शनिवार, एप्रिल १५, २०१७

अजून किती हुंडाबळी हवेत ?


दुर्दैवी शीतल वायाळ 


भिसे वाघोली जि. लातूर येथील शीतल वायाळ या मुलीने हुंड्याच्या भितीने आत्महत्या केली. मनाला अतिशय चटका लावणारी अशी ही घटना मराठवाड्याच्या
भूमीत घडली. फुले, शाहू, आंबेडकर, सावित्रीबाई यानी ज्या महाराष्ट्राला आपल्या विचार आणि कृतीतून पुरोगामी हे बिरुद मिळवून दिले त्या महाराष्ट्राची मान आज शरमेने खाली गेली. मराठा कुणबी समाजातील शीतलने समाजात चालणाऱ्या हुंड्यासारख्या अनिष्ठ प्रथांना कंटाळून आपले जीवन संपविले. आज एकविसाव्या शतकात भारत महासत्ता बनण्याची स्वप्ने पहात असताना अशा प्रकारे स्त्रीजीवनाची उपेक्षा होत आहे ही चांगली गोष्ट नाही. आत्महत्येपूर्वी शीतलने जी चिठ्ठी लिहिली आहे त्यात शितल म्हणते, "मराठा समाजातील या अनिष्ठ रूढींना कंटाळून मी आपले जीवन संपविले आहे" या प्रकरणानंतर समाजात हुंडा, त्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि एकंदरच समाजाची मानसिकता याबद्दल भरपूर बोलले, लिहिले जाईल.

शीतलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी 
राजकीय नेते शीतलच्या गावाला, घराला भेटी देती. फोटो काढतील. काही लोक पैशाच्या किंवा इतर स्वरुपात मदत करतील. समाजाचा असंतोष cash करुन सत्ता मिळविण्यासाठी खुबीने उपयोग करुन घेतला जाईल. परंतु हुंड्यासारख्या अनिष्ठ आणि कालबाह्य परंपरा संपविण्यासाठी कुणीच ठोस पुढाकार घेणार नाही. समाज चार दिवस चर्चा करुन सर्व विसरुन जाईल आणि पुन्हा एकदा दुसऱ्या शीतलच्या मृत्युची वाट पाहील. शीतलने आपले जीवन संपविले. खरतर हा समाजाने, समाजाच्या प्रतिष्ठेच्या चुकीच्या संकल्पनानी केलेला खून आहे. याच चुकीच्या गोष्टीनी शीतलला आपली जीवनयात्रा संपवायला भाग पाडले.

हुंडा ही अनेक वर्षांपासून समाजाला लागलेली कीड आहे. फक्त मराठा समाजातच हुंडा घेतला जातो असं नाही. सर्वच जातींमध्ये हुंड्याची प्रथा अस्तित्वात आहे. जातीची समाजातील प्रतिष्ठा जितकी जास्त हुंड्याचे प्रमाण तितके जास्त. मराठा समाज इतर जातींच्या तुलनेत प्रतिष्ठित मानला जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो. पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्यात हुंड्याचे प्रमाण जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: सांगली, सातारा, कोल्हापूर भागात हुंड्याची पद्धत जवळजवळ नामशेष झाली आहे. माझे मराठवाड्यात भरपूर मित्र आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे, संविधानाचा अभ्यास करणारे, समाजसुधारक वाचणारे माझे मित्र अधिकारी होतात तेव्हा त्यांचा दर ठरलेला असतो. हे अधिकारी भरपूर हुंडा घेतात. अगदी पाच लाखापासून २५-३० लाखापर्यंत हुंडा घेतला जातो. यासहित एकूण लग्नाचा खर्च बघता एका मुलीसाठी ३०-५० लाख खर्च येतो. गोरगरीब, शेतकरी, कामगार, मजूर यानी आपल्या मुलींची लग्न कशी करायची? हुंड्यासाठी लांबत असलेले लग्न, आई-बापाची तगमग बघून कोणत्या मुलीची जगायची उर्मी राहील. आपल्या लग्नासाठी आपला बाप रोज थोडा थोडा मरतोय हे बघुन त्या मुलीला जीव द्यावासा वाटणार नाही का ?

या सर्व प्रकारानंतर एकही युवक उभा राहून मी हुंडा घेणार नाही असे म्हणू शकत नाही यातच सारे आले. मराठा असो किंवा इतर कोणताही समाज असो, आपल्या समाजाच्या आरक्षण, सत्तेत सहभाग अशा गोष्टींसाठी जसे आपण भांडतो तसेच समाजातील अनिष्ठ परंपरांच्या विरोधात लढा उभारणार आहोत का? मराठ्यांचे लाखांचे क्रांतीमोर्चे निघाले. हुंड्याच्या विरोधात असा क्रांतीमोर्चा निघणार आहे का? आपल्या समाजातील युवक वर्गाचे आपण प्रबोधन करणार आहोत कि नाही?

हुंडा घेणारे, स्त्रियांना त्रास देणारे अशांच्या विरोधात आपण सामाजिक दबाव तयार करणार आहोत कि नाही? आणि याची सुरुवात स्वत:पासून करायला काहीच हरकत नाही. शीतलच्या बलिदानाला साक्षी मानून आजपासून प्रतिज्ञा करुया कि मी हुंडा घेणार नाही, सर्व स्त्री वर्गाचा आदर करेन आणि समाजात घडणाऱ्या अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीना ठाम विरोध करेन ..... आपण  स्वत:मध्ये सकारात्मक बदल घडविला तर समाज नक्की बदलेल.... शीतल तुझे बलिदान व्यर्थ जाणार नाही....

15 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

Sir Are you from the martaha caste...Then it's okay if you talk about dowry practice amongst Marathas but if you are from other caste then you sound like a biaSed person...Because i have read your previous posts and they are biaSed against maratha caste... So that's okay only if you are from maratha caste and trying to bring a reform in marriage ... I'm a maratha and I'll be with you even though you haven't thought through whole process of maratha alienation phenomenon happening in education since decades and in power from 2014...

pramod म्हणाले...

Is there communalism required to lift the society from old outdated molethods or system...
Sir, it doesn't matter we are marathas, brhamins or in any casts only matter is we have to break those process which leads to damage society so the posts written by Prakash are not against any specific society but are against the processes ....

I am sorry sir but we have come out from this mentality and unite against old systems which are bad ones.

अनामित म्हणाले...

Sir actually it's true that we must take efforts as a unified society....But the case is we are not.. Marathas have different problems which are 1. Negligence towards education 2. No support like reservation or tuition fee waiver(same for all the open category people)..3. low land holding(common for all castes) 4.peculiar inclination for politics...5.No lower caste factor to hide behind 6.Dowry problem 7.No intellectuals from the caste who can support and guide the maratha youth...8.since most of the marathas are farmers they face same problem as other farmers like no MSP is granted and etc. Now add to this the traditional burden of being the Respected and Village Head maratha 2hich gives rise to silly concepts of prestige and respect.. If instead of taking these aspects into account one sings the same song of 'Ban dowry' then nothing will happen. Same situation is applicable for all the castes which have their own problems and strengths.. just singling out marathas won't help..And real problem won't be solved..

अनामित म्हणाले...

खांदा कोणाचा आहे ते कळलं. बंदूक कोणाची आहे तेही कळलं तर बरं होईल!

अनामित म्हणाले...

Obviously खांदा साहेबांचा आहे. बंदूक नेहमीप्रमाणे मराठा विरोधक चालवितात. सगळ्या अन्यायच मूळ मराठा आहेत. त्यांच्यात बुद्धी नाही, विषमता आहे, अभ्यासू प्रवुत्ती नाही असे सगळे एकसुरात म्हणतील पण त्यांना मागास ठरवतील पण त्यांना आरक्षण नको रे बाबा... असा सगळा गोंधळ आहे एकूण

अनामित म्हणाले...

35 lakh kharch karnara manus karodpati asto . ugach kahichya kahi fafat pasara nako lihat jau . Marathi lokmadhe barech mula/muli gharchi paristhiti garibichi aslyane pude shikta yet nahi mhanun gharich basun astat .
ek kali samrudha asnanra shetakri varg, shetichy avatny ahot gelyane , dushkal , sheti malala yogya bhav naslyane ganjun gela aahe aahe.
kahi varshapurvi pan laturmadhe ek muline collgela janyastahi bus che pas ceh paise nahit mhanun aatmhatya keli hoti.

UX Design Studio म्हणाले...

I am extremely impressed along with your writing abilities, Thanks for this great share.

अनामित म्हणाले...

हुंडा समस्या फक्त मराठाच नव्हे तर सर्वच समाजाला भेडसावत आहे.
आंतरधर्मीय तसेच आंतरजातीय आणि प्रेमविवाह हेच आता हुंडाबळी प्रथेपासून वाचवू शकतील !!!

प्रकाश पोळ म्हणाले...

Sir Are you from the martaha caste...Then it's okay if you talk about dowry practice amongst Marathas but if you are from other caste then you sound like a biaSed person.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
नमस्कार सर,
मराठाच काय कोणत्याच समाजाचा मी द्वेष करू शकत नाही. समाज व्यवस्थेची चिकित्सा करताना जर एखाद्या समाजाचा संदर्भ आला तर तो द्वेष कसा होईल. मराठा समाजाबद्दल मराठा समाजातील व्यक्तीने लिहिले तर चालते परंतु इतरांनी लिहिले कि द्वेष होतो काय ? मी हि पोस्ट प्रामाणिकपणे लिहिली आहे. मराठा समाजाचा द्वेष नाही करत मी हे कृपया समजून घ्या. हुंडा हि समस्या फक्त मराठा समाजापुरती नाही हे मी लिहिलेय. पण शीतल मराठा आहे आणि तिने आपल्या समाजातील अनिष्ठ रुढींचा उल्लेख केला म्हणून मी तो संदर्भ दिला एवढेच. कृपया मूळ मुद्दा समजून घ्या.

प्रकाश पोळ म्हणाले...

खांदा कोणाचा आहे ते कळलं. बंदूक कोणाची आहे तेही कळलं तर बरं होईल!>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
खांदा आणि बंदूक शोधा तुम्हीच. पण वाद घालूनसुद्धा मूळ समस्येवर आपण एकत्र काम करू शकतो.

प्रकाश पोळ म्हणाले...

हुंडा ही अनेक वर्षांपासून समाजाला लागलेली कीड आहे. फक्त मराठा समाजातच हुंडा घेतला जातो असं नाही. सर्वच जातींमध्ये हुंड्याची प्रथा अस्तित्वात आहे. जातीची समाजातील प्रतिष्ठा जितकी जास्त हुंड्याचे प्रमाण तितके जास्त. मराठा समाज इतर जातींच्या तुलनेत प्रतिष्ठित मानला जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणात हुंडा घेतला जातो.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
कृपया लेखामधील वरील मजकूर पुन्हा एकदा वाचावा.

आकाश श्रीहरी जगताप म्हणाले...

छान लेख आहे.प्रबोधन करणे गरजेचे आहे सर्वच समाजाचे.

K. Vilas म्हणाले...

I am very much influenced by the writings of Dr. A.H. Salunkhe and M.M. Deshmukh. To mention few Vidrohi Tukaram and Astishiromani Charvak by Dr. Salunkhe
Madhyaygeen Bharataacha itihaas by M.M

K. Vilas म्हणाले...

Congratulations on competing 5 years of your blog.

Unknown म्हणाले...

Aaplya blogchi watachal aakhandapane suru aasallyache blogpostwarun samajale.ABHINAnDAN.
kharetar me nukatech fb v blog vishwat safaring karato aahe. mala ethe ek janavatey ki ethe far mothyapramanat jatinusar..panthanusar..dharmanusar.. vicha v gatanusar kampugiri(gat)nusar aapapale vaicharik mudde maandun retun aapalech barobar aasa aagrahi prach
ar v prssar hoto aahe.aaso.chuk ki barobar ya vadat mi padat nahi. pan purogamtavachi laat ethe osandun vahate yacha matra khup aanand watato.bhetat rahu aaplya fb page var.aabhar.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes