(सदर लेख लिहिताना विश्वाचा यशवंत नायक या मासिकातील एस. एल. अक्कीसागर यांच्या लेखाचा खूप उपयोग झाला.)
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे
सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या
महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय
वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण
व्हायला वेळ लागत नाही....