शनिवार, नोव्हेंबर ०२, २०१३

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत पुणे विद्यापीठाचा “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” असा नामविस्तार करण्याचा ठराव एकमताने पास केला. या निर्णयामुळे पुरोगामी वर्तुळात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे तर दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या विचारांना नेहमी विरोध करणाऱ्या समूहामध्ये नाराजी पसरली आहे. या नामविस्ताराचा मुहूर्त साधून अनेकांनी पुणे विद्यापीठाच्या गुणवत्तेची चर्चा सुरु केली आहे. एरव्ही आपल्याला गुणवत्तेचे फारसे देणे-घेणे पडले नसताना आरक्षण किंवा नामांतर अशा प्रकारच्या गोष्टी समोर आल्या की लगेच आपणाला गुणवत्ता आणि मेरीट आठवते. दुर्दैवाची बाब ही की या मेरीट किंवा गुणवत्तेची चर्चा फक्त फुले-आंबेडकर अशा ठराविक नावामुळेच होत असते....

मंगळवार, ऑक्टोबर ०८, २०१३

दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे द्या

ता. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि साधनाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अज्ञात मारेकर्यांनी निर्घृण खून केला. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरातून त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जनभावना लक्षात घेवून महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायद्याचा अध्यादेश काढला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी त्यावेळी दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार आणि सर्व षड्यंत्र समाजासमोर आणण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना काहीच सुगावा लागलेला नाही....

गुरुवार, सप्टेंबर २६, २०१३

भालदेव, श्राद्धपक्ष व बळीराजाः शेतकर्‍यांचा प्रेरणादायी उत्सव!

Normal 0 false false false EN-US X-NONE X-NONE भाद्रपदाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्व आहे. शूद्धपक्षात भालदेव व वद्यपक्षात पित्तरपाटा म्हणजे श्राद्धपक्ष साजरा केला जातो. भालदेव म्हणजे बलीदेव आणि बळीदेव म्हणजे बळीराजा होय. आजही ग्रामीण भागात दिवाळी- दसर्‍याच्या सणांमध्ये आमच्या आया-बहिणी आपल्या नातेवाईक पुरूषांना ओवाळतांना मोठ्या प्रेमाने म्हणातात, ‘ईडापीडा जाओ, आणि बळीचं राज्य येवो!’. भाद्रपदाच्या कृष्णपक्षात श्राद्धपक्ष म्हणून कडक सुतक पाळले जाते.  प्रा. श्रावण देवरे यांनी या सणांची माहीती देणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यातील काही भाग आपल्या वाचकांसाठी देत आहोत. बळीचं राज्य नवखंडांचं!...

शुक्रवार, सप्टेंबर २०, २०१३

गणेशोत्सव- जल्लोष, उन्माद आणि बरंच काही

गणपती हा शब्दच गणपतीचे मूळ स्वरूप दाखवून देतो. गणांचा अधिपती तो गणपती असा सरळ, साधा अर्थ आहे. शिव-पार्वतीचा पुत्र असणारा हा गणपती वैदिकांसाठी सुरुवातीला विघ्नकर्ता होता. त्याने विघ्न आणू नये म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची आराधना करून होते. नंतरच्या काळात त्याचे मुळचे अवैदिक स्वरूप नष्ट होऊन त्याचे ब्राम्हणीकरण झाले. अवैदिक गणपतीचे वैदिक ब्रम्हणस्पतिबरोबर एकरूपत्व दाखवून गणेशाचे पूर्ण स्वरूप बदलवून टाकले. त्यासाठी जाणीवपूर्वक धार्मिक ग्रंथातून पूरक कथांची निर्मिती केली गेली....

शनिवार, ऑगस्ट ३१, २०१३

सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..

डॉ. नरेंद्र दाभोळकर बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?- राही भिड...

काय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात?

तुम्हीच ठरवा : अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आच? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ज्यासाठी लढा दिला त्या जादुटोणा विरोधी विधेयकाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकातील तरतुदींवर वेगवेगळी मते व्यक्त होत असताना त्यात नेमके काय आहे, हे जाणून घेतल्यास हे विधेयक म्हणजे श्रद्धेवर घाला आहे की अंधश्रद्धेवर प्रहार याचा फैसला लोक करू शकतील....

जादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास

१९९५ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणाविरोधी कायदा संमत व्हावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पाठपुरावा केला. त्यासाठी सत्त्ताधारी आणि विरोधकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळूनही विधिमंडळाच्या पटलावर त्यातील काही तरतुदींमुळे ते रखडले. त्यावरून खडाजंगीही झाली. विधेयकाचा खडतर प्रवास  विधेयकाचे शासकीय नाव : ‘महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अघोरी आणि अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम- २०११’ जुलै १९९५ : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा करण्याचे अशासकीय विधेयक मांडले गेले. विधान परिषदेत बहुमताने मंजूर....

बुधवार, ऑगस्ट २८, २०१३

सनातन विकृती

ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सुसंस्कृत पुण्यामध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. डॉ. दाभोलकरांचे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात पसरत चालले होते कि संकुचित मनुवादी प्रवृत्त्तींनी त्यांची खूपच धास्ती घेतली होती. समाजाला जाती-धर्माची, अंधश्रद्धेची नशा पाजून आपली तुंबडी भरणारे महाभाग समाजात भरपूर आहेत. या महाभागांनी दाभोलकर आणि अंनिसबद्दल आजपर्यंत खूप अपप्रचार केला. दाभोलकर हयात असताना त्यांच्याबद्दल खूपच असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करण्यात येत होती. परंतु हिंदू धर्म-संस्कृतीचा ठेका घेतलेले हे लोक किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचा अनुभव साऱ्या महाराष्ट्राने दाभोलकरांच्या हत्येनंतर घेतला. ...

मंगळवार, ऑगस्ट २७, २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत

डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर, सातारा. जन्मतारीख- ०१/११/१९४५ शिक्षण- एम.बी.बी.एस. (१९७०) वैद्यकीय व्यवसाय- १९७०-८२ Ø  १९८२ सालानंतर अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते. अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विरोधात सतत संघर्ष, लेखन, भाषण. आजवर हजारो व्याख्याने, शेकडो लेख, आकाशवाणी, दुरचित्र वाहिन्या यातील अनेक कार्यक्रमांत सहभाग. अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन याच्या विविध पैलूंवर बारा पुस्तकांचे लेखन. महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा करावा या प्रक्रियेत महत्वाचा...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या- पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छन

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे या पुण्यातील धर्मांध विचाराच्या (?) व्यक्तीने हत्या केली. महात्मा गांधींचे विचार पटत नसलेला एक वर्ग त्याकाळी होता. त्या गांधीविरोधी गटाचा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांना विरोध होता. परंतु वैचारिक संघर्ष करण्याची त्यांची कुवत नव्हती त्यामुळे त्यांनी गांधींचा विचार संपवण्यापेक्षा गांधीनाच संपवले. कारण तसे करणे सोयीस्कर होते. परंतु त्या मूर्खाना एवढे कळत नव्हते कि माणूस मारून त्याचे विचार मरणार नाहीत....

शनिवार, जुलै ०६, २०१३

सोमवार, एप्रिल १५, २०१३

आधुनिक भारताचे शिल्पकार:डा.बाबासाहेब आंबेडकर

डॉ.  बाबासाहेब आंबेडकर प्रा. हरी नरके   आधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले. त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना...

रविवार, एप्रिल ०७, २०१३

ओबीसी आरक्षण संकटात! मागासजातीय संघटना रस्त्यावर उतरणार- ओबीसी नेते श्रावण देवरे यांचे पत्रक

 प्रा. श्रावण देवरे मराठा समाजाला घटनाबाहृय पद्धतीने ओबीसींच्या यादीत घुसविण्याचा प्रयत्न महराष्ट्र शासन करीत आहे. असंख्य ओबीसी कार्यकर्त्यांनी प्रदिर्घ काळ संघर्ष करुन मिळविलेले ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून ते वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी संघटना रस्त्यावरच्या संघर्षाची तयारी करीत आहेत. या आंदोलनाची सुरुवात दि. 9 एप्रील मंगळवार रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसाच्या धरणे आंदोलनाने होत आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे ओबीसी संघटनेचे उपाध्यक्ष श्रावण देवरे यांनी दिली आहे....

शनिवार, मार्च ३०, २०१३

जलसंपत्ती...दुष्काळ आणि बाबासाहेब!

डॉ .  बाबासाहेब  आंबेडकर  लेखक - संजय सोनवणी.   महान नेत्यांचे अद्वितीय लक्षण म्हणजे त्यांची दूरदृष्टी. वर्तमान व भवितव्यातील समस्या कायमस्वरुपी यशस्वीपणे सोडवण्यासाठी लागणारी असामान्य प्रतिभा आणि उपायांची नेटाने केलेली राबवणुक. डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवजातीला अनेक क्षेत्रांत अनमोल योगदान आहे. बाबासाहेबांची प्रज्ञा बहुमुखी होती. १९३४ साली रिझर्व ब्यंकेची जी स्थापना झाली ती अर्थशास्त्रज्ञ या नात्याने हिल्टन यंग कमिशनसमोर बाबासाहेबांनी जे प्रस्ताव ठेवले होते त्या आधारावरच झाली हे सहसा आपल्याला माहि...

बुधवार, जानेवारी ०९, २०१३

साहित्य संमेलनावर वादाचा ‘परशु’

साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. प्रत्येक साहित्य संमेलनात साहित्यबाह्य विषयावरून वाद होतात आणि ते संमेलन इतर गोष्टींसाठीच लक्षात राहते. जो मूळ हेतू लक्षात घेऊन या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते तो हेतू सफल करण्याचे प्रयत्न कितपत होतात असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण साहित्य महामंडळाचे कारभारी आणि स्थानिक संयोजन समिती कशा प्रकारे वाद निर्माण करत असतात हे दरवर्षी आपण पाहत आहोतच. यावेळचे साहित्य संमेलन तर अनेक कारणांनी गाजत आहे. या संमेलनातील वादाची सुरवात झाली ती अध्यक्षीय निवडणुकीतील ह. मो. मराठे जातीयवादी प्रचाराने. ब्राम्हण मतांचे धृविकरण आपल्या...

साहित्य संमेलनातील वाद - बाळासाहेब ठाकरे आणि हमीद दलवाई

बाळासाहेब ठाकरे यंदाचे साहित्य संमेलन परशुरामाच्या एकाच वादापुरते मर्यादित नाही. संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला पुष्पा भावेंनी विरोध केल्यामुळे वातावरण आणखीनच तापले. १९९९ च्या साहित्य संमेलनाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांची संभावना बैल अशी केली होती. त्यावेळी सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध झाला होता. परंतु काही दिवसापूर्वी बाळासाहेबांचे निधन झाल्याने त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचे ...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes