मी कोण ? मला नेहमी प्रश्न पडतो.
उत्तरच मिळत नाही.
खुप शोधावस वाटतं
पण गणितच जुळत नाही.
नंतर कुणीतरी सांगतं,
नंतर कुणीतरी सांगतं,
की मी आहे एक उपेक्षित माणुस.
कधी धरणग्रस्त, कधी शेतकरी,
तर कधी गिरणी कामगार.
भूमिका कशाही असल्या तरी
प्रत्येक वेळी पदरी उपेक्षाच,
सरकारकडून, समाजाकडून.
परंतु पंखच छाटले जातात.
स्वताच्या हक्कासाठी,
रस्त्यावर यायच,
घरदार बायका मुलं सोडून.
कित्येकानी हुतात्मे व्हायचं,
बाकिच्यानी आश्वासनं झेलायची,
आशा निराशेच्या वादळात जे मिळतं ते घ्यायचं,
तेवढ्यावरच समाधान मानायचं.
कारण मी आहे उपेक्षित माणूस.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ