भारताविरुद्ध असलेला पाकिस्तानचा सामना म्हणजे एक धर्मयुद्ध आहे, अशी भूमिका बऱ्याच लोकांनी घेतली. क्रिकेट सारख्या खेळाला धर्मयुद्धाचे, हिंदू-मुस्लीम वादाचे स्वरूप देवून सामान्य माणसाच्या भावना भडकावण्याचे पाप काही लोकांनी केले. पाक विरुद्धचा सामना आपण जिंकला. त्यानंतर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देताना हिंदुनी मुसलमानावर विजय मिळवला अशा प्रकारची मांडणी केली. आता आपला अंतिम सामना श्रीलंकेबरोबर आहे. भारत अंतिम फेरीत पोहचला ही सर्व भारतीयांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. त्याबद्दल जरूर तो आनंद व्यक्त करावा. परंतु आनंदाच्या प्रदर्शनाचा अतिरेक झाला तर मात्र आपला उन्मत्तपणा दिसून येतो. श्रीलंका हा भारताचा शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध मांडण...