![]() |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात
त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार
मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध
पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे.
अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;
जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांची समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीयदृष्ट्या सखोल मीमांसा करून त्यांच्यामुळे केवळ अस्पृश्यांचेच नव्हे, तर सबंध भारतीय समाजाचे कसे अतोनात नुकसान झाले आहे, हे प्रभावीपणे सांगणारे एक दष्टे विचारवंत; 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहून बुद्धांच्या समग्र तत्त्वज्ञानावर भाष्य करणारा आणि त्या तत्त्वज्ञानाचा प्रचलित मानवी समाजाला अत्यावश्यक असलेला संदर्भ सांगणारा एक तत्त्वज्ञ; राजकीय अर्थशास्त्र आणि प्रशासनाचे नावाजलेले प्राध्यापक; विधी महाविद्यालयाचे प्राचार्य; मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे एक निष्णात बॅरिस्टर; कोकणातील अन्यायकारक खोती पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात विधेयक मांडणारे गरीब शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी.
१९४२ ते १९४६ या चार वर्षांत व्हाईसरॉयच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना या देशातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निभीर्ड मजूरमंत्री. भारतातील स्त्रियांच्या समान अधिकारांची सनद असलेल्या हिंदू कोड बिलाचे निर्माते आणि सरकारमध्ये ते मान्य होत नाही, असे दिसताच स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदेमंत्रीपदाचे राजीनामा देणारे 'स्वाभिमानी' केंदीय मंत्री! (अर्थात हिंदू कोड बिल हे राजीनाम्याचे एक प्रमुख कारण होते.) हे वर्णन आणखीही वाढविता येईल.
डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे पैलू मी थोड्याशा विस्ताराने इथे अशासाठी सांगितले की भारतातील एकही समाजघटक त्यांच्या ऋणातून मुक्त नाही. तरीही देशभर आणि सबंध जगात पसरलेले त्यांचे अनुयायी सोडले, तर एकूण भारतीय समाजाने त्यांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची दखल घेतलेली दिसत नाही. अस्पृश्यांचे, फार तर दलितांचे पुढारी, आणि वस्तुस्थिती नाकारता येत नाही म्हणून 'भारतीय घटनेचे शिल्पकार' इथपर्यंतच त्यांची ओळख आहे. अनेकांना तर राखीव जागांच्या धोरणांचा आग्रह धरून त्यांनी गुणवत्तेची आणि कार्यक्षमतेची वाट लावली, असेच वाटते.
शेकडो वर्षांच्या जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या संकुचित आणि खंडित मनोवृत्तीचेच हे निदर्शक आहे. खरे पाहता, डॉ. आंबेडकर यांनी या देशाच्या जवळ जवळ प्रत्येक प्रश्नाचा अगदी मुळाशी जाऊन विचार केलेला आहे. इतकेच नव्हे, तर अशा प्रश्नांची सोडवणूक कशी करावी, यासबंधी वेळोवेळी उपाययोजनाही सांगितली आहे. आर्थिक धोरण, संसदीय लोकशाही, परराष्ट्रीय आणि संरक्षणधोरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षणप्रणाली व विद्यापीठांची पुनर्रचना, पाणी-धरणे-वीजविषयक धोरण, नद्यांच्या पाणीवाटपावरून शेजारच्या राज्यातील तंटे... देशाचा अगदी एकही प्रश्न त्यांच्या नजरेतून सुटला नाही.
काळाच्या ओघात या उपाययोजनेचा पुनविर्चार वा तिची पुर्नमांडणी होणे शक्य आहे. उदा. त्यांनी जमिनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा कार्यक्रम सांगितला. समाजवादी क्रांती झाल्यानंतर ज्या ज्या देशांनी शेतीचे राष्ट्रीयीकरण केले, तिथे तो प्रयोग यशस्वी झाला नाही. मात्र, हे जरी खरे असले, तरी भारतामध्ये केवळ २०-२५ टक्के मोठ्या व मध्यम शेतकऱ्यांच्या हातात ७० टक्क्यांहून अधिक शेतजमीन असल्यामुळे मुबलक अन्नधान्य पिकवूनही देशातील किमान एक-चतुर्थांश लोक दारिद्यरेषेखाली राहतात, ही गोष्ट आपल्याला नजरेआड करता येत नाही.
देशाच्या प्रश्नांचा इतका समग्र, विस्तृत आणि सखोल विचार त्यांनी का केला असेल? आणि तोही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागली तरीही? याचे एकच उत्तर आहे. डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. त्यांची राष्ट्रनिष्ठा शंभर नंबरी सोन्यासारखी होती. दोन-अडीच हजार वर्षांच्या जातिव्यवस्थेविरुद्ध अगदी एकाकीपणे संघर्ष करणे, ही भारतीय इतिहासाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी होती. खरे म्हणजे, ती यशस्वीपणे निभावून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्यच त्यांच्या हातून घडले आहे.
हा आशय प्रत्यक्ष देण्याची संधी जेव्हा त्यांना घटनासमितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदामुळे मिळाली, तेव्हाही त्यांनी त्या संधीचे सोने केले. पर्वत, नद्या, डोंगर, फुले आणि फळे ही राष्ट्राच्या अस्मितेची प्रतिके आहेत, हे खरे. परंतु मुळात राष्ट्र ही संकल्पनाच माणसाने निर्माण केली. म्हणून राष्ट्राचा खरा नायक माणूस आणि राष्ट्र म्हणजे माणसा-माणसांतील संबंध. हे संबंध समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता. आज भारतात (आणि जगात इतरत्रही) खऱ्या अर्थाने तसे ते नाहीत, ही त्यांची खंत होती. ते तसे का नाहीत आणि ते कसे निर्माण करता येतील, हे कळण्यासाठी या देशाने आंबेडकर समजून घेणे आवश्यक आहे.

आभार
प्रशांत म. गायकवाड
(सदर लेख इथून संकलित केला आहे.)
14 टिप्पणी(ण्या):
जेव्हा सर्व समाज बाबासाहेबांना स्वीकारून त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालेल तेव्हा खऱ्या अर्थाने भारताचा सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास घडून येईल.
देशाच्या प्रश्नांचा इतका समग्र, विस्तृत आणि सखोल विचार त्यांनी का केला असेल? आणि तोही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागली तरीही? याचे एकच उत्तर आहे. डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. त्यांची राष्ट्रनिष्ठा शंभर नंबरी सोन्यासारखी होती. दोन-अडीच हजार वर्षांच्या जातिव्यवस्थेविरुद्ध अगदी एकाकीपणे संघर्ष करणे, ही भारतीय इतिहासाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी होती. खरे म्हणजे, ती यशस्वीपणे निभावून भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्यच त्यांच्या हातून घडले आहे.
its absolutely true
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बहुजन स्वातंत्र्याला कायद्याचे अधिष्ठान मिळवून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल हा जन्मदिवस. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त बहुजन समाजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी आपल्या विचार आणि आचारातून भक्कम वैचारिक बळ दिले. बाबासाहेबांच्या विचारांना स्मरून बहुजन समाजाने शैक्षणिक, सामाजिक आणि ...आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाने गरजेचे आहे. जातीपातीच्या राक्षसाला गाडून टाकून सर्व भारतात बुद्धविचाराचा प्रसार करण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित प्रबुद्ध भारत घडवणे हे आपले लक्ष्य आहे.
बाबासाहेबांनी सर्व जाती-धर्माच्या उपेक्षित लोकांसाठी संघर्ष केला. स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल मांडले. परंतु संकुचित विचारांच्या मनुवादी लोकांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला. आज अनेक उपेक्षित घटक बाबासाहेबांच्या संघर्षामुळे सन्मानाचे जीवन जगात आहेत. स्त्रियांसाठी समान हक्क आहे. समस्त स्त्री वर्ग बाबासाहेबांचा ऋणी असला पाहिजे. परंतु जातीव्यवस्थेची बंधने आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल मुद्दाम निर्माण केलेले गैरसमज अशा वावटळीत बहुतांशी लोक बाबासाहेबांचा तिरस्कार करतात. बाबासाहेबांची ही उपेक्षा अतिशय अन्यायकारक आहे.
स्वताच्या डोक्याने विचार करा. बाबासाहेब समजून घ्या. कोणताही अभ्यास न करता बाबासाहेबांच्या कार्याबद्दल टिपण्णी करू नका. त्यांचे चरित्र वाचा. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला एकसंध समाज निर्माण करुया. ते आपले नैतिक कर्तव्य आहे.
JYA LOKANI AMBEDKARANCHA ELECTION MADHE PARABHAW GHADWUN ANLA HOTA . TYANI (CONGRESWALYANI) KRUPAYA
AMBEDAKARANCHE NAW GHEU NAYE.
DALITANCHA KALWALA ASEL TAR DALIT MIKHYAMANTRI KARA.
GELI 60 WARSHE DALITANCHI NUSATI MATE KHAUN GAWATUN
TYANCHYAWAR ATYACHAR KELET.MHANUN ATRICITY ACT ANAWA LAGALA.
AJUN 15 WARSHANE MARATHA SAMAJ SATTETUN NAHISA HOUN
DALIT/OBC UTI SATTA GHENAR AHE SAWADHA PRAKASH POL(PATI)
Content of topic is very nice.Everybody should follow sayings of Baba, then only we will survive.
Education in our society is less . Mr. Pol We should come together to work in this field.
M.S. Kate
manojkate@gmail.com
9623392531
आंबेडकरांच्या व्यंगचित्रावरून एवढा वाद झाला तरी तुम्हाला त्याचे काहीच वाटलेले दिसत नाही. हाच प्रसंग होळकर यांच्या बाबतीत घडला असता तर तुम्ही असेच थंडपणे बसून राहिला असतात का? ते नरके, सोनवणी आणि तो येडा सांगलीकर हे देखील मूग गिळून गप्प बसले आहेत. भटांना कोणी शिव्या दिल्या की तुम्हा सर्वांच्या लेखण्या खवळून उठतात. पण इथे आंबेडकरांची विटंबना चालली आहे तरी यांच्या लेखणीवरची माशीही उडत नाही. तुमच्या असल्या वागण्यावरूनच तुमची निष्ठा कोणाशी बांधलेली आहे ते कळून येते.
आंबेडकरांच्या बदनामी मागेही पुण्यातील ब्राह्मण डॉ. सुहास पळशीकर !
एनसीईआरटीच्या अकरावीच्या पुस्तकात डॉ. आंबेडकरांचा अवमान करणारे कार्टून घुसडवून बदनामीचा विकृत आनंद लुटणाराही पुण्यातला ब्राह्मणच निघाला. डॉ. सुहास पळशीकर असे त्याचे नाव. तो पुणे विद्यापीठात विभाग प्रमुख आहे. संतप्त भीमसैनिक शनिवारी त्याच्या केबिनमध्ये घुसले. मोडतोड केली. पण अशाने काहीही होणार नाही. डॉ. पळशीकरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक होऊन, जामीन मिळणार नाही, अशी कलमे लागली पाहिजेत. असे झाले तरच अशा घटनांना पायबंद बसेल. व्यंगचित्रांच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना शिक्षण देण्याचा हा प्रकार जगातील पहिलाच असावा, असे दिसते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, पुण्यातील ब्राह्मण हीच एक विकृती आहे. ब्राह्मणेतरांच्या यच्चयावत सर्व महापुरुषांची बदनामी करण्यात या लोकांना विकृत आनंद मिळतो. छत्रपती शिवराय आणि माँसाहेब जिजाऊंच्या बदनामीचे केंद्र पुण्यात, ब्राह्मण वसाहतींत होते. डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे केंद्रही येथेच आहे. ब्राह्मणेतर महापुरुषांच्या बदनामीसाठी पाठ्यपुस्तकांचा आधार घेण्यापर्यंत या विकृतांची मजल गेली आहे.
डॉ. सुहास पळशीकर एनएसीईआरटीचे सल्लागार होते. त्यांच्या जोडीला होते, डॉ. योगेंद्र यादव. हेच यादव अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. अण्णांचे आणि आरएसएसचे संबंध असल्याचे अलिकडील आंदोलनाने स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे आंबेडकरांच्या बदनामीचे धागेदोरे सर्व बाजूंनी ब्राह्मणांनाच जाऊन भिडतात.
केंद्र सरकारच्या एनसीईआरटी अभ्यासक्रमातील राज्यशास्त्राच्या + इंडियन कॉन्स्टिट्यूशन अॅट वर्क+ या पुस्तकात घटनेच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ५० वर्षापुर्वीचे व्यंगचित्र छापले आहे. त्यावरून शुक्रवारी संसदेत गदोरोळ झाल्यानंतर हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर एनसीईआरटीचे सल्लागाप असलेल्या योगेंद्र यादव आणि डॉ. सुहास पळशीकर यांनी पदाचा राजीनामा दिला.
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख असलेल्या डॉ. सुहास पळशीकर यांच्या कार्यालयावर भीमसैनिकांनी हल्लाबोल केला. या हल्ल्यात पळशीकर यांच्या कार्यालयाचे तोडफोड करण्यात आली. यावेळी पळशीकर कार्यालयात नसल्याने त्यांना कोणतीही इजा पोहचलेली नाही.
व्यंगचित्राच्या मुद्द्यावर भीमसैनिकांनी पळशीकर यांची भेट मागितल्यानंतर त्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले होते. तीन कार्यकत्र्याशी झालेल्या चर्चेनंतरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. आंबेडकरांच्या बदनामीचे षडयंत्र उघडकीस आल्यानंतरही डॉ. पळशीकरांचा टार्गटपणा कमी झालेला नाही. या पुस्तकातील आशय अतिशय चांगला आहे, असे निर्लज्ज उद्गार डॉ. पळशीकर यांनी काढले. महाराष्ट्र टाईम्सने त्यांची प्रतिक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यात डॉ. पळशीकर म्हणतात : + हे पुस्तक २००६ पासून शिकवले जात असून , त्यातील आशय चांगला असल्याची प्रतिक्रिया अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञांनी यापूर्वी दिलेली आहे. आधीच्या पुस्तकांमधील निरस मजकुराऐवजी संवाद साधणारा आणि सचित्र मजकूर या पुस्तकात आहे. गांधीजी , डॉ.आंबेडकर आणि पंडित नेहरू या तत्कालीन प्रसिद्ध व्यक्तींची त्यावेळी काढल्या गेलेल्या अभिजात व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आंबेडकर यांच्यावरील व्यंगचित्र वापरतानाही हाच दृष्टिकोन होता. आंबेडकरांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. घटना तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा तपशील याच पुस्तकात देण्यात आला आहे. आंबेडकरांची भूमिकाही नंतरच्या पुस्तकात देण्यात आली आहे. राज्यशास्त्रातील ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता घेऊनच हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.+
या पुस्तकाला ख्यातनाम तज्ज्ञांची मान्यता होती, असे डॉ. पळशीकर सांगतात. याचाच अर्थ या बदनामीच्या कटात आणखी अनेक जण सहभागी आहेत. हे इतर लोक कोण आहेत, याच शोध घेण्यासाठी डॉ. पळशीकरांची चौकशी होणे आवश्यक आहे. या कथित तज्ज्ञांनाही अटक व्हायला हवी.
अलिकडे काही दलित विद्वानांना ब्राह्मणांचा भारीच पुळका आलेला आहे. दलितांवरील भूतकाळातील अन्यायाला ब्राह्मणांना जबाबदार धरण्यात येऊ नये, असे या लोकांचे म्हणणे आहे. कार्टून प्रकरणाने अशा विद्वानांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच घातले आहे.
स्वतःला पुरोगामी सांगणारेच कसे धोकेबाज असतात हे सांगण्यासाठी डॉ. सुहास पळशीकर हे अत्यंत बोलके उदाहरण आहे हे आता स्पष्टच झाले आहे. वैचारिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारेच त्याचा अर्थ बदलून वैचारिक गोंधळ माजवीत आहेत. वैचारिक स्वातंत्र्याचे वैचारिक स्वयराचारात रुपांतर करू पाहत आहेत. हे समाजाला खूपच घातक आहे हे सांगणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमाची पुस्तके लिहिताना तारतम्य बाळगायला हवे. अन्यथा घात केल्यास प्रतिघात होणार हे वोघानेच आले हे सांगणे न लगे.
प्रियंका राव
Very good last three comments. Keep it up.
चिल्लर कार्टून प्रकरण काढून दलित समाजाची भावना भडकविण्याचा घाणेरडा धंदा कॉंग्रेसचा आहे. प्रश्न कार्टून चा नाही अस्तित्वाचा आहे. आजपर्यंत एकही बहुजन पंतप्रधान होऊ शकला नाही, का ? महाराष्ट्रात मुख्यमंत्री मराठा असल्यानंतर उपमुख्यमंत्री सुद्धा मराठा असावा असा आग्रह का ? संगमा सारख्या आदिवासी बहुजन नेत्याला राष्ट्रपती पदासाठी पाठींबा न देता शरद पवार कॉन्ग्ग्रेस च्या मुखर्जी या बामणाच्या पाठीशी उभे राहतात हे सर्व मागास लोकांच्या नजरेसमोर आहे. बहुजन मेला तरी चालेल पण अभिजन जगाला पाहिजे हे षड्यंत्र आहे. बहुजनांच्या भावनांची कदर असती तर छगन भुजबळ उप मुख्यमंत्री राहिले असते, पण मराठ्यांना बहुजनांच्या हाती सत्ता असलेली सहन होत नाही. ह्यांना मुसलमान चालतात पण दलित नको. शिवस्मारकासाठी करोडो खर्च्णारे इंदू मिल साठी आम्हाला भिक मागायला लावतात. अजून यांची मस्ती सरली नाही म्हणून उदयन भोसले सारखा एखादा फडतूस आमदार / खासदार स्वतःला छत्रपती म्हणून घेतो. एक चव्हाण गेला ( ashok ) तर दुसरा आणला (प्रीठीराज ), ह्यांना कोणी दलित - ओबीसी नेता दिसला नाही काय ? मुसलमानांना आता ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार म्हणे , आणि वेगळा मराठा आरक्षण देणार, म्हणजे आमचा कोटा मुसलमानांना आणि मराठ्यांचा कोटा मराठ्यांना, सरकार आहे कि गम्मत आहे ?
जे हरी नरके एके काळी "होय, सुहास पळशीकर हा आरएसएसचा एजंट आहे" असे मत शंभर फूट ऐकू जाईल अशा आवाजात अत्यंत सौम्यपणे मांडत त्याच नरके यांना आता पळशीकर हे पुरोगामी ब्राह्मण असल्याचा साक्षात्कार झाला आहे. लोकशाहीत मतपरिवर्तनाचा अधिकार असणे हे आवश्यकच आहे परंतु नरके यांच्यासारख्या थोर अभ्यासू व्यक्तिमत्वाचे वैचारिक परिवर्तन होणे ही काही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नव्हे. या वैचारिक परिवर्तनामागील मूलगामी कारणांचा शोध घेणे हे नितांत गरजेचे आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांना विचारवंत कसे बनावे आणि योग्य वेळी स्वत:चे आणि इतरांचे वैचारिक परिवर्तन कसे घडवून आणावे याबाबत उत्तम मार्गदर्शन मिळू शकेल.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो!!!
बाबासाहेब आंबेडकर हे खरे देशभक्त होते. रोजच मानसिक मनस्ताप सहन करून सुद्धा त्यांनी या देशाचे भलेच केले.ते शेवट पर्यंत म्हनत होते, ''मी प्रथम भारतीय आणि अंततःही भारतीयच आहे.''
या देशातील प्रत्येक शोषित ,पिडीत जनतेचे ते उद्धारक होते .SC,ST,OBC,NT या सर्वांना न्याय देण्यासाठी त्यांनी राज्यघटना लिहिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर एकाखादा चांगला लेख छापला की, काही जातीयवादी व्यक्तीची तडपायाची आग मस्तास पोहचती. व ते भालतेसहते काही कॉमेंट लिहीतात. परंतु माझे म्हणणे हे आहे की, डॉ.आंबेडकर हे बापाचा बाप आहे. सुर्याला कोणी काही म्हटले तरी सुर्य लखाखनारच. मग कुठल्याही लुग्यासुगांनी काही कॉमेंट लिहो.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ