शनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२

वैदिक लढाया आणि सुसंस्कृतपणा (?)

निरपराध शम्बुकाला रामाने ठार मारले. शंबूक हा तथाकथित शूद्र वर्णातील असून त्याने विद्या ग्रहण केली, हा त्याचा अपराध होता काय? यात रामाचे समर्थन कसे होईल. हे सुसंस्कृत युद्धाचे उदाहरण आहे का ? वामनाने तीन पावलाची जमीन मागून कपटाने निष्कपट बळीराजाला ठार केले हा सुसंस्कृतपणा आहे का ? परशुरामाने अत्यंत क्रौर्याने आपल्या आई आणि भावाना ठार मारले हा सुसंस्कृतपणा आहे का ? सुग्रीव आणि वाली यांच्या संघर्षात निरपराध वालीला रामाने क्षात्रधर्म बाजूला सारून मारले हे रामाचा सुसंस्कृतपणा दर्शवते की कपट ? वालीचा कोणता अपराध होता ? अशी शेकडो उदाहरणे देता येतील. इंद्राने
ऋषीच्या बायकोला फसवून तिच्यावर केलेला अत्याचार काय दर्शवतो.

शंबूक हा शूद्र होता. शूद्राने शिक्षण घेवू नये, वेद ऐकू वाचू नयेत असे कायदे त्याकाळी मानुस्मृतीने लादले होते. तेच अन्याय्य कायदे मोडले म्हणून ब्राम्हणांनी गहजब केला आणि रामाला शाम्बुकाला मारायला लावले. बळीराजा निष्कपट होता हे सरवाना म्हाईत आहे. तसे नसते तर बहुजन समाज "इडा पीडा जावू दे आणि बळीचे राज्य येवू दे" असे म्हटला नसता. तुकोबानीही आपल्या अभंगातून हे हरी तू निष्ठुर, का धाडला बळी पाताळी असे म्हटले आहे. वामनाने कपट करूनच बळीराजाला संपवले हे वास्तव आहे. वाली आणि सुग्रीव यांच्या भांडणात रामाने समझोता करणे समजू शकते पण निर्दोष आणि निशस्त्र वालीला रामाने झाडाआडून बाण मारला हा आपला सुसंस्कृतपणा आहे असे वाटते का ? जनता ही धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या प्रभावाखाली असते. मुठभर त्रैवर्णिक सोडले तर बाकीची जनता शूद्र आणि अतिशूद्र होती. त्यांना पेटून उठन्याचाही अधिकार नव्हता.

3 टिप्पणी(ण्या):

Abhijeet म्हणाले...

शूद्र आणि अतिशूद्र यांच्यावरील अत्याचारांची हजारो वर्षांपूर्वीची शेकडो काल्पनिक उदाहरणे देण्यापेक्षा आजच्या काळातील रमाबाई नगर हत्याकांड आणि खैरलांजी हत्याकांड ही उदाहरणे आपण का बरे देत नाही? या हत्याकांडातील आरोपींना कोण पाठीशी घालत आहे ते देखील स्पष्ट करा. पुराणांतील अत्याचारांची उदाहरणे काल्पनिक असली तरी त्यांचे समर्थन करणारी काही मंडळी आजच्या काळात अस्तित्वात आहेत. पण आज जे अत्याचार होत आहेत त्यांचे देखील अप्रत्यक्ष समर्थन करणारी मंडळी आज अस्तित्वात आहेत. करायचाच असेल तर या दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तींचा निषेध करा. जगातील सर्व अनर्थाचे मूळ खापर एकाच जातीच्या माथ्यावर फोडणे योग्य आहे अशा प्रकारच्या विचारसरणीने समाज पुरोगामी न बनता उलट प्रतिगामी बनत जातो.

प्रकाश पोळ म्हणाले...

@ अभिजीत- खैरलांजी हत्याकांड असो वा आणखी कोणताही अत्याचार, अन्याय असो, सह्याद्री बाणा वरून लिखाण करताना या सर्व गोष्टींचा वेळोवेळी तीव्र शब्दात निषेधच केला आहे. आणि फक्त निषेध करून थांबलो नाही तर अशा अन्यायग्रस्त कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी जे संघर्ष झाले त्यातही अनेक वेळा सहभागी झालो आहे. अत्याचार कोणत्याही प्रकारचा असो, तो कुणीही करू दे त्याचे समर्थन होऊ शकत नाही. उलट अन्याय करणाऱ्या अशा प्रवृत्तींना कडक शिक्षा व्हायला हव्यात असेच माझे मत आहे. याबद्दल सह्याद्री बाणावर वेळोवेळी लिहिले आहे. खैरलांजी हत्याकांडाचे समर्थन माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केले होते. त्यावेळीही मी दैनिक लोकमत मधून पत्र लिहून शालिनीताईंचा निषेध केला होता.
संदर्भासाठी खालील लिंक ओपन करा.
http://prakashpol.blogspot.in/2008/09/shalinitai.html

त्यामुळे आपल्या अपेक्षेप्रमाणे मी दोन्ही प्रकारच्या प्रवृत्तींचा निषेध करतो हे लक्षात घ्या. परशुराम हा ब्राम्हण, राम हा क्षत्रिय होते, तर शालिनीताई पाटील या मराठा आहेत. या तिघांच्याही काही विचार/कृतीना मी विरोध केला. याचा अर्थ मी जात पाहून विरोध करत नाही किंवा केवळ विरोधासाठी विरोध करत नाही हे आपल्या लक्षात आले असेल.

Peace on Earth म्हणाले...

best bloc. Keep it up sir, I am with you.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes