रविवार, एप्रिल ०७, २०१३

ओबीसी आरक्षण संकटात! मागासजातीय संघटना रस्त्यावर उतरणार- ओबीसी नेते श्रावण देवरे यांचे पत्रक

 प्रा. श्रावण देवरे
मराठा समाजाला घटनाबाहृय पद्धतीने ओबीसींच्या यादीत घुसविण्याचा प्रयत्न महराष्ट्र शासन करीत आहे. असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रदिर्घ काळ संघर्ष करुन मिळविलेले ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून ते वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावरच्या संघर्षाची तयारी करीत आहेत. या आंदोलनाची सुरुवात दि. 9 एप्रील मंगळवार रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसाच्या धरणे आंदोलनाने होत आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष श्रावण देवरे यांनी दिली आहे.
     याबाबत अधिक माहीती देतांना पत्रकात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार स्थापन झालेल्या तीन राज्य मागासवर्गीय आयोगांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 9 वेळा अहवाल देऊन ठामपणे सांगीतले आहे की,‘कोणत्याही परिस्थीतीत मराठा समाजाला कोणतेही आरक्षण देता येत नाही. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेले एकूण 4 निकाल स्पष्टपणे सांगतात की, मराठा समाजाला ओबीसींच्या यादीत समाविष्ट करता येत नाही. तरीही ही सर्व न्यायिक व लोकशाही प्रक्रीया बाजूला सारत दडपशाही व दहशतीच्या मार्गाने मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचे षडयंत्र रचले जात आहे, आघाडी सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.
     नारायण राणे समिती ही बेकायदेशिर आहे. राज्य मागासवर्ग आयोग अस्तित्वात असतांना अशी समीती स्थापन करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणे आहे. समितीचे अध्यक्ष स्वतःच मराठा मोर्च्यासमोर जाउन आरक्षणाचे आश्वासन देत असतील तर समीती गठीत करण्याचे नाटक तरी का करायचे, असा सवालही पत्रकात करण्यात आला आहे.
9 तारखेच्य्या धरणे आंदोलनाबाबत अधिक माहिती देतांना पत्रकात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र स्तरावर काम करणार्‍या विविध ओबीसी व भटक्या जातीजमातीच्या संघटना तसेच जाती संघटनांचे कार्यकर्ते आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात ओबीसी हितासाठी काम करणार्‍या सर्व सामाजिक व राजकीय संघटना सहभागी होणार आहेत. तसेच तेली, कुणबी, माळी, लोहार, सुतार, शिंपी, नाभिक, धनगर, वंजारा, तांबोळी, मण्यार, पिंजारी आदी सर्व धर्माच्या ओबीसी जातींचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
     ओबीसींसाठी ही जीवन-मरणाची लढाई असून आपले अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन श्री. देवरे यांनी केले आहे.


श्रावण देवरे- महाराष्ट्र ओबीसी संघटना 

संजय कोकरे - ओबीसी एनटी  पार्टी               
डॉ. नारायणराव मुंडे - ओबीसी व्हीजेएनटी फ्रंट 


राजाराम पाटील - कुणबी संघटना               
कमलाकर दराडे - महाराष्ट्र ओबीसी संघटना               
शब्बीर अन्सारी - मुस्लिम ओबीसी संघटना 

संपर्क-- श्री. संजय कोकरे, मोबा- 92 24 44 31 19 ,  
E-mailः- deore2012@gmail.com  
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes