरव करावा लागतो. ब्राम्हणांचा गौरव होत नाही असे नाही. परंतु या बाबतीत बहुजनांवर मात्र अन्याय होतो हे नक्की. आम्ही ब्राम्हणांचा गौरव नाही केला तरी तो मोठ्या प्रमाणावर होणार हे सत्य आहे. काही अपवाद वगळता बहुजनांच्या वाट्याला मात्र हा गौरव फारसा येत नाही.
प्रस्थापित समाज व्यवस्था, प्रसिद्धी माध्यमे बहुजनांची उपेक्षा करत असल्यानेच आम्हाला आमची नवीन व्यवस्था निर्माण करावी लागत आहे आणि हे अपरिहार्य आहे. बाकी आमचा ब्राह्मणावर राग नाही की आम्हीं त्यांचा द्वेष करत नाही. पटत असेल तर स्वीकारा नाहीतर अजून विचार करा. सर्व लोक सारखे नसतात. आपल्या डोळ्यावरील झापडे काढून विचार केला तर माझ्या म्हणण्यातील सत्यता अधिक पटेल.
Prakash ji , tumhala ek sangu. Me swatah brahman ahe, pan tari kuthetari mala asa vatta ki tumche lekh vachavet. Bhale tikaa asli tari. Karan kuthetari shabda samarthya ahe, garbhit vichar ahe.
ब्राह्मण असे का ?
मी एक लेख लिहिला होता उमाजी नाईक यांच्याविषयी कि ते पहिले क्रांतिकारक होते आणि त्यांना १८३२ ला फासी झाली.१८४५ ला बळवंत फडके जन्मला तर मग तो पहिला क्रांतिकारक कसा झाला ?
तर त्या फडक्याने (सकाळ वृत्तपत्राचा व्यवस्थापक ) हा मुद्दाच गाळून टाकला आणि लिहिले कि उमाजी नाईक हे बळवंत फडके च्या आधी थोडा काळ क्रांतिकारक होते . अरे थोडा काळ म्हणजे किती १५ मिनिटे कि
अर्धा तास ? असे कसे रे तुम्ही
maratha /patil lokani bahujananwar kelele atyacharachya kahanya kadhi sangnar?
maharashtra mantri mandalat bahusankhya maratha ka?
सरकारी नोकऱ्या तर ब्राह्मणांच्या हातात आहेत जिथे ब्राह्मणांच्या १५ जागा आहेत तिथे ४० आणि ५० पण आहेत माझ्याकडे पुरावा आहे तो मी प्रकाश पोल कडे पाठवीन ते नक्कीच उपयोगी पडतील ब्राह्मणांची तोंड बंद करायला.
"मात्र निष्कारण खोटा इतिहास लिहिणारे, बहुजन समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा यात गुरफटून ठेवणारे जे लोक असतील त्यांना आम्ही नेहमीच विरोध करू, मग त्याची जात/धर्म कोणताही असो."
- इति श्री प्रकाश उवाच
'इस्लाम खतरे में है' या एका घोषणेमुळे किती मुस्लिम बहुजनांचे नुकसान झाले आहे विषयावर आपण आपले चिंतनीय विचार का बरे मांडत नाही? गरीब, अशिक्षित आदिवासींना मूठभर पैशाची लालूच दाखवून धर्मांतरित करण्यासाठी बाहेरच्या देशांतून किती पैसा आणि माणसे येतात याबद्दल लिहिण्याची आपल्याला लाज वाटते का? की या लोकांना आपण बहुजन मानतच नाही? हिंदू धर्मातील बहुजनांची हिंदू उच्चवर्णीयांनी केलेली पिळवणूक एवढ्यापुरतेच आपले विचार मर्यादित असतील तर स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणे बंद करा आणि हिंदू धर्माची चौकट पार करण्याचे धैर्य तुमच्यात नाही हे मान्य करा. बाबासाहेबांनी केवळ हिंदू धर्मावरच नव्हे तर सर्वच धर्मांतील प्रतिगामी वृत्तींवर निर्भयपणे टीका केली. ते खरे सुधारक होते. निधर्मी देशातील सुधारकांना एकाच धर्मावर टीका करणे शोभून दिसत नाही!
Kulkarni saheb, agdi yatha yogya lihilet apan. tumcha pratyek ani pratyek shabd laakh molacha ahe.
Kerala madhe 24 % muslim lok sankhya ahe. Christian pan bharpur pramanat ahet. He sagle lok vanshane, varnane bharatiyach ahet. Biju, Siju navachi manase Hindu dharmat ahet, tasech, Christian ani tasech Muslim. He lok purviche kon hote ? Veg veglya samajatle lok kadhi paishychya joravar, kadhi talwarichya joravar, kadhi swa-icchene dharma badlun gele. tya madhe brahman samajatle lok pan hote, he muddam namud karnya sarkhe.
Hindu dharma var asud ugararya madhe Waman Tilak, Pandita Ramabai (Ramabai Dongre)... he 2 chitpavan brahman lok pan yetat. Jyanni chukichya chali-riti n var asud ugarle ani nantar christian dharma madhe gele.
Vaachak ho , chukichya chali riti, garibanchi dishabhul karnare buva lok, sadhu bairagi hyacnhya virrudha me pan ahe. Pan atma dnyan prapt zalele sant (brahman athava ankhi konihi) amhala vandaniya ahet.
itar dharma madhe odhnya sathi tyanche lok kai kai udyog kartat , hyacha ek namuna pahaicha asla tar google var "Dr Sebastian Martin "he shabda taaka. AshirwadIndia navane ek sanstha chalavnara ha gristha kiti khotarde pana karto, andha shraddha vaadhis laavto garib lokan madhe he aaplyala kalun yeil.
Ani aho, he baghitlya nantar aaplya pratikirya jarur kalva...vaat pahatoi me
@ Pol saheb, Dr Sebastian Martin hyanche bharpur pramana madhe videos tumhala youtube var miltil. Te baghun mala aapli pratikriya jarur kalvavi. Samaj madhe asleli andha shradhha, dishabhul fakt hindu dharmiyach karat nahit. ti sagli kade ahe. Dr Zakir Naik he asech ek magnetic vyaktimatva. Achaat shabda samarthya, smaran shakti... pan khol uddesh ha ki jaastit kaast bahujan lokanna islam dharma madhe odhun ghene. Hindu dharma madhe asleli dufali ankhi kaa vaadhte tar kai karmath vicharachya lokan mule ani brigedi chhap lokan mule. Itar dharmiya tyacha nemka gair fayada ghetat. 5000 varshe amchyavar anyaya zala, ase roj roj ordun sangnya peksha , sud-buddhi bajula thevu apan ani ujwal bhavishyacha vichar karu. Patatai ka tumhala ?
kai ahe na virodh karnyaramadhe "ishwar la retire kara" ase Dr Shriram Lagoo (Chitpavan brahman) ahet, pan tyancha daring nahi itar kontyahi dharma chya preshit athava deva baddal bolaiche... me chukichya gonshtin che samarthan karat nahi... pan vastusthiti hi ahe.. ki ithe janmala alele panth ani dharma (Hindu/ Sananat/ Vedic/ Jain/ Boudhha/ Sikh )... he mulaat sarva samaveshak, shaant, akrastale pana na karnare asech ahet
bahujanat budhipramanyvad kadihi yeu dyaycha nahi ha sanatani agenda aahe ani to rahnarach! teva pol sir tumhi lihit raha.
shaswat vicharanche pathirakhe honyasathi bramhani lok dhajat nahit!
जे लोक सत्तेसाठी रस्त्यावरच्या कुत्र्यांसारखे एकमेकांशी भांडत आहेत त्यांनी इतरांना अक्कल शिकवू नये.
POL SAHEB
1)GELI SATH WARSHA BHRASHTACHARANE BURBURATLELE SUGAR
LOBBYWALE HE SUDHA BAHUJANAN SHATRU AHET
2)JYANCHYAPASUN BACHAW KARANYASATHI ATROCITY ACT ANAWA LAGLA TE SUDHA BAHUJAN SHATRU AHET
3)BHATANI JYANCHYA TALAWARICHYA DHAKANE JATIWYAVASHTA KELI TE SUDHA BAHUJAN SHTRU AHET.
4)Z.P/ PANCHAYAT SAMITIT JE TOPIWALE AHET(APAVAD WAGALUN)
TE SUDHA BAHUJAN SHATRU AHET.
5)EKA 3% JATI BADDAL SHORYACHA AW ANUN LADHANARE WA MUL
PRASHNAN WARUN BAHUJANANCHE LAKH DUSARIKADE WALWAYCHA PRAYATNA KARNARE HI BAHUJAN SHATRU AHET.
रा.स्व. संघाचे दबावतंत्र
चित्रलेखा, ५ नोव्हेंबर २००७ मधील हीच ती दोन पत्रे कि जी छापल्यामुळे चित्रलेखा या साप्ताहिकाला किमान सहा महिने "साद-प्रतिसाद" हे सदर रा.स्व. संघ च्या दबावामुळे चालविता आले नाही.
पत्र क्र. १
स्वयंसेवकांनो, कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाता?
चित्रलेखाच्या साद-प्रतिसाद मधील (३० जुलै) सुर्यकांत शानभाग आणि विजय वामन आगाशे (१ ऑक्टोबर) यांची पत्रे वाचली. शानभाग यांनी संघाचे काढलेले वाभाडे आणि आगाशेंनी केकेली सारवासारव पहिली. या संदर्भात स्वयंसेवकांना पुढील प्रमाणे आवाहन करावे, असे वाटते.
'स्वयंसेवकांनो, तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता, धर्मांधता आणि चार्तुवर्ण्याचे तसेच जातीव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे.
या गर्वात कुठलीही मानवतेची हाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा शेवटी धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी मुलेही ओरडतात कि, गर्वाचे घर खाली. तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले आहे तरी काय? हिंदूंनी गर्व करून घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वरांना तुम्ही संत म्हणून बोलबाला करता; त्याच ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना तुमच्या वर्ण वर्चस्ववादी पूर्वज्यांनी जलसमाधी घ्यायला लावली आहे. तेच आज ज्ञानेशाची स्तुती करीत आहेत. कोणाला माहित ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, कि त्यांचेही काही बरे -वाईट केले?
तुमचा धर्म खरेच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्रजी बोलायला आले कि, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाहीत. आपल्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आपला सगळा इतिहासच पराभवांचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हशील आहे? तुम्हाला धर्मच हवा असेल, तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा, तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल!’
विकास विवेक पाठक (सिडको-औरंगाबाद)
पत्र क्र. २
रा. स्व. संघ आणि विध्वंस
विजय वामन आगाशे यांचे (चित्रलेखा १ आक्टोंबर २००७) ‘साद-प्रतिसाद’ मधील पत्र वाचले. ते लिहितात,’ ८२ वर्षांमद्धे संघाने हिंदू सामाज्याचा पार विध्वंस केला म्हणजे नेमके काय केले, हे शानभागांनी लिहायला हवे होते.’ एखाद्याला संघ परिवाराबद्धल अवास्तव अभिमान असल्यास विध्वंसाकडे त्यांची डोळेझाक होणार हे ओघानेच आले. काही प्रमुख विध्वन्सांची नोंद येथे घेणे योग्य ठरेल.
□ धार्मिक शिक्षण देण्याच्या मिषाने मुलांमद्धे पाद्दत्शीरपणे चातुर्वर्ण ओतण्याचा प्रयत्न केला. परधर्मद्वेषापोटी विकृत इतिहास शिकविला आणि तसा प्रयत्न अविरत चालू आहे.
□ मुस्लीम -ख्रिश्चनांचा परमोच्चद्वेष म्हणजे हिंदू धर्मप्रेम हा अजब सिद्धांत संघवाल्यांनी स्वीकारल्यामुळे प्रतिक्रियावादी बनलेला तरुण हिंदू धर्माच्या कथित आणि पढिक प्रेमापायी परधर्मद्वेष्ठा बनतो.
□ संघाचे स्वयंसेवक एक धार्मिक कृत्य म्हणून संघाच्या संघटनेकडे पाहतात आणि तन-मन-धन खर्ची घालतात. ते राष्ट्र उभारण्यासाठी नव्हे, तर धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी. देशापेक्षा धर्म मोठा असे शिकवल्यास असेच घडणार. रा. स्व. संघ निश्चितपणे हिंदू-धर्मांधतेचे प्रतिनिधित्व करतो, नव्हे धर्मांधता हाच संघाच्या राजकारणाचा मूळ उद्देश आहे. त्याच दृष्ठीने लाखो हिंदूंना धार्मिक प्रश्नाच्या दावणीला बांधले जाते.
□ हिंसा हा संघाचा स्थायीभाव आहे. हिंसा हि संघीष्ठांच्या नसानसात एखाद्या जहरी विषासारखी भिनलेली आहे. ‘मशिदी उखडून लावणे’ हे त्यांचे लाडके स्वप्नरंजन असते.
□ महात्मा गांधींचा खून करणारा गोडसे (तथाकथित माथेफिरू ) हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
□ राखीव जागाविरोधी आंदोलन पेट घेते तेंव्हा रा. स्व. संघ समाज्यात ढोंगीपणे वावरताना दिसतो. अशावेळी संघ हिंदुत्ववादाला अनुसरून भूमिका घेताना दिसत नाही व दिसला नाही.
प्रमोद शिंत्रे (इगतपुरी-नाशिक)
Dnyanesh Maharao he satya ahe na?
Aaarrrrr hana hi Baman, hya bamnanche vichar tyanchya shendisarkhe vakade aahet ki rrrr... Hyana mirchyachi dhuri dili pahije.. tavach hi makad zadavaran khali utartyal. Dear Prakash, I am with you... Aapla SATARA
सा ध्या सुध्या लोकांना फसवण्याची सवय भाभणाचीच
बहुजन हिताय बहुजन सुखाय ...
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ