यंदाचे
साहित्य संमेलन परशुरामाच्या एकाच वादापुरते मर्यादित नाही. संमेलनाच्या
व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला पुष्पा भावेंनी विरोध केल्यामुळे
वातावरण आणखीनच तापले. १९९९ च्या साहित्य संमेलनाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी
साहित्यिकांची संभावना बैल अशी केली होती. त्यावेळी सर्व स्तरातून या गोष्टीचा
निषेध झाला होता. परंतु काही दिवसापूर्वी बाळासाहेबांचे निधन झाल्याने त्यांचा
सन्मान करण्यासाठी त्यांचे
नाव व्यासपीठाला देण्याचा विचार आयोजकांनी केला. परंतु
पुष्पा भावेंनी याला विरोध केल्यानंतर वातावरण तापले आणि पोलिसांनी सुरक्षेच्या
कारणावरून पुष्पा भावे यांचा पोलीसंसाठीच आयोजित केलेला कार्यक्रम रद्द केला.
कोकणच्या शिवसैनिकांनी कडक भूमिका घेत पुष्पा भावेना जिल्हात येवू देणार नसल्याचे
सांगितले. या ठोकशाहीबद्दल ना आयोजक काही बोलायला तयार आहेत ना पोलीस. संमेलनाचे
उद्घाटक मा. शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या नावाचा आग्रह धरला. बाळासाहेबांचे
साहित्यविश्वात काही योगदान नसेल परंतु महाराष्ट्राला घडवण्यात त्यांचे योगदान
नाही का असा प्रश्न पवार साहेबांनी विचारला आहे. पवार साहेबांची इच्छा म्हणून स्वागताध्यक्ष
तटकरे यांनीही कोणत्याही परीस्थित बाळासाहेबांचे नाव हटवणार नाही अशी भूमिका घेतली.
पण पुष्पा भावेंच्या बाबतीत शिवसैनिक जी दडपशाही वापरत आहेत त्याबद्दल बोलायला
फारसे कोणीही तयार नाहीत.
![]() |
हमीद दलवाई |
दुसरा
वाद झाला तो हमीद दलवाई यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यावरून आणि त्यांच्या
गावातून ग्रंथदिंडी काढण्यावरून. हमीद दलवाई हे पुरोगामी विचारवंत होते हे
सर्वांनाच माहित आहे. आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपून कार्य केले. त्यांनी
साहित्यनिर्मितीही केली. अशा व्यक्तीचा गौरव साम्मेलांच्या निमित्ताने व्हावा ही
आयिओजकन्चि भूमिका योग्य होती. पण कोण कुठला एका धार्मिक समुदायाचा नेता उठतो आणि
संमेलन उधळून लावण्याची भाषा करतो आणि आयोजकही त्याला बळी पडतात. आणि दलवाई यांच्या
गावातून निघणारी ग्रंथदिंडी रद्द करतात. त्यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्याचाही
विचार रद्द करतात. काही झाले तरी बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला देणारच असा कणखरपण
दाखवणारे आयोजक, शरद पवार, तटकरे दलवाईबाबत अशी भूमिका का घेऊ शकत नाहीत याचे उत्तर
मिळाले पाहिजे.
हमीद
दलवाई यांची जागा अ. भा. मराठी साहित्य संमेलनात नाही
हमीद
दलवाई हे महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक होते. ते
सत्यशोधक होते. त्यामुळे सत्याचे, न्यायाचे आणि समतेचे वावडे असणाऱ्या साहित्य
संमेलनात हमीद दलवाई यांची जागा नाही. दलवाई यांचे काम खूप मोठे आहे. त्यांच्या
समाजकार्याला अ. भा. मराठी साहित्य संमेलन किंवा साहित्य महामंडळाचे कारभार्यानी प्रशस्तीपत्र
देण्याची गरज नाही.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ