ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर
यांची सुसंस्कृत पुण्यामध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. डॉ. दाभोलकरांचे
कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात पसरत चालले होते कि संकुचित मनुवादी
प्रवृत्त्तींनी त्यांची खूपच धास्ती घेतली होती. समाजाला जाती-धर्माची,
अंधश्रद्धेची नशा पाजून आपली तुंबडी भरणारे महाभाग समाजात भरपूर आहेत. या
महाभागांनी दाभोलकर आणि अंनिसबद्दल आजपर्यंत खूप अपप्रचार केला. दाभोलकर हयात
असताना त्यांच्याबद्दल खूपच असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करण्यात येत होती. परंतु
हिंदू धर्म-संस्कृतीचा ठेका घेतलेले हे लोक किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचा
अनुभव साऱ्या महाराष्ट्राने दाभोलकरांच्या हत्येनंतर घेतला.



प्रकाश पोळ

Posted in: 












