
विधानसभेची
निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या
पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी
कॉंग्रेस यांच्या १५ वर्षे सत्तेत असलेल्या आणि कथित फुले-शाहू-आंबेडकरवादी
सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या या आघाडी सरकारच्या
काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे
कुटुंबियांना दीर्घ प्रतीक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार
आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये
अशा स्वरूपाच्या हिंसेचे क्रौर्य वाढलेले दिसते. नेवासा येथील सोनई
हत्याकांड असो की खर्डा येथे नितीन आगे या महाविद्यालयीन तरुणाचा केलेला
खून, या प्रकारच्या हल्ल्यांमधून ना सरकारी यंत्रणा शहाणी झाली, ना
अन्यायाला वाचा फोडणारे आपण यातून...