दलित हत्याकांड हा समाजात नेहमीच ऐरणीवर असणारा विषय आहे. कारण वरचेवर देशात दलित समाजातील व्यक्तींवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे पुरोगामी म्हणवला जाणारा महाराष्ट्र दलितांवरील अन्याय, अत्याचारात सर्वात पुढे आहे. सहा-सात वर्षांपूर्वीच सार्या समाजमनाचा थरकाप उडवणारे खैरलांजी हत्याकांड झाले. या बिभत्स हत्याकांडाने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे सामाजिक वातावरण ढवळून निघाले. एकाच कुटूंबातील चार व्यक्तींची हत्या आणि त्या कुटुंबातील माय-लेकींवर झालेला बलात्कार याने कोणत्याही संवेदनशील माणसाचे मन द्रवले असेल.
खैरलांजी प्रकरणाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोवर खर्डा येथील नितीन आगे याच्या हत्येने पुन्हा दलितांवरील अन्यायाचा मुद्दा पुढे आला. याच्या अधेमधेही अनेक ठिकाणी दलित हत्याकांड. बलात्कार, मारहाण, जाळपोळ अशा प्रकारच्या घटना घडल्या. काही घटनांचा माध्यमातून गवगवा झाला तर काही दुर्लक्षिल्या गेल्या. काही प्रकरणात पिडीताना न्याय मिळाला, तर अनेकजण अजून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. काळ बदलला, जातीव्यवस्थेचा परमोच्च बिंदू अस्प्रुष्यता तोही काळाच्या ओघात मागे पडला. परंतू तरीही दलितांवरील अत्याचार थांबायला तयार नाहीत.
एकीकडे देशाला महासत्ता बनवण्यासाठी चाललेले जोरदार प्रयत्न, अच्छे दिन आणण्याचे स्वप्न आणि दुसरीकडे दलित, मागास समाजातील व्यक्तींवर होणारे हल्ले, बलात्कार, हत्या या भयानक विसंगतीत आपण जगत आहोत. पिडीत, शोषित अशा समाजाला आत्मभान मिळवून देण्यासाठी, त्यानी स्वाभिमानाने जगावे म्हणून प्रव्रुत्त करण्यासाठी महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पेरियार यानी जातीव्यवस्थेच्या, धर्मव्यवस्थेच्या दलालांशी लढा दिला. दलित, मागास समाजात आत्मविश्वास निर्माण केला. या आणि इतर अनेक महामानवानी केलेल्या संघर्षामूळे दलित समाज स्वाभिमानाने पेटून उठला. बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र अंगिकारुन दलितानी विषमतावादी सामाजिक व्यवस्थेचे जू फेकूण दिले. परंतू शेकडो वर्षे आपल्या इशार्यांवर नाचणारा, आपल्यापुढे खाल मानेने जगणारा हा समाज आपल्या बरोबरीने चालायची भाषा करतो हे इथल्या जातीव्यवस्थेच्या लाभार्थ्याना थोडीच खपणार आहे. दलितानी आपल्या पायरीनेच रहावे अशी अपेक्षा असणार्या या सरंजामदारी प्रव्रुत्तीना दलितांच्या स्वाभिमानी बाण्याने चांगलीच ठेच बसली. आजपर्यंत जातव्यवस्थेचे फायदे घेतले, मागासाना हवे तेव्हा, हवे तसे पायदळी तूडवले आणि आता हेच मागास आपणाला जुमानत नाहीत हे दिसताच या जातीयवादी प्रव्रुत्ती खवळल्या. त्यातूनच मग अशा प्रकारच्या दलित अत्याचाराच्या घटना घडू लागल्या.
अशा प्रकारच्या घटनात सरकारी पातळीवरुनही प्रचंड उदासीनता दाखवली जाते हे आपण खैरलांजी प्रकरणात पाहिलेच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे, विचारांचे असले तरी दलितांवरील अत्याचारात अजिबात खंड पडलेला नाही. दलित समाजाकडे पहाण्याची तिरस्कारदर्षक भावना, पुर्वग्रुह, स्वजातीचा अभिमान (कि माज) ही दलित अत्याचाराची कारणे आहेत. चार दोन लोकाना शिक्षा झाल्या म्हणून हे अत्याचार थांबतील असे मानायचे काहीही कारण नाही. जोपर्यंत समाजाची कलुषित मानसिकता बदलत.नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडत राहणार. कारण या घटनांचे मूळ जातीव्यवस्था आणि समाजाची दूषित मानसिकता हेच आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकरणात शोषित, पिडीत व्यक्तीच्या, कुटूंबाच्या मागे सर्व समाज उभा रहात नाही. ज्या जातीतील व्यक्तींवर अन्याय झाला आहे त्यांचे ते पाहून घेतील ही समाजविघातक व्रुत्ती सामान्य माणसात आढळते. हाही द्रुढ जातीव्यवस्थेचा परिपाक होय. अर्थातच याला काही सन्माननीय अपवादही आहेत. परंतू बहुतांशी समाज मात्र अशा प्रकरणात शांतच राहतो. दलित अत्याचाराच्या सर्व घटनांमध्ये अत्याचार करणारे बहुजन समाजातीलच असतात. जातीव्यवस्था हा जरी इथल्या ब्राह्मणी व्यवथेचा परिपाक असला तरी त्यामाध्यमातून अन्याय करणारे बहुजन समाजातीलच घटक आहेत हेहे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. अन्याय करणारा बहुजन आहे ब्राह्मण, मराठा आहे कि ओबीसी हा वाद न करता अशा प्रकारच्या प्रव्रुत्तीना कठोर शिक्षा होऊन पिडीताना न्याय मिळावा म्हणून सर्व समाजाने आग्रही राहिले पाहिजे. खर्डा प्रकरणात काही लोकानी दुर्दैवी भूमिका घेऊन दलित हत्याकांडाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या लोकानाही समाजाने त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे. शेवटी आपण सर्व माणसेच आहोत.....तर माणूस म्हणून एकत्र येवूया आणि अशा घटनाना पायबंद घालूया. जातीयवाद्याना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आग्रही राहूया. तरच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांतील समतावादी, एकमय समाजनिर्मितीचे स्वप्न आपण पूर्ण करु.
-प्रकाश पोळ.
3 टिप्पणी(ण्या):
tumhi jatine kon ahhat.
हा हा हा हा
अहो पोळ साहेब
हां चश्मा काढ़ा हो डोळ्या वरचा
समाजाच्या प्रत्यक जाती घटका मधे खून दरोडे मारामारया हे चालूच आहे
ब्राम्हण मराठा दलित सगळ्या ठिकाणी खून होतातच की गुन्हेगार हां गुन्हेगार असतो
दलित समाजा मधे पण
कौटुंबिक वाद
अंतर्गत कलह
जमिनीचे वाद चालूच असतात
आणि दलितांचा कोणताही गुन्हा समोर आला की आपण लगेच दलितां वर अत्याचार झाला अस बोलून कस चालेल.??
म्हणजे कोणा सवर्णाचा खून झाला तर तो फ़क्त खून
आणि दलिटाचा खून झाला की त्याला लगेच जातिक लेबल आणि आत्याचाराच् नाव देऊन रिकाम व्हायच का..??
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ