
लालासाहेब पोळ
आज Father's Day...आयुष्यभर ज्या बापाने खस्ता खाऊन आपणाला वाढवले त्या बापाच्या संघर्ष, त्यागापुढे नतमस्तक होण्याचा दिवस...सकाळीच मोबाईलचे इंटरनेट चालू केले आणि Father's Day चे मेसेज यायला लागले. काळजात चर्रर्र झाले. ज्या दिवशी पप्पा अपघातात गेले तो दिवस आठवला. 5 फेब्रुवारी 2013...आयुष्यातला काळा दिवस...वाटलं नव्हतं कि असं काही होईल...घरून फोन आला आणि ती दुःखद बातमी ऐकून अवसान गळून गेलं. ...