शनिवार, जुलै ०६, २०१३
सोमवार, एप्रिल १५, २०१३
आधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
प्रा. हरी नरके
आधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण
योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष
समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही
मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज
प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी
राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता,
सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित
जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना
प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर
लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले.
त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना अस्तित्त्व,उर्जा, अस्मिता आणि
प्रकाश दिला.
रविवार, एप्रिल ०७, २०१३
ओबीसी आरक्षण संकटात! मागासजातीय संघटना रस्त्यावर उतरणार- ओबीसी नेते श्रावण देवरे यांचे पत्रक
![]() |
| प्रा. श्रावण देवरे |
मराठा समाजाला घटनाबाहृय
पद्धतीने ओबीसींच्या यादीत घुसविण्याचा प्रयत्न महराष्ट्र शासन करीत आहे. असंख्य ओबीसी
कार्यकर्त्यांनी प्रदिर्घ काळ संघर्ष करुन मिळविलेले ओबीसी आरक्षण धोक्यात आले
असून ते वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावरच्या संघर्षाची
तयारी करीत आहेत. या आंदोलनाची सुरुवात दि. 9 एप्रील मंगळवार रोजी मुंबई येथील
आझाद मैदानावर एक दिवसाच्या धरणे आंदोलनाने होत आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे
ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष श्रावण देवरे यांनी दिली आहे.
शनिवार, मार्च ३०, २०१३
जलसंपत्ती...दुष्काळ आणि बाबासाहेब!
![]() |
| डॉ . बाबासाहेब आंबेडकर |
महान नेत्यांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. वर्तमान व
भवितव्यातील समस्या कायमस्वरुपी यशस्वीपणे सोडवण्यासाठी लागणारी असामान्य
प्रतिभा आणि उपायांची नेटाने केलेली राबवणुक. डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे
मानवजातीला अनेक क्षेत्रांत अनमोल योगदान आहे. बाबासाहेबांची प्रज्ञा
बहुमुखी होती. १९३४ साली रिझर्व ब्यंकेची जी स्थापना झाली ती
अर्थशास्त्रज्ञ या नात्याने हिल्टन यंग कमिशनसमोर बाबासाहेबांनी जे
प्रस्ताव ठेवले होते त्या आधारावरच झाली हे सहसा आपल्याला माहित
बुधवार, जानेवारी ०९, २०१३
साहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’
साहित्य
संमेलन आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. प्रत्येक साहित्य संमेलनात साहित्यबाह्य
विषयावरून वाद होतात आणि ते संमेलन इतर गोष्टींसाठीच लक्षात राहते. जो मूळ हेतू
लक्षात घेऊन या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते तो हेतू सफल करण्याचे प्रयत्न
कितपत होतात असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण साहित्य महामंडळाचे कारभारी
आणि स्थानिक संयोजन समिती कशा प्रकारे वाद निर्माण करत असतात हे दरवर्षी आपण पाहत
आहोतच. यावेळचे साहित्य संमेलन तर अनेक कारणांनी गाजत आहे. या संमेलनातील वादाची
सुरवात झाली ती अध्यक्षीय निवडणुकीतील ह. मो. मराठे जातीयवादी प्रचाराने. ब्राम्हण
मतांचे धृविकरण आपल्या
साहित्य संमेलनातील वाद - बाळासाहेब ठाकरे आणि हमीद दलवाई
यंदाचे
साहित्य संमेलन परशुरामाच्या एकाच वादापुरते मर्यादित नाही. संमेलनाच्या
व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला पुष्पा भावेंनी विरोध केल्यामुळे
वातावरण आणखीनच तापले. १९९९ च्या साहित्य संमेलनाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी
साहित्यिकांची संभावना बैल अशी केली होती. त्यावेळी सर्व स्तरातून या गोष्टीचा
निषेध झाला होता. परंतु काही दिवसापूर्वी बाळासाहेबांचे निधन झाल्याने त्यांचा
सन्मान करण्यासाठी त्यांचे
गुरुवार, डिसेंबर २७, २०१२
75 years of ‘Annihilation of Caste- प्रा. हरी नरके यांचे भाषण
सौजन्य: अलोक जत्राटकर,सहा.कुलसचिव,शिवाजी विद्यापिठ,कोल्हापुर
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे नाताळच्या दिवशी एका महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. ’75 years of ‘Annihilation of Caste’- Tracing the Journey of Caste System in India ’ असा या दोन दिवसीय चर्चासत्राचा विषय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक १९३६ साली प्रकाशित झालं. भारतीय जातिनिर्मूलनाच्या चळवळीसाठी कालातीत रसद पुरवणाऱ्या या पुस्तकाची पंचाहत्तरी आणि आजच्या काळातील त्याचं महत्त्व,
Posted in: प्रा. हरी नरकेबुधवार, डिसेंबर २६, २०१२
स्त्रियांवरील वाढते अत्याचार : सामाजिक अवनतीचे लक्षण
- प्रकाश पोळ.
दिल्ली येथे एका अभागी भगिनीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराने सारा देश खडबडून जागा झाला आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दिल्लीतील त्या मुलीवर जो प्रसंग ओढवला तो माणुसकीला काळिमा फासणारा आहे. माणसाची नैतिकता किती खालावलेली आहे हेच या घटनेवरून दिसून येते. ती मुलगी रात्री १० च्या सुमारास आपल्या मित्राबरोबर एका खाजगी बसमधून प्रवास करत असताना तिच्यावर पाच जणांच्या टोळक्याने सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड शारीरिक यातना देवून तिच्या मित्रासह बसमधून फेकून दिले. ती तरुणी आजही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. मिडीयाने या घटनेला
दिल्ली येथे एका अभागी भगिनीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराने सारा देश खडबडून जागा झाला आणि स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. दिल्लीतील त्या मुलीवर जो प्रसंग ओढवला तो माणुसकीला काळिमा फासणारा आहे. माणसाची नैतिकता किती खालावलेली आहे हेच या घटनेवरून दिसून येते. ती मुलगी रात्री १० च्या सुमारास आपल्या मित्राबरोबर एका खाजगी बसमधून प्रवास करत असताना तिच्यावर पाच जणांच्या टोळक्याने सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला प्रचंड शारीरिक यातना देवून तिच्या मित्रासह बसमधून फेकून दिले. ती तरुणी आजही हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्यावरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. मिडीयाने या घटनेला
गुरुवार, ऑक्टोबर २५, २०१२
अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख
डॉ. आ. ह. साळुंखे
यांनी त्यांच्या "बळीवंश" या ग्रंथात प्राचीन वैदिक ग्रंथातील काही पुरावे
दिले आहेत. असुर व्यक्ती गणपती होत्या आणि असुर आणि शिवाचे नाते याचे काही
पुरावे .
गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज
अवैदिक गणपती : शंकर पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख
गणपती
हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि गणांचा प्रमुख म्हणून विख्यात आहे. शंकराचे
भक्त, सेवक आणि सैनिक असलेल्या गणांचा प्रमुख म्हणून त्याला गणपती, गणेश अशी नवे
प्राप्त झाली आहेत. गणपती हे केवळ एखाद्या व्यक्तीचे वा देवतेचे नाव आहे, या
दृष्टीने गणपतीकडे पाहण्याऐवजी एक अत्यंत महत्वाचे पद या दृष्टीने
त्याच्याकडे पाहणे, हा खरा ऐतिहासिक दृष्टीकोन होय. शंकर
शनिवार, ऑगस्ट ०४, २०१२
महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग ३
तुकोजीरावांचा आंतरधर्मीय विवाह
![]() |
| तुकोजीराव होळकर (III) |
बावला खून खटल्यानंतर
१९२६ मध्ये तुकोजीराव यांनी गादी सोडली आणि युरोप-अमेरिकेकडे रवाना झाले. तिथेच
त्यांची ओळख मिस मिलर यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि
तुकोजीरावानी मिलर यांच्याशी लग्न करायचे ठरविले. १९२८ मध्ये तुकोजीराव मिलर यांना
घेवून भारतात आहे. त्यांनी तिच्याशी रीतसर लग्न केले. मिलर यांनी हिंदू धर्म स्वीकारला. लग्नानंतर त्यांचे नाव
शर्मिष्ठादेवी असे झाले. तुकोजीराव आणि शर्मिष्ठादेवी आयुष्यभर एकत्र राहिले.
परंतु त्यांच्या लग्नाबद्दलही जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम चालू आहे. इंटरनेट वर अनेक ब्लॉगधारकांनी बावला खून
महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग २
बावला खून खटला
![]() |
| महाराजा तुकोजीराव होळकर (III) |
बावला खून
खटल्याची थोडक्यात कहाणी अशी की,
शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१२
महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग १
![]() |
| तुकोजीराव होळकर (III) |
आपल्या समाजात अनेक महामानवांनी
सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामध्ये विचारवंत, लेखक ज्याप्रमाणे आहेत
त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सत्ता हातात असणारे राजे, महाराजे, संस्थानिक सुद्धा आहेत.
यामध्येच इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे
लागेल. परंतु तुकोजीरावांचे सामाजिक काम समाजासमोर फारसे मांडले गेले नाही. आणि जर
कुणी तुकोजीरावांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतलाच तर समाजात
त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण होवू नये म्हणून प्रस्थापित लेखणीबहाद्दार आणि
सनातनी लोकांनी तुकोजीरावांची एवढी बदनामी केली की त्यापुढे त्यांचे सामाजिक कार्य
झाकोळून जाईल. त्यामुळे तुकोजीरावांचे सामाजिक
कार्य समाजासमोर मांडण्याचा आणि त्यांच्यावरील आरोपांचे खरे स्वरूप दाखवण्याचा हा
लेखनप्रपंच.
संभाजी ब्रिगेडने विचार करावा
वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक या लेखाचा उद्देश संभाजी ब्रिगेडची बदनामी करणे नाही हे लेख संपूर्ण वाचल्यानंतर लक्षात येईल. मी स्वतः संभाजी ब्रिगेडबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती मला माहित आहे. त्यांच्या कार्याने विचाराने प्रभावित होवून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. प्रश्न केवळ ब्रिगेडचा नाही. कोणतीही बहुजनवादी, पुरोगामी संघटना या माझ्यासाठी आदरणीय आहेत. वेळोवेळी अशा सर्व संघटनांमध्ये मी काम करीत आलो आहे. परंतु ब्रिगेड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे ते
गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१२
वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक
अखेर रायगडवरील
बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला.
गेले अनेक दिवस वाघ्या कुत्र्याच्या प्रश्नावरून उलट-सुलट चर्चा चालू होती. दादोजी
कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत रायगडवरील
वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी जोरदार आंदोलन उभे केले होते. वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या एका महाराणीच्या समाधीवर
ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक उभा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या
महाराणी यांची बदनामी करणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा रायगडवरून काढून टाकावा अशी
संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. (संभाजी ब्रिगेडच्या सविस्तर भूमिकेसाठीक्लिक करा.) परंतु रायगडवरील शिवस्मारकाला इंदूरचे महाराजा
तुकोजीराव होळकर तृतीय यांनी आर्थिक मदत केली असल्याने धनगर समाजाचा वाघ्याचा
पुतळा काढण्याला विरोध होता. महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या देणगीतून
वाघ्याचा पुतळा रायगडावर उभा करण्यात आला. (त्यासाठी होळकरांच्या
कुत्र्याची दंतकथाही निर्माण करण्यात आली.)
शुक्रवार, जुलै २७, २०१२
खरे आयडॉल- प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद् पाटील
लेखक-
किशोर मांदळे
सर्वच चळवळींना अरिष्टात
सापडण्याचा भोग अटळ असतो. चळवळीचे अरिष्ट नेमके कोणते ते आकलल्याशिवाय
त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडू शकत नाही. चळवळींना अरिष्टातून बाहेर
काढण्याचे दिव्य विद्यापीठांच्या "आयव्हरी टॉवर'मधील विचारवंतांच्या आवाक्यातले कधीच नसते. त्यासाठी चळवळीच्या
रणमैदानातूनच "द्रष्टा पुढे यावा लागतो. या द्रष्ट्याचीही वाटचाल सोपी नसते.
कारण, तत्वज्ञानाने कर्मठ बनलेल्या श्रद्धा त्याला मोडीत काढाव्या
लागतात. मार्क्सवादाच्या "सार्वभौम श्रद्धेला' आव्हान देऊन त्याचे
दार्शनिक अरिष्ट जगासमोर मांडणे म्हणजे तर केवढे पाखंड! हे पाखंड कॉ. शरद्
पाटील यांनी तीन दशकांच्या मागेच केले.आत्मरत डाव्या प्रस्थापितांनी कॉ. शरद्
पाटलांची कोंडी
रविवार, जून २४, २०१२
राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा
"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 4
1990 ला RSS-BJP
ने पुन्हा अशाच षडयंत्राची रचना केली. परंतू ब्राम्हणी व अब्राम्हणी या दोन्ही
शत्रूंनी एकमेकांचा मागचा अनुभव पाहता, RSS-BJP चे नेते जसे हुशार
झाले होते तसे ओबीसी नेतेही सतर्क व सावध झाले होते. 1989चा जनता दल व 1977
चा जनता पक्ष यांच्यात बराच मुलभूत फरक होता. परिस्थितीही आमूलाग्र बदललेली होती.
यावेळी RSS-BJP ने संभाव्य मंडलविरोधी लढ्याची तयारी खूप
आधीपासूनच सुरु केलेली होती. त्यांनी आपल्या पक्षात ओबीसी जातीतून भरपूर
शनिवार, जून १६, २०१२
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 3
आतापर्यंत आपण प्रस्थापित
कॉंग्रेसधर्मी पक्षांमधील ओबीसी नेत्यांबाबत चर्चा करीत होतो. आता आपण मूळ ओबीसी
चळवळीतून निर्माण झालेल्या ओबीसी नेत्यांबाबत विचार करु या! तात्यासाहेब महात्मा
जोतीराव फुले यांच्या जातीअंतक सत्यशोधक चळवळ ब्राम्हण-मराठा युतीने दडपून टाकताच
तीने एकीकडे तामीळनाडूत तर दुसरीकडे बिहारात मूळ धरले. तामीळनाडूत पेरियार ई.
व्ही. रामास्वामी
गुरुवार, जून १४, २०१२
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 2
जर जातीव्यवस्था
वर्गव्यवस्थेप्रमाणे खूली राहीली असती तर आज ओबीसी नेतेपदी मुंडे-भूजबळांच्याऐवजी
जोशी-कुलकर्णी दिसले असते. बाबरी मशिद पाडण्यासाठी जुंपलेल्या या हिंदू नेत्यांवर ओबीसी
नेतृत्वाची झूल का टाकण्यात आली? ते पुढीलप्रमाने समजून
घेता येईल ----
व्हि. पी. सींग सरकार व
बाबरी मशिद पाडतांना मंडल आयोगाचा क्रांतीकारक सामाजिक व राजकीय गाभा बर्याच
प्रमाणात गाडला गेल्यानंतर ओबीसी जातीतील या हिंदू नेत्यांचे एक काम संपलेले होते.
आर्थिक व राजकीय उठाव कायमचे उखडून टाकता येतात, सामाजिक असंतोष मात्र
मंगळवार, जून १२, २०१२
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा''- भाग 1
लेखक- प्रा. श्रावण देवरे
![]() |
| प्रा. श्रावण देवरे |
''ओबीसी चळवळीच्या संघर्ष वाटा'' हे पुस्तक 6 महिन्यापुर्वीच लिहुन तयार आहे.
आर्थिक स्थिती बरी असलेल्या ओबीसी नेत्यांना व कार्यकर्त्यांना पुस्तक छपाईसाठी
आर्थिक मदतीची विनंती केली. परंतू फारसा चांगला अनुभव नाही. ईलेक्शनची हौस भागविन्यासाठी आमचे ओबीसी
3/4 लाख रुपये सहज उडवुन टाकतात. परंतू चळवळीला मार्गदर्शक ठरणारे
पुस्तक छपाईसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.
या पुस्तकातील एक लेख आपल्या सह्याद्री बाणाच्या वाचकांसाठी----------
.
.



प्रकाश पोळ














