रविवार, मार्च १८, २०१२
शनिवार, मार्च १७, २०१२
'आंबेडकर' समजून घ्या!
![]() |
| डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान
ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. मात्र असे असूनही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात
त्यांचे हे ऐतिहासिक योगदान ध्यानात घेतले जात नाही, ही या देशाची एक फार
मोठी शोकांतिका आहे. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध
पैलू पाहिले की कुणीही आश्चर्याने थक्क व्हावे.
अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;
अमेरिकेतील विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठ (सध्याचे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स) या दोन विद्यापीठांच्या अनुक्रमे पीएच. डी. आणि डी. एस्सी. या पदव्या घेतलेला एक श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ; 'मूकनायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक;
बुधवार, मार्च ०७, २०१२
जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक
पुरोगामी महाराष्ट्रात
प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारा सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यातील
औंध या गावी माणुसकीला काळीमा फासणारी ‘ऑनर किलिंग’ ची घटना घडली. या गावातील आशा
शिंदे ही उच्चशिक्षित तरुणी. साताऱ्याच्या सोशल सायन्स कॉलेजमधून तिने एम. एस.
डब्ल्यू. केले होते. पुण्यातील एका नामांकित कंपनीत ती कार्यरत होती. विचाराने
आधुनिक. जात-पात या गोष्टी गौण आहेत असे तीचे मत. ती एका परजातीतील मुलाच्या
प्रेमात पडली.
रविवार, मार्च ०४, २०१२
आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर !
जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान
दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन
करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने
अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली,
पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध
पुकारणारी ही महान वीरांगना.
शनिवार, फेब्रुवारी २५, २०१२
बहुजन समाज आत्मपरीक्षण करणार का?
हा लेख बहुजनांच्या विरोधात किंवा ब्राम्हणांच्या बाजूने नाही. बहुजनांनी आत्मपरीक्षण करावे या एकाच हेतूने तो लिहिला आहे. - महावीर सांगलीकर.
स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही
स्वत:ला बहुजन समजणा-या प्रत्येकाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारतात बहुजन नावाचा कोणताही समाज अस्तित्वात नाही. जशी हिन्दू या शब्दाची व्याख्या नाही, तशीच बहुजन या शब्दाचीही व्याख्या नाही. ब्राम्हण सोडून बाकी सगळे बहुजन ही बहुजन या शब्दाची व्याख्या होवू शकत नाही
बुधवार, फेब्रुवारी २२, २०१२
स्वतंत्र पुरोगामी भूमिका घेणे म्हणजे ब्राह्मणद्वेष का ?
सह्याद्री बाणावर लिखाण करताना एक आरोप नेहमीच होत आला आहे तो म्हणजे ब्राह्मणद्वेष. तुम्ही ब्राम्हणांचा द्वेष करता असे मला अनेक ब्राम्हण म्हणतात. पण मी कसा ब्राह्मणद्वेष करतो ते मात्र सांगत नाही. मला आश्चर्य वाटते की मी इतकी संयमी मांडणी करूनही हे लोक नेहमी तेच-तेच आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर ब्राम्हणद्वेषाचा आरोप करणाऱ्या लोकांना मी एका प्रतिक्रीयेद्वारे उत्तर दिले आहे. ती प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
शनिवार, फेब्रुवारी ११, २०१२
बुद्ध धम्म , वादविवाद: काल आज आणि उद्या
प्राचीन काळी बौद्ध भिक्खुंमध्ये धम्मा विषयी वादविवाद निर्माण होत असत , काही तत्व, आचार विचार विषयी मतभिन्नता निर्माण होत असे तेव्हा ते वाद मिटविण्यासाठी धम्म संगीतीचे आयोजन करण्यात येत असे. या संगीति अनेक महिने, वर्ष चालत असत. बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर चार महिन्या नंतर प्रथम धम्म संगीतीचे आयोजन शिशुनाग वंशातील राजा 'अजातशत्रू' यांनी राजगृह येथे केले होते. स्थविर उपाली आणि बुद्धांचा आवडता शिष्य आनंद यांची या संगीतीसाठी प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. ही संगीति सात महिने चालली. मानवाच्या कल्याणासाठी भदंत आनंद यांच्या मार्गदर्शना खाली बुद्ध तत्व प्रणाली तयार करण्यात आली.
शनिवार, फेब्रुवारी ०४, २०१२
'सह्याद्री बाणा'ची एका वर्षातील वाटचाल
गुलामगिरी, अज्ञान,
दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी एक वर्षापूर्वी (नोव्हेंबर
२०१०) सह्याद्री बाणा हा ब्लॉग तयार केला. आजपर्यंत ज्या-ज्या महामानवांनी
प्रस्थापित ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला त्या शिवराय-फुले-शाहू-आंबेडकरांच्या
कार्यापासून प्रेरणा घेवून सह्याद्री बाणा ने एक वर्ष वाटचाल केली. बहुतांश बहुजन
समाज हा अशिक्षित आणि
वैदिक लढाया आणि सुसंस्कृतपणा (?)
निरपराध शम्बुकाला रामाने ठार मारले. शंबूक हा तथाकथित शूद्र वर्णातील असून
त्याने विद्या ग्रहण केली, हा त्याचा अपराध होता काय? यात रामाचे समर्थन कसे होईल. हे सुसंस्कृत युद्धाचे उदाहरण आहे का ? वामनाने तीन पावलाची जमीन मागून कपटाने निष्कपट बळीराजाला ठार केले हा
सुसंस्कृतपणा आहे का ? परशुरामाने अत्यंत क्रौर्याने आपल्या आई
आणि भावाना ठार मारले हा सुसंस्कृतपणा आहे का ? सुग्रीव आणि
वाली यांच्या संघर्षात निरपराध वालीला रामाने क्षात्रधर्म बाजूला सारून मारले हे
रामाचा सुसंस्कृतपणा दर्शवते की कपट ? वालीचा कोणता
अपराध होता ? अशी शेकडो उदाहरणे देता येतील. इंद्राने
ऋषीच्या बायकोला
फसवून तिच्यावर केलेला अत्याचार काय दर्शवतो.
Posted in: वैदिक धर्मगुरुवार, जानेवारी १९, २०१२
महान क्रांतिकारक: संगोळी रायन्ना
(सदर लेख लिहिताना विश्वाचा यशवंत नायक या मासिकातील एस. एल. अक्कीसागर यांच्या लेखाचा खूप उपयोग झाला.)
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही.
सोमवार, जानेवारी १६, २०१२
पानिपत आणि मल्हारराव होळकर: पानिपत संग्रामाचे नवे अन्वयार्थ
संजय सोनवणी
१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन
२५१ वर्ष होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी
फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबदल आणि त्यातील
युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील.
१४ जानेवारीला पानिपतचे विनाशक युद्ध होऊन २५१ वर्षे होत आहेत. मराठी सत्तेचा कणा मोडणारे हे युद्ध. ‘घरटी बांगडी फुटली’ एवढा संहार या युद्धात झाला. या युद्धाबद्दल आणि त्यातील युद्धनेत्यांच्या भूमिकांबद्दल वारंवार चर्चा होत आली आहे आणि होत राहील. विजयाचे श्रेय घ्यायला सारेच येतात, पण पराजय हा नेहमीच पित्रुत्वहीन असतो असे म्हणतात ते खरेच आहे. उलट एकमेकांवर दोषारोप करण्याची अहमहमिका लागते. त्यातून सत्य हाती लागतेच, असे नाही. कोणाचा तरी बळी चढवून सारे खापर त्याच्या माथी मारून मोकळे होणे
ही सामान्यांची रीत झाली, पण इतिहास संशोधनात त्याला थारा नसतो.
बुधवार, जानेवारी ११, २०१२
परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर- श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस)
श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) हे
सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत. तश्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) 'सकाळ'
वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. तुम्हाला ती
नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर (शब्दांकन: श्री. मनोहर भोळे)
परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर (शब्दांकन: श्री. मनोहर भोळे)
दहावीत केवळ ५३ टक्के, बारवीत ७० टक्के, बी. कॉम. मध्ये ६६ टक्के, तर
एमबीएमध्ये ६६ टक्के गुण. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील ही सर्वसाधारण
प्रगती. बारावीपर्यंतचे शिक्षणही ग्रामीण भागात झाले. पहिली ते चौथी
फलटणच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये. पाचवी ते दहावी येथील मुधोजी
हायस्कूलमध्ये. या व्यक्तिमत्त्वाचा राजकुमार व्हटकर हा एक सामान्य
विद्यार्थी ते भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी हा प्रवास तसा रोमांचक आहे
शनिवार, नोव्हेंबर १९, २०११
रेणुका, कार्तवीर्य आणि कर्ण यांच्यावर परशुरामाकडून अन्यायच....
हा परशुराम होता तरी कोण ? हा यशवंत रायकर
यांचा दि. १४ ऑक्टोबरच्या अंकातील लेख आणि त्यावरील दि. २५ नोव्हेंबरच्या अंकातीलश्यामसुंदर गंधे यांची प्रतिक्रिया वाचली. धार्मिक ग्रंथातून परशुरामासंबंधी ज्या-ज्या
कथा आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांशी काल्पनिक आहेत हे स्पष्ट आहे. परशुराम हा
विष्णूच्या अवतारांपैकी एक. हा एकमेव विष्णूअवतार चिरंजीव मानण्यात आलेला आहे.
मुळात परशुरामाचा संबंध अनेक पिढ्यातील लोकांबरोबर आल्याचे दाखवले आहे. पुराणात
वर्णन केल्याप्रमाणे जर परशुरामाचे वय काढायचे म्हटले तर ते हजारो वर्षे होईल. आणि
हजारो वर्षे कोणतीही व्यक्ती जिवंत राहू शकत नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
परशुरामाभोवती काल्पनिक आणि चमत्कारी घटनांची इतकी गुंफण करून ठेवली आहे कि
त्यामुळे परशुरामाचे खरे चरित्र समजणे फार अवघड आहे. त्यात रायकर यांनी लिहिल्याप्रमाणे
नरसंहाराचा उच्चांक गाठलेला असतानाही परशुरामाला आगळे दैवत्व प्राप्
शनिवार, नोव्हेंबर १२, २०११
भारतातील पहिल्या महिला संपादिका : तानुबाई बिर्जे
कृष्णाजी भालेकर यांनी १८७७मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या
वृत्तपत्राचं संपादकपद 1906 ते 1912 या काळात तानुबाई बिर्जे यांनी
साभाळलं. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील त्या पहिल्या संपादिका ठरल्या.
महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून
आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली.
बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले. विसाव्या
शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका
बजावणा-या तानुबाईंची ही ओळख..
बुधवार, नोव्हेंबर ०२, २०११
प्रस्थापित व्यवस्था, क्रांती आणि क्रांतीचे प्रणेते : एक प्रतिक्रिया
सह्याद्री बाणा वर प्रसिद्ध केलेल्या समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजा या लेखावर Jidnyasu यांनी खालील प्रतिक्रिया दिली होती. आजपर्यंत अनेकांनी शिव्या देत, असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिल्या. काहींनी चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अशापैकी एक अतिशय सभ्य आणि छान प्रतिक्रिया आणि त्यावर माझे स्पष्टीकरण....
सोमवार, ऑक्टोबर ३१, २०११
यशवंतराव होळकर आणि इतिहासाचा विपर्यास
![]() |
महाराजा यशवंतराव होळकर
|
या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून
देशासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. आपल्या तळपत्या कर्तुत्वाने त्यांनी
दाहीदिशा उजळून टाकल्या. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा इतिहास लिहिणाऱ्या
बहुतांश इतिहासकारांनी प्रामाणिक इतिहास लिहिला नाही. खोट्या कथा, काल्पनिक
प्रसंग, पात्रे यांची घुसावाघुसव करत अनेक महामानावांचा इतिहास बिघडवून
टाकला. या महापुरुषांना आणि महान स्त्रियांना जातीच्या चष्म्यातून पाहत त्यांचा
विकृत इतिहास लिहिला. मल्हारराव होळकर या सामान्य धनगराच्या मुलाने स्वकर्तुत्वावर
मोठे राज्य निर्माण केले. अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या लोककल्याणकारी कामाने
संपूर्ण भारतभर आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. अहिल्यामाई होळकर
यांचे पती खंडेराव हे युद्धात मरण पावले. युद्ध करता करता मरण येवूनही खंडेराव
यांना बदनाम केले. खंडेराव व अहिल्यामाई यांचे पुत्र मालेराव हे व्यसनी, माथेफिरू
रेखाटले. तुकोजी होळकर,
शनिवार, ऑक्टोबर २९, २०११
डॉ. यशवंतराव मोहिते- महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स
| यशवंतराव मोहिते |
यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय
कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढ्या प्रमाणात
महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे; तेवढ्या प्रमाणात परिचित नाही. उलट
त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ,
सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला
आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी केलेली विचारांची व कृतीची धडपड,
फूले-शाहू-आंबेडकर या विचारप्रवाहावर त्याची असलेली अविचल निष्ठा, भारतात लोकशाही
समाजवाद यावा याकरिता त्यांनी केलेले प्रयत्न या सर्वांचा महाराष्ट्रातील जनतेला
परिचय झाला पाहिजे.
गुरुवार, ऑक्टोबर २७, २०११
समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजा
आज बलिप्रतिपदा ! शेतकरी, कष्टकऱ्यांचा राजा बळीराजा ! त्याच्या
पुनरागमनाचा हा दिवस ! या दिवशी बहुजन स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, “इडा
पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” आजचा दिवस बळीराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला
तर जातीयवादी इडा-पीडा घालवण्यासाठी बहुजनांना लढण्याची प्रेरणा मिळेल. या
निमित्ताने बळीराजाचे महत्व प्रतिपादन करणारा प्रा. श्रावण देवरे यांचा लेख “सह्याद्रीबाणा”च्या वाचकांसाठी देत आहोत.
-
प्रकाश पोळ.
![]() |
| बळीराजा |
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे
म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो
आणि बळीचे राज्य येवो !” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार
वर्षापूर्वी बळीराजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या
आर्य वामन याने बळीराजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे
झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद
महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा
भालदेव बसवतात. १५ दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात.
भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या
मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.
सोमवार, ऑक्टोबर १७, २०११
अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद
![]() |
| अग्निवेश का बाहेर पडले ? |
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहेत. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी देशात प्रभावी जनलोकपाल कायदा मंजूर करणे, परदेशातील काळा पैसा भारतात आणणे, निवडणुकांच्या पद्धतींमध्ये बदल घडवणे आणि हे सर्व अंमलात आणण्यासाठी उपोषण, मौनव्रत, सरकारवर टीका, राजकीय-सामाजिक दबाव अशा मार्गांचा अवलंब करणे असे सर्व वातावरण आहे. अण्णा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे.
रविवार, सप्टेंबर ०४, २०११
गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज
बहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव,
नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-धनाने साजरा
करीत असतो. या उत्सवांदरम्यान बहुजन समाजाला इतर सर्व गोष्टींचा जवळ-जवळ विसर पडलेला
असतो. सध्या गणपती उत्सवाचे वारे सगळीकडे वाहत आहे. अशा परिस्थितीत गणपतीचे मूळ, गणपती
उत्सव आणि त्यात बहुजन समाजाचा सहभाग यावर थोडक्यात केलेले भाष्य.....
| गणपती |
.
.



प्रकाश पोळ





