
सध्या मराठी बिग बॉस हा कलर्स वाहिनीवरील रिऍलिटी शो खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमात काही स्पर्धकांना ठराविक दिवस एका घरामध्ये बंद करून ठेवलेले असते. त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात आणि त्यातून नामांकन व मतदानाच्या प्रक्रियेने एकेका स्पर्धकाला बाद ठरवले जाते. त्या घरातील स्पर्धकांचा बाहेरील जगाशी काहीही संबंध नसतो. मात्र घरात काय चालुय हे बाहेर सर्व जग पाहू शकते. ...