![]() |
दैनिक लोकसत्ता, २७ ऑगस्ट २०१८ |
दिनांक २४ ऑगस्ट रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा केल्यामुळे वाद निर्माण झाला. महाविद्यालय प्रशासनाच्या या कृतीचा पुरोगामी कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. सदरचा प्रकार गंभीर असून त्यामुळे भारतीय संविधानाचे उल्लंघन होत असल्याने त्याची चर्चा क्रमप्राप्त ठरते.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य असेल असे म्हटले आहे. याचा अर्थ राज्याला कोणताही अधिकृत धर्म नसेल. राज्य कोणत्याही धर्माला झुकते माप देणार नाही. घटनेच्याच २५व्या कलमात प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे. आपल्या प्रथा, परंपरा, धार्मिक तत्वे यांचे पालन करण्याचा, प्रसार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र हा अधिकार अमर्यादित नाही. शासन लोकांच्या धार्मिक अधिकारांवर सुयोग्य बंधने लादू शकते. त्यामुळेच शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी कोणत्याही धर्माचे प्रदर्शन किंवा कर्मकांड करणे यावर बंधने घातली गेली आहेत. शाळा, महाविद्यालये या तर विवेकी नागरिक घडवणाऱ्या संस्था आहेत. असे असताना या संस्थांमधून एकाच विशिष्ट धर्माच्या प्रथा, परंपरा व कर्मकांड यांचा पुरस्कार होत असेल तर विवेकी नागरिक घडवण्याची अपेक्षा आपण कशी करायची. राज्यघटनेत सांगितलेले वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याचे मग काय करायचे? सत्यनारायण पूजा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड कशी काय घालता येईल. सत्यनारायण पूजेत कोणते शैक्षणिक मूल्य आहे याचे स्पष्टीकरण कॉलेज प्रशासन देईल का ? एकाच धर्माचा पुरस्कार केल्याने जर इतर धर्मीय नागरिकांनी जर आपापल्या धार्मिक परंपरांचे पालन करण्याचा आग्रह अशा संस्थांकडे धरला तर शाळा-महाविद्यालये धार्मिक अड्डे बनणार नाहीत का? अशा संस्थांतून नक्की कोणत्या प्रकारचे विद्यार्थी बाहेर पडतील?
आज समाजात धार्मिक कट्टरता वाढीस लागली आहे. विज्ञानाच्या युगात आजचा तरुण धार्मिक गुलामीमकडे वळत आहे. धर्माच्या विखारी प्रचारामुळे तरुणांची माथी भडकत आहेत. डॉ. दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी या विवेकवाद्यांच्या हत्या झाल्या आहेत. आजच्या तरुणांसाठी रोजगार महत्वाचा असला तरी त्यांना ३२ मन सोन्याचे सिंहासन व खडा पहारा या नादाला लावले जाते. अशा परिस्थितीत फर्ग्युसनसारखी महाविद्यालये धार्मिक कर्मकांडाला प्रोत्साहन देत असतील तर ते निषेधार्ह आहे. अशाने आपली वाटचाल मध्ययुगाकडे होण्याचीच दाट शक्यता वाटते.
4 टिप्पणी(ण्या):
vada pav khanar ka?
convent madhe prayers hotat tya banda kara ki
आबे भुसनाळ्या कायबी पांचट हाणू नको लोकांची कामे कर
मायला जो तो उठतो आणि उगाच मोठी मोठी हाणत बसतो... ह्या जगात उपदेश देणारे लई आणि ऐकणारे कमी झालेत...
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ