
देव कोणाला म्हणावं ? संत कोण आहे हे कसं ओळखावं ? या प्रश्नांची उत्तरे संत तुकोबानी साडेतीनशे वर्षांपूर्वीच दिली आहेत. तुकोबा म्हणतात,
"जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुला,
तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा..."
साडेतीनशे वर्षांपूर्वी जे तुकोबांना उमगलं ते आज एकवीसाव्या शतकात आपणाला कळू नये यासारखी शोकांतिका नाही. दोन दिवसांपूर्वी हरियाणातील हिस्सार येथील रामपाल या तथाकथित बाबाला पोलीस कारवाई...