
निधी चौधरी (IAS)
IAS अधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींबद्दल एक ट्विट केले आणि महाराष्ट्रभर वादाचा धुरळा उडाला. यामध्ये अनेक जण सामील झाले अन निधी चौधरी यांच्यावर कारवाईची मागणी केली गेली. माध्यमांनी हा विषय फारच लावून धरला. माध्यमांच्या अति जागृकतेमुळे आणि सोशल मीडियामधील नेटिझन्समुळे गेली चार दिवस हा विषय खूपच तापला. महात्मा गांधींसारख्या राष्ट्रपित्यावर अशा पद्धतीने कुणी टीका केली, त्यांचे पुतळे तोडा वगैरे म्हटलं तर लोकांना राग येणं साहजिकच आहे. ज्यांना गांधी पटतात वा किमान त्यांना विरोध तरी नाही असे सर्व लोक व्यक्त झाले. निधी चौधरी यांच्यावर चोहोबाजूंनी तुफान टीका झाली. यामुळे त्यांची बदली मंत्रालयात केली गेली....