प्रकाश पोळ.
--------------------------------------------------------
19 सप्टेंबरच्या सकाळमध्ये 'सावध ऐका,चिनी हाका' हा अग्रलेख वाचला. अग्रलेखात म्हंटल्याप्रमाणे भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधामध्ये प्रगती साधण्यातील मुख्य अडथळा सीमाप्रश्नाबरोबरच परस्पर व्यापारातील तूट हाही आहे. गेल्या काही वर्षात चीनकडून होणारी भारताची आयात लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. परंतू भारत करत असलेली निर्यात मात्र त्या प्रमाणात वाढताना दिसत नाही. 1990-91 पर्यंत भारतासोबत
नगण्य व्यापार असणार्या चीनने सध्या भारतीय बाजारपेठ काबीज करुन टाकली आहे. भारत चीनला लोहखनिज निर्यात करतो तर चीनकडून भारत अनेक गोष्टी आयात करतो. चीनकडून भारताला होणारी निर्यात वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे चीनमध्ये तयार होणार्या स्वस्त मालाशी भारतीय माल स्पर्धा करु शकत नाही. उदाहरण सांगायचे तर रक्षाबंधनला लागणार्या राख्या चीनमधून आल्या होत्या. दिवाळीत आपण वाजवत असणारे फटाके मोठ्या प्रमाणात चीनमधून येतात. हा माल भारतात तयार होणार्या मालापेक्षा स्वस्त आणि आकर्षक असतो. त्यामूळे ग्राहकांची पसंतीसुद्धा चीनी मालालाच अधिक मिळते. गेल्या काही वर्षात चीनला भारताकडून होत असणार्या निर्यातीचे प्रमाणही वाढून 7.5% झाले आहे. परंतू भारत करत असलेली आयात ही 11.4% आहे. चीनचा भारतीय व्यापारातील चीनचा हिस्सा 9.52% असून तो प्रथम क्रमांकाचा भागीदार देश आहे. चीनकडून भारत करत असलेली आयात काळाच्या ओघात वाढणार आहे हे ग्रुहित धरुन आपली त्याना होणारी निर्यात कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी दर्जेदार मालाचे उत्पन्न, बाजारपेठेचा अभ्यास या गोष्टींवर प्रामुख्याने भर द्यावा लागेल.
प्रकाश लालासाहेब पोळ,
कराड, सातारा.
मोबा. 7588204128, 9552616160.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ