छ. शिवराय....स्वराज्याची स्थापना करून या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष....स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव....या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे दृष्टे राजे..... प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे नाव घेतले की ३३ कोटी देवांची फलटण बाद होते, इतकी ताकद 'शिवाजी' या नावात आहे”...