शनिवार, ऑगस्ट ३१, २०१३

सावधान! सनातन 'शक्ती' वाढतेय..

डॉ. नरेंद्र दाभोळकर बहुजन आणि अभिजन वारकरी अशा दोन वर्गांत वारकरी विभागले आहेत. बहुजन वारकर्‍यांनी संत तुकारामांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम अंधश्रद्धेविरुद्ध भूमिका घेतली आहे. संत तुकाराम म्हणतात, 'तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, शेंदरी हेंदरी दैवते, कोणी ती पूजते भूतेखेते' या विचारांवर श्रद्धा असणारे वारकरी अंधश्रद्धा विधेयकाला विरोध करतील का?- राही भिड...

काय आहे जादूटोणाविरोधी विधेयकात?

तुम्हीच ठरवा : अंधश्रद्धेवर प्रहार की श्रद्धेवर आच? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धाविरोधी चळवळीचे अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ज्यासाठी लढा दिला त्या जादुटोणा विरोधी विधेयकाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या विधेयकातील तरतुदींवर वेगवेगळी मते व्यक्त होत असताना त्यात नेमके काय आहे, हे जाणून घेतल्यास हे विधेयक म्हणजे श्रद्धेवर घाला आहे की अंधश्रद्धेवर प्रहार याचा फैसला लोक करू शकतील....

जादूटोणाविरोधी विधेयकाचा खडतर प्रवास

१९९५ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन आणि जादूटोणाविरोधी कायदा संमत व्हावा यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पाठपुरावा केला. त्यासाठी सत्त्ताधारी आणि विरोधकांच्या गाठी-भेटी घेतल्या. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळूनही विधिमंडळाच्या पटलावर त्यातील काही तरतुदींमुळे ते रखडले. त्यावरून खडाजंगीही झाली. विधेयकाचा खडतर प्रवास  विधेयकाचे शासकीय नाव : ‘महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अघोरी आणि अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम- २०११’ जुलै १९९५ : भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा करण्याचे अशासकीय विधेयक मांडले गेले. विधान परिषदेत बहुमताने मंजूर....

बुधवार, ऑगस्ट २८, २०१३

सनातन विकृती

ता. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सुसंस्कृत पुण्यामध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. डॉ. दाभोलकरांचे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात समाजात पसरत चालले होते कि संकुचित मनुवादी प्रवृत्त्तींनी त्यांची खूपच धास्ती घेतली होती. समाजाला जाती-धर्माची, अंधश्रद्धेची नशा पाजून आपली तुंबडी भरणारे महाभाग समाजात भरपूर आहेत. या महाभागांनी दाभोलकर आणि अंनिसबद्दल आजपर्यंत खूप अपप्रचार केला. दाभोलकर हयात असताना त्यांच्याबद्दल खूपच असभ्य भाषेत टिकाटिपण्णी करण्यात येत होती. परंतु हिंदू धर्म-संस्कृतीचा ठेका घेतलेले हे लोक किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याचा अनुभव साऱ्या महाराष्ट्राने दाभोलकरांच्या हत्येनंतर घेतला. ...

मंगळवार, ऑगस्ट २७, २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकर जीवनवृत्तांत

डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर, सातारा. जन्मतारीख- ०१/११/१९४५ शिक्षण- एम.बी.बी.एस. (१९७०) वैद्यकीय व्यवसाय- १९७०-८२ Ø  १९८२ सालानंतर अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते. अंधश्रद्धा, बुवाबाजीच्या विरोधात सतत संघर्ष, लेखन, भाषण. आजवर हजारो व्याख्याने, शेकडो लेख, आकाशवाणी, दुरचित्र वाहिन्या यातील अनेक कार्यक्रमांत सहभाग. अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टीकोन याच्या विविध पैलूंवर बारा पुस्तकांचे लेखन. महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा करावा या प्रक्रियेत महत्वाचा...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या- पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छन

३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे या पुण्यातील धर्मांध विचाराच्या (?) व्यक्तीने हत्या केली. महात्मा गांधींचे विचार पटत नसलेला एक वर्ग त्याकाळी होता. त्या गांधीविरोधी गटाचा महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांना विरोध होता. परंतु वैचारिक संघर्ष करण्याची त्यांची कुवत नव्हती त्यामुळे त्यांनी गांधींचा विचार संपवण्यापेक्षा गांधीनाच संपवले. कारण तसे करणे सोयीस्कर होते. परंतु त्या मूर्खाना एवढे कळत नव्हते कि माणूस मारून त्याचे विचार मरणार नाहीत....

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes