ता. २० ऑगस्ट २०१३ या दिवशी अंधश्रद्धा निर्मुलन
समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि साधनाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा अज्ञात
मारेकर्यांनी निर्घृण खून केला. त्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरातून त्याविरोधात
तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. जनभावना लक्षात घेवून महाराष्ट्र सरकारने जादूटोणा
विरोधी कायद्याचा अध्यादेश काढला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री आर.
आर. पाटील यांनी त्यावेळी दाभोलकरांच्या हत्येचे सूत्रधार आणि सर्व षड्यंत्र
समाजासमोर आणण्याची घोषणा केली. त्यानंतर आज दीड महिना उलटून गेला तरी पोलिसांना
काहीच सुगावा लागलेला नाही.
आरोपी हे परराज्यातील आहेत आणि हा खून सुपारी देवून
झालेला आहे एवढाच निष्कर्ष पोलीस काढू शकले आहेत. काही लोकांना वाटतं कि पोलिसांना
वेळ द्यायला पाहिजे. परंतु किती ? दीड महिन्यात पोलिसांना आरोपी कोण आहेत हे माहित
होत नसेल तर पोलीस यंत्रणेचे ते अपयश आहे हे मान्य करायला हवे. आर. आर. आबांनीही
पोलिसांबद्दल फाजील विश्वास बाळगू नये. जर पोलीस अपयशी ठरत असतील तर या प्रकरणाचा
तपास सीबीआय कडे द्यावा अशी पुरोगामी कार्यकर्त्यांची मागणी आहे. केवळ पुणे
पोलिसांची प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रकरणाचा तपास वरिष्ठ तपास यंत्रणांकडे दिला
जात नाही कि काय अशी शंका येण्यास वाव आहे. फक्त आश्वासने देवून प्रश्न सुटणार
नाही हे सर्वाना माहित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण आणि गृहमंत्री आर. आर.
पाटील यांनी या प्रकरणात गांभीर्याने विचार करावा. कॉंग्रेस-राष्ट्रवादी दाभोलकरांच्या
हत्येचे राजकीय भांडवल करत असल्याचीही शंका वाटते. २०१४ च्या निवडणुकीसाठी या
प्रकरणाचा फायदा उठवण्याचा या पक्षांचा विचार आहे का अशीही शंका सामान्य माणसाच्या
मनात येत आहे.
2 टिप्पणी(ण्या):
मिस्टर प्रकाश पोळ, पुण्याचे आयुक्त गुलाबराव पोळ म्हणजे तुमचाच माणूस! मग तुम्हीच त्यांना प्रत्यक्ष भेटून ह्या प्रकरणाचा निकाल का लावत नाही?
हत्ये मागील कारण जरुर बाहेर येईल पण ते सोईचे असेल तर आणि योग्य मुहुर्तावर. तोपर्यंत पुरोगामी मंडळीनी सनातन व हिंदुत्ववाद्यांना शिव्या घालत रहावे.
त्यामुळे त्यांच्या पुरोगामी पणाचे नुतनीकरण होत राहील.
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ