सोमवार, ऑक्टोबर ३१, २०११

यशवंतराव होळकर आणि इतिहासाचा विपर्यास

महाराजा यशवंतराव होळकर
या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून देशासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. आपल्या तळपत्या कर्तुत्वाने त्यांनी दाहीदिशा उजळून टाकल्या. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा इतिहास लिहिणाऱ्या बहुतांश इतिहासकारांनी प्रामाणिक इतिहास लिहिला नाही. खोट्या कथा, काल्पनिक प्रसंग, पात्रे यांची घुसावाघुसव करत अनेक महामानावांचा इतिहास बिघडवून टाकला. या महापुरुषांना आणि महान स्त्रियांना जातीच्या चष्म्यातून पाहत त्यांचा विकृत इतिहास लिहिला. मल्हारराव होळकर या सामान्य धनगराच्या मुलाने स्वकर्तुत्वावर मोठे राज्य निर्माण केले. अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या लोककल्याणकारी कामाने संपूर्ण भारतभर आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. अहिल्यामाई होळकर यांचे पती खंडेराव हे युद्धात मरण पावले. युद्ध करता करता मरण येवूनही खंडेराव यांना बदनाम केले. खंडेराव व अहिल्यामाई यांचे पुत्र मालेराव हे व्यसनी, माथेफिरू रेखाटले. तुकोजी होळकर,

शनिवार, ऑक्टोबर २९, २०११

डॉ. यशवंतराव मोहिते- महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स

यशवंतराव मोहिते
यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे राजकीय कार्य, सहकार क्षेत्रातील कार्य, वैचारिक निष्ठा आणि विचारसंपदा जेवढ्या प्रमाणात महाराष्ट्राला परिचित असणे गरजेचे होते व आहे; तेवढ्या प्रमाणात परिचित नाही. उलट त्यांच्यासंबंधी काही गैरसमज पसरलेले आहेत, पसरविले आहेत. यशवंतराव मोहिते यांचे स्वच्छ, सार्वजनिक जीवन, निर्मळ, पुरोगामी आणि लोक कल्याणकारी नेतृत्व, सामान्य माणसाला आर्थिक, सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी केलेली विचारांची व कृतीची धडपड, फूले-शाहू-आंबेडकर या विचारप्रवाहावर त्याची असलेली अविचल निष्ठा, भारतात लोकशाही समाजवाद यावा याकरिता त्यांनी केलेले प्रयत्न या सर्वांचा महाराष्ट्रातील जनतेला परिचय झाला पाहिजे.

गुरुवार, ऑक्टोबर २७, २०११

समतावादी संस्कृतीचा महानायक : बळीराजा

आज बलिप्रतिपदा ! शेतकरी, कष्टकऱ्यांचा राजा बळीराजा ! त्याच्या पुनरागमनाचा हा दिवस ! या दिवशी बहुजन स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात, “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” आजचा दिवस बळीराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला तर जातीयवादी इडा-पीडा घालवण्यासाठी बहुजनांना लढण्याची प्रेरणा मिळेल. या निमित्ताने बळीराजाचे महत्व प्रतिपादन करणारा प्रा. श्रावण देवरे यांचा लेख “सह्याद्रीबाणा”च्या वाचकांसाठी देत आहोत.
-    प्रकाश पोळ.

बळीराजा
बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी “इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !” असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य वामन याने बळीराजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भालदेव बसवतात. १५ दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.

सोमवार, ऑक्टोबर १७, २०११

अण्णांचे आंदोलन म्हणजे ब्राह्मणवाद

अग्निवेश का बाहेर पडले ?
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहेत. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी देशात प्रभावी जनलोकपाल कायदा मंजूर करणे, परदेशातील काळा पैसा भारतात आणणे, निवडणुकांच्या पद्धतींमध्ये बदल घडवणे आणि हे सर्व अंमलात आणण्यासाठी उपोषण, मौनव्रत, सरकारवर टीका, राजकीय-सामाजिक दबाव अशा मार्गांचा अवलंब करणे असे सर्व वातावरण आहे. अण्णा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे.

रविवार, सप्टेंबर ०४, २०११

गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि बहुजन समाज


बहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-धनाने साजरा करीत असतो. या उत्सवांदरम्यान बहुजन समाजाला इतर सर्व गोष्टींचा जवळ-जवळ विसर पडलेला असतो. सध्या गणपती उत्सवाचे वारे सगळीकडे वाहत आहे. अशा परिस्थितीत गणपतीचे मूळ, गणपती उत्सव आणि त्यात बहुजन समाजाचा सहभाग यावर थोडक्यात केलेले भाष्य.....

गणपती
गणपती उत्सव हा बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलेला उत्सव. त्याआधी गणपतीची पूजा-अर्चा विशेषकरून पेशव्यांच्या दरबारी होत असे. परंतु स्वातंत्र्याचा लढा ऐन जोमात असताना टिळकांनी गणपती उत्सव सुरु केला. समाजात राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी, समाज उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यावा, त्यांचे प्रबोधन व्हावे या हेतूने गणेश उत्सव सुरु केला असे सांगण्यात येते. गणेशोत्सव सुरु करण्यामागे वरील करणे जरी सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र याउलट परिस्थिती आहे. सध्या तर गणेशोत्सवाला अत्यंत हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव जवळ आला कि पोलिसांनाही सुरक्षा वाढवावी लागते. या काळात काही ठिकाणी धार्मिक दंगली घडून येण्याची शक्यताही असते. युवा पिढी बेभान होवून (दारू

शुक्रवार, ऑगस्ट १२, २०११

मेरीटच्या गप्पा कुणाला सांगता ?

आरक्षण हा विषय जेव्हा जेव्हा चर्चेला आला तेव्हा तेव्हा आरक्षण विरोधकांनी मेरीट चा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जणू काही आरक्षणाचा लाभ घेनार्यांकडे मेरीटची वानवा असते अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आरक्षण समर्थकांना अत्यंत हीन पद्धतीने हिणवले गेले. आरक्षण व्यवस्थेमुळे भारताची नोकरशाही आणि प्रशासन दुर्बल होईल अशा प्रकारच्या टीका केल्या गेल्या. प्रकाश झा च्याच भाषेत बोलायचे झाले तर "हम मेरीट में विश्वास करते है, आरक्षण में नही." थोडक्यात काय तर मागास समाज आणि मेरीट यांचा जन्मोजन्मीचा काहीही संबंध नाही अशीच भारतातील अभिजन वर्गाची धारणा आहे.

बुधवार, ऑगस्ट १०, २०११

'आरक्षण' चित्रपट आणि मेडीयाचा पक्षपात

दिनांक ८ ऑगस्ट २०११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्टार न्यूज या वाहिनीवर आरक्षण या चित्रपटाच्या निमित्ताने 'नोकरीमध्ये आरक्षण असावे का ?' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रकाश झा, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण सहभागी झाले होते. याच दिवशी आय. बी. एन. लोकमत वाहिनीवर 'आरक्षण चित्रपटाला विरोध योग्य आहे का ?' या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत प्रा. हरी नरके (विभागप्रमुख- महात्मा फुले अध्यासन, पुणे विद्यापीठ), हेमंत देसाई (पत्रकार आणि समीक्षक), संजय पवार (लेखक), रामदास आठवले (अध्यक्ष- आरपीआय) आणि प्रकाश झा (चित्रपट निर्माता) इ. लोक सहभागी झाले होते. या दोन्ही चर्चा पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या चर्चांचे स्वरूप आणि विषय आरक्षणाबद्दल मनात किंतु ठेवून ठरवले गेले होते असे वाटते. 'आरक्षण' या बहुचर्चित चित्रपटाच्या वादावरून हे दोन्ही विषय चर्चेला आणले होते. परंतु या विषयांच्या ऐवजी 'आरक्षणाला किंवा मागास घटकांच्या विकासाला विरोध करणे योग्य आहे का ?' किंवा 'मागास समाजाची बदनामी चित्रपटाच्या माध्यमातून करणे योग्य आहे का ?' अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांना का करता येत नाहीत हा प्रश्नच आहे.

मंगळवार, ऑगस्ट ०२, २०११

क्रांतिसिंह नाना पाटील


क्रांतिसिंह नाना पाटील
सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले असते. आणि हे विचार क्रांतिसिंह नाना पाटील यांना तंतोतंत लागू पडतात.
क्रांतीसिहांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या छोट्याशा गावी ३ ऑगस्ट १९०० रोजी झाला. लहानपणापासूनच दणकट शरीरयष्टी लाभलेल्या नानांनी भारताला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ‘आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक सुधारणा’ असा वाद अस्तित्वात होता. काहींनी आधी राजकीय स्वातंत्र्य योग्य मानले तर काहीना आधी सामाजिक सुधारणा इष्ट वाटत होत्या. परंतु नानांनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचे महत्कार्य पार पाडले, हे नानांच्या कार्याचे वेगळेपण आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने

रविवार, जुलै ३१, २०११

“आरक्षण” प्रश्नी उच्चवर्णीय मानसिकता ?

प्रकाश झा यांचा “आरक्षण” हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असतानाचा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोषित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेने जे आरक्षण दिले आहे त्याच विषयावर हा चित्रपट असल्याने त्याबद्दल वाद निर्माण होणे साहजिक आहे. उलट निर्माण झालेला वाद हा प्रकाश झा यांच्याच पथ्यावर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण कोणतीही चर्चा झाली नसती तर कदाचित हा चित्रपट खूप लोकांनी पहिलाच असता असे नाही. परंतु एका ज्वलंत विषयावर निर्माण केलेल्या चित्रपटाबद्दल वाद निर्माण झाल्यानंतर तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यामुळे आता या चित्रपटाला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. परंतु चर्चा झालीच नाही तर कदाचित एकांगी आणि द्वेषमुलक बाजू मांडली जावू शकते त्यामुळे या विषयी सखोल चर्चा आवश्यक आहे

शुक्रवार, जुलै ०८, २०११

Satyashodhak Examination

Dear friends

Satyashodhak Chhatrapati Dnyanpith has organized two examinations on the syllabus books of Fule Shahu Ambedkar thought. Both exams will be conducted all over Maharashtra at 300 exam centers on 28 August 2011. Detail information can be available at ---


------ Sau. Shobhatai Shrawan Deore
Convenor, Satyashodhak Chhatrapati Dnyanpith,
201, Sparsh Heights, Dream city Road
Opp. Fame Cinema, Pune Road, NASHIK - 422011


Mobile - 9422788546.
Email- satyashodhak.university@gmail.com

मंगळवार, जुलै ०५, २०११

महाराष्ट्राचे आराध्य श्री विट्ठल म्हणजे कोण?

महाराष्ट्राचे आराध्य श्री विट्ठल हे आजवर रहस्यच बनुन बसले होते. विष्णुच्या 24 अवतारांत आणि विष्णु सहस्त्रनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठुन आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेवून संशोधकांनी श्री विट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि कदाचित तो त्यामुळेच अयशस्वी ठरला आहे. खरे तर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या नामांतच श्री विट्ठलाचे मुळ चरित्र दडलेले आहे यावर कोणी विचार केला नव्हता. परंतु श्री विय़्ट्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसुन पौंड्र या प्राचीन पशुपालक

गुरुवार, जून २३, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती भाग ३- कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे बेगडी दलीतप्रेम

रामदास आठवले यांनी शिवसेनेचे धनुष्य खांद्यावर घेतल्यापासून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला. शिवसेना कशी जातीयवादी आहे आणि त्यांना बाबासाहेबांच्या विचारांची कशी अलर्जी आहे याचा लेखाजोखा सारेजण मांडत आहेत. ज्यांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून आठवले सेनेसोबत गेले त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही आठवले आणि सेना या दोघांना टीकेचे लक्ष बनवले आहे. आठवलेंचे सेनेसोबत जाणे हा बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे, आठवले बाबासाहेबांचा विचार विसरले अशा प्रकारची मांडणी सत्ताधाऱ्यांनी सुरु केली. मुळात सत्ताधाऱ्यांना आठवलेंच्या या भूमिकेवर बोलण्याचा अधिकार आहे का तेही तपासून पाहायला हवे.
 

आठवले सेनेसोबत जाणार हे स्पष्ट होताच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपले डावपेच खेळण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीने सामाजिक हक्क परिषद भरवून आम्हीच दलित मागास जनतेचे कैवारी आहोत असा डांगोरा

सोमवार, जून २०, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती भाग २- शिवसेना आंबेडकरी विचार पचवू शकेल ?

रामदास आठवलेंनी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय घेवून सर्वच परिवर्तनवादी घटकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याला शिवसेनेचा आजपर्यंतचा इतिहास कारणीभूत ठरला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, मागास समाजाच्या उन्नतीसाठी चळवळ उभी केली. देशाच्या सामाजिक पटलावर आपले क्रांतिकारी विचार मांडले. प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्याना नेहमीच सामाजिक टीकेचे लक्ष बनावे लागले आहे. अन्यायकारक व्यवस्था उलथवून टाकून समतावादी समज निर्माण करण्यासाठी जे-जे महापुरुष धडपडले त्यांची प्रथमदर्शनी समाजाने उपेक्षाच केली. परंतु जेव्हा त्या महापुरुषांच्या कार्याचे खरे मोल समाजाने जाणले तेव्हा मात्र त्या महापुरुषांचा गौरव व्हायला सुरुवात झाली. महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर या सर्वाना याच चक्रातून जावे लागले. डॉ.

रविवार, जून १९, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती - भाग १ : केवळ आठवले गट म्हणजे संपूर्ण भीमशक्ती ?


सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे, ते शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीच्या चर्चेमुळे. रामदास आठवले यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. आजपर्यंत दलितांचे तारणहार म्हणवून घेत हे पक्ष महाराष्ट्रातील बहुतांश दलित मतदार स्वतःकडे वळवून घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु रामदास आठवलेंच्या शिवसेनेशी युती करण्यामुळे आपला पारंपारिक आणि हक्काचा मतदार असलेला दलित वर्ग आपल्यापासून दूर जाईल या भीतीने कॉंग्रेस-राष्ट्रवादी सैरभैर झाले आहेत. प्रसारमाध्यमातून या युतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु हि चर्चा करत असताना काही महत्वाच्या मुद्द्यांना जाणीवपूर्वक बगल दिली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही मुद्द्यांची चर्चा करुया.
भाग १ : केवळ आठवले गट म्हणजे संपूर्ण भीमशक्ती ?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना-भाजप युतीला रामदास आठवले यांनी साथ दिली आहे. शिवसेनेचे धनुष्य आपल्या खांद्यावर घेवून आठवले कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर शरसंधान करीत आहेत.

बुधवार, जून १५, २०११

प्रजाहितदक्ष लोकमाता अहिल्यामाई होळकर

३१ मे २०११ रोजी लोकमाता अहिल्यामाई होळकर जयंतीनिमित्त दैनिक प्रीतीसंगम (सातारा) मध्ये आलेला माझा लेख
Print Page

बुधवार, मे ०४, २०११

डॉ. आ. ह. साळुंखे

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या, हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावेच लागते. महाराष्ट्राच्या भविष्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले सांस्कृतिक धोरण थोरामोठय़ांकडून वाखाणले गेले. सांगली जिल्हय़ात खाडेवाडीसारख्या छोटय़ा गावात १९४३ मध्ये शेतकरी कुटुंबात साळुंखे जन्माले. आयुष्यभर नांगर ओढत, पाण्याच्या पखाली वाहण्याचेच काम करावे लागता कामा नये याची पक्की जाणीव आ. ह. साळुंखे यांना असली पाहिजे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची केवळ दैवते नव्हती, 

रविवार, एप्रिल २४, २०११

बहुजनांनो आत्मपरीक्षण करा

विषमतावादी ब्राम्हणी व्यवस्थेच्या दलदलीत रुतून बसल्यामुळे बहुजन समाजाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. हजारो वर्षे बहुजन समाजावर इथल्या व्यवस्थेने अन्यायच केलेला आहे. बहुजनांच्या या परिस्थितीला अन्याय करणारी सनातनी भिक्षुकशाही जेवढी जबाबदार आहेत तेवढेच अन्याय सहन करणारेही बहुजनही जबाबदार आहेत. बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामीतून बाहेर काढण्यासाठी बुद्ध-महावीरांपासून फुले-शाहू-आंबेडकर आणि बळीराजा, सम्राट अशोकापासून शिवरायांपर्यंत अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले. काहींनी सामाजिक चळवळी उभारून तर काहींनी राजकीय चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या प्रगतीला, विकासाला चालना दिली. तरी अजूनही हा समाज या गुलामीतून पुरता बाहेर पडलेला नाही. कोणत्याही समाजाला स्वतःवरील अन्यायाची जाणीव झाल्याशिवाय तो अन्यायाविरुद्ध पेटून उठत नाही. बहुजन समाजाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची पूर्णपणे जाणीव नाही. स्वतःचे खरे मित्र कोण, शत्रू कोण याचे भान नाही. अन्यायी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करताना जर लक्षच निश्चित नसेल तर चळवळ दिशाहीन होते. शत्रूला मित्र समजून जर त्याच्याबरोबर मैत्री केली तर तो धोका देणार नाही याची खात्री कोण देवू शकेल ?

बुधवार, एप्रिल २०, २०११

ही बहुजनांची संस्कृती नाही

गेले काही दिवस बहुजन चळवळीतील कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खरा इतिहास मांडणे आणि खोटया व विकृत इतिहासाला विरोध करणे यात बहुजन तरुणांनी आघाडी घेतली आहे. जिथे क्रिया आहे तिथे ओघानेच प्रतिक्रिया येणारच. बहुजनांचा इतिहास विकृत करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला विरोध होणारच. दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुले व सावित्रीमाई या दाम्पत्याने बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याअगोदर अपवादानेच बहुजन समाजातील लोक शिक्षण घेत होते. सामान्य बहुजन समाजाला तर शिक्षणाची दारे पूर्णपणे

शनिवार, एप्रिल १६, २०११

अण्णा हजारे, भ्रष्टाचार निर्मुलन आणि काही प्रश्न

सध्या जिकडे तिकडे एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अण्णा हजारे. घरात, कॉलेज मध्ये, गावच्या पारावर, फेसबूक आणि ओर्कुटवर कुठेही जा...एकाच गोष्टीची चर्चा...अण्णा हजारेंचे आंदोलन. एका रात्रीत अण्णांना देवत्व बहाल करण्यात आले. आण्णा म्हणजे या देशातील सर्व सामन्यांचे मसीहा, तारणहार अशा प्रकारची मांडणी केली गेली. काही उत्साही अण्णाप्रेमी तर घोषणाच देत होते, ‘अण्णा हजारे आंधी है, देश कें दुसरे गांधी है’. गांधींना पण बरे वाटले असेल...चला एकदाचा दुसरा गांधी तयार झाला (कि केला) तर...समाजात अण्णा हजारे म्हणजे दुसरे गांधी आहेत असे मानून त्यांच्या आंदोलनाची, उपोषणाची भरपूर चर्चा केली गेली.

गुरुवार, एप्रिल १४, २०११

महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण- १७ - फेरआढावा, परिशिष्टे

फेरआढावा

समाज जीवन प्रवाही असते. त्‍यामुळे सांस्‍कृतिक बाबींचे स्‍वरुप काळाच्‍या ओघात बदलत असते. समाजाच्‍या आकांक्षा आणि गरजा यातही बदल होत असतो. पुढच्‍या काळात विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञांकडून आणि सर्वसामान्‍य नागरिकांकडून या धोरणाच्‍या संदर्भात ज्‍या सूचना प्राप्‍त होतील, त्‍यांमधून समाजाच्‍या या आकांक्षा आणि गरजा व्‍यक्‍त होतील. स्‍वाभाविकच, या धोरणात समाविष्‍ट

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes