
महाराजा यशवंतराव होळकर
या भारतभूमीत आपल्या प्राणांची बाजी लावून
देशासाठी लढणारे अनेक वीर जन्माला आले. आपल्या तळपत्या कर्तुत्वाने त्यांनी
दाहीदिशा उजळून टाकल्या. परंतु त्यांच्या पश्चात त्यांचा इतिहास लिहिणाऱ्या
बहुतांश इतिहासकारांनी प्रामाणिक इतिहास लिहिला नाही. खोट्या कथा, काल्पनिक
प्रसंग, पात्रे यांची घुसावाघुसव करत अनेक महामानावांचा इतिहास बिघडवून
टाकला. या महापुरुषांना आणि महान स्त्रियांना जातीच्या चष्म्यातून पाहत त्यांचा
विकृत इतिहास लिहिला. मल्हारराव होळकर या सामान्य धनगराच्या मुलाने स्वकर्तुत्वावर
मोठे राज्य निर्माण केले. अहिल्यामाई होळकर यांनी आपल्या लोककल्याणकारी कामाने
संपूर्ण भारतभर आदर्श राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ घालून दिला आहे. अहिल्यामाई होळकर
यांचे पती खंडेराव हे युद्धात मरण पावले. युद्ध करता करता मरण येवूनही...