शनिवार, ऑगस्ट ०४, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग ३

तुकोजीरावांचा आंतरधर्मीय विवाह तुकोजीराव होळकर (III) बावला खून खटल्यानंतर  १९२६ मध्ये तुकोजीराव यांनी गादी सोडली आणि युरोप-अमेरिकेकडे रवाना झाले. तिथेच त्यांची ओळख मिस मिलर यांच्याशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि तुकोजीरावानी मिलर यांच्याशी लग्न करायचे ठरविले. १९२८ मध्ये तुकोजीराव मिलर यांना घेवून भारतात आहे. त्यांनी तिच्याशी रीतसर लग्न केले. मिलर यांनी हिंदू धर्म स्वीकारला. लग्नानंतर त्यांचे नाव शर्मिष्ठादेवी असे झाले. तुकोजीराव आणि शर्मिष्ठादेवी आयुष्यभर एकत्र राहिले. परंतु त्यांच्या लग्नाबद्दलही जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम चालू आहे. इंटरनेट वर अनेक ब्लॉगधारकांनी बावला खून...

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग २

                                 बावला खून खटला महाराजा तुकोजीराव होळकर (III)    बावला खून खटला हे तुकोजीरावाच्या आयुष्यातील अतिशय दुर्दैवी प्रकरण होय. या प्रकरणात त्यांची खूप बदनामी झाली, त्यांना विनाकारण मनस्ताप सोसावा लागला. शेवटपर्यंत या खून खटल्यात तुकोजीरावांचा सहभाग असल्याचा एकही पुरावा सापडला नाही, तरी कपाळकरंट्या लोकांनी तुकोजीरावच मुख्य आरोपी आहेत असे मानून या प्रकरणाची मांडणी केली . बावला खून खटल्याची थोडक्यात कहाणी अशी की, ...

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१२

महाराजा तुकोजीराव होळकर (III) - भाग १

तुकोजीराव होळकर (III) आपल्या समाजात अनेक महामानवांनी सामाजिक सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्यामध्ये विचारवंत, लेखक ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे प्रत्यक्ष सत्ता हातात असणारे राजे, महाराजे, संस्थानिक सुद्धा आहेत. यामध्येच इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. परंतु तुकोजीरावांचे सामाजिक काम समाजासमोर फारसे मांडले गेले नाही. आणि जर कुणी तुकोजीरावांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतलाच तर समाजात त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण होवू नये म्हणून प्रस्थापित लेखणीबहाद्दार आणि सनातनी लोकांनी तुकोजीरावांची एवढी बदनामी केली की त्यापुढे त्यांचे सामाजिक कार्य झाकोळून जाईल. त्यामुळे तुकोजीरावांचे सामाजिक कार्य समाजासमोर मांडण्याचा आणि त्यांच्यावरील आरोपांचे खरे स्वरूप दाखवण्याचा हा लेखनप्रपंच....

संभाजी ब्रिगेडने विचार करावा

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक या लेखाचा उद्देश संभाजी ब्रिगेडची बदनामी करणे नाही हे लेख संपूर्ण वाचल्यानंतर लक्षात येईल. मी स्वतः संभाजी ब्रिगेडबरोबर काम केले आहे. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती मला माहित आहे. त्यांच्या कार्याने विचाराने प्रभावित होवून मी त्यांच्याबरोबर काम केले आहे. प्रश्न केवळ ब्रिगेडचा नाही. कोणतीही बहुजनवादी, पुरोगामी संघटना या माझ्यासाठी आदरणीय आहेत. वेळोवेळी अशा सर्व संघटनांमध्ये मी काम करीत आलो आहे. परंतु ब्रिगेड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक प्रॉब्लेम आहे. तो म्हणजे त...

गुरुवार, ऑगस्ट ०२, २०१२

वाघ्याला हटवण्याची संभाजी ब्रिगेडची कृती फुले-शाहू-आंबेडकरवादास घातक

अखेर रायगडवरील बहुचर्चित वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला. गेले अनेक दिवस वाघ्या कुत्र्याच्या प्रश्नावरून उलट-सुलट चर्चा चालू होती. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत रायगडवरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्यासाठी जोरदार आंदोलन उभे केले होते. वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या एका महाराणीच्या समाधीवर ब्राम्हणांनी जाणीवपूर्वक उभा केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवराय आणि त्यांच्या महाराणी यांची बदनामी करणाऱ्या या कुत्र्याचा पुतळा रायगडवरून काढून टाकावा अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका होती. (संभाजी ब्रिगेडच्या सविस्तर भूमिकेसाठीक्लिक करा.) परंतु रायगडवरील शिवस्मारकाला इंदूरचे महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय यांनी आर्थिक मदत केली असल्याने धनगर समाजाचा वाघ्याचा पुतळा काढण्याला...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes