मी मरतो या मातीसाठी,
आत्मभान विसरून राबराब राबतो,
तरीही पदरी निराशाच,
शेताच्या बांधावर गोफण घेवून,
करतो पिकांची राखण,
पण,
विचारच करवत नाही,
चारही बाजूने कोंडमारा सहन करून,
मी जगतो नव्या उमेदीने.
मी या देशातील दलित, बहुजन शेतकरी,
मला कोणी नाही वाली,
सेझच्या नावाखाली साम्राज्यवादाची टांगती तलवार
आणि,
आणि,
भूमिहीन होण्याची भीती,
उराशी बाळगून,
मी जगतो,
या देशासाठी, या मातीसाठी,
माझ्यासाठी.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा
सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.
-प्रकाश पोळ