अखेर रायगडवरील
बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला.
गेले अनेक दिवस वाघ्या कुत्र्याच्या प्रश्नावरून उलट-सुलट चर्चा चालू होती. दादोजी
कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत रायगडवरील
वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी जोरदार आंदोलन उभे केले होते. वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या एका महाराणीच्या समाधीवर
ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक उभा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या
महाराणी यांची बदनामी करणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा रायगडवरून काढून टाकावा अशी
संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. (संभाजी ब्रिगेडच्या सविस्तर भूमिकेसाठीक्लिक करा.) परंतु रायगडवरील शिवस्मारकाला इंदूरचे महाराजा
तुकोजीराव होळकर तृतीय यांनी आर्थिक मदत केली असल्याने धनगर समाजाचा वाघ्याचा
पुतळा काढण्याला विरोध होता. महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या देणगीतून
वाघ्याचा पुतळा रायगडावर उभा करण्यात आला. (त्यासाठी होळकरांच्या
कुत्र्याची दंतकथाही निर्माण करण्यात आली.)
संभाजी ब्रिगेडच्या
या मागणीविरुद्ध धनगर समाजाच्या संघटनाही आक्रमक झाल्या होत्या. चर्चा,
वाद-प्रतिवाद असे प्रकार सातत्याने चालू होते. त्यामुळे दोन समाजातील ऐक्य, सलोखा
धोक्यात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी (२०११) ब्रिगेडने
वाघ्याचा पुतळा काढणार अशी घोषणा केली. त्याला महादेव जानकर आणि धनगर समाजाच्या
संघटनांनी विरोध केल्याने हे प्रकरण जरा लांबणीवर पडले. त्यानंतर एका वर्षांनी (एप्रिल-मे
२०१२) संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेवून ६ जून (शिवराज्याभिषेक) पूर्वी
सरकारने वाघ्याचा पुतळा हटवावा; अन्यथा आम्ही तो हटवू अशी भूमिका घेतली.
त्यावेळीही जानकर व धनगर समाजाने ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध केला. वाघ्याच्या
पुतळ्याच्या संरक्षणासाठी जानकर व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाधिकारी व संबंधित
प्रशासनाला निवेदने दिली. याप्रकरणी जेष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, प्रा. संजय
सोनवणी आणि प्रा. श्रावण देवरे या अभ्यासकांनी वेळोवेळी ब्रिगेडच्या या भूमिकेस
विरोध केला. कुत्रा हा अपमानास्पद प्राणी आहे ही
भूमिका धनगर समाज व त्यांच्या समर्थकांना मान्य नव्हती. (वाघ्याप्रश्नी धनगरसमाजाची भूमिका सविस्तर वाचा.) कुत्र्याऐवजी घोड्याचा पुतळा असता तर काढला असता
का? असा थेट सवाल प्रा. श्रावण देवरे यांनी विचारला.
प्रश्न
पुतळ्याचा नाही, तो काढण्याच्या पद्धतीचा आहे
फुले-शाहू-आंबेडकरवादी
चळवळ जर यशस्वी करायची असेल तर बहुजन समाजातील सर्व जाती एकत्र यायला हव्यात.
बहुजन समाजात वाद निर्माण होतील असे प्रश्न अतिशय संयमाने आणि कौशल्याने हाताळले
पाहिजेत. सर्व जाती-जमातींना विश्वासात घेवून वाटचाल केली पाहिजे. परंतु ब्रिगेडने
वाघ्याच्या प्रश्नी घेतलेली भूमिका ही मराठा आणि धनगर समाजात वाद निर्माण करणारी
होती. प्रश्न केवळ वाघ्याचा नाही. आततायी भूमिका घेवून,
कुणालाही विश्वासात न घेता आपलेच घोडे पुढे दामटायचे, बळाच्या जोरावर इतरांना
नामोहरम करण्याचा प्रयत्न करायचा या धोरणांमुळे दोन समाजात कटुता निर्माण होण्याची
शक्यता आहे. (फेसबुकवर याचा प्रत्यय आलाच आहे.) ही कटुता निर्माण होवू न
देण्याची जबाबदारी पुरोगामी कार्यकर्त्यांवर राहील. वाघ्याप्रश्नी इतिहासकारांची
समिती स्थापन करण्याची मागणी सर्वानी करावयास हवी होती. समिती
स्थापन केल्यानंतर अभ्यास, चर्चा, वाद-प्रतिवाद होवून जे सत्य समोर येईल ते
सर्वानी स्वीकारण्यास हरकत नव्हती. परंतु अशा लोकशाही मार्गाने जाण्याऐवजी
ब्रिगेडने ठोकशाही भूमिका घेतली हे बहुजन समाजाचे दुर्दैव. दादोजी कोंडदेव प्रकरणी
समिती नेमून समितीचा निर्णय आल्यानंतर कोंडदेव यांचा पुतळा काढण्यात आला. मग
वाघ्याप्रश्नी इतकी गडबड का केली हे एक कोडे आहे.
वाघ्याप्रकरणी
मराठा-धनगर वादाचे कारण नरके-सोनवणी ?
वाघ्याच्या
मुद्द्यावरून मराठा आणि धनगर समाजामध्ये वाद लावण्याचे काम नरके आणि सोनवणी करत
आहेत असा आरोप ब्रिगेडकडून सातत्याने होत असतो. परंतु संभाजी ब्रिगेड आणि नरके-सोनवणी
यांचा वाद दादोजी कोंडदेव पुतळा काढल्यानंतरचा आहे. ब्रिगेडचा
छुपा मराठा अजेंडा हे या वादामागे मुख्य कारण होते. परंतु रायगडवरील धनगर
समाजाचा पूर्वीपासून वाघ्याचा पुतळा हटवण्याला विरोध होता. त्यामुळे नरके-सोनवणी
यांनी हा वाद भडकावला हा आरोप निराधार आहे. नरके-सोनवणी
हे मराठेतर म्हणून त्यांच्यावर असा आरोप होत असेल. मग मराठा समाजातील काही
पुरोगामी विचारवंत (त्यांची नावे उघड करून त्यांना वादात गुंतवण्याची माझी इच्छा
नाही.) ब्रिगेडच्या या भूमिकेला विरोध करत होते त्यांच्याबाबत असेच म्हणता येईल
काय ?
संभाजी ब्रिगेडवरील
आक्षेप
संभाजी ब्रिगेडच्या
काही भूमिका आणि धोरणांमुळे मराठेतर बहुजन समाज आणि ब्रिगेडमध्ये दुरावा निर्माण
झाला आहे. दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल ब्रिगेडने कधीच ठोस भूमिका घेतली
नाही. उलट Atrocity कायद्याचा गैरवापर होतोय म्हणून ब्रिगेडने
वेळोवेळी आवाज उठवला. मराठा महासंघ, छावा, शिवसंग्राम या त्यांच्या सहकारी
संघटनांनी सवर्ण-दलित वादात नेहमी सवर्णांची बाजू घेवून दलितांवर आणखी अन्याय
केला. Atrocity च्या कायद्यात सुधारणा व्हावी हा
ब्रिगेडचा मुद्दा वरवर पाहता संयुक्तिक वाटत असला तरी तो योग्य नाही. गावोगाव दलित
समाजावर सवर्णांकडून होणार्या अत्याचाराकडे ब्रिगेडने दुर्लक्ष केले.
मराठा आरक्षणाची
मागणी ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटनांनी लावून धरली आहे. मराठा समाजाला
शैक्षणिक प्रतिनिधित्व पुरेसे नाही हे एकवेळ खरे मानले तरी चालेल, परंतु त्यांना
राजकीय प्रतिनिधित्व मात्र प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना शैक्षणिक
आरक्षण देण्यास हरकत नसावी; मात्र राजकीय आरक्षण मराठा समाजाला देणे योग्य होणार
नाही. त्यांच्या आरक्षण मागणीतही एकवाक्यता नसल्याने त्यांच्या एकूण भूमिकेवर
प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काहीजण म्हणतात मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या, काही
म्हणतात मूळ आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना लोकसंखेच्या प्रमाणात (हे प्रमाण
२५ % पासून ४० % पर्यंत असते,) आरक्षण द्या. काहीजण म्हणतात हे आरक्षणच बंद करून
टाका. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी मागणी एकीकडे
आणि दुसरीकडे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्याच्या खटपटी. पण यामुळे मूळच्या
ओबीसींवर अन्याय होतोय याकडे ब्रिगेडचे लक्ष नाही. मराठा समाजातील अनेकांनी
निवडणुकीसाठी मराठा-कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळविले आणि सत्ता उपभोगली. म्हणजे
ओपनमधून मराठे आणि ओबीसी कोट्यामधूनही मराठे अशी परिस्थिती अनेक ठिकाणी होती.
जनजागृती करून ओबीसींच्या वाट्याचा घास न हिसकावण्यासाठी ब्रिगेडने प्रयत्न करायला
हवा होता. परंतु तसे झाले नाही.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आणि दलित समाज यांच्यावर सातत्याने जहरी टीका करणाऱ्या डॉ. शालिनीताई पाटील यांना मराठा सेवा संघाचा ‘मराठा भूषण’
पुरस्कार दिला गेला तेव्हा सर्वांचा आश्चर्य वाटले. परंतु हा पुरस्कार
ताईना ताराराणी यांच्यावरील संशोधनासाठी दिला असल्याचे ब्रिगेडकडून सांगण्यात
येते. जेव्हा ताई आरक्षण, डॉ. बाबासाहेब आणि दलित समाज यांच्याविरुद्ध
महाराष्ट्रभर द्वेष निर्माण करत फिरत होत्या, तेव्हा ब्रिगेडने त्यांना विरोध केला
नाही. याला ब्रिगेडचे काही लोक अपवाद आहेत. पण
ब्रिगेडची आक्रमकता त्यावेळी कुठेही दिसली नाही. याला एक महत्वाचे कारण सांगितले
जाते ते ताई मराठा म्हणजे बहुजन आहेत. तेव्हा त्यांना विरोध करून आपले मुख्य लक्ष
ब्राम्हण आहेत, त्याकडे दुर्लक्ष करायला नको. ताई आणि बहुजन समाजात भांडणे लावून
चळवळ संपवण्याचा ब्राम्हणांचा प्रयत्न आहे अशी थिअरी ब्रिगेडकडून मांडण्यात आली. उलट
ब्रिगेडच्या सहकारी संघटनांनी मात्र शालीनिताईना व्यासपीठ निर्माण करून दिले. म्हणजे चुकीच्या
गोष्टीना उघड पाठींबा
नाही पण विरोधही नाही अशी ब्रिगेडची अवस्था झाली होती.
दादोजी कोंडदेव
वादात ब्रिगेडचे एक सहकारी मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत
पवार यांनी दादोजी कोंडदेव मराठा होते असे म्हणून ब्रिगेडलाच धक्का दिला.
तेव्हा त्यांच्या विरोधात (अर्थातच सभ्य भाषेत) मी फेसबुकवर स्टेटस अपडेट केले
होते. वीस-पंचवीस मिनिटात पंधरा-वीस प्रतिक्रिया आल्या. त्या बहुतांशी शशिकांत पवार
यांच्या विरोधात होत्या. हे पाहून ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांनी फोन करून, फेसबुकवर
मेसेज करून पवार यांचेविरोधातील स्टेटस डिलीट करावयास लावले. कारण का तर पवार हे
बहुजन आहेत. त्यांना विरोध करणे आपले काम नाही. आपले लक्ष ब्राम्हण असले पाहिजेत. मग जर शालिनीताई आणि पवार यांना बहुजन (की मराठा ?) म्हणून
सॉफ्ट कॉर्नर मिळत असेल तर नरके-सोनवणी-देवरे यांनाच सातत्याने का टार्गेट केले
जाते ?
ब्रिगेडच्या
कार्यकर्त्यांनी नेहमी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हिताची भूमिका घेतली आहे.
ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. आमची हरकत नाही, कुणाचीही
नसावी. पण त्यामुळे राष्ट्रवादीचा मराठा अजेंडा राबवण्याच्या नादात मराठेतर
समाजाला दुखावणाऱ्या भूमिका ब्रिगेड वारंवार राबविते. राष्ट्रवादी
पक्ष आणि त्यांचे नेते आदरणीय शरद पवार, अजितदादा यांच्याविरोधात लिहायचे, बोलायचे
नाही. लिहिले की तुम्ही भटांचे दलाल. परंतु त्याच वेळी भुजबळ हे राष्ट्रवादीचे असूनही
त्यांना मात्र झोडपून काढायचे. हे सर्व इतर कोणत्याही मराठा संघटनांकडून
झाले असते तरी आमची हरकत नव्हती. कारण इतर संघटना फुले-शाहू-आंबेडकरवादाचा
प्रत्यक्ष पुरस्कार करत नाहीत. परंतु फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर आपली
संघटना उभी आहे असे म्हणणाऱ्या ब्रिगेडने अशी दुटप्पी भूमिका घ्यावी याचेच आश्चर्य
वाटते. ब्रिगेडसोबत असणारे लोक प्रामाणिक आणि
पुरोगामी पण ब्रिगेडशी थोडे मतभेद झाले की ते आरएसएस आणि भटांचे दलाल ठरतात. (हा
लेख वाचल्यानंतर मलाही आरएसएसचा एजंट ठरवतील यात शंका नाही.) अनेक मराठेतर
विचारवंताना ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः खालच्या पातळीवर जावून शिवीगाळ
केली आहे. हे फुले-शाहू-आंबेडकरवादाचे लक्षण निश्चितच नाही.
ब्रिगेडचा
हिंदुत्ववादी पक्ष-संघटना यांना खूप विरोध आहे. त्यामुळे पुरोगामी असणार्यांपैकी
कुणी हिंदुत्ववादाच्या छत्राखाली गेला तर ब्रिगेडचा तिळपापड होतो. आठवले सेनेसोबत
गेले तर त्यांनी आंबेडकरांच्या विचारांना काळीमा फसल्याची प्रतिक्रिया, जानकर
यांनी मुंडेना पाठींबा दिला तर ते भटांचे दलाल. मग मराठा
सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी आदरणीय रेखाताई
खेडेकर या भाजपच्या आमदार कशा या प्रश्नाचे उत्तर ब्रिगेडकडून खुबीने टाळले जाते.
त्यांना स्त्री असूनही खेडेकर साहेबांनी पक्ष निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे असे
सांगण्यात येते. मान्य आहे. मग बाकीच्या लोकांना असे स्वातंत्र्य नाही का ?
ज्या
ब्रिगेडला दादोजी कोंडदेव प्रकरणी अठरा-पगड जातींच्या सर्व संघटनांनी मदत केली,
त्याच ब्रिगेडने इतर समाजांना विश्वासात न घेता वाघ्याला हटवण्याची कृती केली हा
माझा आक्षेप आहे. वाघ्याचा पुतळा आज
काढण्याऐवजी लोकशाही मार्गाने वर्षभराने जरी काढला असता तरी काय तोटा झाला नसता.
परंतु बहुजन समाजातील ऐक्य धोक्यात न येण्याचा फायदा मात्र झाला असता. आमचे ऐकले तर लोकशाही नाहीतर ठोकशाही या मार्गाने चळवळ पुढे
जाणार नाही. ती पुढे न्यायची की मागे याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. आपल्यावर
होणाऱ्या टीका, आरोप गांभीर्याने घेवून त्याचा सांगोपांग विचार करायचा की आरोप,
सुचना करणाऱ्यांची मुस्कटदाबी करायची हे ब्रिगेडने ठरविले पाहिजे. समाजातील
ब्राम्हणांचे वर्चस्व जावून त्याच जागी मराठा येणार असतील तर तो फुले-शाहू-आंबेडकर
यांच्या विचारांचा पराभव आहे.
वाघ्याचा
पुतळा तर काढला. अजून काही दिवस याचे पडसाद समाजात उमटत राहतील. प्रशासन तो पुतळा
परत रायगडवर उभा करेल किंवा नाही. चार दिवस चर्चा होवून हा प्रश्न लोक विसरूनही
जातील. परंतु अशा प्रकारच्या आततायी कृती बहुजन समाजाला जोडणार की तोडणार हे येणारा काळच ठरवेल.
11 टिप्पणी(ण्या):
ब्रिगेडचा हिंसाचार आणि आततायीपणा अमान्यच।।।
पण ब्रिगेडविरोधी होणारा हिंसाचारही फुले शाहू आंबेडकरवादास घातकच।।।
एकनाथ
विचारांचा जागर...!
वाह रे श्वानप्रेम.
वाघ्या कुत्रा वास्तव आणि अवास्तव...
इतिहासात काय आहे वाघ्या ?
वाघ्या खरंच कोठून आला ?
वाघ्याचा एव्हडा पुळका का ?
संपूर्ण माहिती
वाचा www.sndiamond.blogspot.com
जास्तीत जास्त share करा...
ज्याची जळते त्यालाच कळते तुम्हाला काय घेणे देणे शिवाजी महाराजांचे, जेम्स लेन च्या पुस्तकाच्या वेळी तुम्ही काय केले हेही सर्वांनी पहिले आहे , पोळ सरकार तुमच्याकडून कोणत्याही सामाजिक संघटनेला बदनाम करणे अपेक्षित नाही, तसे करायचे ठरवले असेलच तर तुम्हाला बहुजन समाजच धडा शिकवेल हे विसरू नका , बहुजन समाज हा फारच विचारिक जहाला आहे हे विसरू नका, चळवळीतील लोकांना डाव्चाण्याचा प्रयत्न करू नका .
Samsta Comment karnare mitraho, prakashrawanche kay chukale? yogyach tar bolat aahet! Sambhaji brigade mhana ki itr kontihi hi bahujan snghatana mhana, tila tyancha wirodh thodich aahe, pan asha ghatananna apan kasha prtikriya deto ge mhatawache. Bahujantali dari wadhy naye mhanun kelela ha lekh prapancha ullekhaniya aahe. Paul sarkhyanchya pathishi ubhe rahane apale kaam aahe. Ani te nemaka kay sangaycha prayatn karat aahet he mahit karun hi ghene kam aahe. Dhanyawad paul saheb. Chan.
धन्यवाद पिंपळे साहेब. या लेखाचा उद्देश संभाजी ब्रिगेडची बदनामी करणे नाही हे लेख संपूर्ण वाचल्यानंतर लक्षात येईल. मी स्वतः संभाजी ब्रिगेडबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती मला माहित आहे. त्यांच्या कार्याने विचाराने प्रभावित होवून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. प्रश्न केवळ ब्रिगेडचा नाही. कोणतीही बहुजनवादी, पुरोगामी संघटना या माझ्यासाठी आदरणीय आहेत. वेळोवेळी अशा सर्व संघटनांमध्ये मी काम करीत आलो आहे. परंतु ब्रिगेड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे ते स्वतःविरुद्ध एक अवाक्षरही खपवून घेवू शकत नाहीत. तुकोबा म्हणतात, “निंदकाचे घर असावे शेजारी”. हे निंदक दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे दुसऱ्याची बदनामी करण्यासाठी त्याची निंदा करणे. ही निंदा द्वेषभावनेतून केलेली असते. आणि दुसरा प्रकार म्हणजे समोरच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या चुका (अर्थातच आपल्या दृष्टीने) दाखवणे. याचा हेतू असा असतो की समोरची व्यक्ती, संघटना किंवा जो कुणी आहे, त्याने गांभीर्याने विचार करावा. पण विचार करण्यापेक्षा निरर्थक बडबड करणे सहज शक्य असते. ब्रिगेडने विचार करावा हाच माझा हेतू आहे.
वरील लेखात मी कुठेही वाघ्या कुत्रा धनगरांची अस्मिता आहे असे लिहिले नाही. किंबहुना हा लेख धनगर समाजाची बाजू घेवूनही लिहिलेला नाही. बहुजन समाजातील दोन घटकांमध्ये वाद निर्माण होण्यासारखी परिस्थितीती किती संयमाने हाताळायला पाहिजे हेच लोकांना काळात नाही.
वाघ्याला हटवण्याची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादाला कशी घातक आहे असा सवाल अनेकांना पडला आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीचे ध्येय काय आहे ? बहुजन समाजात एकी घडवून आणणे, त्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी प्रयत्न करणे हेच ना ? मग वाघ्याच्या मुद्द्यावरून बहुजन समाजात भांडणे लागणार असतील तर तो मुद्दा चळवळीला घातक नाही का ? वाघ्याचा पुतळा असा आततायी कृती करून आज काढण्यापेक्षा लोकशाही मार्गाने काढणे उचित झाले नसते का ? शासनाने समिती नेमून याप्रकरणी अभ्यास, पुरावे देवून सर्वसंमतीने वाघ्याचा पुतळा काढला असता तर एवढे वादंग माजले नसते.
संभाजी ब्रिगेडबद्दल मी नोंदवलेले आक्षेप यापूर्वी अनेकांनी मांडले आहेत. तेव्हाही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. आणि आत्ताही देत नाहीत. हे आक्षेप महत्वाचे आहेत त्यामुळे निदान त्यांची समाधानकारक उत्तरे देता आली पाहिजेत. ती देत तर नाहीत, उलट टाळाटाळ करतात असा माझा अनुभव आहे. रेखाताई खेडेकर भाजपमध्ये असतात, हा आक्षेप आहे. त्यांच्या भाजपमध्ये असण्याला आक्षेप नाही तर रेखाताई भाजपमध्ये असताना ब्रिगेड भाजपविरुद्ध टीका करते आणि इतर लोक भाजपला पाठींबा द्यायला लागले की त्यांच्यावर भटांचा दलाल असा आरोप करण्यात येतो. म्हणजे मुख्य आक्षेप आहे तो ब्रिगेड रेखाताई (म्हणजे ब्रिगेड ची माणसे) आणि इतर यात फरक करतात, त्यांना समान न्याय लावत नाहीत हा. मग यावर विचार नको का करायला.
कोणतीही व्यक्ती किंवा चळवळ सदा काळ योग्य असू शकत नाही. व्यक्ती आहे म्हंटल्यावर ती चुकणारच. संघटनाही व्यक्तीच चालवत असतात. त्यामुळे त्यांच्याही चुका होवू शकतात. मग अशा चुका कुणी लक्षात आणून दिल्या तर विचार करायला पाहिजे. एकतर आपले कसे बरोबर आहे हे तरी पटवून द्यावे किंवा चूक होत असेल तर ती स्वीकारून दुरुस्ती तरी करावी. आणि मला वाटते जी चळवळ होणाऱ्या चुकांपासून बोध घेत पुढे जाईल तीच समाजात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणेल.
1) ''ज्याची जळते त्यालाच कळते तुम्हाला काय घेणे देणे शिवाजी महाराजांचे,'' अशी प्रतिक्रीया देणार्या मराठा मित्रा..... मराठा+पेशवाई च्याच राज्यात शिवराय व शिवसमाधी विस्मृतीत गाडली गेली. ती पहिल्यांदा जगासमोर आणणारे तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले कोण् जातीचे होते?
2)स्वराज्य स्थपणेस व राज्यभिषेकास तमाम मराठा सरदार व ब्राम्हण भटजी yancha विरोध असतांना शिवरायसाठी प्राण अर्पण करणारे मावळे कोण जातीचे होते?
3)स्वराज्यासाठी प्राण देणारे मावळे स्वराज्य स्थापण झाल्यावर अचानक निर्णय प्रक्रीयेतून (सत्ता प्रक्रीयेतून) कोठे गायब झालेत?
3)मराठ्यांचे खोटे शिवप्रेम केव्हा उफाळून आले? अर्थात 1928 नंतर महाराष्ट्राची राजकीय सत्ता दृष्टीपथात आली तेव्हा!!
4) त्यासाठी ब्राम्हणांशी अनेक तडजोडी कराव्या लागल्या , त्या पैकी एक तडजोड म्हणजे तात्यासाहेबांचा 'कुळ्वाडी कुळ्वाडी कुळभुषण' शिवाजी गाडून 'गोब्राम्हण प्रतिपालक' शिवाजी डोक्यावर घेणे.
5) आता जस जसे SC, ST, OBC जागे होत आहेत तस्ा तसे 'कुळ्वाडी कुळ्वाडी कुळभुषण' शिवाजी जागृत होत आहेत. याही शिवाजीला कॅश करण्यासाठी सेव संघी-ब्रीगेडी षडयंत्र.
संभाजी ब्रिगेडने आत्म परीक्षण करावे...भाग १
"अति घाई संकटात नेई " असे एक ब्रीद आपण सर्वांनी रस्त्याच्या कडेला वाचलेच असेल. परंतु अति घाई कशी आणि किती संकटात नेते हे समजून घेण्यासाठी संभाजी ब्रिगेड ने वाघ्या प्रकरणी केलेल्या आंदोलनाकडे पहावे लागेल.मुद्दा बरोबर असताना सुद्धा संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनाचा कसां फज्जा उडाला आणि नवीनच शत्रू ब्रिगेड ने कसा निर्माण केला हे उभ्या महारास्त्राने पहिले आहे. मुळात ब्रिगेड चे हे आंदोलन पूर्वनियोजित नव्हते असे एकंदरीत वाघ्याच्या प्रकरणावरून लक्षात येते. कुणालाही कसलीही कल्पना नसताना अचानक वाघ्या काढण्यात येतो आणि साक्षात ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनाही याची माहिती नसते यावरून हे लक्षात येईल.एकतर ही वेळ पुतळा काढण्याची नव्हती आणि येन केन प्रकारेण काढलाच होता तर तो पुतळा तिथेच लपवून ठेवायला नव्हता पाहिजे.तो उध्वस्त करायला पाहिजे होता. दादोजी प्रकरणात ब्रिगेड ने जर असे आततायी कृत्य केले असते तर ते एखादे वेळी माफ केल्या गेल्या असते. कारण त्यावेळची पुतळा काढण्याची अपरिहार्यता. पण वाघ्या संदर्भात मात्र असे म्हणता येत नाही. दुसरी गोष्ट दादोजी प्रकरणात ब्रिगेडने २००३ ते २०११ अशी सलग ८ वर्ष वाट पहिली.आणि या ८ वर्षाच्या काळात ब्रिगेडने जो प्रचार आणि प्रसार केला त्याला भारताच्या सामाजिक आंदोलनाच्या इतिहासात तोड नाही. या भरभक्कम प्रचारा मुळे दादोजी चे शिल्प अगोदरच जनतेच्या मनातून उध्वस्त झाले होते. फक्त बाकी होते ते दादोजींचा पुतळा काढणे. परंतु वाघ्याच्या संदर्भात जून २०११ ते ओगस्ट २०१२ एवढंच कालावधी ब्रिगेडने घेतला. बर या कालावधीत कुत्रा कसा चुकीचा आहे, त्याला ऐईहासिक पुरावा कसा नाही आणि या कुत्र्यामुळे शिवरायाची कशी बदनामी होते यावर ब्रिगेडने रान उठवायला पाहिजे होते पण आरक्षण की पुतळा या द्विधा मनस्तीतीत ब्रिगेडने एकाही मुद्द्याला न्याय दिला नाही. आरक्षणा बाबतीतही ब्रिगेडने अशीच धरसोड केली. मुळात आरक्षणा बाबतीत सर्व मराठा संघठणाणमधेच एक वाक्यता नव्हती आणि ज्या मराठा समाजासाठी आरक्षनाची मागणी लाऊन धरण्यात आली त्या समाजालाच आरक्षनाची गरज कधी लक्षात आली नाही म्हणा किंवा त्याचे महत्व लक्षात आले नाही. म्हणून यासंदर्भात जेवढा समाज रस्त्यवर यायला पाहिजे होता तो कधी आलाच नाही. आणि हा मुद्दा कधीच कोणत्या संघटनेने समाजाला पटवूनही दिला नाही. बर आता १५ ओगस्ट ही आरक्षणाची डेडलाईन मिळाली असताना ब्रीगेडनेच नको त्यावेळी वाघ्याची घाण करून ठेवली. यामुळे ब्रिगेडची "तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे " अशीच अवस्था झाली. पुतळाही बसला, बदनामीही झाली आणि कार्यकर्त्यान्वर फुकट केसेस पडल्या.
वाघ्या प्रकरणात ब्रिगेडला हरी नरके, संजय सोनवणी यांनी महादेव जाणकर ला हाताशी धरून घरचाच आहेर दिला होता तेव्हा ब्रिगेडने हे प्रकरण सांभाळून हाताळायला हवे होते. जाणकर ची गरज नरकेला का पडली कारण माळी समाज हा नर्केच्या पाठीशी नाही आणि आपला समाज कोणता आणि आपला बाप कोणता याचा त्या सोनवनीला पत्ता नाही.बहुजन वर्गात मोडणारे लोक विरोधात असताना ब्रिगेडने हे आंदोलन थोडे संयमाने करायला पाहिजे होते. पण दादोजी प्रकरणामुळे हम करे सो कायदा अशी घमेंड कदाचित ब्रिगेडला आली आणि या देशात लोकशाही आहे याचा विसर त्यांना पडला असावा. आधीच नरके ब्रिगेडला "फुले-आंबेडकर विरोधी " दाखवण्यासाठी धडपडत होता त्यात वाघ्याचे प्रकरण करून ब्रिगेडने नरके- सोनवनेरूपी माकडाच्या हाती कोलीत देण्याचा प्रकार केला. मुळात नरके आणि सोनवनीच आंबेडकरवादी नाहीत. त्यात महादेव जाणकर आणि धनगर समाजाचे जाती अंताच्या लढाईत काय योगदान आहे हे राज्यात सर्वांना ठाऊक आहे. असे असतानाही या लोकांनी ब्रिगेडला परिवर्तन विरोधी ठरवणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच.वाघ्या प्रकरणानंतर या लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या वाचूनच या लोकांची वैचारिक उंची समजते. संजय सोनवनिचेच पहा वाघ्या काढला असे ऐकताच या घाबरट माणसाने ब्लॉगवर काय लिहावे?(continue...)
संभाजी ब्रिगेडने आत्म परीक्षण करावे...भाग 2
...ही वेळ आपण सर्वांना गुडबाय करण्याची आहे.
मित्रांनो....बहुदा ही वेळ आपण सर्वांना गुडबाय करण्याची आहे. मी गेली दोन वर्ष वाघ्याच्या स्मारकाबाबत लिहिले...तो एवढा काळ तरी सुरक्षीत राहिला. आताच ज्या बातम्या मी पाहिल्या त्यानुसार तो उध्वस्त केला गेला आहे. आता पुढचे टार्गेट मीच असणार याबाबत शंका असण्याचे मला काही एक कारण दिसत नाही. मी भयभीत नाही. मला जीवाची पर्वा नाही. असती तर असले पंगे मी घेतलेच नसते. या देशात कायदे हे सत्ताधारी जातींच्याच हातात होते व आहेत. ते म्न्हनतील ते कायदे. अशा स्थितीत मी आहे तरी कोण? वाघ्या हटवला...पोलीस बंदोबस्त असुन हटवला...मग त्या हटवण्याला सातत्याने विरोध करणारा हा यश्किश्चित सोनवणी कोण? मलाही हे हटवनार याबद्दल मला कसलीही शंका उरलेली नाही. जे एका स्मारकाचे रक्षण करु शकले नाही ते माझे करतील यावर तर विश्वास नाहीच, आणि मला ती अपेक्षाही नाही. पण मला एक सांगायचे आहे...वाघ्याचे स्मारक हटवुन जी झुंडशाहीची प्रवृत्ती दृष्ठीअल्याड आली आहे ती महाराष्ट्राचाच बळी घेवून थांबनार यात शंका नाही. यात माझा बळी गेला तर त्यात काय आश्चर्य?
मी कोठे जाणार? याच मतीत जन्माला आलो त्याच मातीत मिळनार...पंण ही माती द्वेषाने ओतप्रोत ओथंबलेली आहे. मेहरबानी करा...मला या मातीत गाडु नका...कि येथे जआळुही नका...समुद्रात फेकुन द्या...
किमान जलचरांचे पोट तरी भरेल...
आता असले नालायक लिखाण करणाऱ्या हरामखोरांना जर विचारवंत म्हटले जात असेल तर अशा लोकांचा मानसोपचार तज्ञा करवी इलाज करण्याची गरज आहे. वाघ्या काढला हे ऐकूनच हा हरामखोर एवढा भयभीत झाला होता की त्याला वाटले आता ब्रिगेडवाले आपल्याला संपवतील.मुळात संभाजी ब्रिगेड ही अशा नालायकांना खिजगिनतीतही धरत नाही हा आज पर्यंतचा इतिहास आहे. असले डरपोक लोक परिवर्तनाची भाषा करू शकत नाहीत. म्हणूनच हा सोनवणी "जिकडे खोबरं तिकडे चांगभलं" असा वागतो. वाघ्या बसवल्यानंतर याची प्रतिक्रिया काय तर "मी जिंकलो संभाजी ब्रिगेड हरली." वाघ्या काही सोनवनीचा बाप नव्हता मी जिंकलो म्हणायला. हा नालायक जर स्वताला विचारवंत समजतो तर त्याने "सत्य जिंकले आणि असत्य पराभूत झाले " म्हणायला पाहिजे होते. छोट्याश्या गोष्टीने उन्मादात जाणारे विचारवंत नसतात तर विकारवंत असतात हे बिगेडणे ध्यानात ठेवायला हवे. महाड येथील वर्तमान पात्रातील सोनवनीचे स्टेटमेंट वाचून भल्या भल्यांना तोंडात बोटे घालायची वेळ आली. याचे स्टेटमेंट काय वाचा "वाघ्या जर नाही काढला तर आम्ही धनगरांच्या मुलींवर बलात्कार करू अशी संभाजी ब्रिगेडची धमकी. " आत्ता बोला.हा यांचा वैचारिक लढा. धनगर तर सोडाच पण ब्रिगेडच्या एकाही कार्यकर्त्याने कधी ब्राह्मण महिलांबद्दल असे उद्गार काढल्याचे महाराष्ट्र देशाला माहित नाही. ही आहे यांची वैचारिक उंची. हा सोनवणी सतत "ओल्ड मोंक " नावाची दारू ढोसत असतो, अशा हलकट आणि दारूबाज व्यक्तींकडून हीच अपेक्षा महाराष्ट्र करू शकतो. बर या सोनवनीला सत्याचा एवढाच ध्यास आहे तर जेम्स लेन प्रकरणात हा उपोषणाला का नाही बसला? हा उघड उघड जातीयवाद आहे.(continue...)
संभाजी ब्रिगेडने आत्मपरीक्षण करावे...भाग 3
नरके तर स्वताचे कौतुक स्वताच करून आधुनिक आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. उठ सूठ आंबेडकरी तत्वज्ञानाचे डोस पाजणाऱ्या नरकेने वायफळ बडबड न करता सगळा माळी समाज घेऊन भुजबळांसहित बौध धम्म स्वीकारावा.तरच तो खरा आंबेडकरी ठरेल. दुसरा वाघ्याचा भाऊ म्हणजे मधुकर रामटेके. याने फक्त बाबा साहेबांच्या जातीत जन्म घेतला म्हणून हा आंबेडकरी नाहोतर यांच्या सारखा जातीयवादी शोधूनही सापडणार नाही. काय तर म्हणे "मी एवढा कट्टर आंबेडकर वादी आहे की बाबा साहेबांना आधुनिक बुध समजतो." याला एवढेही माहित नाही की कट्टरवाद तो मग ब्रिगेडचा असो की रामटेकेचा असो तो हिटलर वादातच मोडतो. पण ब्रिगेडचा कट्टरवाद हिटलर च्या वळणाचा आणि आपला म्हणजे मानवतावादाचा असा यांचा गैर समज दिसतोय. बर या कट्टर आंबेडकरवाद्याने किमान बाबा साहेबांच्या म्हणन्यानुसार तरी वर्तन करावे ना? बाबासाहेब म्हणाले होते की "राजर्षी शाहूंचा जन्मदिन दलितांनी एखाद्या सणासारखा साजरा करावा." आणि हा रामटेके ज्या नरके-सोनावानीच्या ओंजळीने पाणी पितो ते तर कट्टर शाहू द्वेस्टे आहेत. या द्वेशातूनच या नराधमांनी जगभर प्रचलित असणाऱ्या "फुले-शाहू-आंबेडकर " चळवळीचे नामकरण केवळ "फुले-आंबेडकरी " चळवळ असे केले एवढा यांचा पराकोटीचा शाहू द्वेष . मग असे करणे कोणत्या "कट्टर आंबेडकर वादात " बसते याचे उत्तर रामटेके देतील काय? असे करणे हा बाबा साहेबांचा अपमानच नव्हे काय? मग अशा दुटप्पी माणसांनी ब्रिगेडवाल्यांना आंबेडकरवाद शिकवू नये. बर वाघ्या प्रकरणात जेव्हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर तथाकथित हल्ला झाला तेव्हा या रामटेकेला एवढ्या उकळ्या फुटल्या की त्याने आता कसं वाटतंय? असा प्रश्न विचारणे सुरु केले. हे पण कट्टर आंबेडकरवादाचेच द्योतक मानायचे काय?
आता उरला प्रश्न "राष्ट्रीय समाज पक्षाचे " गल्लीतही माहित नसणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर यांचा. पुतळा बसवला तो यांच्या पक्षाला घाबरून नव्हे तर सामाजिक समतोल खराब होऊ नये म्हणून शासनानेच ही तत्परता दाखवली. पण या राष्ट्रीय नेत्याचे स्टेटमेंट पहा "वाघ्याला हात लावाल तर महादेव जाणकरशी गाठ आहे." राष्ट्रीय नेत्याच्या वर्तनावरून त्याच्या समाजाचे मूल्यमापन होत असते. एकीकडे महादेव जानकर यांना शत्रू समजू नका असे आव्हाहन करणारे ब्रीगेडवाले पहिले की या जानकरची वैचारिक उंची लक्षात येते आणि ब्रिगेड आज सुधा बहुजनवाद किती पराकोटीने जपते याचा प्रत्यय येतो. नरके-सोनवणी-रामटेके आणि आत्ता आत्ता जानकर यांच्या संबंधी ब्रिगेडचा व्यवहार पहिला की ब्रिगेडचा शत्रू निश्चित आहे आणि तो फक्त आणि फक्त ब्राहमनच आहे हेही लक्षात येते. मग प्रश्न येतो तो संभाजी ब्रिगेडच्या मराठा समजा विषयीच्या "सोफ्ट कॉर्नरचा." कोणताही व्यक्तीच्या मनात आपल्या समाजाच्या व्यक्तीच्या विषयी मनात सोफ्ट कॉर्नर निर्माण होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परशुराम हा क्षत्रियांचा कर्दनकाळ असूनही ब्राह्मण समाजाचा देव ठरला. आजही अफझल खानचा विषयजरी काढला तरी स्वताला शिवभक्त समजणाऱ्या मुसलमानांना सुधा या विषयावर बोलणे नको वाटते. दलितांनी चौक बाटविला म्हणून गायीच्या मुत्राने चौकाचे शुद्धीकरण करणाऱ्या छगन भुजबळांना नरके-सोनवणी-रामटेके ने जाहीर झोडपले नाही. उलट त्यांच्याच तुकड्यावर आजचा गालीच्च प्रकार होत आहे. अहो एवढेच कशाला इंग्रजांना घाबरून शिवरायांच्या ऐवजी कुत्र्याच्या स्मारकाला मदत करणारे होळकर सुधा धनगरांच्या अस्मितेचा विषय झालेच की नाही? मग आपण शिवरायाचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला अस्मिता मानावी आणि ब्रीगेडवाल्यांनी स्वजातीय लोकांना बोलूही नये? हा कुठला न्याय झाला.वारंवार ब्रिगेडला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधनार्यांना शरद पवारांसमोर लोटांगण घालणारा आणि शेपटी घोळनारा समतावादी छगन भुजबळ कसाकाय चालतो? अहो परिवर्तन म्हणजे "बाहेर्चीला लुगडी आणि घरचिला नागडी ठेवणे नव्हे." परिवर्तनाचा उपयोग जर आपल्याच समाजाला होत नसेल तर असल्या परिवर्तनाला काय चाटायचे काय?(continue...)
संभाजी ब्रिगेडने आत्मपरीक्षण करावे...भाग 4
तोंडात फुले-आंबेडकरांचे नाव घेऊन भांडारकर संस्थेच्या गाद्या गरम करणाऱ्या नरके पेक्षा ब्रिगेडवाल्यांचा आंबेडकरवाद केव्हाही एक नम्बरीच. नाहीतरी आता छगन भुजबळ-गोपीनाथ मुंडे-राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांनी शिवसेना भाजपशी छुपी हात मिळवून सत्ता हस्तगत करायची तयारी चालवलीच आहे. म्हणजे सत्तेसाठी तुम्हाला ब्राहमणवादीही चालतात तर तुमचा असला आंबेडकर वाद हा बहुजन समाजाला जास्त घातक आहे हे समजण्या एवढा बहुजन मुर्ख नक्कीच नाही. ब्रिगेड वाल्यांनी वेळ चूकवली आणि या हरामखोरांना कोल्हेकुई करण्याची संधी मिळाली.नाहीतर यांना त्या वाघ्या कुत्र्याएवढेही कुणी विचारले नसते. या वादात आणखी एका प्राध्यापकाने उडी घेतली आणि आपली अक्कल पाजळली. हे महाशय म्हणजे प्रा.श्रावण देओरे. त्यांचे म्हणणे असे की " कुत्रा हा हीन प्राणी आहे म्हणून हे ब्रीगेडवाले त्याला काढायची मागणी करतात. त्या ऐवजी तिथे घोड्याचा पुतळा असला असता तर त्यांनी काढायची मागणी केली नसती."कुत्रा हा हीन प्राणी आहे हे मान्य असूनही एका प्राध्यापकाने घोड्याचे वीधान करावे हेच हास्यास्पद आहे. या प्राध्यापकाला एवढीही अक्कल नसावी की नंदीबैल हा मांगल्याचे प्रतिक असूनही त्याची जागा देवळात नसून बाहेरच असते.त्याला कोणी महादेवाच्या बोकांडी बसवत नाही. मग शिवरायाच्या समाधी पेक्षा उंच असणारा वाघ्या ब्रिगेडने का सहन करावा ?
असो. राज्यात अजूनही बरेच प्रश्न शिल्लक आहेत. त्यातही मराठ्यांचे प्रश्न जास्तच गंभीर आहेत.जागतिकीकरणात मराठा काळाच्या मागे जात आहे.या साठी काय करता येईल या संबंधी ब्रिगेडने ठोस भूमिका घ्यावी. इतिहासामुळे अस्मिता जागी होते पण पोटात भूक असताना नुसत्या अस्मितेने पोट भरत नाही याचेही भान हवे. बाकीचे हौसे गौसे नौसे परिवर्तनवादी सोबत न घेता ही संभाजी ब्रिगेडने फक्त आणि फक्त मराठ्याची जरी मोट बांधली तरी भरपूर झाले. वरील माकड छाप राष्ट्रीय नेते कितीही सत्ता हस्तगत करण्याच्या मागे लागले तरी मराठ्यांच्या मता शिवाय यांना सत्तेचे स्वप्नही पाहता येणार नाही. आणि ब्रिगेडला विरोध होण्याचे कारणही हेच आहे. या हरामखोरांचे विचार आणि यांचे तर्कट बघितले की लक्षात येते यांचा एकाचाही पायपोस एकाला नाही. पण वरील सर्वामध्ये एकच मुद्दा सामाईक आहे तों म्हणजे मराठा द्वेष. या एकच मुद्यावर हे सगळे संभाजी ब्रिगेडच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा हा मराठा द्वेष्ट जातीयवाद कधीच यशस्वी होऊ न देणे ब्रिगेडच्या हातात आहे. आजही खऱ्या खुऱ्या आंबेडकर वाद्यांचा ब्रीगेद्लाच पाठींबा आहे.तो टिकवून ठेवावा. अजूनही ब्रिगेड गाव पातळीवर पोचली नाही त्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.प्रशिक्षण शिबिरानेच कार्यकरत्यंना वेगळी दिशा मिळते त्यात सातत्य ठेवावे. नव नवीन लेखक वक्त्यांना संधी द्यावी. समाजाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवावी. आणि विशेष म्हणजे सारा महाराष्ट्र आपल्याच बापाचा आहे अश्या अविर्भावात वागणे बंद करावे. वाघ्या मुळे एक नवीन दिशा ठरवून आणि मरगळ झटकून कामाला लागावे. आपल्या सारख्याच बहुजन समाजातील छोट्या छोट्या समाज घटकांना सोबत घेऊन चालावे. अशी वाटचाल सातत्याने चालू ठेवल्यास शिवरायांचे स्वराज्य पुन्हा दिसेल. नाहीतर नरके-सोनवणी-रामटेके सारख्या बाटग्यांना सोबत घेऊन आम्ही सारे जात बांधव पेशवाई आणायला टपलेलेच आहोत.(the end)
pratyek vishay nit samajun pratikriya dene faiydeshir tharel.wagyaa kutra ha vishay shivray yanchya etihasat nahi,tyala eaitihasik aadhar nahi.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ