शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग १

तुकोजीराव होळकर (III)
आपल्या समाजात अनेक महामानवांनी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामध्ये विचारवंत, लेखक ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सत्ता हातात असणारे राजे, महाराजे, संस्थानिक सुद्धा आहेत. यामध्येच इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. परंतु तुकोजीरावांचे सामाजिक काम समाजासमोर फारसे मांडले गेले नाही. आणि जर कुणी तुकोजीरावांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतलाच तर समाजात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण होवू नये म्हणून प्रस्थापित लेखणीबहाद्दार आणि सनातनी लोकांनी तुकोजीरावांची एवढी बदनामी केली की त्यापुढे त्यांचे सामाजिक कार्य झाकोळून जाईल. त्यामुळे तुकोजीरावांचे सामाजिक कार्य समाजासमोर मांडण्याचा आणि त्यांच्यावरील आरोपांचे खरे स्वरूप दाखवण्याचा हा लेखनप्रपंच.

श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांचा जन्म २६ नोव्हेंबर १८९० रोजी झाला. त्यांचे शिक्षण इंदूरच्या डेली कॉलेज, सिटी कॉलेज आणि मेयो कॉलेज (अजमेर) इथे झाले. १९०३ साली वयाच्या १३ व्या वर्षी तुकोजीरावांकडे इंदूर संस्थानची जबाबदारी आली. १९०५ साली डेली कॉलेजला ११८ एकर जमीन दान केली. कॉलेजच्या मुख्य इमारत आणि इतर सभागृहांचे बांधकाम करून दिले. एप्रिल १९१० मध्ये तुकोजीरावानी युरोपचा दौरा केला. १९११ साली सम्राट पंचम जॉर्ज आणि साम्राद्नी विक्टोरिया यांच्या राज्यारोहण प्रसंगी तुकोजीराव उपस्थित होते. १९१४ साली तुकोजीरावांनी इंदूर मध्ये क्षयरोग्यांसाठी दवाखाने चालू केले. १० एप्रिल १९१४ रोजी हुकुमचंद मिलची स्थापना केली. ७ नोव्हें. १९१४ रोजी कृषी फार्मची निर्मिती केली. १९१६ साली प्रिन्स यशवंतराव होळकर ब्रास कारखाना, मुद्रणालय, थर्मल कारखाना, रेशीम उद्योग ई. उद्योगांची इंदूर संस्थानात स्थापना केली. १९१८ साली इंदूरमध्ये इन्फ्लूएन्झाची साथ आली होती. तेव्हा तुकोजीरावांनी सेवा समित्या व स्वयंसेवकांचे गट निर्माण केले. आजारी लोकांना सर्व प्रकारची सहाय्यता केली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहकारी सोसायट्यांची स्थापना केली. इंदूर, कन्नोद, सनावद, पेटलवाबाद, महेश्वर येथे बँकांची स्थापना केली. शिक्षणप्रसारासाठी इंदूरमध्ये संस्कृत महाविद्यालय, महिला विद्यालय, चंद्रावती हायस्कूल आणि अहिल्याश्रमची स्थापना केली. जनरल लायब्ररी या वाचनालयाची स्थापना केली. गोरगरीब समाजातील मुले शिकावी म्हणून ‘मल्हार आश्रमा’ची स्थापना केली. तुकोजीरावांनी हुशार व योग्य विद्यार्थ्यास स्कॉलरशिप देवून परदेशात शिक्षणासाठी पाठविले. १९२५ते २८ या काळात इंदूर मधील सर्व गावे, नगरे यात शाळांची स्थापना केली.

बडोदानरेश सयाजीराव गायकवाड (डावीकडे) आणि तुकोजीराव
इंदूर संस्थानात बालविवाह बंदी, विधवा विवाह व civil marriage act पास केला. लेजीस्लेटीव कौन्सिलची स्थापना करून त्यात लोकनियुक्त प्रतिनिधी राहतील अशी तरतूद केली. त्यामुळे इंदूर संस्थानाने लोकशाहीकडे वाटचाल चालू केली. साहित्य उन्नती व विकासासाठी कवी, लेखक, कलाकार यांना मदत केली. त्यांना आश्रय दिला. महाराष्ट्रातील पहिले शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांना शिवचरित्र लिहून प्रकाशन करण्याकामी २४ हजार रुपयांचे कर्ज झाले. तुकोजीरावांना ही बातमी कळताच त्यांनी केळूसकर गुरुजींना बोलावून घेवून त्यांचे कौतूक केले. केळूसकर यांचे २४ हजार रुपयांचे कर्ज तुकोजीरावानी भरले. त्याचप्रमाणे त्यांच्या मराठी शिवचरित्राचे इंग्रजीत भाषांतर करून त्याच्या पाच हजार प्रति जगभरातील ग्रंथालयांना मोफत वाटल्या. खुद्द केळूसकर गुरुजींनी त्यांच्या पुस्तकात ही माहिती नमूद केली आहे. तुकोजीरावांनी इंदूरमध्ये हिंदी आणि मराठी साहित्य संमेलने आयोजित केली. त्यांच्या कारकीर्दीत इंदूर संस्थानची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक भरभराट झाली हे निखळ सत्य आहे. 

तुकोजीरावांनी त्या काळी आर्थिक मदत केलेल्या व्यक्ती आणि संस्थांची नवे पाहिली तर आपणास त्यांच्या सामाजिक कार्याची प्रचीती येईल.

बनारस हिंदू विश्वविद्यालय – पाच लाख रुपये, डेली कॉलेज, इंदूर – चार लाख पन्नास हजार रुपये, छत्रपती शिवाजी स्मारक, पुणे – पाच लाख रुपये, शिवाजी मेमोरिअल सोसायटी – वीस हजार रुपये, शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळूसकर – चोवीस हजार रुपये, अलीगढ कॉलेज – पन्नास हजार रुपये, डिप्रेस्ड क्लास असोसिएशन – वीस हजार रुपये, अस्पृश्योद्धार समिती – दहा हजार रुपये, किंग एडवर्ड हॉस्पिटल, इंदूर – दहा हजार पाचशे रुपये, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, दिल्ली – साठ हजार रुपये, सेवा सदन, पुणे – दहा हजार रुपये, गोखले मेमोरिअल – पाच हजार रुपये, सर फिरोजशहा मेहता मेमोरिअल – चार हजार रुपये, फर्ग्युसन कॉलेज, पुणे – वीस हजार रुपये, दादाभाई नौरोजी स्मारक – तीन हजार रुपये, महाराष्ट्र साहित्य संमेलन- एक हजार रुपये, पुणे व्यायामशाळा – तीन हजार रुपये, इंद्रप्रस्थ हिंदू कन्या पाठशाला – दोन हजार रुपये, हिंदी साहित्य संमेलन – दहा हजार रुपये, आयुर्वेदिक कॉलेजम दिल्ली – दहा हजार रुपये, League of maternity – वीस हजार रुपये, कलकत्ता विश्वविद्यालय – तीन हजार रुपये, हिंदू अनाथाश्रम – दोन हजार रुपये, अलीगढ विद्यापीठ – पंधरा हजार रुपये, हाउस बिल्डिंग बोर्ड – पन्नास हजार रुपये, काच कारखाना - वीस हजार रुपये, कागद कारखाना – नऊ हजार रुपये. 

याशिवाय अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संस्थांना तुकोजीरावांनी खूप आर्थिक मदत करून त्यांच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. 

                                          
                                          संदर्भ-
·                                                                                                                                                                                                                                                             होळकरांचा इतिहास- मधुसूदनराव होळकर.
·                                                                                                                                                                                                                                                             विश्वाचा यशवंत नायक- १३ ऑगस्ट १९९५
·                                                                                                                                                                                                                                                             माझी जीवनगाथा- प्रबोधनकार ठाकरे
·                                                                                                                                                                                                                  

4 टिप्पणी(ण्या):

SACHIN SHENDGE म्हणाले...

महाराजा तुकोजीराव होळकर यांचे कार्य समाजासमोर आणून दिल्या बद्दल धन्यवाद,
त्यांनी त्या काळी केलेल्या अनेक सामिजिक कार्यांना मनुवाद्यांनी जगासमोर येऊ दिले नाही, आणि साहजिक आहे कि मनुवाद्याकडून हि अपेक्षा हि करणे चुकीचे आहे.
पण तथाकथित बहुजनवादयानीदेखील त्यांचे कार्य समाजासमोर कष्ट उचलले नाही याचे मला आश्चर्य वाटते...

अनामित म्हणाले...

प्रथम, महाराजा तुकोजीराव होळकर यांचे कार्य समाजासमोर आणून दिल्या बद्दल मित्र प्रकाश पोळ आपले धन्यवाद !

-------------------------------

@ SACHIN SHENDGE
....तथाकथित बहुजनवांदयानीदेखील त्यांचे कार्य समाजासमोर ठेवण्याचे कष्ट उचलले नाही याचे मला आश्चर्य वाटते...

>>>>>>>>>

...याचेच दुःख फार आहे मित्रा... व आपल्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे.

----------------------------------------

केवळ महाराजा तुकोजीराव होळकर'च नव्हे तर बहुजन समाजातील उपेक्षित जाती - जमाती'चे तसेच त्या जाती - जमाती'च्या महापुरुषांची 'दखल' तथाकथित बहुजनवादयांनि घेतलेले दिसत नाही... ( तोंडी लावन्यासारखे केवळ नाव घेणे, म्हणजे दखल नव्हे...)

बहुजन समाजातीलच काही जाती जमाती बरोबर त्यांचे महापुरुष देखिल उपेक्षित ठेवले गेल्याचे आताशा स्पष्ट होत आहे...

म्हणून,

बहुजन म्हणजे नक्की कोण ?

का सर्व सोयिने...

विचार करावा...

अनामित म्हणाले...

"आमचे मालक व्हावे, अशी तुमची इच्छा असेल,
पण आम्ही तुमचे गुलाम का व्हावे"
- युसिडायडीस

Rohit Pandhare म्हणाले...

महाराजा तुकोजीराव होळकर -III - बहुजन्नाचा वीर राजा
(जन्म : 26 नवम्बर 1890, देहान्त 21 मई 1978 )

छत्रपति शिवाजी महाराजांचे चरित्र तत्कालीन रु २४,०००/- खर्च करूंन जगातील सर्व भाषांमधे प्रकाशित करून विश्वभर मोफत पोहोचाविले.
राजश्री शाहू यांचे निधन १९२२ साली झाले अणि रायातेने अपाला पुरोगामी राजा गमवला यातून जातीय वाद पुन्हा उफलला यावर कायमस्वरूपी उपाय महाराजा तुकोजीराव होळकर यांनी काढला अणि आपला मुलगा यशवतराव होलकर-II याचा विवाह शाहूराजांच्या चुलत बहिनिशी १९२४ रोजी करवून घेतला .असाच प्रकारे अनकहीं १०० अंतरजातीय विवाह करवून दिले अणि एक पुरोगामी चलवल सुरु झाली

या सर्व गोस्टिचा परिणाम गुलामगिरीत रहनारा भारतीय समाज छात्रपतिंच्या शौर्य आणी महाराजा होळकर यांचा उघडपणे जाहिर पाठिंबा यामुल़े स्पृतित होऊन इंग्रजांच्या विरोधात बंड करून पेटून उठला . जनतेचा वधता रोष हा महाराजा होळकर यांच्या जाहिर पाठिंबा यामुल़े आहे म्हणून त्यांना राजगादी सोडावी नाहीतर शिव स्मृति जगावान्याचे कार्य बंद करावे या साठी इंग्रज हुकूमत दबाव अणु लागली..
मोडेन पण वाकणार नहीं . महापराक्रमी आद्या क्रांतिनायक महाराजा यशवंतराजे होळकर यानचा सार्थ वारस असलेले महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांनी स्वतःहा हून राजगादी १९२६ मधे सोडली ..

तरीही कार्य महाराजा होळकर यांनी व्यापक स्वरूपात करने सुरूच ठेवले महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांनी स्वतःहाच्या पैशातून तत्कालीन रु ५,००,०००/- जगातील पहिला शिवाजी महाराजांचा पुतला पुणे (शिवाजीनगर) येथे १९३२ साली बसवला ..

रायगडावारिल शिवाजी महाराजांचा सिंव्हासन रुढ़ पुतला अणि शिवाजी महाराजांच्या प्रिय वाघ्याची स्मृति तत्कालीन रु ५,०००/- खर्च करून १९३६ साली उभारली

महाराजा तुकोजीराव होळकर (III) यांच्या चरनी माझे नमन.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes