बहुजन समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. गुढीपाढवा, दहीहंडी, गणपती उत्सव,
नवरात्री उत्सव, दसरा, दिवाळी असे बहुसंख्य सण-उत्सव बहुजन समाज तन-मन-धनाने साजरा
करीत असतो. या उत्सवांदरम्यान बहुजन समाजाला इतर सर्व गोष्टींचा जवळ-जवळ विसर पडलेला
असतो. सध्या गणपती उत्सवाचे वारे सगळीकडे वाहत आहे. अशा परिस्थितीत गणपतीचे मूळ, गणपती
उत्सव आणि त्यात बहुजन समाजाचा सहभाग यावर थोडक्यात केलेले भाष्य.....
 |
गणपती |
गणपती उत्सव हा बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलेला उत्सव. त्याआधी
गणपतीची पूजा-अर्चा विशेषकरून पेशव्यांच्या दरबारी होत असे. परंतु स्वातंत्र्याचा
लढा ऐन जोमात असताना टिळकांनी गणपती उत्सव सुरु केला. समाजात राष्ट्रीय ऐक्याची
भावना निर्माण व्हावी, समाज उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यावा, त्यांचे प्रबोधन
व्हावे या हेतूने गणेश उत्सव सुरु केला असे सांगण्यात येते. गणेशोत्सव सुरु
करण्यामागे वरील करणे जरी सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र याउलट
परिस्थिती आहे. सध्या तर गणेशोत्सवाला अत्यंत हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सव जवळ आला कि पोलिसांनाही सुरक्षा वाढवावी लागते. या काळात काही ठिकाणी
धार्मिक दंगली घडून येण्याची शक्यताही असते. युवा पिढी बेभान होवून (दारू