सोमवार, जानेवारी ३१, २०११

इतिहासाची पुनर्मान्डणी अत्यावश्यक

भुतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत माहीती म्हणजे इतिहास होय, अशी इतिहासाची व्याख्या केली जाते. त्यामुळे भूतकाळात जे घडले ते निपक्षपातीपणे सांगणे हा इतिहासाचा हेतू होय. परंतू आजपर्यंत बहुजनाना इतिहासाच्या नावाखाली त्यांच्याच पराभवाच्या, बदनामीच्या गोष्टी तिखट-मिठ लावून सांगीतल्या गेल्या. स्वाताच्या पूर्वजांचा इतिहास समजून घेण्यासाठी बहुजन समाज ब्राम्हनावर अवलंबुन राहीला हे बहुजन समाजाचे दुर्दैव होय. ...

गुरुवार, जानेवारी २७, २०११

शिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा ?

रामदास आठवले महाराष्ट्रातील दलित चळवळीतील एक महत्वाचे नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतीच सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या एकीकरणाचा नारा दिला. या भेटीत अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी या भेटीमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत....

रविवार, जानेवारी २३, २०११

महान क्रांतिकारक : संगोळी रायन्ना

संगोळी रायन्ना संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही. या संकुचित प्रवृत्तीनीच छ. शिवराय आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक यांना महाराष्ट्रापुरते संकुचित करून टाकले. त्यांचा आदर्श, त्यांचे चरित्र इतर राज्यातील लोकांपर्यंत नीट पोहचू दिले नाही. आपला सामाजिक, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या महामानवांच्या नावाचा, कर्तुत्वाचा दुरुपयोग केला...

शनिवार, जानेवारी २२, २०११

बाबासाहेब पुरंदरे : समज; गैरसमज

बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब  पुरंदरे यांची 'राजा शिवछत्रपती' ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. गेली अनेक वर्षे या कादंबरीने बहुजन समाजाच्या मनात शिवचरीत्राविषयी अनेक गैरसमज निर्माण करून ठेवले . शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. प्रचार-प्रसाराची माध्यमे ब्राम्हनान्च्या ताब्यात असल्याने त्यानी पद्धतशीरपणे ही कादंबरी म्हणजे सत्य इतिहास असा भास निर्माण केला आहे. सामाजिक जाणीव नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला पुरंदरेंची ही कादंबरी म्हणजे उत्कृष्ट साहित्य कृतीचा नमुनाच वाटेल आणि त्याबद्दल ते पुरंदरेंची प्रशंसाही करतील. आणि नेमके हेच दुर्दैव पुरोगामी महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. पुरंदरेनी अतिशय चाणाक्षपणे या कादंबरीत अशी काही विधाने केली आहेत की सामान्य वाचकाला त्याचा थांगपत्ताही...

गुरुवार, जानेवारी २०, २०११

“आद्य क्रांतिकारक” उमाजी नाईक

उमाजी नाईक....इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात पहिली सशस्त्र क्रांती सुरु करणारा क्रांतिकारक....परंतु बऱ्याच अंशी उपेक्षित.....होय, उमाजी नाईक उपेक्षित क्रांतिकारक आहे....कारण उमाजी नाईक हे रामोशी समाजातील. त्यामुळे त्यांचा खराखुरा इतिहास लिहिण्यापेक्षा लेखणी ज्यांच्या हातात आहे अशा लोकांनी पूर्वग्रह आणि जातीयवाद मनात बाळगून इतिहासाचे लेखन केले. त्यांच्या या उपद्व्यापामुळे उमाजी नाईक सारखे अस्सल हिरो झिरो झाले आणि झिरो हिरो झाले. ही कला अवगत असते ज्याच्या हातात प्रचार-प्रसार माध्यमे असतात त्याला. लोकांना एखादी खोटी गोष्ट सांगितली तर ती पटतेच असे नाही. परंतु एकच खोटे शंभर वेळा खरे म्हणून सांगितले तर लोकांना ते नक्की पटते. ...

सोमवार, जानेवारी १७, २०११

कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वैभव

 कराडच्या  आगशिव डोंगरात कोरलेल्या बौद्ध लेण्या कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसर सुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर'  असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला...

रविवार, जानेवारी १६, २०११

मनातून जात नाही ती जात

जातींची उतरंड कधी नष्ट होणार ? ‘जात नाही ती जात’ असे जरी आपल्या जातीव्यवस्थेबद्दल किंवा जातींबद्दल बोललं जात असलं तरी ते पूर्ण सत्य नाही. ते अर्धसत्य आहे. कारण खरं सत्य आहे ते ‘मनातून जात नाही ती जात’. बऱ्याच वेळा या जाती नकोशा वाटतात. आरक्षणासारखा मुद्दा समोर आला तर मात्र या जातीव्यवस्थेचा (कि जातींचा) फारच तिटकारा यायला लागतो. या जाती नसत्या तर बरे झाले असते असे वाटू लागते. एकसंध समाज निर्माण व्हयला हवा अशी स्वप्ने काही जणांना पडू लागतात. परंतु खरोखर आपण मनातून जाती हद्दपार करू शकतो का ? या प्रश्नाचा प्रामुख्याने विचार करायला हवा. आणि माझातरी असा अनुभव आहे कि वरवर पाहता सर्व जाती-धर्माचे लोक दैनंदिन व्यवहारामध्ये जातीपातीना महत्व देत नाहीत असा भास निर्माण करत असले तरी मनातून मात्र जाती अधिक बळकट केल्या जातात. जातीव्यवस्था बळकट...

शुक्रवार, जानेवारी १४, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. वी. वाले आणि पेपर वाले सांगत होते. त्या सभेचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर दाखवले. पण राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राज ठाकरेच्या सभेला जितकी गर्दी होती त्याच्या पाचपट गर्दी असूनही एकाही प्रसारमाध्यमाने त्यांची दखल घेतली नाही. लेख वाचा 'प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा' ) त्या सभेत राज ठाकरेनी बोलण्याच्या ओघात अतिशय खोटारडे विधान केले. बहुजन समाजातील महामानवांचा सत्य इतिहास दडपून जातीयवादी इतिहास लादण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचे ते विधान म्हणजे उत्तम नमुना होय. ...

सोमवार, जानेवारी ०३, २०११

भारतीयांची ज्ञानाई : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले सामान्यतः समाजातील बहुतांशी लोक कालचक्राप्रमाणे वाहत जातात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. आणि यातच त्यांचे युग प्रवर्तकत्व सामावलेले असते. महात्मा जोतीराव फुले भारताचा इतिहास हा जेवढा पुरुषांच्या उज्वल आणि दैदिप्यमान कारकिर्दीने भरून आणि भारून गेला आहे तेवढाच स्त्रियांच्या सामर्थ्यवान कामगिरीने भारतीय इतिहासाची अनेक सुवर्णपाने रेखाटली आहेत. परंतू आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या कामगिरीला योग्य तो सन्मान अजून मिळालेला नाही. आज भारत २१ व्या शतकात मार्गक्रमण करत आहे. गेल्या दीडशे वर्षात भारताने कमालीची शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती केली आहे. परंतु या शैक्षणिक...

Page 1 of 3712345Next

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes