
साहित्य
संमेलन आणि वाद हे समीकरण काही नवे नाही. प्रत्येक साहित्य संमेलनात साहित्यबाह्य
विषयावरून वाद होतात आणि ते संमेलन इतर गोष्टींसाठीच लक्षात राहते. जो मूळ हेतू
लक्षात घेऊन या साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते तो हेतू सफल करण्याचे प्रयत्न
कितपत होतात असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. कारण साहित्य महामंडळाचे कारभारी
आणि स्थानिक संयोजन समिती कशा प्रकारे वाद निर्माण करत असतात हे दरवर्षी आपण पाहत
आहोतच. यावेळचे साहित्य संमेलन तर अनेक कारणांनी गाजत आहे. या संमेलनातील वादाची
सुरवात झाली ती अध्यक्षीय निवडणुकीतील ह. मो. मराठे जातीयवादी प्रचाराने. ब्राम्हण
मतांचे धृविकरण आपल्या...